तुमच्या थीम प्रतिमांमध्ये पर्यायी मजकूर जोडणे
जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये प्रतिमा जोडता, तेव्हा त्या दृष्टिहीन किंवा कमी दृष्टी असलेल्या ग्राहकांना ॲक्सेस करण्यायोग्य बनवणे महत्त्वाचे असते. प्रत्येक प्रतिमेचे अचूक वर्णन करणारा पर्यायी मजकूर जोडून तुम्ही हे करू शकता. जे ग्राहक स्क्रीन रीडर वापरतात ते तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील प्रतिमांची सामग्री समजून घेण्यासाठी ऑल्ट मजकुरावर अवलंबून असतात.
या लेखामध्ये, तुम्ही थीम एडिटरमधून प्रतिमांमध्ये ऑल्ट मजकूर जोडण्याबद्दल वाचू शकता. तुम्ही Shopify ॲडमिनमधून तुमच्या उत्पादन प्रतिमांमध्ये ऑल्ट मजकूरदेखील जोडू शकता.
ऑल्ट मजकूर आणि थीम ॲक्सेसिबिलिटीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, थीमसाठी ॲक्सेसिबिलिटी पाहा.
थीम प्रतिमांमध्ये ऑल्ट मजकूर जोडा
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑनलाइन स्टोअर वर जा.
तुम्हाला जी थीम संपादित करायची आहे ती शोधा आणि त्यानंतर थीम संपादित करा वर क्लिक करा.
थीम एडिटर साइडबारमधून, ज्या प्रतिमेसाठी ऑल्ट मजकुराची आवश्यकता आहे त्या सेक्शनवर क्लिक करा.
प्रतिमेवर, संपादित करा वर क्लिक करा.
डायलॉग बॉक्समध्ये, ऑल्ट मजकूर टाका आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
विक्री चॅनेल सेक्शनमध्ये, ऑनलाइन स्टोअर वर टॅप करा.
सर्व थीम व्यवस्थापित करा वर टॅप करा.
तुम्हाला संपादित करायची असलेली थीम शोधा आणि नंतर थीम संपादित करा वर टॅप करा.
संपादित करा वर टॅप करा.
थीम एडिटर साइडबारमधून, ऑल्ट मजकूर आवश्यक असलेल्या प्रतिमेच्या विभागावर टॅप करा.
प्रतिमेवर, संपादित करा वर टॅप करा.
डायलॉग बॉक्समध्ये, ऑल्ट मजकूर टाका आणि नंतर सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.