Shopify Search & Discovery सह उत्पादन शिफारसी सानुकूलित करा
काही थीम्समध्ये शिफारस केलेली उत्पादने विभाग असतात जे ग्राहकांना तुमच्या उत्पादन पेजेसवर पूरक आणि संबंधित उत्पादने दाखवतात. या शिफारसी Shopify Search & Discovery ॲप वापरून सानुकूलित केल्या जाऊ शकतात.
तुमच्या स्टोअरवर उत्पादन शिफारसी दाखवण्यासाठी, तुम्हाला अशी थीम वापरावी लागेल ज्यामध्ये पूरक उत्पादने विभाग आणि उत्पादन शिफारसी विभाग समाविष्ट असेल आणि नंतर तो विभाग तुमच्या उत्पादन पेजेसवर जोडावा लागेल.
या पेजवर
उत्पादन शिफारसीच्या आवश्यकता
खालील निकष पूर्ण झाले तरच शिफारस केलेले उत्पादन उत्पादन पेजवर दिसते:
- ते विकले गेलेले नसावे (संबंधित उत्पादनांसाठी, स्टॉकमध्ये नसतानाही विक्री करणे सुरू ठेवा सक्रिय केले असल्यास उत्पादन दिसू शकते; पूरक उत्पादनांसाठी, उत्पादनाची इन्व्हेंटरी 0 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे).
- त्याला अनलिस्ट केलेले उत्पादन स्थिती नसावी.
- त्याची किंमत $0.00 पेक्षा जास्त असावी.
- ते गिफ्ट कार्ड नसावे.
- ते तुमच्या ऑनलाइन स्टोअर विक्री चॅनेलवर प्रकाशित केलेले असावे.
- ते सध्या व्हिजिटरच्या कार्टमध्ये नसावे.
संबंधित आणि पूरक अशा दोन्ही उत्पादनांसाठी, उत्पादन अॅक्टिव्ह वर सेट केलेले असणे आवश्यक आहे. जर इन्व्हेंटरीचे प्रमाण 0 असेल पण स्टॉकमध्ये नसतानाही विक्री करणे सुरू ठेवा सक्रिय केले असेल, तर उत्पादन संबंधित उत्पादनांच्या सूचीमध्ये दिसू शकते, परंतु पूरक उत्पादनांच्या सूचीमध्ये नाही. पूरक उत्पादने दिसण्यासाठी त्यांचा स्टॉक 0 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
या आवश्यकतांमुळे ग्राहकांना सध्या उपलब्ध असलेली उत्पादने शोधण्यास आणि खरेदी करण्यास मदत होते.
पूरक उत्पादने
पूरक उत्पादने म्हणजे अशी उत्पादने जी अनेकदा निवडलेल्या उत्पादनासोबत खरेदी केली जातात. ग्राहकांना नवीन उत्पादने शोधण्यात मदत करण्यासाठी आणि तुमच्या ऑनलाइन स्टोअरची विक्री वाढवण्यासाठी तुम्ही पूरक उत्पादने दाखवू शकता.
पूरक उत्पादन शिफारसींसाठी सर्वोत्तम पद्धती
संबंधित उत्पादनांची शिफारस केल्याने अधिक विक्री होऊ शकते किंवा कार्टचा आकार वाढू शकतो. पूरक उत्पादन शिफारसी निवडण्यासाठी खालील सर्वोत्तम पद्धती वापरा:
- ग्राहकांना उपयुक्त वाटतील अशी खात्री असलेल्या उत्पादन शिफारसी निवडा.
- मूळ उत्पादनासाठी चांगले अॅड-ऑन मानले जातील अशी उत्पादने निवडा.
- मूळ उत्पादनापेक्षा कमी किंवा त्याच्या इतकाच खर्च असलेली उत्पादने निवडा.
