Shopify वर Buy with Prime ॲक्टिव्हेट करणे
जेव्हा ग्राहक Amazon Pay किंवा Shop Pay द्वारे चेकआउट करतात तेव्हा त्यांना तुमच्या Shopify स्टोअरवर त्यांची Amazon Prime मेंबरशिप वापरण्याचा पर्याय देऊन, Buy with Prime कन्व्हर्जन दर सुधारण्यास मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. Buy with Prime वापरण्यासाठी तुम्हाला amazon.com वर विक्री करण्याची आवश्यकता नाही.
Buy with Prime ॲक्टिव्हेट केल्याने तुमच्या उत्पादन पेजेसवर Prime हायलाइट होते, जे Prime सदस्यांकडून पात्र ऑर्डर्सवर जलद आणि मोफत वितरण आणि मोफत रिटर्न्स ऑफर करते.
तुमच्या Shopify स्टोअरमध्ये Buy with Prime जोडून, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील Shopify साठी Amazon MCF आणि Buy with Prime ॲपवरून तुमची Buy with Prime उत्पादने व्यवस्थापित करू शकता. Prime मॉड्यूल हे तुमच्या Shopify स्टोअरमधील थीमशी आपोआप जुळवले जाते.
Shopify साठी Amazon MCF आणि Buy with Prime ॲपची किंमत निश्चिती ही पे ॲज यू गो (तुम्ही वापरता तसे पैसे द्या) आहे. Amazon च्या Buy with Prime च्या किंमत निश्चिती आणि शुल्कांबद्दल अधिक जाणून घ्या.
Buy with Prime वापरून दिलेल्या ऑर्डरसाठी Amazon कडून पेमेंट कॅप्चर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पुढील Shopify Payments पेआउटमध्ये तुमच्या ऑर्डरसाठी पेमेंट मिळते.
या पेजवर
अटी आणि पात्रता
Buy with Prime साठी पात्र होण्यासाठी, तुमच्या स्टोअरने आणि तुमच्या Amazon Seller Central खात्याने पूर्ण केल्या पाहिजेत अशा काही आवश्यकता आणि अटींचा संच आहे ज्यांना तुम्ही संमती देणे आवश्यक आहे. मर्चंट आणि ग्राहकांसाठी सातत्यपूर्ण अनुभव सुनिश्चित करण्यासाठी या आवश्यकता लागू केल्या आहेत. आवश्यकतांची यादी पूर्वसूचनेशिवाय बदलू शकते.
तुमचे स्टोअर
- तुमचे स्टोअर युनायटेड स्टेट्समध्ये स्थित आहे आणि तुम्ही USD मध्ये विक्री करता.
- तुमचे स्टोअर युनायटेड स्टेट्समध्ये देशांतर्गत शिपिंग करते.
- तुमचे Shopify Payments खाते ॲक्टिव्ह असले पाहिजे.
- Shopify Payments सह Amazon Pay ॲक्टिव्ह असले पाहिजे.
- तुमचे स्टोअर ॲक्टिव्ह Basic प्लॅन किंवा त्याहून उच्च प्लॅनवर असणे आवश्यक आहे. तुमचा सध्याचा प्लॅन तपासणे किंवा अपग्रेड करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
- स्टोअरमध्ये चेकआउटची नवीनतम आवृत्ती वापरणे आवश्यक आहे. तुम्ही चेकआउटची नवीनतम आवृत्ती वापरत नसल्यास, सेटिंग्ज > चेकआउट मध्ये अपग्रेडची सूचना दिसते.
- तुम्ही Shopify च्या स्वीकार्य वापर धोरणाचे कधीही उल्लंघन केलेले नाही.
तुमच्या Amazon खात्याच्या आवश्यकता
Buy with Prime वापरण्यासाठी तुम्हाला Amazon.com वर विक्री करण्याची आवश्यकता नाही. तथापि, तुमच्या Amazon खात्याने खालील आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत:
- तुमचे Amazon Pay खाते ॲक्टिव्ह असले पाहिजे. तुम्ही Shopify Payments मधील वॉलेट्स विभागाद्वारे किंवा थेट Amazon Pay वॉलेटद्वारे Amazon Pay ॲक्टिव्हेट करू शकता.
