थीम्ससाठी ॲक्सेसिबिलिटी

जेव्हा तुम्ही तुमची थीम सानुकूलित करता, तेव्हा तुमचे ऑनलाइन स्टोअर ॲक्सेसिबल ठेवण्यात मदत होईल अशी डिझाइन आणि सामग्री निवडा. ॲक्सेसिबल वेबसाइट अशी डिझाइन केलेली असते की ती दिव्यांगांसह प्रत्येकाला वापरता येते. ॲक्सेसिबिलिटी लक्षात ठेवून तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी पर्याय निवडल्याने तुम्हाला तुमच्या सर्व ग्राहकांसाठी सर्वसमावेशक अनुभव प्रदान करण्यात मदत होऊ शकते.

खालील मार्गदर्शक तत्त्वे Web Content Accessibility Guidelines (WCAG) लक्षात ठेवून तयार केली आहेत. ॲक्सेसिबल वेबसाइट तयार करताना अनेक घटकांचा विचार करावा लागत असल्याने, केवळ खालील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे तुमचे ऑनलाइन स्टोअर पूर्णपणे ॲक्सेसिबल असल्याची हमी देत नाही. तुम्ही WCAG वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली सूचीबद्ध केलेली संसाधने पाहून वेब ॲक्सेसिबिलिटीबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

मजकूर ॲक्सेसिबिलिटी

तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील मजकूर हा दृष्टिहीन असलेल्या किंवा मजकुराचे मोठे ब्लॉक वाचण्यात अडचण असलेल्या ग्राहकांना वाचता येण्याजोगा असणे महत्त्वाचे आहे.

रंग कॉन्ट्रास्ट

जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे रंग संपादित करता, तेव्हा तुमचा सर्व मजकूर कलरब्लाइंड किंवा इतर प्रकारे दृष्टिहीन असलेल्या ग्राहकांसाठी ॲक्सेसिबल असल्याची खात्री करा. हे ग्राहक दृश्यरूपाने एका गोष्टीपेक्षा दुसर्‍या गोष्टीमध्ये फरक करण्यासाठी पुरेशा रंग कॉन्ट्रास्टवर अवलंबून असतात. तुमच्या स्टोअरच्या वेगवेगळ्या भागांचा कॉन्ट्रास्ट तपासण्यासाठी तुम्ही ऑनलाइन कॉन्ट्रास्ट रेशो टूल वापरू शकता.

खालील उदाहरणामध्ये, मजकुराचा त्याच्या बॅकग्राउंडच्या तुलनेत कॉन्ट्रास्ट रेशो 2.4:1 आहे आणि काही ग्राहकांना तो वाचणे कठीण जाते.

हलक्या राखाडी मजकुराचा ब्लॉक आणि सलग पांढरी पार्श्वभूमी.

पुढील उदाहरणामध्ये, मजकुराचा कॉन्ट्रास्ट रेशो 4.8:1 आहे आणि बऱ्याच ग्राहकांना तो वाचणे सोपे जाते.

सलग पांढऱ्या पार्श्वभूमीवरील गडद करड्या मजकुराचा ब्लॉक.

बॉडी मजकूर, शीर्षके, लिंक्स आणि फॉर्म फील्ड्ससह सर्व मजकुराच्या कॉन्ट्रास्टची चाचणी करा. खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरा:

  • बॉडी मजकूर आणि बटण मजकुराचा रंग यांचा त्यांच्या बॅकग्राउंडच्या तुलनेत किमान 4.5:1 कॉन्ट्रास्ट रेशो असतो.
  • शीर्षके आणि इतर मोठ्या मजकुराच्या (फॉन्ट आकार 24 px आणि त्यावरील) रंगाचा त्यांच्या बॅकग्राउंडच्या तुलनेत किमान 3:1 कॉन्ट्रास्ट रेशो असतो.
  • स्लाईडशो, बॅनर्स आणि व्हिडिओंसह, प्रतिमांवरील सर्व मजकुराच्या रंगाचा त्यांच्या बॅकग्राउंडच्या तुलनेत पुरेसा कॉन्ट्रास्ट रेशो असतो. मोठ्या मजकुरासाठी (फॉन्ट आकार 24 px आणि त्यावरील), कॉन्ट्रास्ट किमान 3:1 असतो. लहान मजकुरासाठी कॉन्ट्रास्ट किमान 4.5:1 असतो.
  • इनपुट बॉर्डर्स आणि आयकन्ससह, बिगर-मजकूर घटकांच्या रंगाचा त्यांच्या बॅकग्राउंडच्या तुलनेत किमान 3:1 कॉन्ट्रास्ट रेशो असतो.

