तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये मेनू आयटम जोडा, काढून टाका किंवा संपादित करा
तुमच्या स्टोअरचे मेनू तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअर आणि ग्राहक खात्यांच्या मेनूमध्ये मेनू आयटम्स जोडू शकता. मेनू आयटम्स हे उत्पादने, संग्रह, वेबपेजेस, ब्लॉग पोस्ट्स, धोरणे, ग्राहक खाते पेजेस किंवा इतर वेबसाइट्सच्या लिंक्स असतात. तुम्ही मेनू आयटम्स काढून टाकू किंवा संपादितदेखील करू शकता.
बहुतांश प्रकरणांमध्ये, तुम्हाला एखाद्या आयटमला लिंक करण्यापूर्वी तो तयार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, तुम्हाला तो मेनूमध्ये जोडण्यापूर्वी संग्रह तयार करणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या स्टोअरच्या मेनूमध्ये वापरत असलेला स्रोत हटवल्यास, कोणतेही संबंधित मेनू आयटम्सदेखील हटवले जातात. उदाहरणार्थ, तुम्ही सेलवर असलेल्या मेनू आयटमसाठी वापरत असलेला संग्रह हटवल्यास, संग्रह आणि मेनू आयटम दोन्ही हटवले जातात.
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील आशय > मेनू वरून तुमचे ऑनलाइन स्टोअर मेनू पाहू शकता आणि बदलू शकता.
मेनू आयटम जोडा
तुम्ही खालील लिंक प्रकारांसाठी मेनू आयटम्स जोडू शकता:
| लिंक प्रकार | वर्णन |
|---|---|
| होम पेज | तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे होम पेज |
| शोध | तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे शोध पेज |
| संग्रह | विशिष्ट संग्रह किंवा सर्व संग्रह |
| उत्पादने | विशिष्ट उत्पादन किंवा सर्व उत्पादने |
| पृष्ठे | तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील वेबपेज |
| ब्लॉग्स | तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील ब्लॉग |
| ब्लॉग पोस्ट | तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील विशिष्ट ब्लॉग पोस्ट |
| धोरणे | तुमच्या स्टोअरच्या धोरणांपैकी एक |
| ग्राहक खाती | खालीलपैकी कोणत्याही ग्राहक खात्यांच्या पेजेसची लिंक:
|
| बाह्य पेज | बाह्य वेबसाइटचा वेबसाइट अॅड्रेस, जो तुम्ही पेज शोधा किंवा URL पेस्ट करा फील्डमध्ये जोडू शकता. URL जोडताना, ड्रॉपडाउनमध्ये गंतव्यस्थान दिसेपर्यंत प्रतीक्षा करा आणि ते निवडा. ड्रॉपडाउनमधून न निवडता URL पेस्ट केल्यानंतर Enter दाबल्यास किंवा सेव्ह केल्यास लिंक जोडली जाणार नाही आणि त्यामुळे अवैध URL एरर येऊ शकते. Shopify ने फसव्या म्हणून ओळखलेल्या बाह्य वेबसाइटच्या लिंक लिंक संरक्षण द्वारे ब्लॉक केल्या जातात. |
| ईमेल लिंक | ईमेल लिंक तयार करण्यासाठी, एखादे पेज शोधा किंवा URL पेस्ट करा फील्डमध्ये mailto:youremail@example.com हे फॉरमॅट वापरा. |
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, आशय > मेनू वर जा.
मेनू पेजवर, तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या मेनूच्या शीर्षकावर क्लिक करा.
मेनू आयटम जोडा वर क्लिक करा.
मेनू आयटमसाठी नाव प्रविष्ट करा. हे नाव मेनूमध्ये दिसते आणि यामध्ये विशेष वर्णांचा किंवा इमोजींचा समावेश असू शकतो.
लिंक शोधा किंवा पेस्ट करा फील्डवर क्लिक करा आणि त्यानंतर बाह्य वेबसाइटसाठी वेबसाइट पत्ता प्रविष्ट करा, किंवा लिंकचा प्रकार निवडा.
तुम्ही एखादा विशिष्ट संग्रह निवडल्यास, तुम्ही प्रविष्ट केलेल्या सर्व टॅगशी जुळणारी उत्पादनेच प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही टॅगसह संग्रह फिल्टर करू शकता.
तुम्ही उत्पादने किंवा पृष्ठे यांसारखा लिंक प्रकार निवडल्यास, विशिष्ट गंतव्यस्थान निवडा. तुम्ही होम पेज निवडल्यावर, गंतव्यस्थान आपोआप तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या होम पेजवर सेट केले जाते.
तुम्ही लिंक प्रकार आणि विशिष्ट गंतव्यस्थान निवडता, तेव्हा तुम्ही आधीच नाव प्रविष्ट केलेले नसल्यास गंतव्यस्थानाचे नाव, जसे की उत्पादन शीर्षक किंवा पेज शीर्षक नाव फील्डमध्ये आपोआप भरले जाते.
तुमचा मेनू आयटम जोडण्यासाठी जोडा वर क्लिक करा.
सेव्ह करा किंवा मेनू सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाइल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
आशय मेनूमध्ये,
आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर मेनू वर टॅप करा.
मेनू पेजवर, तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या मेनूच्या शीर्षकावर टॅप करा.
मेनू आयटम जोडा वर टॅप करा.
मेनू आयटमसाठी नाव प्रविष्ट करा. हे नाव मेनूमध्ये दिसते आणि यामध्ये विशेष वर्णांचा किंवा इमोजींचा समावेश असू शकतो.
लिंक शोधा किंवा पेस्ट करा फील्डवर टॅप करा आणि त्यानंतर बाह्य वेबसाइटसाठी वेबसाइट पत्ता प्रविष्ट करा, किंवा लिंकचा प्रकार निवडा.
