SimGym

तुमच्या थीममधील बदल प्रकाशित करण्यापूर्वी AI खरेदीदारांसह तुमच्या ऑनलाइन स्टोअरची चाचणी करण्यासाठी, तुम्ही Shopify चे अ‍ॅप SimGym वापरू शकता. AI खरेदीदार खऱ्या ग्राहकांप्रमाणेच वागतात: ते संग्रह ब्राउझ करतात, उत्पादने पाहतात, त्यांच्या कार्टमध्ये आयटम जोडतात आणि त्यांचे अनुभव सांगतात.

तुम्ही एका थीमची चाचणी करू शकता, किंवा AI खरेदीदार कोणत्या थीमवर त्यांच्या कार्टमध्ये उत्पादने जोडण्याची अधिक शक्यता असते, हे शोधण्यासाठी दोन थीमची तुलना करू शकता. सिम्युलेशन पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक शिफारशीमागील खरेदीदार अभिप्रायासह तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये कोणते बदल करायचे याबाबत शिफारसी मिळतात.

पात्रता

SimGym वापरण्यासाठी, तुमचे स्टोअर खालील आवश्यकता पूर्ण करत असणे आवश्यक आहे:

  • तुमचे स्टोअर Liquid स्टोअरफ्रंट वापरते. Hydrogen आणि हेडलेस स्टोअरफ्रंट्स समर्थित नाहीत.
  • तुमच्या स्टोअरमध्ये Shopify Network Intelligence (SNI) सक्रिय आहे.
  • काही डेव्हलपमेंट स्टोअरप्रमाणे तुमचे ऑनलाइन स्टोअर कायमस्वरूपी पासवर्ड पेज वापरत नाही. प्रायव्हेट मोड मधील स्टोअर अद्याप विनामूल्य चाचणीसह सिम्युलेशन रन करू शकतात.
  • तुमच्या स्टोअरचा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह आहे.
  • तुमच्या स्टोअरमध्ये किमान एक उत्पादन आहे, जे ऑनलाइन स्टोअर विक्री चॅनेलवर प्रकाशित केलेले आहे, ते गिफ्ट कार्ड नाही आणि त्याची किंमत शून्यापेक्षा अधिक आहे.

तुमचे स्टोअर या आवश्यकता पूर्ण करत नसल्यास, तुम्ही नवीन सिम्युलेशन का सुरू करू शकत नाही हे SimGym स्पष्ट करते. इनॅक्टिव्ह प्लॅन, डिएक्टिव्हेट केलेले SNI किंवा कोणतीही पात्र उत्पादने नसतील, तर तुम्ही ही समस्या कुठे सोडवू शकता याची लिंक एका बॅनरवर दिली जाते. तुमचे ऑनलाइन स्टोअर कायमस्वरूपी पासवर्ड पेज वापरत असल्यास, तुम्ही SimGym चा कोणताही भाग वापरू शकत नाही.

मर्यादा आणि विचारात घेण्यासारख्या गोष्टी

खरेदीदाराच्या वर्तनाचे अनुकरण करण्यासाठी SimGym वापरताना खालील मर्यादांचा विचार करा:

  • थीम तुलनांसाठी किमान एक मसुदा थीम असणे आवश्यक आहे.
  • विद्यमान उत्पादने आणि सामग्री असलेल्या स्टोअर्ससाठी सिम्युलेशन्स सर्वोत्तम काम करतात.
  • सिम्युलेशन AI खरेदीदारांचा वापर करतात जे ग्राहकांच्या वर्तनाची नक्कल करतात, पण तुमचे प्रत्यक्ष ग्राहक कसे वागतात यावरून परिणामांमध्ये फरक असू शकतो.
  • बॉट संरक्षण किंवा ट्रॅफिक मर्यादा AI खरेदीदारांना तुमच्या स्टोअरफ्रंटमध्ये प्रवेश करण्यापासून ब्लॉक करू शकतात आणि त्यांचा खरेदीचा प्रवास अपूर्ण राहू शकतो.

किंमत

SimGym मध्ये एक मासिक भत्ता समाविष्ट असतो, जो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी रिन्यू होतो. न वापरलेली सिम्युलेशन्स पुढील महिन्यात कॅरी ओव्हर केली जात नाहीत.

संपूर्ण खरेदीचा प्रवास, उत्पादन शोध, किंवा कार्टमध्ये-जोडण्याविषयी आत्मविश्वास टेस्ट फोकस असणारी सिम्युलेशन सिंगल-थीम सिम्युलेशन असतात. थीम तुलना सामान्यतः एका-थीम सिम्युलेशनपेक्षा तुमचा दुप्पट मासिक भत्ता वापरते.