मजकूर शीर्षके

जेव्हा तुम्ही रिच टेक्स्ट एडिटर सोबत तुमच्या पेजवर शीर्षके जोडता, तेव्हा त्यांना क्रमवार (1 - 6) ठेवणे महत्त्वाचे असते. पेजची सामग्री कशी आयोजित केली आहे हे संप्रेषित करण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे शीर्षके वापरली जातात. पातळी वगळणे, जसे की हेडिंग लेव्हल 2 नंतर हेडिंग लेव्हल 4 वापरणे युजर्ससाठी गोंधळात टाकणारे असू शकते. खालील मार्गदर्शक तत्त्व वापरा:

  • शीर्षके क्रमवार वापरली जातात आणि त्यामध्ये पातळी वगळली जात नाही.

मजकुराचा आकार आणि अलाइनमेंट

जेव्हा तुम्ही तुमच्या थीमची टायपोग्राफी सेटिंग्ज संपादित करता, तेव्हा तुमचा मजकूर ग्राहकांना आरामात वाचता येईल इतका मोठा असल्याची खात्री करा.

मजकूर वाचणे सोपे करण्यासाठी शब्द आणि अक्षरांमध्ये सातत्यपूर्ण जागा असावी. खालील उदाहरणामध्ये, मजकूर अलाइनमेंट जस्टिफाइड आहे, जे शब्दांमध्ये विसंगत जागा तयार करते.

मजकुराचा ब्लॉक जस्टिफाइड अलाइन केलेला आहे. मजकुराची प्रत्येक ओळ शेवटपर्यंत जागा भरते, ज्यामुळे ते फिट बसवण्यासाठी शब्दांमध्ये वेगवेगळी जागा देणे भाग पडते.

पुढील उदाहरणामध्ये, मजकूर अलाइनमेंट डावीकडे-अलाइन केलेले आहे, जे शब्दांमध्ये सातत्यपूर्ण जागा तयार करते.

मजकुराचा ब्लॉक डावीकडे-अलाइन केलेला आहे. प्रत्येक शब्दामध्ये सातत्यपूर्ण जागा आहे.

मजकुराचा आकार आणि अलाइनमेंट सानुकूलित करताना, खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरा:

  • बॉडी मजकुरासाठी किमान फॉन्ट आकार हा 16 px च्या समतुल्य असतो.
  • मजकूर अलाइनमेंट जस्टिफाइड नसते. जस्टिफाइड मजकूर शब्दांमध्ये विसंगत जागा तयार करतो.

मजकूर लिंक्स

मजकूर लिंक्स अधोरेखित केल्या पाहिजेत किंवा नियमित मजकुराच्या तुलनेत त्यांची दुसरी दृष्टिभेद करणारी स्टाईल असावी. काही ग्राहकांना रंग पाहण्यात अडचण येत असल्यामुळे, तुम्ही लिंकला नियमित मजकुरापेक्षा वेगळे करण्यासाठी केवळ रंगातील बदलावर अवलंबून राहू शकत नाही.

मजकूर लिंक्स त्याच टॅबमध्ये उघडल्या पाहिजेत. नवीन टॅब किंवा विंडोमध्ये उघडणाऱ्या लिंक्समुळे गोंधळ होऊ शकतो, विशेषत: मोबाईलवर जिथे जुनी विंडो दृश्यमान नसते आणि त्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक नसतात, विशेषत: असे ग्राहक जे स्क्रीन मॅग्निफिकेशन वापरतात किंवा कमी तांत्रिक आहेत.

