थीम सपोर्ट
तुमची थीम सानुकूलित करण्यापूर्वी, कोणत्या स्तराचा सपोर्ट उपलब्ध आहे हे तुम्हाला समजले असल्याची खात्री करा. तुम्ही मूलभूत कस्टमायझेशन करत असल्यास, तुम्हाला तुमच्या थीमच्या डेव्हलपरकडून सपोर्ट मिळू शकेल. तुम्ही तुमच्या थीमध्ये विस्तृत बदल करत असल्यास, आमच्या थीम सपोर्टसाठी अतिरीक्त संसाधने या सूचीचा संदर्भ घ्या.
Shopify सपोर्ट करत नसलेल्या कस्टमायझेशनबद्दल जाणून घेण्यासाठी, आमच्या डिझाइन धोरणाचा संदर्भ घ्या.
तुमच्या थीमसाठी सपोर्ट कुठे शोधायचा
तुम्हाला मिळू शकणारा सपोर्ट तुमची थीम कोणी बनवली आहे यावर अवलंबून असतो.
Shopify च्या मोफत थीम्ससाठी सपोर्ट
तुम्ही Shopify ची मोफत थीम वापरत असल्यास, Shopify सपोर्ट तुम्हाला काही ठराविक पूर्वनिर्धारित कस्टमायझेशन्समध्ये मदत करू शकेल. जर तुम्ही Basic प्लॅन किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनवर असाल, तर तुम्ही 60 मिनिटांपर्यंतचा मोफत डिझाइन सपोर्ट वापरू शकता, जो 15 मिनिटांच्या टप्प्यांमध्ये वापरला जातो.
अधिक जाणून घेण्यासाठी, Shopify डिझाइन धोरणाचे पुनरावलोकन करा.
सशुल्क थीम्ससाठी सपोर्ट
तुम्ही Shopify ची मोफत थीम वापरत नसल्यास, तुमची थीम एखाद्या तृतीय-पक्ष थीम डेव्हलपरने बनवली आहे. सपोर्ट मिळवण्यासाठी, तुम्ही डेस्कटॉप किंवा मोबाइल ब्राउझरवरून तुमच्या Shopify ॲडमिनमधील तुमच्या थीमसाठीचे सपोर्ट दस्तऐवज पाहू शकता. तुम्ही सपोर्टसाठी थीम डेव्हलपरशीही संपर्क साधू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनवरून, ऑनलाइन स्टोअर वर जा.
तुम्हाला संपादित करायची असलेली थीम शोधा आणि त्यानंतर थीम संपादित करा वर क्लिक करा.
थीमच्या नावावर क्लिक करा.
दस्तऐवज पहा किंवा सपोर्ट मिळवा वर क्लिक करा.
Shopify डिझाइन धोरण
तुम्ही Shopify ची मोफत थीम वापरत असल्यास, Shopify सपोर्ट तुम्हाला काही ठराविक पूर्वनिर्धारित कस्टमायझेशन्समध्ये मदत करू शकेल. Shopify सपोर्ट कस्टम कोड लिहित नाही किंवा अनियंत्रित कोड बदल करत नाही. Shopify सपोर्टशी संपर्क साधण्यापूर्वी, तुमच्या थीमसाठी सपोर्ट कोण पुरवते ते तपासा.
प्रत्येक थीम वेगळ्या प्रकारे कार्य करत असल्यामुळे, Shopify सपोर्ट कोणत्या प्रकारचे बदल करू शकतो हे तुम्ही वापरत असलेल्या थीमवर अवलंबून असते.
जर तुम्ही Basic प्लॅन किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनवर असाल, तर तुम्ही 60 मिनिटांपर्यंतच्या पूरक डिझाइन सपोर्टचा किंवा डिझाइन वेळेचा वापर करू शकता, जो 15 मिनिटांच्या टप्प्यांमध्ये ट्रॅक केला जातो. एखादे विशिष्ट कस्टमायझेशन पूर्ण करण्यासाठी किती मिनिटे लागतात हे समजून घेण्यासाठी, कस्टमायझेशनच्या वर्णनामध्ये डिझाइन वेळ तपासा.
थीम सपोर्ट टीम तुम्ही केलेल्या प्रत्येक थीम मॉडिफिकेशनच्या विनंतीवर त्यांनी घालवलेल्या वेळेचा ट्रॅक ठेवते. जर तुम्ही संपूर्ण 60 मिनिटांचा पूरक डिझाइन सपोर्ट वापरला, तर पुढील मदतीसाठी तुम्ही Shopify पार्टनरला नियुक्त करू शकता. Shopify पार्टनरला नियुक्त करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
सपोर्टेड थीम्स आणि कस्टमायझेशन्स
Shopify सपोर्ट Shopify च्या मोफत थीम्समध्ये काही कस्टमायझेशन्स करू शकतो. Shopify सपोर्ट कस्टमायझेशनच्या पात्रतेचे प्रत्येक प्रकरणानुसार मूल्यमापन करतो. जर तुम्ही असे कस्टमायझेशन शोधत असाल जे तुमच्या थीमसाठीच्या सपोर्टेड कस्टमायझेशन्समध्ये सूचीबद्ध केलेले नाही, तरीही Shopify सपोर्ट तुम्हाला मदत करू शकेल.