तुम्ही तुमची मासिक वापर मर्यादा गाठल्यानंतर, तुम्ही या किमतींवर सिम्युलेशन चालवणे सुरू ठेवू शकता:

  • सिंगल-थीम सिम्युलेशन्स: $0.75 USD
  • थीमची तुलना: $1.50 USD

सशुल्क सिम्युलेशन सुरू होण्यापूर्वी SimGym अचूक किंमत दाखवते. सुरू ठेवण्यासाठी तुम्ही किंमत मंजूर करू शकता किंवा कोणतेही शुल्क न भरता रद्द करू शकता.

SimGym प्रथम कोणताही उपलब्ध मासिक भत्ता वापरते. जेव्हा अतिरिक्त सशुल्क सिम्युलेशन यशस्वीरित्या पूर्ण होते तेव्हाच तुमच्या Shopify बिल वर शुल्क आकारले जाते.

तुम्ही सुरू करण्यापूर्वी

तुम्ही SimGym वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुमचे स्टोअर खालील आवश्यकता पूर्ण करत असल्याची खात्री करा:

  • तुमच्या स्टोअरमध्ये किमान एक उत्पादन आहे, जे पात्रतेच्या आवश्यकता पूर्ण करते.
  • थीम तुलनांसाठी, तुमच्या स्टोअरमध्ये प्रकाशित थीम व्यतिरिक्त किमान एक मसुदा थीम आहे.

SimGym इंस्टॉल करणे

तुमच्या स्टोअरवर AI खरेदीदारांचे सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Shopify App Store वरून SimGym इंस्टॉल करा.

पायऱ्या:

  1. Shopify App Store वरून SimGym अ‍ॅप इंस्टॉल करा.
  2. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, अ‍ॅप्स > SimGym वर जा.
  3. सिम्युलेशन्स तयार करण्यास सुरुवात करा.

सिम्युलेशन्स

सिम्युलेशन हे एक सत्र आहे जिथे AI खरेदीदार तुमच्या स्टोअरशी संवाद साधतात. तुम्ही सिम्युलेशन तयार करता तेव्हा, तुम्ही पुढीलपैकी एक टेस्ट फोकस पर्याय निवडू शकता:

  • संपूर्ण खरेदीचा प्रवास: अडचणीचे मुख्य मुद्दे शोधण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या स्टोअरची चाचणी करा.
  • उत्पादन शोध: तुमचे होम पेज आणि संग्रह ब्राउझ केल्याने AI खरेदीदार संबंधित उत्पादनापर्यंत पोहोचतात का, याची चाचणी घ्या.
  • कार्टमध्ये-जोडण्याविषयी आत्मविश्वास: तुमच्या उत्पादनाचा तपशील AI खरेदीदारांना खरेदी करण्यासाठी आत्मविश्वास देतो की नाही, याची चाचणी घ्या.
  • थीमची तुलना: दोन थीमची तुलना कशी होते हे शोधण्यासाठी समान AI खरेदीदारांसह दोन थीमची चाचणी करा.

सिम्युलेशन्ससाठी सामान्य युझ केसेस

SimGym सिम्युलेशन्ससाठी या सामान्य युझ केसेसचे पुनरावलोकन करा:

  • थीममधील बदल: तुमची प्रकाशित थीम नवीन थीम प्रकाशित करण्यापूर्वी तिच्याशी तुलना करा. SimGym साठी ही प्राथमिक युज केस आहे.
  • हंगामी अपडेट्स: मोहीम लॉन्च करण्यापूर्वी हॉलिडे थीम किंवा प्रचारात्मक लेआउटची चाचणी घ्या.
  • स्टोअर नॅव्हिगेशन: वेगवेगळ्या थीम-आधारित मेनू संरचना किंवा संग्रह संस्थेची तुलना करा.
  • स्टोअर ऑडिट: तुलना सेट न करता तुमच्या सध्याच्या स्टोअरफ्रंटचे सविस्तर पुनरावलोकन मिळवण्यासाठी संपूर्ण खरेदीचा प्रवास सिम्युलेशन रन करा.
  • मसुदा थीमचे पुनरावलोकन: समस्या लवकर शोधण्यासाठी मसुदा थीम प्रकाशित करण्यापूर्वी तिची चाचणी घ्या.
  • केंद्रीत केलेला अभिप्राय: AI खरेदीदार उत्पादने कशी शोधतात किंवा ती खरेदी करण्याचा निर्णय कसा घेतात, यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्पादन शोध किंवा कार्टमध्ये-जोडण्याविषयी आत्मविश्वास टेस्ट फोकसचा वापर करा.
  • आधी-आणि-नंतर: तुमच्या सध्याच्या थीमवर सिम्युलेशन रन करा, बदल करा आणि त्यानंतर अनुभव सुधारला आहे का हे सांगण्यासाठी दुसरे सिम्युलेशन रन करा.