तुम्ही एखादा विशिष्ट संग्रह निवडल्यास, तुम्ही प्रविष्ट केलेल्या सर्व टॅगशी जुळणारी उत्पादनेच प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही टॅगसह संग्रह फिल्टर करू शकता.
तुम्ही उत्पादने किंवा पृष्ठे यांसारखा लिंक प्रकार निवडल्यास, विशिष्ट गंतव्यस्थान निवडा. तुम्ही होम पेज निवडल्यावर, गंतव्यस्थान आपोआप तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या होम पेजवर सेट केले जाते.
तुम्ही लिंक प्रकार आणि विशिष्ट गंतव्यस्थान निवडता, तेव्हा तुम्ही आधीच नाव प्रविष्ट केलेले नसल्यास गंतव्यस्थानाचे नाव, जसे की उत्पादन शीर्षक किंवा पेज शीर्षक नाव फील्डमध्ये आपोआप भरले जाते.
तुमचा मेनू आयटम जोडण्यासाठी जोडा वर टॅप करा.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
मेनू आयटम संपादित करा
तुमचे मेनू संपादित करताना, जोडा, संपादित करा, हटवा आणि हलवा यांसारखी प्रत्येक कृती बदल म्हणून मोजली जाते. तुम्ही 200 बदल पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या मेनूमधील बदल सेव्ह करेपर्यंत पुढील कृतींवर निर्बंध लादला जातो. सेव्ह करा बटणावर क्लिक केल्याने किंवा टॅप केल्याने काउंटर रीसेट होतो. तुम्ही बदल करण्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचणार नाही, याची खात्री करण्यासाठी तुमच्या मेनूचे बदल वारंवार सेव्ह करा.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, आशय > मेनू वर जा.
आयटमचा समावेश असलेल्या मेनूच्या नावावर क्लिक करा.
मेनू आयटम विभागामध्ये, आयटमच्या नावाजवळील संपादित करा वर क्लिक करा.
कोणतेही बदल करा:
- मेनू आयटमचे नाव बदलण्यासाठी, नाव फील्डमध्ये मजकूर प्रविष्ट करा.
- मेनू आयटमचे गंतव्यस्थान बदलण्यासाठी, लिंक फील्डच्या पुढील
xवर क्लिक करा आणि त्यानंतर नवीन गंतव्यस्थान प्रविष्ट करा किंवा निवडा.
बदल लागू करा वर क्लिक करा.
सेव्ह करा किंवा मेनू सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाइल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
आशय मेनूमध्ये,
आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर मेनू वर टॅप करा.
आयटमचा समावेश असलेल्या मेनूच्या नावावर टॅप करा.
मेनू आयटम विभागामध्ये, आयटमच्या नावाजवळील संपादित करा वर टॅप करा.
कोणतेही बदल करा:
- मेनू आयटमचे नाव बदलण्यासाठी, नाव फील्डमध्ये मजकूर प्रविष्ट करा.
- मेनू आयटमचे गंतव्यस्थान बदलण्यासाठी, लिंक फील्डच्या पुढील
xवर टॅप करा आणि त्यानंतर नवीन गंतव्यस्थान प्रविष्ट करा किंवा निवडा.
बदल लागू करा वर टॅप करा.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
मेनू आयटमचा डिस्प्ले क्रम बदला
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील आशय > मेनू वरून मेनू आयटमचा डिस्प्ले क्रम पाहू शकता. तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर मेनू आयटम ते सूचीबद्ध केलेल्या क्रमाने प्रदर्शित होतात.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, आशय > मेनू वर जा.
तुम्हाला ज्या मेनूचा क्रम बदलायचा आहे त्याच्या शीर्षकावर क्लिक करा.
मेनू आयटमजवळील हँडल आयकनवर (⠿) क्लिक करा आणि धरून ठेवा आणि त्यानंतर मेनू आयटम दुसऱ्या स्थानावर ड्रॅग करा.
सेव्ह करा किंवा मेनू सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाइल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
आशय मेनूमध्ये,
आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर मेनू वर टॅप करा.
तुम्हाला ज्या मेनूचा क्रम बदलायचा आहे त्याच्या शीर्षकावर टॅप करा.
मेनू आयटमजवळील हँडल आयकनवर (⠿) टॅप करा आणि धरून ठेवा आणि त्यानंतर मेनू आयटम दुसऱ्या स्थानावर ड्रॅग करा.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
मेनू आयटम काढून टाका
मेनू आयटमला तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या मेनूमधून हटवण्यासाठी तुम्ही तो काढून टाकू शकता. ज्या मेनू आयटमच्या खाली ड्रॉप-डाउन मेनूमध्ये नेस्ट केलेले आयटम आहेत असा मेनू आयटम तुम्ही काढून टाकल्यास, ते नेस्टेड मेनू आयटमदेखील काढून टाकले जातात आणि ड्रॉप-डाउन मेनू तुमच्या ऑनलाइन स्टोअर मेनूमधून काढून टाकला जातो.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, आशय > मेनू वर जा.
तुम्हाला हटवायच्या असलेल्या मेनू आयटमच्या ओळीवर होव्हर करा आणि त्यानंतर ट्रॅश आयकनवर क्लिक करा.
खात्री करण्यासाठी काढून टाका वर क्लिक करा.
सेव्ह करा किंवा मेनू सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाइल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
आशय मेनूमध्ये,
आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर मेनू वर टॅप करा.
तुम्हाला जो मेनू आयटम काढून टाकायचा आहे, त्याजवळील हटवा वर टॅप करा.
खात्री करण्यासाठी काढून टाका वर टॅप करा.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.