तुमच्या कस्टमायझेशनमुळे तुमच्या व्यवसायात सकारात्मक वाढ होईल याची खात्री करण्यासाठी, या कस्टमायझेशनकडून तुम्हाला कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत आणि त्याचा तुमच्या ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा.
मर्यादा
Shopify सपोर्ट मोठ्या प्रमाणात मूलभूत कस्टमायझेशनला सपोर्ट करण्यास सक्षम असला तरी, लक्षात ठेवा की Shopify खालील कामांमध्ये मदत करू शकत नाही:
- चेकआउट संपादित करणे.
- लक्षणीय कोड बदल असलेल्या थीम्स कस्टमाइझ किंवा ट्रबलशूट करणे.
- तृतीय-पक्ष ॲप्स (Shopify ने विकसित न केलेले ॲप्स) इंस्टॉल करणे, काढून टाकणे किंवा बदलणे.
- तृतीय-पक्ष कोड कस्टमाइझ करणे किंवा ट्रबलशूट करणे. हे Shopify द्वारे विकसित न केलेल्या कोडचा संदर्भ देते, ज्यामध्ये फोरम आणि Shopify पार्टनर्सचा कोड आणि AI-व्युत्पन्न थीम ब्लॉक्समधील कोणत्याही कोडचा समावेश आहे.
- तुमच्या Shopify ॲडमिनमधील रिच टेक्स्ट एडिटरमध्ये जोडलेली सामग्री कस्टमाइझ करणे किंवा ट्रबलशूट करणे, जसे की पेजेस आणि ब्लॉग पोस्ट्स.
- तुमच्या थीममध्ये नवीन फॉन्ट जोडणे.
- इमेजेस संपादित करणे, ज्यामध्ये क्रॉप करणे, रंग प्रोफाइल्स ॲडजस्ट करणे, बॅकग्राउंड्स काढून टाकणे यांचा समावेश आहे.
- ग्राहकांना दिशाभूल करणारी किंवा फसवणूक करणारी माहिती पुरवणारे बदल लागू करणे.
- कस्टम भाषांतर सेवा, ज्यामध्ये ऑर्डर प्रिंटर आणि ई-मेल सूचना टेम्पलेट्सचा समावेश आहे.
मोफत Shopify थींबद्दल Shopify सपोर्टशी संपर्क साधण्याची तयारी करणे
Shopify सपोर्टशी संपर्क साधण्यापूर्वी, तुम्ही खालील पायऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत:
- तुमचा प्राथमिक स्टोअर सेटअप पूर्ण करा.
- तुमची विनंती Shopify सपोर्ट करत नसलेल्या कस्टमायझेशनच्या यादीत नसल्याची खात्री करा.
- एखादी वेगळी थीम तुमच्या व्यवसायासाठी अधिक योग्य असू शकते का ते ठरवा.
- थीम एडिटरमध्ये तुमच्या थीमसाठी उपलब्ध कस्टमायझेशन पर्याय एक्सप्लोर करा.
- तुमच्या थीममध्ये लक्षणीय कोड बदल नाहीत याची खात्री करा.
- कस्टमायझेशन ॲक्सेसिबिलिटी मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करण्यासाठी थीम्ससाठीच्या ॲक्सेसिबिलिटीचे पुनरावलोकन करा.
जर तुमचा स्टोअर सेटअप पूर्ण झाला असेल आणि तुम्ही शोधत असलेले कस्टमायझेशन थीम एडिटर वापरून शक्य नसेल, तर तुम्ही विनंतीचे पुनरावलोकन करण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधू शकता.
सपोर्टेड ब्राउझर्स
थीमचा लेआउट, ब्राउझिंग अनुभव आणि खरेदीच्या कृतींनी खालील ब्राउझर आणि रिलीझला सपोर्ट करणे आवश्यक आहे:
डेस्कटॉप ब्राउझर्स
- Safari - Mac साठीचे नवीनतम दोन रिलीझ
- Chrome - Mac आणि PC साठीचे नवीनतम तीन रिलीझ
- Firefox - Mac आणि PC साठीचे नवीनतम तीन रिलीझ
- Edge - PC साठीचे नवीनतम दोन रिलीझ
मोबाइल ब्राउझर्स
- Mobile Safari - iOS साठीचे नवीनतम दोन रिलीझ
- Chrome Mobile - Android आणि iOS साठीचे नवीनतम तीन रिलीझ
- Samsung Internet - Android साठीचे नवीनतम दोन रिलीझ
वेबव्ह्यूज आणि इतर ॲप्लिकेशन्स
खालील ॲप्लिकेशन्ससाठी वेबव्ह्यूजमध्ये रेंडर केल्यावर थीम्सनी ब्राउझिंग आणि खरेदीच्या कृतींना सपोर्ट करणे आवश्यक आहे:
- Instagram - Android आणि iOS साठी नवीनतम रीलिझ
- Facebook - Android आणि iOS साठी नवीनतम रीलिझ
- Pinterest - Android आणि iOS साठी नवीनतम रीलिझ
अतिरिक्त संसाधने
Shopify विस्तृत किंवा प्रगत थीम कस्टमायझेशनला सपोर्ट करत नाही, त्यासाठी इतर अनेक सपोर्ट संसाधने उपलब्ध आहेत.