यशस्वी सिम्युलेशन्ससाठी टिप्स

तुमची सिम्युलेशन्स सुधारण्यासाठी या टिप्सचा विचार करा:

  • एका वेळी एकाच बदलाची चाचणी घ्या: यामुळे खरेदीदाराच्या वर्तनात कोणतेही फरक कशामुळे आले हे समजणे सोपे होते.
  • वैयक्तिक खरेदीदारांचे पुनरावलोकन: शिफारशीमागील खरेदीदार अभिप्राय आणि सत्र रिप्ले वाचण्यासाठी आणि वर्तनाचे पॅटर्न समजून घेण्यासाठी निष्कर्ष पहा चा वापर करा.
  • मोठे बदल करण्यापूर्वी चाचणी करा: तुमच्या प्रकाशित थीममध्ये महत्त्वपूर्ण अपडेट लागू करण्यापूर्वी सिम्युलेशन रन करा.

सिम्युलेशन रन करणे

टेस्ट फोकस आणि चाचणी करण्यासाठी थीम निवडून सिम्युलेशन तयार करा. एका-थीम सिम्युलेशनला सहसा त्याच्या टेस्ट फोकस आणि थीमवरून नाव दिले जाते, जसे की संपूर्ण खरेदीचा प्रवास: Dawn. थीम तुलना दोन्ही थीमवरून नाव दिले जाते. तुम्ही सिम्युलेशन तयार केल्यानंतर त्याचे नाव बदलू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, अ‍ॅप्स > SimGym वर जा.

  2. तुम्ही याआधी सिम्युलेशन रन केले असल्यास, सिम्युलेशन तयार करा वर क्लिक करा. हे तुमचे पहिले सिम्युलेशन असल्यास, SimGym होम पेजवर सुरू ठेवा.

  3. टेस्ट फोकस विभागामध्ये, संपूर्ण खरेदीचा प्रवास, उत्पादन शोध, कार्टमध्ये-जोडण्याविषयी आत्मविश्वास किंवा थीम तुलना निवडा.

  4. चाचणी करण्यासाठी थीम निवडा:

    • सिंगल-थीम सिम्युलेशनसाठी, चाचणीसाठी थीम विभागामध्ये तुमची प्रकाशित थीम निवडलेली आहे. त्याऐवजी मसुदा थीम ची चाचणी करण्यासाठी, निवडलेली थीम बदला.
    • थीम तुलनेसाठी, तुमची प्रकाशित थीम थीम 1 म्हणून निवडलेली आहे. थीम 2 रिक्त असल्यास, मसुदा थीम निवडा. वेगळ्या थीमची तुलना करण्यासाठी, कोणतीही थीम बदला. थीम 2 मसुदा थीम असणे आवश्यक आहे.
  5. सिम्युलेशन रन करा वर क्लिक करा.

सिम्युलेशन दरम्यान, तुमच्या स्टोअरफ्रंटचा अ‍ॅनिमेटेड पूर्वावलोकन प्रदर्शित केले जाते. सिम्युलेशनसाठी सहसा 1-5 मिनिटे लागतात. तुम्ही पेज सोडू शकता. जेव्हा सिम्युलेशन यशस्वीरित्या पूर्ण होते, तेव्हा तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये परिणामांच्या लिंकसह एक सूचना मिळते.

सिम्युलेशन विश्लेषण पाहणे

तुमचे सिम्युलेशन पूर्ण झाल्यानंतर, AI खरेदीदारांनी तुमच्या स्टोअरशी कसा संवाद साधला आणि काय बदलावे हे समजून घेण्यासाठी तुम्ही विश्लेषणाचे पुनरावलोकन करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, अ‍ॅप्स > SimGym वर जा.

  2. विश्लेषण पाहण्यासाठी पूर्ण झालेल्या सिम्युलेशनवर क्लिक करा.