जर तुम्ही तुमच्या थीमची स्टाईलशीट संपादित केली, तर तुम्ही मजकूर लिंक स्टाईल्स काढून टाकणार नाही याची खात्री करा. खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरा:

  • मजकूर लिंक्स एकतर अधोरेखित केलेल्या असतात किंवा त्यांच्यात रंग सोडून दुसरा दृश्यमान भेद असतो जेणेकरून ग्राहक नियमित मजकुरापासून लिंक्समध्ये फरक करू शकतील.
  • क्लिक केल्यावर मजकूर लिंक्स त्याच टॅबमध्ये उघडतात.

प्रतिमांसाठी पर्यायी मजकूर

जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये प्रतिमा जोडता, तेव्हा त्या अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या ग्राहकांसाठी ॲक्सेसिबल करणे महत्त्वाचे असते. प्रत्येक प्रतिमेचे अचूक वर्णन करणारा पर्यायी मजकूर जोडून तुम्ही हे करू शकता. स्क्रीन रीडर्स वापरणारे ग्राहक तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील प्रतिमांची सामग्री संप्रेषित करण्यासाठी ऑल्ट मजकुरावर अवलंबून असतात.

तुम्ही Shopify ॲडमिन वरून तुमच्या उत्पादन प्रतिमांमध्ये ऑल्ट मजकूर जोडू शकता. तुम्ही थीम एडिटरमधून तुमच्या थीममधील इतर प्रतिमांमध्ये ऑल्ट मजकूर जोडू शकता.

जेव्हा तुम्ही एखाद्या प्रतिमेमध्ये ऑल्ट मजकूर जोडता, तेव्हा डोळे मिटलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ती प्रतिमा समजावून सांगत आहात, अशी कल्पना करणे ही एक चांगली सवय आहे. त्यांच्या मनात प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांना मदत करा. तुम्ही एखाद्या प्रतिमेचे वर्णन करण्याची पद्धत तुमच्या वेब पेजच्या संदर्भावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर तुमचा व्यवसाय ट्रॅव्हल एजन्सी असेल, तर तुम्ही एखाद्या प्रतिमेचे वर्णन आउटडोअर उपकरण स्टोअरच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे करू शकता. खालील प्रतिमेचा विचार करा:

दोन मित्र पाठीवर बॅकपॅक घेऊन एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून समुद्राकडे पाहत आहेत

ट्रॅव्हल एजन्सीसाठी, तुम्ही हे दोन मित्र ज्या देश आणि प्रदेशात प्रवास करत आहेत त्याचा, आणि ते पाहत असलेल्या समुद्राच्या किंवा महासागराच्या नावाचा संदर्भ देऊ शकता. दुसरीकडे, आउटडोअर उपकरणांच्या स्टोअरसाठी, तुम्ही या दोन मित्रांच्या बॅकपॅकचे ब्रँड आणि वैशिष्ट्ये यावर लक्ष केंद्रित करू शकता.

जर तुमचा व्यवसाय ट्रॅव्हल एजन्सी असेल, तर खराब ऑल्ट मजकुराचे उदाहरण हे असू शकते, "समुद्रासमोर उभे असलेले दोन लोक." त्याच एजन्सीसाठी, चांगल्या ऑल्ट मजकुराचे उदाहरण हे असू शकते, "पोर्तुगालमधील लागोस येथे प्रवास करत असलेले दोन मित्र, एका सनी दिवशी प्रेया दो कॅमिलोच्या वालुकामय खाडीकडे पाहत आहेत."

स्लाईडशो आणि व्हिडिओ ॲक्सेसिबिलिटी

जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये व्हिडिओ जोडता, तेव्हा कमी दृष्टी असलेल्या, कर्णबधिर किंवा ऐकण्यास त्रास असलेल्या ग्राहकांच्या आणि व्हेस्टिब्युलर डिसऑर्डर असण्याची शक्यता असलेल्या ग्राहकांच्या गरजांचा विचार केल्याची खात्री करा.

यापैकी काही ग्राहक स्क्रीन रीडरच्या टेक्स्ट टू स्पीच क्षमतेवर अवलंबून असतात, जे वेब पेजची सामग्री मोठ्याने वाचतात. व्हिडिओ आणि संगीतातील अतिरिक्त ऑडिओ, विशेषत: तो अनपेक्षित असल्यास, हा अनुभव कठीण करू शकतो. कर्णबधिर किंवा ऐकण्यास त्रास असलेल्या ग्राहकांना सामग्री ॲक्सेस करता यावी यासाठी, तुमच्या व्हिडिओंमध्ये क्लोज्ड कॅप्शन्स जोडणे ही एक चांगली कल्पना आहे.