संबंधित उत्पादने
संबंधित उत्पादने म्हणजे निवडलेल्या उत्पादनासारखीच असलेली उत्पादने. ग्राहकांना खरेदी करण्यासाठी इतर तत्सम उत्पादने शोधण्यात मदत करण्यासाठी तुम्ही संभाव्य पर्यायी उत्पादने दाखवू शकता.
संबंधित उत्पादन शिफारसींसाठी सर्वोत्तम पद्धती
तुम्ही शिफारस करत असलेल्या उत्पादनांमुळे ग्राहकांना संबंधित उत्पादने मिळण्याची शक्यता वाढू शकते, ज्यामुळे विक्री वाढू शकते. तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी उत्पादन शिफारस धोरण तयार करताना खालील सर्वोत्तम पद्धती विचारात घ्या:
- ग्राहकांना उपयुक्त वाटतील अशी खात्री असलेल्या उत्पादन शिफारसी निवडा.
- तुमच्या सानुकूल शिफारसींसोबत ऑटोमॅटिकली तयार केलेल्या उत्पादन शिफारसी दिसू द्या, कारण ऑटोमॅटिकली तयार केलेल्या शिफारसी तुमच्या उत्पादनांमधील आणि ग्राहकांच्या ॲक्टिव्हिटीमधील बदल प्रतिबिंबित करण्यासाठी ॲडजस्ट होतात. यामुळे तुमच्या सानुकूल उत्पादन शिफारसी विकल्या गेल्या असतील किंवा अप्रकाशित केल्या असतील तरीही शिफारसी दिसतील याची खात्री होईल.
- तुमच्या थीम सेटिंग्ज तुम्हाला हव्या असलेल्या प्रमाणात उत्पादन शिफारसी दाखवत आहेत याची खात्री करा.
ऑटोमॅटिकली तयार केलेल्या उत्पादन शिफारसी
तुमच्या स्टोअरमधील प्रत्येक उत्पादनासाठी संबंधित उत्पादन शिफारसी ऑटोमॅटिकली तयार केल्या जातात. तुम्ही Search & Discovery ॲपमध्ये एखाद्या उत्पादनासाठी शिफारसी सानुकूलित करत असताना, तुम्ही तयार केलेल्या शिफारसींचा प्रिव्ह्यू पाहू शकता.
सामान्यतः एकत्र खरेदी केली जाणारी उत्पादने, समान उत्पादन वर्णन असलेली उत्पादने किंवा संबंधित संग्रहांमधील उत्पादने यावर आधारित या उत्पादन शिफारसी ॲडजस्ट करण्यासाठी Shopify कडे अंगभूत धोरणे आहेत. वापरल्या जाण्यासाठी प्रत्येक धोरणाच्या स्वतःच्या आवश्यकता आहेत:
- खरेदीचा इतिहास: खरेदीच्या वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी उत्पादनाची मागील विक्री असणे आवश्यक आहे.
- उत्पादन वर्णन: फक्त इंग्रजी स्टोअरफ्रंट असलेल्या मर्चंट्ससाठी उपलब्ध आहे.
- संबंधित संग्रह: खरेदीचा इतिहास आणि उत्पादन वर्णनावर आधारित शिफारसी उपलब्ध नसताना वापरले जाते.
तयार केलेल्या उत्पादन शिफारसी संपादित करणे शक्य नाही, परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या शिफारसी मॅन्युअली जोडू शकता.
उत्पादनासाठी तयार केलेल्या शिफारसी वारंवार बदलतात. तुम्ही उत्पादन पेजला पुन्हा भेट देता तेव्हा भिन्न शिफारसी असणे सामान्य आहे, कारण Shopify खरेदीदारांसाठी अधिक संबंधित असू शकणारी नवीन उत्पादने सुचवते. याच कारणामुळे Search & Discovery ॲपमध्ये प्रिव्ह्यू केलेल्या उत्पादन शिफारसी अनेकदा स्टोअरफ्रंटपेक्षा वेगळ्या असतील.