  3. पर्यायी: शिफारशीमागील खरेदीदार अभिप्रायाचे पुनरावलोकन करण्यासाठी, शिफारसीवर क्लिक करा आणि त्यानंतर निष्कर्ष पहा वर क्लिक करा.

सिंगल-थीम सिम्युलेशनच्या परिणामांमध्ये पुढील विभागांचा समावेश आहे:

  • मुख्य निष्कर्ष: हा विभाग सिम्युलेशनमधील सर्वात महत्त्वाचा परिणाम स्पष्ट करतो.
  • स्टोअरफ्रंट स्क्रीनशॉट्स: या विभागात शिफारसी लागू असलेल्या पेजच्या स्क्रीनशॉटचा समावेश आहे, जेव्हा स्क्रीनशॉट उपलब्ध असतात. स्क्रीनशॉटवरील क्रमांकित मार्कर क्रमांकित शिफारसींशी जुळतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक बदल कुठे लागू होतो हे शोधू शकता.
  • शिफारसी: Shopify चा AI-संचलित वाणिज्य सहाय्यक Sidekick AI खरेदीदारांच्या अभिप्रायाच्या आधारे तुमच्या स्टोअरमध्ये करता येतील असे ठोस बदल सुचवतो.

थीम तुलनाचे परिणाम एका थीमवर AI खरेदीदार अधिक प्रमाणात कार्टमध्ये जोडण्याची शक्यता आहे की दोन्ही थीमवर समान प्रमाणात कार्टमध्ये जोडले गेले, या सारांश ने सुरू होतात. Sidekick प्रत्येक थीमसाठी शिफारसी देखील लिहिते, ज्या थीमच्या होम पेजच्या स्क्रीनशॉटच्या बाजूला सूचीबद्ध केल्या जातात, जेव्हा एक उपलब्ध असतो.

जेव्हा तुम्ही शिफारशीवर निष्कर्ष पहा वर क्लिक करता, तेव्हा त्या समस्येचा सामना करणाऱ्या AI खरेदीदारांची त्यांच्या अनुभवाच्या सारांशासह सूची दिली जाते. तुम्ही खरेदीदाराचा सत्र रिप्ले प्ले करू शकता, आणि रिप्लेमधील त्या क्षणावर जाण्यासाठी खरेदीदाराच्या विचाराच्या टाइमस्टॅम्पवर क्लिक करू शकता.

तुम्ही शिफारसी उपयुक्त होत्या की नाही हे रेट करू शकता आणि टिप्पणी जोडू शकता.

SimGym च्या सध्याच्या आवृत्तीपूर्वी पूर्ण झालेली सिम्युलेशन त्यांचे मूळ निकाल लेआउट कायम ठेवतात.

सिम्युलेशन्स व्यवस्थापित करणे

तुमची सिम्युलेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी ही सेटिंग्ज वापरा:

  • सिम्युलेशन इतिहास पहा: SimGym होम पेजवर सर्व मागील सिम्युलेशन आणि त्यांचे विश्लेषण पहा. सिम्युलेशन शोधण्यासाठी, सिम्युलेशन शोधा फील्डमध्ये त्याचे नाव टाका.
  • सिम्युलेशनचे नाव बदला: सिम्युलेशन उघडा, कृती > नाव बदला वर क्लिक करा, नवीन नाव प्रविष्ट करा आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.
  • सिम्युलेशन हटवा: पूर्ण झालेले सिम्युलेशन उघडा, कृती > हटवा वर क्लिक करा आणि त्यानंतर सिम्युलेशन हटवा वर क्लिक करा. चालू असलेले सिम्युलेशन थांबवण्यासाठी, ते त्याच्या प्रगती पेजवरून हटवा.

AI खरेदीदाराचा अभिप्राय समजून घेणे

सिम्युलेशन दरम्यान खरेदीदारांना काय आढळले याचे वर्णन AI खरेदीदार अभिप्राय करतो. प्रत्येक शिफारशीमागील खरेदीदार सारांश आणि सत्र रिप्लेसाठी, सिम्युलेशन विश्लेषण पाहणे चा संदर्भ घ्या.

अनेक खरेदीदारांमधील पॅटर्न ओळखण्यासाठी या अभिप्रायाचा वापर करा. अनेक खरेदीदारांनी समान समस्यांची नोंद केल्यास, त्या भागांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते. शिफारशीवर कार्यवाही करण्यासाठी, AI खरेदीदारांनी चिन्हांकित केलेल्या भागांचे निराकरण करण्याकरिता तुम्ही तुमची थीम संपादित करू शकता.