अनाउन्समेंट बार जोडा

तुमच्या व्यवसायाबद्दल महत्त्वाची माहिती हायलाइट करण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर अनाउन्समेंट बार जोडू शकता, जसे की खालील माहिती:

  • कोणताही शिपिंगमधील विलंब किंवा आंतरराष्ट्रीय शिपमेंट न स्वीकारणारे प्रदेश
  • कोणतीही नवीन किंवा अपडेट केलेली धोरणाची पृष्ठे
  • सध्या ऑफर केले जाणारे कोणतेही प्रमोशन्स, जसे की सेल किंवा नवीन गिफ्ट कार्ड

काही थीममध्ये अनाउन्समेंट बारचे अंगभूत वैशिष्ट्य असते, तर इतरांमध्ये अनाउन्समेंट बार प्रदर्शित करण्यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक असते.

तुमच्या थीममध्ये अनाउन्समेंट बारचे वैशिष्ट्य आहे का ते तपासा

तुमच्या थीममध्ये अनाउन्समेंट बारचे वैशिष्ट्य आहे का हे तपासण्यासाठी, खालीलपैकी एका पद्धतीचा वापर करा:

  • ऑनलाइन स्टोअर वर जा आणि त्यानंतर थीम संपादित करा वर क्लिक करा. जर तुमच्या थीममध्ये अनाउन्समेंट बार असेल, तर थीम एडिटर मधील विभागांच्या सूचीमध्ये किंवा हेडर सेटिंग्जमध्ये अनाउन्समेंट बार प्रदर्शित होईल.
  • तुमच्या थीमच्या दस्तऐवजीकरणाचा संदर्भ घ्या.
  • तुमच्या थीम डेव्हलपरशी संपर्क साधा. तुम्ही Shopify-समर्थित थीम वापरत असल्यास, Shopify सपोर्टशी संपर्क साधा.

तुमच्या थीममध्ये अनाउन्समेंट बारचे अंगभूत वैशिष्ट्य असल्यास, ते तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर जोडण्यासाठी तुमच्या थीमच्या दस्तऐवजीकरणाचे अनुसरण करा.

तुमच्या थीममध्ये अनाउन्समेंट बारचे वैशिष्ट्य नसल्यास, किंवा तुम्हाला हव्या असलेल्या सेटिंग्ज अंगभूत वैशिष्ट्यामध्ये नसल्यास, तुम्ही बॅनर अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

अनाउन्समेंट बार जोडा

तुमच्या थीममध्ये तुम्ही केवळ एकच अनाउन्समेंट बार विभाग ठेवू शकता, पण तुम्ही तुमच्या अनाउन्समेंट बारवर 12 पर्यंत अनाउन्समेंट ब्लॉक जोडू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनवरून, ऑनलाइन स्टोअर वर जा.

  2. तुम्हाला सानुकूलित करावयाच्या थीमच्या बाजूला असलेल्या थीम संपादित करा वर क्लिक करा.

  3. अनाउन्समेंट बार विभागामध्ये, अनाउन्समेंट जोडा वर क्लिक करा.

  4. मजकूर फील्डमध्ये, तुमच्या अनाउन्समेंटचा मजकूर टाका.

  5. पर्यायी: लिंक फील्डवर क्लिक करा आणि त्यानंतर खालीलपैकी एक करा:

    • तुमच्या ग्राहकांना विशिष्ट ठिकाणी निर्देशित करण्यासाठी URL टाका.
    • तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरून पृष्ठ निवडण्यासाठी ड्रॉपडाउन मेनूचा वापर करा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

तुमचा अनाउन्समेंट बार संपादित करा

असे तीन वेगवेगळे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा अनाउन्समेंट बार सानुकूलित करू शकता:

  • शैली: तुमच्या अनाउन्समेंट बारची पार्श्वभूमी आणि मजकुराचा रंग बदलण्यासाठी रंगसंगती निवडा.
  • कार्य: तुमच्या अनाउन्समेंट बारवर भाषा निवडक, देश किंवा प्रदेश निवडक आणि सोशल मीडिया आयकन जोडा.
  • ॲनिमेशन: अनेक घोषणा जोडा. तुमच्या घोषणा स्वयंचलितरीत्या फिरण्यासाठी निवडा, किंवा तुमच्या ग्राहकांना शेवरॉन (chevron) बटणांचा वापर करून व्यक्तिचलितपणे घोषणा पाहू द्या.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनवरून, ऑनलाइन स्टोअर वर जा.

  2. तुम्हाला सानुकूलित करावयाच्या थीमच्या बाजूला असलेल्या थीम संपादित करा वर क्लिक करा.

  3. अनाउन्समेंट बार विभागावर क्लिक करा.

  4. पर्यायी: ड्रॉपडाउन मेनूमधून तुम्हाला वापरायची असलेली रंगसंगती निवडा.

  5. पर्यायी: विभाजक ओळ जोडण्यासाठी, विभाजक ओळ दाखवा निवडा.