- तुमचे Amazon Seller Central खाते ॲक्टिव्ह स्थितीतील व्यावसायिक खाते असणे आवश्यक आहे. जर तुम्ही Shopify Payments द्वारे Amazon Pay ॲक्टिव्हेट केले, तर एक Seller Central खाते आपोआप तयार केले जाते आणि वापरले जाते, जे ही आवश्यकता पूर्ण करते.
- तुमच्या Seller Central खात्यावर Fulfillment by Amazon सेट केलेले असले पाहिजे.
Amazon च्या FAQ लायब्ररीमध्ये Buy with Prime सेट करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
Buy with Prime वापरण्याच्या अटी
Buy with Prime चा वापर Buy with Prime Merchant Console Service Terms आणि Buy with Prime Conditions of Use द्वारे नियंत्रित केला जातो.
Buy with Prime अॅक्टिव्हेट करा
- Shopify App Store मध्ये लॉग इन करा.
- Shopify साठी Amazon MCF आणि Buy with Prime अॅप शोधण्यासाठी शोध बॉक्स वापरा आणि त्यानंतर त्यावर क्लिक करा.
- अॅप लिस्टिंग पेजवर, अॅप जोडा वर क्लिक करा.
- खालील फंक्शन्स अधिकृत करण्यासाठी तुमच्या Shopify अॅडमिनमधून अॅप इंस्टॉल करा वर क्लिक करा:
- अॅपचा वापर.
- ग्राहक आणि स्टोअर माहिती पाहणे आणि ती संपादित करण्याच्या अॅक्सेससह, Shopify आणि Amazon ने माहिती शेअर करणे.
तुम्ही Shopify साठी Amazon MCF आणि Buy with Prime अॅप इंस्टॉल केल्यानंतर, तुम्ही तुमच्या Shopify अॅडमिनमधील अॅप्स पेजवरून ते पाहू शकता आणि वापरू शकता. अॅपचा वापर Multi-Channel Fulfillment (MCF) आणि Buy with Prime अॅक्टिव्हेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. Buy with Prime वापरण्यासाठी, तुम्हाला कदाचित प्रथम खालील पायऱ्या अनुक्रमे पूर्ण कराव्या लागतील:
- Shopify Payments च्या वॉलेट्स विभागात Amazon Pay अॅक्टिव्हेट करा.
- तुमचे Buy with Prime खाते सेट करा.
- Amazon MCF आणि Buy with Prime अॅप वापरून तुमची उत्पादने मॅप करा आणि Buy with Prime सुरू करा.
- तुमच्या Shopify अॅडमिनमध्ये सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जाऊन स्प्लिट शिपिंग अॅक्टिव्हेट करा. हे ग्राहकांना Buy with Prime आणि स्वतः-पूर्तता केलेल्या अशा दोन्ही आयटम्ससह चेकआउट करण्याची अनुमती देते.
अधिक माहितीसाठी, Shopify साठी Buy with Prime अॅप पहा. तुम्हाला मदत हवी असल्यास, तुम्ही तुमच्या खात्यातून Buy with Prime सपोर्टशी संपर्क साधू शकता. किंवा, तुम्ही Buy with Prime आमच्याशी संपर्क साधा फॉर्म पूर्ण करू शकता.
Buy with Prime डिअॅक्टिव्हेट करा
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, सेटिंग्ज > अॅप्स वर जा.
तुम्हाला जे अॅप अनइंस्टॉल करायचे आहे त्या अॅपच्या ओळीत, अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.
प्रदर्शित होणाऱ्या डायलॉगमध्ये, अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.
Buy with Prime व्यवस्थापित करा
तुमचे Buy with Prime खाते व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- तुमच्या उत्पादनांसाठी Prime शिपिंग आणि रिटर्न्स ऑफर करा.
- Buy with Prime ऑर्डर्स पहा.
- Buy with Prime कन्सोलवरून तुमचे खाते व्यवस्थापित करा.
- Buy with Prime साठी सपोर्ट मिळवा.
