मेनू समजून घेणे
तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टोअर सेट करता, तेव्हा ग्राहकांना तुमची उत्पादने आणि तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती कशी मिळावी याचा विचार करा. यामुळे तुम्हाला तुमच्या ऑनलाइन स्टोअर मेनूबाबत आणि तुमचे मेनू कसे सेट करायचे याबाबत निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.
डीफॉल्ट मेनू
तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये प्रत्येक पेजवर दिसणारे दोन डीफॉल्ट मेनू असतात: मुख्य मेनू आणि फूटर मेनू. तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या डीफॉल्ट मेनूमध्ये मेनू आयटम जोडू, काढू किंवा संपादित करू शकता.
तुम्ही ग्राहक खाती वापरल्यास, डीफॉल्टनुसार तुमच्या स्टोअरवर ग्राहक खाते मुख्य मेनूदेखील समाविष्ट केला जातो.
तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या डीफॉल्ट मेनूमध्ये मेनू आयटम जोडू, काढू किंवा संपादित करू शकता. सर्व मेनूंमध्ये उत्पादने, संग्रह, वेबपेज, ब्लॉग पोस्ट आणि ग्राहक खाते पेजेस यांसारख्या ऑनलाइन पेजेसचा तसेच इतर वेबसाइट्सच्या लिंक्सचा समावेश असू शकतो. तुम्ही तुमच्या मुख्य मेनू आणि ग्राहक खाते मेनूमध्ये ड्रॉप-डाउन मेनूदेखील तयार करू शकता.
मुख्य मेनू
मुख्य मेनू तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या प्रत्येक पेजवर दिसतो. मुख्य मेनू सहसा हेडरच्या रुंदीमध्ये आयटम्स म्हणून किंवा साइडबारमध्ये आयटम्सची सूची म्हणून दिसतो. तुमची उत्पादने आणि तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती (जसे की, “आमच्याबद्दल” पेज) शोधण्यासाठी ग्राहक तुमचा मुख्य मेनू पाहू शकतो.
तुमच्या मुख्य मेनूमध्ये खालील दोन डीफॉल्ट मेनू आयटम्स आहेत:
- होम: तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे मुख्य पेज
- कॅटलॉग: तुमची सर्व उत्पादने दाखवणारे पेज
फूटर मेनू
फूटर मेनू सहसा फूटरच्या रुंदीमध्ये आयटम्स म्हणून दिसतो. तुमच्या स्टोअरच्या धोरणांबद्दल आणि संपर्क माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी एखादा ग्राहक तुमचा फूटर मेनू पाहू शकतो.
ग्राहक खाते मेनू
ग्राहक खाते मुख्य मेनू तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर, तसेच तुम्ही तुमचे ग्राहक खाते हेडर वापरता अशा कोणत्याही ठिकाणी (जसे की, मोबाइल ॲप) दिसतो. तुमचे ग्राहक खाते मेनू सानुकूलित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
इतर मेनू
तुमच्या स्टोअरच्या थीमनुसार, थीमच्या Header विभागातील सेटिंग्ज संपादित करून तुम्ही एक नवीन मेनू जोडू शकाल. तुमची थीम थीम सेटिंग्ज संपादित करून नवीन मेनू जोडण्याची अनुमती देत नसल्यास, तुम्ही नवीन मेनू जोडण्यासाठी तुमचा थीम कोड सानुकूलित करू शकता. तुमच्यासाठी बदल करण्यासाठी तुम्ही Shopify पार्टनरलाही नियुक्त करू शकता. Shopify पार्टनरला नियुक्त करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
वेगवेगळ्या थीममधील मेनूची तुलना करणे
प्रत्येक थीमचे डिझाइन वेगळे असते, त्यामुळे तुमचे मेनू वेगवेगळ्या थीमवर वेगळ्या प्रकारे दिसू शकतात.
डेमोसाठी, Shopify Theme Store मधील कोणत्याही थीमवर जा आणि View Demo वर क्लिक करा.
