वेब कामगिरीचा ओव्हरव्ह्यू

वेब कामगिरी ही Core Web Vitals नावाच्या प्रमुख मेट्रिक्सद्वारे मोजली जाते. हे मेट्रिक्स तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या कामगिरीचे प्रमाण ठरवतात आणि मूल्यांना ऑप्टिमाइझ केल्याने तुमच्या ग्राहकांचा खरेदीचा अनुभव, तुमचा कन्व्हर्जन दर आणि तुमच्या स्टोअरची शोधण्यायोग्यता सुधारू शकते.

तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या कामगिरीवर खालील क्षेत्रांसारख्या अनेक घटकांचा प्रभाव पडू शकतो:

  • अ‍ॅप्स
  • तृतीय-पक्ष लायब्ररी आणि सेवा
  • ॲनालिटिक लायब्ररीज
  • थीम कोड
  • इमेज आणि व्हिडिओंचे प्रमाण आणि आकार

तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये स्ट्रॅटेजिक बदल करून, तुम्ही तुमचे कामगिरी मेट्रिक्स आणि रँकिंग सुधारू शकता.

तुमची वेब कामगिरी मोजणे

वेब कामगिरी Core Web Vitals द्वारे मोजली जाते, ज्यामध्ये खालील कामगिरी मोजमापांचा समावेश होतो:

  • लार्जेस्ट कंटेंटफुल पेंट (LCP) सर्वात मोठा घटक किंवा मुख्य सामग्री व्हिजिटर्सना किती वेगाने दृश्यमान होते, याच्या आधारे लोडिंगचा वेग मोजते. पेज लोड होण्यास सुरुवात झाल्यापासून 2.5 सेकंदात मुख्य सामग्री लोड केल्यास, चांगला LCP स्कोअर मिळतो.
  • इंटरेक्शन टू नेक्स्ट पेंट (INP) लिंक किंवा बटणावर क्लिक करण्यासारख्या बहुतांश वापरकर्त्याच्या कृतींना पेजला प्रतिसाद देण्यासाठी किती वेळ लागतो, याच्या आधारे संवादात्मकता मोजते. 200 मिलिसेकंदांपेक्षा कमी INP स्कोअर ही एक चांगली कामगिरी मानली जाते, कारण पेज लवकर संवादात्मक होते.
  • क्युम्युलेटिव्ह लेआउट शिफ्ट (CLS) पेजवर नेव्हिगेट करताना सामग्री अनपेक्षितपणे किती बदलते, याच्या आधारे दृश्यमान स्थिरता मोजते. 0.1 पेक्षा कमी CLS स्कोअर ही एक चांगली कामगिरी मानली जाते.

Google यासारख्या सर्च इंजिन्सनी तुमची वेब कामगिरी "चांगली (good)" मानण्यासाठी, तुमच्या किमान 75% पेज लोड्सनी सर्व Core Web Vitals वर चांगले (Good) स्कोअर मिळवणे आवश्यक आहे. वेब कामगिरी अहवाल तुम्हाला तुमच्या कामगिरीचा ट्रॅक ठेवण्यात मदत करण्यासाठी हे 75वे पर्सेन्टाइल मोजमाप दाखवतो.

Core Web Vitals व्यतिरिक्त, Google इतर घटकांचेही मूल्यांकन करते, ज्यामध्ये खालील उदाहरणांचा समावेश आहे:

  • मोबाईल सुसंगतता
  • सुरक्षित ब्राउझिंग
  • HTTPS सुरक्षितता
  • त्रासदायक इंटरस्टीशियल्स नसणे, जे प्रमोशनल पॉप-अप्स किंवा वयाची पडताळणी करण्यासारखे पेजमधील घटक आहेत, जे सामग्रीचे पूर्ण दृश्य पाहण्यात अडथळा आणतात

हे घटक एकत्रितपणे वेबपेजची कामगिरी आणि वापरकर्ता अनुभवाचे मूल्यांकन करण्यास मदत करतात.

Core Web Vitals आणि Google चे सर्च निकाल याबद्दल अधिक जाणून घ्या.

वेब कामगिरीचा तुमच्या स्टोअरवर कसा प्रभाव पडतो

तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या कामगिरीचा तुमच्या ग्राहकांचा खरेदीचा अनुभव, तुमचा कन्व्हर्जन दर आणि तुमच्या स्टोअरच्या शोधण्यायोग्यतेवर परिणाम होऊ शकतो.

वेब कामगिरी का महत्त्वाची आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.