शिफारसींमध्ये एकत्रित लिस्टिंग्ज ॲडजस्ट करणे
Shopify Search and Discovery ॲपच्या सेटिंग्ज विभागामध्ये ऑटो-जनरेट केलेल्या शिफारसींमध्ये एकत्रित लिस्टिंग्ज कसे दिसतील ते तुम्ही निवडू शकता. डीफॉल्टनुसार, फक्त चाइल्ड उत्पादने दिसतात. तथापि, फक्त पेरेंट उत्पादने किंवा पेरेंट आणि चाइल्ड अशी दोन्ही उत्पादने दाखवण्यासाठी तुम्ही ॲप सेटिंग्ज अपडेट करू शकता.
या सेटिंगचा अॅक्सेस मिळवण्यासाठी, तुमच्या स्टोअरमध्ये एकत्रित लिस्टिंग उत्पादने असणे किंवा Combined Listings ॲप इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Search & Discovery वर जा.
सेटिंग्ज वर क्लिक करा.
उत्पादने विभागामध्ये, एकत्रित लिस्टिंग्जच्या ऑटो-जनरेट केलेल्या उत्पादन शिफारसींसाठी खालीलपैकी एक पर्याय निवडा:
- एकत्रित लिस्टिंग्जची केवळ चाइल्ड उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी केवळ चाइल्ड उत्पादने दाखवा वर क्लिक करा.
- एकत्रित लिस्टिंग्जची केवळ पेरेंट उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी केवळ पेरेंट उत्पादने दाखवा वर क्लिक करा.
- एकत्रित लिस्टिंग्जची पेरेंट आणि चाइल्ड अशी दोन्ही उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही दाखवा वर क्लिक करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
उत्पादन शिफारसी तयार करा
तुमच्या उत्पादन पेजवर प्रदर्शित होणाऱ्या उत्पादन शिफारसी सानुकूलित करा.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Search & Discovery वर जा.
उत्पादन शिफारसी वर क्लिक करा आणि त्यानंतर शिफारसी जोडा वर क्लिक करा.
ज्या उत्पादनासाठी तुम्हाला उत्पादन शिफारसी सानुकूलित करायच्या आहेत ते उत्पादन निवडा.
जास्तीत जास्त 10 पूरक उत्पादने निवडा.
शिफारस करण्यासाठी जास्तीत जास्त 10 संबंधित उत्पादने निवडा. उत्पादनाने केवळ कस्टम शिफारसी प्रदर्शित कराव्यात किंवा कस्टम शिफारसी आणि ऑटो-जनरेट केलेल्या शिफारसी अशा दोन्ही प्रदर्शित कराव्यात यासाठी उत्पादन सेट करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
एखाद्या उत्पादनासाठी ऑटो-जनरेट केलेल्या शिफारसी लपवणे
तुम्ही वैयक्तिक उत्पादनांसाठी ऑटो-जनरेट केलेल्या उत्पादन शिफारसी लपवणे निवडू शकता. ही सेटिंग प्रत्येक उत्पादनासाठी स्वतंत्रपणे कॉन्फिगर केली जाणे आवश्यक आहे.
मेटाफील्ड्ससह बल्कमध्ये उत्पादन शिफारसी संपादित करा
उत्पादन शिफारसी संपादित करण्यासाठी तुम्ही मेटाफील्ड्स वापरू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅप्स > Search & Discovery वर जा.
Recommendations पेजवरून एकाधिक उत्पादने निवडा.
बल्क एडिटर उघडण्यासाठी बल्क एडिट करा वर क्लिक करा.
प्रत्येक उत्पादनासाठी उत्पादन शिफारसी निवडा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
तुम्ही Shopify Flow सारख्या इतर अॅप्समधूनही मेटाफील्ड्स संपादित करू शकता.