व्हेस्टिब्युलर डिसऑर्डर असलेल्या ग्राहकांना हलता आशय पाहताना चक्कर आल्यासारखे वाटू शकते. यामुळे, स्लाईडशो आणि व्हिडिओ आपोआप प्ले न होणे आणि ग्राहकाला कंट्रोल बटणे वापरून स्लाईडशो नियंत्रित करता येणे महत्त्वाचे आहे.

स्लाईडशो

तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये स्लाईडशो जोडता, तेव्हा खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरा:

  • स्लाईडशो आपोआप प्ले होत नाहीत.
  • जर स्लाईडशो आपोआप प्ले होत असतील, तर त्यात स्लाईडशो कंट्रोल्सचा समावेश असावा, ज्यांचा वापर ग्राहक स्लाईडशो पॉज करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी करू शकतील.

व्हिडिओ

तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये व्हिडिओ जोडता, तेव्हा खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरा:

  • व्हिडिओ आपोआप प्ले होत नाहीत.
  • जर व्हिडिओ आपोआप प्ले होत असतील, तर त्यांचा ऑडिओ म्यूट केलेला असावा.
  • ऑडिओ असलेल्या व्हिडिओंसाठी, व्हिडिओ पूर्णपणे दृश्यमान असावा आणि तो पेजवरील इतर घटकांमुळे झाकलेला नसावा. यामुळे क्लोज्ड कॅप्शन्स दृश्यमान राहण्यास मदत होते.
  • संवाद असलेल्या व्हिडिओंसाठी, मजकूर ट्रान्सक्रिप्ट्स उपलब्ध असावीत. यांचा समावेश एकतर त्याच पेजवर किंवा वेगळ्या पेजच्या लिंकमध्ये केलेला असावा.

ही मार्गदर्शक तत्त्वे स्लाईडशोमध्ये असलेल्या व्हिडिओंनाही लागू होतात.

कीबोर्ड सपोर्ट

दृष्टी किंवा हालचालीत दोष असलेले ग्राहक ऑनलाइन नॅव्हिगेट करण्यासाठी आणि कार्ये पूर्ण करण्यासाठी कीबोर्डचा वापर करू शकतात. त्यांच्या कीबोर्डचे लक्ष वेब पेजवर कुठे आहे, हे पाहण्यासाठी हे ग्राहक व्हिज्युअल इंडिकेटरवर अवलंबून असतात. खालील उदाहरणात, ईमेल फील्डमध्ये एक व्हिज्युअल फोकस इंडिकेटर आहे:

ऑनलाइन स्टोअरवरील ग्राहकाची लॉग इन स्क्रीन जी ईमेल आणि पासवर्डसाठी फॉर्म फील्ड्स दर्शवते. ईमेल फील्ड निळ्या रंगात आउटलाइन केलेली आहे.

तुम्ही तुमच्या थीमची स्टाईलशीट संपादित करत असल्यास, कोणत्याही पेज घटकामधून कीबोर्ड फोकस स्टाईल काढत नसल्याची खात्री करा. खालील मार्गदर्शक तत्त्व वापरा:

  • जेव्हा सर्व परस्परसंवादी पेज घटकांवर कीबोर्ड फोकस असतो, तेव्हा त्यांच्यात एक स्पष्ट व्हिज्युअल इंडिकेटर असतो. या घटकांमध्ये लिंक्स, बटणे आणि फॉर्म फील्ड्स यांचा समावेश असतो.

संसाधने

या लेखामध्ये चर्चा केलेल्या विषयांविषयी वेब ॲक्सेसिबिलिटीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, खालील संसाधनांचा संदर्भ घ्या.

रंग कॉन्ट्रास्ट संसाधने

मजकूर संसाधने

पर्यायी मजकूर संसाधने

स्लाईडशो आणि व्हिडिओ संसाधने

कीबोर्ड सपोर्ट संसाधने

या विभागात