तुमच्या मेनूमधील समस्यांचे ट्रबलशूटिंग करणे
अनेक घटकांमुळे मेनूच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मेनू योग्य प्रकारे कॉन्फिगर केलेला असल्याची आणि कोणत्याही विसंगतीच्या समस्या नसल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या अॅडमिन आणि थीमच्या खालील भागांचे पुनरावलोकन करा:
- लिंक आणि लिंकचा प्रकार बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी मेनू आयटमचे पुनरावलोकन करा.
- लिंक योग्य प्रकारे सेट केलेली असल्याची खात्री करा. तुम्ही सब-मेनू लिंक करत असल्यास, तुम्हाला लिंकचा प्रकार अॅडजस्ट करावा लागेल किंवा कोणतेही अनावश्यक नेस्टिंग काढावे लागेल.
- तुम्ही जो प्रकारचा मेनू तयार करण्याचा प्रयत्न करत आहात त्याला तुमची थीम अनुमती देत असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुम्ही मल्टी-लेव्हल ड्रॉप-डाउन मेनू तयार करत असल्यास, तुमच्या थीमने त्या मेनू प्रकाराला सपोर्ट करणे आवश्यक आहे.
- योग्य मेनू लिंक केलेला असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या थीम सेटिंग्जचे पुनरावलोकन करा.
- तुमच्या थीममध्ये असा कोणताही कस्टम कोड नसल्याची खात्री करा ज्यामुळे मेनू समस्या निर्माण होत आहेत. कोडमुळे संघर्ष निर्माण होत आहे याची चाचणी घेण्यासाठी तुम्ही तुमचा थीम कोड मागील आवृत्तीवर परत नेऊ शकता.
- तुमचे अॅप्स तुमच्या मेनूला अॅपमधील मेनूने ओव्हरराइड करत नसल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या अॅप्सचे पुनरावलोकन करा.
नॅव्हिगेशनच्या सामान्य समस्या
मेनूमधील बदल स्टोअरफ्रंटवर दिसत नाहीत
तुमच्या अॅडमिनमधील मेनू बदल तुमच्या स्टोअरफ्रंटवर दिसत नसल्यास, या भागांचे पुनरावलोकन करा:
थीम मेनू सेटिंग्ज: तुमची थीम योग्य मेनू वापरत असल्याची पडताळणी करा. निवडलेला मेनू तुम्ही संपादित करत असलेल्या मेनूशी जुळत असल्याची पुष्टी करण्यासाठी Header आणि Footer विभागांमधील तुमच्या थीम सेटिंग्ज तपासा.
मेनू अॅप्स: नॅव्हिगेशन अॅप्स (जसे की, “Mega Menu” अॅप्स) तुमचे अॅडमिन मेनू सेटिंग्ज वापरण्याऐवजी अॅपमध्येच मेनू तयार करतात. तुम्ही मेनू अॅप इंस्टॉल केले असल्यास, अॅप सेटिंग्ज अपडेट करा किंवा तुमचे डीफॉल्ट नॅव्हिगेशन वापरण्यासाठी अॅप अनइंस्टॉल करा.
जुनी नॅव्हिगेशन रचना: नेस्टेड नॅव्हिगेशन उपलब्ध होण्यापूर्वी तयार केलेल्या स्टोअर्सना मेनूची पुनर्रचना करण्याची आवश्यकता असू शकते. वेगळ्या मेनूंना लिंक करण्याऐवजी वर्तमान नेस्टेड फॉरमॅट वापरून तुमचे मेनू पुन्हा तयार करण्याचा विचार करा.
थीम सुसंगततेच्या समस्या
थीम मल्टीलेव्हल नॅव्हिगेशनला सपोर्ट करत नाही
थीमच्या काही जुन्या आवृत्त्या मल्टीलेव्हल (तीन किंवा अधिक लेव्हल) ड्रॉप-डाउन मेनूंना सपोर्ट करत नाहीत. तुमचे नेस्टेड मेनू योग्य प्रकारे दिसत नसल्यास, तुमच्या थीमला अपडेट करण्याची आवश्यकता असू शकते. सर्व Online Store 2.0 थीम मल्टीलेव्हल नॅव्हिगेशनला सपोर्ट करतात, परंतु जुन्या सेक्शन थीम्सना एकाधिक मेनू लेव्हल्सना सपोर्ट करण्यासाठी अपडेट्सची आवश्यकता असू शकते.