खालील Shopify स्टँडर्ड मेटाफील्ड्स मधील बदलांमुळे तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या व्हिजिटर्सना प्रदर्शित होणाऱ्या उत्पादन शिफारसी बदलतील. तुम्ही मेटाफील्ड्समध्ये केलेले बदल Search & Discovery अॅपसोबत सिंक केले जातात.
| नाव | वर्णन |
|---|---|
| संबंधित उत्पादने |
तुम्ही मॅन्युअली निवडलेल्या संबंधित उत्पादनांच्या शिफारसींची सूची. या सूचीमध्ये Shopify ने जनरेट केलेल्या शिफारसींचा समावेश नाही.
|
| संबंधित उत्पादनांची सेटिंग्ज |
निवडलेल्या उत्पादन शिफारसी कशा प्रदर्शित करायच्या ते नियंत्रित करते. स्वीकारलेली मूल्ये:
|
| पूरक उत्पादने |
तुम्ही मॅन्युअली निवडलेल्या पूरक उत्पादन शिफारसींची सूची. |
पूरक उत्पादने
तुम्ही थीम एडिटरमध्ये तुमच्या उत्पादन पेजेसवर पूरक उत्पादनांचा ब्लॉक जोडू शकता. तुमच्या वेबसाइटच्या उत्पादन पेजेससाठी पूरक उत्पादने निवडण्यासाठी Shopify Search & Discovery अॅप कसे वापरायचे ते जाणून घ्या.
ग्राहकांना पूरक उत्पादने प्रदर्शित केल्याने त्यांना नवीन उत्पादने शोधणे सोपे होते आणि यामुळे ऑनलाइन स्टोअरची विक्री वाढण्यास मदत होऊ शकते.
पूरक उत्पादने ब्लॉकचे हेडिंग आणि लेआउट तुमच्या थीमनुसार निर्धारित केले जाते.
पूरक उत्पादनांचा देखावा सानुकूलित करणे
पूरक उत्पादने हा तुमच्या उत्पादन पेजेसवरील उत्पादन माहिती विभागामधील एक ब्लॉक आहे, आणि तो केवळ सुसंगत थीम्समध्येच उपलब्ध असतो. तुम्ही तुमच्या उत्पादन पेजेसवरून पूरक उत्पादनांच्या ब्लॉकचा देखावा सानुकूलित करू शकता. एका वेळी उत्पादन पेजवर फक्त एकच पूरक उत्पादनांचा ब्लॉक असू शकतो.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑनलाइन स्टोअर वर जा.
तुम्हाला जी थीम एडिट करायची आहे ती शोधा आणि त्यानंतर थीम एडिट करा वर क्लिक करा.
उत्पादने वर क्लिक करा.
डीफॉल्ट उत्पादन, किंवा तुम्हाला जे उत्पादन टेम्पलेट एडिट करायचे आहे ते निवडा.
खालीलपैकी एक कृती करा:
- जर तुमच्या उत्पादन माहिती विभागामध्ये पूरक उत्पादनांचा ब्लॉक असेल, तर पूरक उत्पादने वर क्लिक करा.
- जर तुमच्या उत्पादन माहिती विभागामध्ये पूरक उत्पादनांचा ब्लॉक नसेल, तर + ब्लॉक जोडा वर क्लिक करा आणि त्यानंतर पूरक उत्पादने निवडा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाइल
- Shopify अॅप मधून,
बटणावर टॅप करा.
- विक्री चॅनेल विभागामध्ये, ऑनलाइन स्टोअर वर टॅप करा.
- थीम्स व्यवस्थापित करा वर टॅप करा.
- तुम्हाला जी थीम एडिट करायची आहे ती शोधा आणि त्यानंतर थीम एडिट करा वर टॅप करा.
- टेम्पलेट्स वर टॅप करा.
- उत्पादने वर टॅप करा.
- डीफॉल्ट उत्पादन, किंवा तुम्हाला जे उत्पादन टेम्पलेट एडिट करायचे आहे ते निवडा.
- खालीलपैकी एक कृती करा:
- जर तुमच्या उत्पादन माहिती विभागामध्ये पूरक उत्पादनांचा ब्लॉक असेल, तर पूरक उत्पादने वर टॅप करा.