अनुभव आणि कन्व्हर्जन

जेव्हा तुमचे ऑनलाइन स्टोअर वेगाने लोड होते आणि संवाद सुरळीत असतात, तेव्हा ते त्यांच्या उपकरणाचा किंवा कनेक्शनच्या वेगाचा विचार न करता सर्व व्हिजिटर्सना एक सकारात्मक अनुभव प्रदान करते. जर एखादी साइट स्लो असेल किंवा नेव्हिगेट करायला कठीण असेल, तर व्हिजिटर्स काहीतरी खरेदी करण्यापूर्वीच साइट सोडून जाण्याची अधिक शक्यता असते. तुमच्या स्टोअरची वेब कामगिरी सुधारून, तुम्ही वापरकर्ता अनुभव अधिक चांगला बनवू शकता आणि कन्व्हर्जन दर वाढवू शकता.

शोधण्यायोग्यता

Google यासारखी सर्च इंजिन्स रँकिंग घटक म्हणून पेजच्या वेगाचा वापर करतात. जर तुमची ऑनलाइन स्टोअर पेजेस Core Web Vitals वर खराब कामगिरी करत असतील, तर ती खाली रँक केली जाऊ शकतात, मग तुमचे स्टोअर इतर बाबींमध्ये सर्च इंजिन्ससाठी ऑप्टिमाइझ केलेले असले तरीही. वेब कामगिरी सुधारून, तुम्ही सर्चमध्ये तुमच्या स्टोअरचे रँकिंग अधिक वर असण्याची शक्यता वाढवत आहात आणि तुमच्या व्यवसायासाठी अधिक दृश्यमानता मिळवत आहात.

ऑनलाइन स्टोअर वैशिष्ट्ये वि. वेब कामगिरी

तुमचे ऑनलाइन स्टोअर थीम कोड, अ‍ॅप्स, इमेज, व्हिडिओ, कॅरोसेल, सोशल मीडिया फीड आणि ॲनालिटिक्स यांसारख्या वैशिष्‍ट्यांच्या संचाने बनलेले आहे. ही वैशिष्‍ट्ये व्हिजिटरचा अनुभव अधिक चांगला बनवू शकतात आणि तुमच्या साइटच्या क्षमता वाढवू शकतात.

तथापि, तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये जोडत असलेले प्रत्येक वैशिष्ट्य तुमच्या स्टोअरच्या Core Web Vitals वर परिणाम करू शकते. काही वैशिष्ट्ये तुमची साइट स्लो करू शकतात किंवा अनपेक्षित वागणूक तयार करू शकतात, ज्यामुळे वापरकर्ता अनुभवांवर परिणाम होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये एखादे वैशिष्ट्य जोडण्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही Core Web Vitals वरील त्याच्या प्रभावाच्या तुलनेत त्या वैशिष्ट्याच्या फायद्यांचे मोजमाप केले पाहिजे. तुम्हाला कदाचित वापरकर्ता अनुभव आणि वेब कामगिरी यांच्यात संतुलन शोधण्याची आवश्यकता असू शकते.

तुमच्या स्टोअरसाठी वैशिष्ट्यांचा विचार करताना स्वतःला खालील प्रश्न विचारा:

  • ग्राहकांना स्टोअरमधून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यास कोणती गोष्ट मदत करेल?
    • उदाहरणार्थ, तुमच्या ग्राहकांना तपशीलवार उत्पादन पेजेसच्या लिंकसह साधे होमपेज आवडेल किंवा अधिक सामर्थ्यवान होम पेज आवडेल जिथे ते उत्पादने त्वरित पाहू आणि खरेदी करू शकतील, याचा विचार करा.
  • कन्व्हर्जन वाढवण्यासाठी पेजच्या वरच्या भागात कोणती कार्यक्षमता असावी?
    • उदाहरणार्थ, ब्रँडिंग घटक, वैशिष्ट्यीकृत इमेजेस आणि चेकआउट कार्ट ही सर्व अशी वैशिष्ट्ये आहेत ज्यांचा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, परंतु त्यामुळे कन्व्हर्जन वाढते.
  • ग्राहक जेव्हा पेजवर खाली स्क्रोल करतात, तेव्हा कोणती कार्यक्षमता नंतर लोड होऊ शकते?
    • उदाहरणार्थ, जेव्हा एखादा ग्राहक तुमच्या स्टोअरला भेट देतो, तेव्हा ॲनालिटिक्स आणि उत्पादन पुनरावलोकने लगेच लोड होण्याची आवश्यकता नसते. एखादे वैशिष्ट्य लगेच लोड होत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या थीम किंवा ॲप डेव्हलपरचा सल्ला घ्यावा लागेल.

तुमचा वेब कामगिरी मेट्रिक सारांश आणि अहवाल एक्सप्लोर करा

तुम्ही तुमचे वेब कामगिरी अहवाल पाहून, तुमचे स्टोअर Core Web Vitals वर कशी कामगिरी करते हे जाणून घेऊ शकता. अहवाल आणि कामगिरी मेट्रिक सारांश हे दाखवतात की तुमचे स्टोअर सर्व 3 Core Web Vitals वर कसे रँक करते आणि सुधारणा करण्यासाठी कृतीयोग्य अंतर्दृष्टी प्रदान करते.