थीम डिझाईन्सवर चर्चा करण्यासाठी फोरम
तुमचे ऑनलाइन स्टोअर सानुकूलित करण्यासाठी HTML, CSS किंवा Liquid कसे संपादित करायचे यावर Shopify Design फोरम मार्गदर्शन प्रदान करतो. तुम्हाला थीम फाईल्स संपादित करण्यासाठी मदतीची आवश्यकता असल्यास, Shopify Design फोरममध्ये तुमचा प्रश्न विचारून पाहा. इतर Shopify मर्चंट्स त्यांच्या थीम्ससह काय करत आहेत याची कल्पना मिळवण्यासाठी तुम्ही पोस्टिंग्जमध्ये शोध घेऊ शकता.
तुमच्या स्टोअरवरील अभिप्रायासाठी फोरम
तुम्ही तुमच्या स्टोअरसाठी रंग, फॉन्ट आणि इतर डिझाईन निर्णयांवर मार्गदर्शन आणि अभिप्राय Feedback On My Store फोरमकडून विचारू शकता.
अॅप्ससाठी सपोर्ट
एखाद्या अॅपबाबत मदत मिळवण्यासाठी, सेटिंग्ज > अॅप्स वर जा आणि त्यानंतर तुम्हाला ज्या अॅपसाठी मदत हवी आहे त्यासाठी > सपोर्ट मिळवा वर क्लिक करा.
तुमच्या स्टोअरवर स्थापित नसलेल्या तृतीय-पक्ष अॅपबाबत तुम्हाला मदत हवी असल्यास, Shopify App Store वर अॅप शोधा. अॅपच्या पेजच्या तळाशी असलेल्या सपोर्ट विभागामध्ये, अॅप डेव्हलपरच्या दस्तावेजाचा संदर्भ घ्या किंवा अॅप डेव्हलपरला मेसेज पाठवा.
रिच टेक्स्ट एडिटर
रिच टेक्स्ट एडिटर सह तुमची सामग्री फॉरमॅट करण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास, तुमच्या स्टोअरमधील पेजेस संपादित करण्यासाठी एखादे अॅप स्थापित करून पाहा.
वेब कामगिरी अहवाल आणि शिफारसी
एक वेगवान ऑनलाइन स्टोअर तुमच्या ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव सुधारू शकते, तुमचे स्टोअर अधिक शोधण्यायोग्य बनवू शकते आणि कन्व्हर्जन वाढवू शकते. तुमच्या Shopify ॲडमिनच्या अॅनालिटिक्स > अहवाल पेजमधील कामगिरी कॅटेगरीसह अहवाल पाहून तुमचे स्टोअर उद्योग मानके आणि तुमच्यासारख्या इतर Shopify स्टोअर्सच्या तुलनेत कशी कामगिरी करते हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या वेब कामगिरीबाबत मदत हवी असल्यास, तुमच्या ऑनलाइन स्टोअरची कामगिरी सुधारणे चा संदर्भ घ्या.
अतिरिक्त कार्यक्षमता
तुमच्या थीममध्ये साइडबार, इमेज झूमिंग, अतिरिक्त स्लाईडशो किंवा इन्फिनाईट स्क्रोल यांसारखी अतिरिक्त कार्यक्षमता जोडण्यासाठी, वेगळी थीम वापरून पाहण्याचा विचार करा. तुमच्या थीममध्ये तुम्हाला हवी असलेली कार्यक्षमता नसल्यास, तुमच्या गरजांनुसार अधिक योग्य थीम शोधण्यासाठी Theme Store मध्ये शोधा. तुम्ही शोधत असलेली कार्यक्षमता ऑफर करणाऱ्या तृतीय-पक्ष अॅपसाठी तुम्ही Shopify App Store देखील शोधू शकता.
Shopify पार्टनर्स
Shopify पार्टनर्स हे अनुभवी उद्योग व्यावसायिक आहेत ज्यांना Shopify थीम्स तयार करणे, अपडेट करणे आणि परिपूर्ण बनवण्याबद्दल विस्तृत ज्ञान आहे.
Shopify पार्टनरला नियुक्त करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.