- जर तुमच्या उत्पादन माहिती विभागामध्ये पूरक उत्पादनांचा ब्लॉक नसेल, तर + ब्लॉक जोडा वर टॅप करा आणि त्यानंतर पूरक उत्पादने निवडा.
- सेव्ह करा वर टॅप करा.
डोळ्याच्या आयकनवर क्लिक करून तुम्ही पूरक उत्पादनांचा ब्लॉक लपवू शकता. जर तुम्हाला तुमच्या थीममधून तो ब्लॉक पूर्णपणे काढून टाकायचा असेल, तर तुम्ही ब्लॉक हटवू शकता.
पूरक उत्पादने ब्लॉक सेटिंग्ज
तुमची पूरक उत्पादने तुमच्या ग्राहकांना कशी प्रदर्शित होतील हे तुम्ही सानुकूलित करू शकता.
मूलभूत डिस्प्ले सेटिंग
| सेटिंग | वर्णन |
|---|---|
| हेडिंग | ब्लॉकचे शीर्षक. |
| कोलॅप्सिबल रो म्हणून दाखवा | निवडल्यावर, सामग्री एका रो टॅबखाली कोलॅप्स झालेली दिसते. जेव्हा एखादा ग्राहक टायटलवर क्लिक करतो, तेव्हा अतिरिक्त सामग्री प्रदर्शित करण्यासाठी टॅबचा विस्तार होतो. |
| आयकन | पूरक उत्पादने कोलॅप्सिबल रो म्हणून प्रदर्शित केली जातात तेव्हा तुमच्या हेडिंगसोबत पेअर करण्यासाठी एक आयकन निवडा. |
उत्पादन डिस्प्ले कॉन्फिगरेशन
| सेटिंग | वर्णन |
|---|---|
| दाखवण्यासाठी कमाल उत्पादने | प्रदर्शित करण्यासाठी पूरक उत्पादनांची कमाल संख्या निवडा. 1 आणि 10 मधील मूल्य निवडा. |
| प्रति पेज उत्पादनांची संख्या | तुम्हाला प्रति स्लाइडर पेज प्रदर्शित करायची असलेली पूरक उत्पादनांची संख्या. 1 आणि 4 मधील मूल्य निवडा. |
| पेजिनेशन स्टाईल |
प्रतिमांच्या खाली प्रदर्शित होणाऱ्या स्लाइडर नॅव्हिगेशनची स्टाईल.
|
| इमेज रेशिओ |
उत्पादन कार्ड प्रतिमांचा आस्पेक्ट रेशिओ निर्धारित करते.
|
अतिरिक्त कार्यक्षमता
| सेटिंग | वर्णन |
|---|---|
| क्विक अॅड बटण सक्षम करा |
"क्विक अॅड" बटण ग्राहकांना उत्पादन कार्डमधून त्यांच्या कार्टमध्ये एखादे उत्पादन जोडण्याची अनुमती देते. उत्पादनामध्ये व्हेरिएंट असल्यास, बटणावर पर्याय निवडा असे वाचता येते आणि ते पॉप-अपमध्ये उत्पादन तपशील प्रदर्शित करते. त्यानंतर ग्राहक त्यांचे इच्छित व्हेरिएंट निवडू शकतात, कार्टमध्ये जोडू शकतात, आताच खरेदी करा पर्यायाने लगेच चेकआउट करू शकतात, किंवा उत्पादनाचा पूर्ण तपशील पाहण्यासाठी क्लिक करू शकतात. क्विक अॅड पर्यायांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आताच खरेदी करा पर्याय उत्पादन पेजवरून स्वतंत्रपणे सेट करणे आवश्यक आहे. जेव्हा आताच खरेदी करा पर्याय सेट केलेला नसतो, तेव्हा ग्राहक तरीही त्यांच्या कार्टमध्ये उत्पादन जोडू शकतात. |