  6. पर्यायी: तुमच्या अनाउन्समेंट बारवर सोशल मीडिया आयकन जोडण्यासाठी, डेस्कटॉपवर आयकन दाखवा निवडा.

  7. पर्यायी: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त घोषणा असल्यास आणि तुम्हाला त्या स्वयंचलितरीत्या फिरवायच्या असल्यास, खालील गोष्टी करा:

    1. घोषणा स्वयंचलितरीत्या फिरवा निवडा.
    2. स्लाइड्स बदला दर स्लाइडरमध्ये, तुमच्या घोषणा किती वेळा फिराव्यात याची वारंवारता निवडा.
    3. घोषणा वेगळ्या क्रमाने हलवण्यासाठी ⋮⋮ आयकनवर क्लिक करून ड्रॅग करा.
  8. पर्यायी: तुमच्या अनाउन्समेंट बारमध्ये देश किंवा प्रदेश निवडक जोडण्यासाठी, देश/प्रदेश निवडक सक्षम करा निवडा.

  9. पर्यायी: तुमच्या अनाउन्समेंट बारमध्ये भाषा निवडक जोडण्यासाठी, भाषा निवडक सक्षम करा निवडा.

  10. सेव्ह करा वर क्लिक करा.

अनाउन्समेंट बार लपवा किंवा हटवा

तुम्हाला तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर जो अनाउन्समेंट बार प्रदर्शित करायचा नसेल, तो तुम्ही लपवू किंवा हटवू शकता. अनाउन्समेंट बार लपवल्याने तो न हटवता तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधून काढून टाकला जातो आणि तुम्ही तो तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी लपवलेला रद्द (unhide) करू शकता. अनाउन्समेंट बार हटवणे ही एक कायमस्वरूपी कृती आहे जी पूर्ववत केली जाऊ शकत नाही.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनवरून, ऑनलाइन स्टोअर वर जा.

  2. तुम्हाला जी थीम संपादित करायची आहे ती शोधा आणि त्यानंतर थीम संपादित करा वर क्लिक करा.

  3. तुमच्या अनाउन्समेंट बारची सूची प्रदर्शित करण्यासाठी अनाउन्समेंट बार टॉगलवर क्लिक करा.

  4. खालीलपैकी एका पद्धतीचा वापर करून अनाउन्समेंट बार काढून टाका:

    • अनाउन्समेंट बार लपवण्यासाठी, तुमचा माउस पॉइंटर अनाउन्समेंट ब्लॉकवर फिरवा आणि नंतर डोळ्याच्या आयकनवर क्लिक करा.
    • अनाउन्समेंट बार हटवण्यासाठी, तुम्हाला जो अनाउन्समेंट बार हटवायचा आहे त्यावर क्लिक करा आणि नंतर ब्लॉक हटवा वर क्लिक करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाइल
  1. Shopify अ‍ॅप मधून, Menu आयकनवर टॅप करा.

  2. विक्री चॅनेल विभागामध्ये, ऑनलाइन स्टोअर वर टॅप करा.

  3. सर्व थीम्स व्यवस्थापित करा वर टॅप करा.

  4. तुम्हाला जी थीम संपादित करायची आहे ती शोधा आणि नंतर थीम संपादित करा वर टॅप करा.

  5. संपादित करा वर टॅप करा.

  6. तुमच्या अनाउन्समेंट बारची सूची दाखवण्यासाठी अनाउन्समेंट बार टॉगलवर टॅप करा.

  7. खालीलपैकी एका पद्धतीचा वापर करून अनाउन्समेंट बार काढून टाका:

    • अनाउन्समेंट बार लपवण्यासाठी, तुमचा माउस पॉइंटर अनाउन्समेंट ब्लॉकवर फिरवा आणि नंतर डोळ्याच्या आयकनवर टॅप करा.
    • अनाउन्समेंट बार हटवण्यासाठी, तुम्हाला जो अनाउन्समेंट बार हटवायचा आहे त्यावर टॅप करा आणि नंतर ब्लॉक हटवा वर टॅप करा.
  8. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

अनाउन्समेंट बॅनर अ‍ॅप डाउनलोड करा

  1. Shopify App Store वर जा.
  2. banner message किंवा announcement bar वापरून अ‍ॅप शोधा.
  3. अ‍ॅप लिस्टिंग पृष्ठ पाहण्यासाठी अ‍ॅपवर क्लिक करा.
  4. जेव्हा तुम्ही अ‍ॅपच्या तपशिलाबाबत समाधानी असाल, तेव्हा अ‍ॅप जोडा वर क्लिक करा.

तुमच्या स्टोअरमध्ये बॅनर जोडण्यासाठी, अ‍ॅपच्या इंस्टॉल करण्याच्या सूचना आणि अ‍ॅपच्या डेव्हलपर्सकडील कोणतेही दस्तऐवजीकरण फॉलो करा.