तुम्ही तुमच्या वेब कामगिरीवर परिणाम करणारे घटक आणि त्यांचे निराकरण कसे करावे हे देखील एक्सप्लोर करू शकता.

वेब कामगिरी स्कोअरबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझ्याकडे अद्याप स्कोअर का नाहीत?

तुमच्याकडे तुमच्या core web vitals साठी अद्याप स्कोअर न मिळण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • तुमच्या स्टोअरचा खाजगी मोड सक्रिय आहे: तुमचे ऑनलाइन स्टोअर खाजगी मोडमध्ये असल्यास, तुम्हाला Core Web Vitals जनरेट करण्यासाठी आवश्यक असलेले रिअल-युझर ट्रॅफिक मिळणार नाही. वापरकर्त्यांना तुमच्या साइटला भेट देण्याची अनुमती देण्यासाठी तुम्हाला खाजगी मोड निष्क्रिय करणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे अद्याप ट्रॅफिक नाही: रिअल-युझर मेट्रिक्स जनरेट करण्यासाठी तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर कदाचित कोणतेही पेज व्ह्यूज नसतील. तुमच्याकडे कोणतेही ट्रॅफिक नसल्यास, तुम्ही कृत्रिम डेटाचा वापर करून मोफत कामगिरी विश्लेषण वापरू शकता, जसे की PageSpeed Insights.

माझ्याकडे ट्रॅफिक आहे, पण Core Web Vital स्कोअर का नाहीत?

Core Web Vitals हे Google उत्पादन आहे आणि सध्या फक्त Firefox आणि Chromium-आधारित ब्राउझरवर उपलब्ध आहे. आधुनिक ब्राउझर्स समान तंत्रज्ञानावर तयार केले गेले आहेत, त्यामुळे विद्यमान डेटा अजूनही तुमचे वापरकर्ते वेबसाइट कसा अनुभवतात, याचे अचूक चित्रण दर्शवतो.

लार्जेस्ट कंटेंटफुल पेंट आणि इंटरॲक्शन टू नेक्स्ट पेंट हे दोन्ही आगामी Safari आवृत्तीपैकी एकामध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. Interop 2025 प्रोजेक्ट मध्ये क्रॉस-ब्राउझर इंटरऑपरेबिलिटीबद्दल अधिक जाणून घ्या.

माझ्याकडे काही मेट्रिक्ससाठी स्कोअर का आहेत, पण इतरांसाठी का नाहीत?

प्रत्येक मेट्रिक कामगिरी आणि वापरकर्त्याच्या संवादांचा भिन्न पैलू मोजतो. उदाहरणार्थ, लार्जेस्ट कंटेंटफुल पेंट पेज लोड मोजते, तर इंटरॲक्शन टू नेक्स्ट पेंट बटणे किंवा लिंक्ससह परस्परसंवाद मोजते. पेजवरील घटकांशी कोणताही संवाद साधला गेला नसल्यास, INP मेट्रिकला स्कोअर नसू शकतो.

माझा एक स्कोअर का बदलला?

ट्रॅफिकचे प्रमाण किंवा तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये केलेल्या बदलांमुळे स्कोअरमध्ये चढ-उतार होऊ शकतात. कमी ट्रॅफिकमुळे मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्यास, साप्ताहिक किंवा मासिक फिल्टरवर बदलून पहा.

जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये बदल करता तेव्हा तुमचे स्कोअर देखील बदलू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित अनेक नवीन उत्पादने आयात केली असतील, अनेक नवीन कलेक्शन तयार केली असतील, तुमची थीम बदलली असेल किंवा एखादे नवीन ॲप आणले असेल. तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या कामगिरीवर परिणाम करू शकणाऱ्या घटकांबद्दल जाणून घ्या.

माझ्या वेब कामगिरी अहवालांमधील स्कोअर इतर टूल्सपेक्षा वेगळे का आहेत?

तुमच्या वेब कामगिरी अहवालांमधील स्कोअर खालील घटकांमुळे इतर टूल्सपेक्षा वेगळे असू शकतात:

  • वेब कामगिरी अहवालांमधील डेटा UTC मानकावर आधारित आहे, जो इतर प्लॅटफॉर्म्सच्या टाइमझोनपेक्षा वेगळा असू शकतो.
  • वेब कामगिरी अहवाल सर्व Chromium ब्राउझर्स (Chrome, Opera, Edge, Samsung Internet) आणि Firefox कडून एक व्यापक डेटा सेट गोळा करून डेटा वेगळ्या प्रकारे संकलित करतात. Google चे PageSpeed Insights सारखी टूल्स फक्त निवडलेल्या Chrome ब्राउझरसाठी CrUX अहवाल वापरतात. CrUX डेटा बद्दल अधिक जाणून घ्या.

माझ्या स्टोअरचा कामगिरी स्कोअर कमी असल्यास, याचा अर्थ काय होतो?

तुमच्या साइटची वैशिष्ट्ये आणि गती यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. कमी स्कोअरचा अर्थ असा आहे की, अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आणि मोबाइल उपकरणे, धीमे इंटरनेट कनेक्शन किंवा जुने ब्राउझर वापरणाऱ्यांसह सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी अधिक प्रवेशयोग्य बनवण्यासाठी तुमचे स्टोअर ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते.

उदाहरणार्थ, जर तुमच्या होमपेजवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत असेल पण तुमच्या होमपेजचा कामगिरी स्कोअर कमी असेल, तर तो व्हिडिओ कामगिरीवरील परिणामाची भरपाई करण्याइतका पुरेसा मौल्यवान आहे की नाही हे तुम्हाला तपासावे लागेल.

परिपूर्ण स्पीड स्कोअर अशी कोणतीही गोष्ट नसते आणि तुम्ही 100 च्या जितके जवळ जाता, तितके पुढे सुधारणा करणे अधिक कठीण होते. शक्य तितका सर्वोच्च स्कोअर मिळवण्याऐवजी तुमच्या विशिष्ट व्यावसायिक गरजांसाठी तुमचे स्टोअर ऑप्टिमाइझ करण्यावर लक्ष केंद्रित करा.

माझा कामगिरी स्कोअर कसा मोजला जातो?

तुमचा कामगिरी स्कोअर मागील 7 दिवसांतील तुमच्या होम पेज, सर्वात जास्त भेट दिलेले उत्पादन पेज आणि सर्वात जास्त भेट दिलेले कलेक्शन पेज यांवरील डेटा एकत्र करतो. ही प्रणाली Chromium-आधारित ब्राउझर्स आणि Firefox वापरणाऱ्या व्हिजिटर्सकडून रिअल युझर डेटा (ज्याला Real User Metrics किंवा RUM म्हटले जाते) वापरते.

प्रत्येक पेजचा स्कोअर वास्तविक व्हिजिटरचे अनुभव दर्शवतो, सिम्युलेट केलेल्या चाचण्या नाही. याचा अर्थ असा की विविध परिस्थितीत वास्तविक ग्राहक तुमचे स्टोअर कसे अनुभवतात हे हे स्कोअर प्रतिबिंबित करतात.

माझा स्कोअर समान स्टोअर्सपेक्षा वेगळा का आहे?

तुमच्या स्टोअरची तुलना समान विक्री आकारमान असलेल्या इतर Shopify स्टोअर्ससोबत केली जाते. ही तुलना तुम्हाला समान आकाराच्या आणि जटिलतेच्या स्टोअर्सच्या संदर्भात तुमची कामगिरी समजून घेण्यास मदत करते.

तुुमचे स्टोअर इतरांशी कसे तुलना करते यावर परिणाम करू शकणाऱ्या घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • तुमची थीम आणि कस्टमायझेशन्सची गुंतागुंत
  • तुम्ही वापरत असलेल्या ॲप्सची संख्या आणि प्रकार
  • तुमचा उत्पादन कॅटलॉगचा आकार आणि इमेज ऑप्टिमायझेशन
  • तुमचा लक्ष्य बाजार आणि ग्राहक उपकरणाची प्राधान्ये

मी माझ्या कामगिरी स्कोअरबद्दल कधी काळजी केली पाहिजे?

खालील परिस्थिती असल्यास सुधारणेवर लक्ष केंद्रित करा:

  • तुमचे स्कोअर एकाधिक मेट्रिक्समध्ये सतत "खराब" श्रेणीत असतात
  • तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये बदल न करताही कामगिरीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे तुमच्या लक्षात येते
  • ग्राहकाचा अभिप्राय धीम्या लोडिंग वेळा किंवा खराब वापरकर्ता अनुभव दर्शवतो
  • कामगिरी स्कोअर सोबत तुमचे कन्व्हर्जन दर घसरत आहेत

खालील परिस्थिती असल्यास जास्त काळजी करू नका:

  • एकूण ट्रेंड चांगले असताना काही वैयक्तिक पेजेस किंवा तारखा मध्यम कामगिरी दर्शवतात
  • सामान्य ट्रॅफिक फरकांमुळे तुमचे स्कोअर थोडे बदलतात
  • तुम्ही व्यावसायिक कारणांसाठी कामगिरीवर परिणाम करणारी वैशिष्ट्ये हेतुपुरस्सर निवडली आहेत