ऑर्डर्स पहा
तुम्ही Shopify साठी Amazon MCF आणि Buy with Prime अॅप इंस्टॉल केल्यानंतर, तुमच्या ऑर्डर्स आपोआप तुमच्या Shopify अॅडमिनमध्ये सिंक केल्या जातात. यामुळे तुम्हाला Buy with Prime चा तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम होत आहे, याविषयीची माहिती सहजपणे शोधण्यात मदत होते, जसे की Buy with Prime द्वारे केलेल्या ऑर्डर्स, रिटर्न्स आणि परताव्यांची संख्या.
पायऱ्या:
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, ऑर्डर्स वर जा.
ऑर्डर व्ह्यूवर क्लिक करा.
तुमच्या ऑर्डर्स Buy with Prime टॅगने फिल्टर करा.
तुमचा Buy with Prime उत्पादन कॅटलॉग व्यवस्थापित करा
तुम्ही Buy with Prime सेट केल्यानंतर, Managing Prime-enabled products पेजवर तुम्हाला Buy with Prime साठी उपलब्ध करायची असलेली उत्पादने तुम्ही निवडू शकता. तुम्ही एखाद्या उत्पादनावर Buy with Prime अॅक्टिव्हेट केल्यानंतर, त्या उत्पादन पेजवर Buy with Prime बटण लगेचच प्रदर्शित होते.
पायऱ्या:
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, अॅप्स > Amazon MCF and Buy with Prime वर जा.
Managing Prime-enabled products वर क्लिक करा.
Offer Prime if conditions are met कॉलममध्ये, तुम्हाला ज्या उत्पादनांवर Buy with Prime प्रदर्शित करायचे आहे ती उत्पादने निवडा किंवा ज्या उत्पादनांवरून तुम्हाला Buy with Prime लपवायचे आहे ती उत्पादने डिसीलेक्ट करा.
Buy with Prime वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ऑनलाइन चेकआउट अनुभव
त्यांच्या Amazon खात्याच्या तपशीलांचा वापर करून, तुमच्या ग्राहकांना नवीन खाते तयार करण्याची किंवा चेकआउट करताना त्यांची वैयक्तिक माहिती टाकण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्या Amazon Prime सदस्याला त्यांच्या Amazon खात्याशी लिंक केलेला शिपिंग पत्ता किंवा पेमेंट पद्धत संपादित करायची असेल, तर ते चेकआउट करताना त्यांच्या Amazon खात्याची माहिती अपडेट करू शकतात.
ग्राहक एकाच Prime-पात्र आयटमसह चेकआउट करू शकतात किंवा गैर-Prime आयटम्ससह एकाधिक आयटम्ससह चेकआउट करू शकतात. एका-आयटमची, Prime-पात्र खरेदी उत्पादन पेज, कार्ट किंवा Prime मॉड्यूल वापरून चेकआउटवरून सुरू केली जाते. ग्राहकाच्या कार्टमधील Prime मॉड्यूलवरून किंवा चेकआउट करताना एकाधिक-आयटमची चेकआउट सुरू केली जाते.
जेव्हा एखादा ग्राहक Prime चेकआउट सुरू करतो, तेव्हा ते खालील गोष्टी अनुभवतात:
- ग्राहक त्यांच्या Amazon खात्यामध्ये लॉग इन करून त्यांची Prime मेंबरशिप व्हेरिफाय करतात:
- जर ग्राहक आधीच Prime सदस्य असेल, तर त्यांना चेकआउट ऑर्डर रिव्ह्यू पेजवर नेले जाते आणि ते त्यांच्या Amazon खात्यावरून सेव्ह केलेला शिपिंग पत्ता आणि पेमेंट पद्धत वापरू शकतात.
- जर ग्राहक आधीच Prime सदस्य नसेल, तर त्यांना एकतर मोफत Prime चाचणी सुरू करण्याचा किंवा Prime मेंबरशिपसाठी पैसे भरण्याचा पर्याय दिला जातो.
- जर एखाद्या ग्राहकाने Prime सुरू न ठेवण्याचे ठरवले, तर त्यांना परत उत्पादन पेजवर रिडिरेक्ट केले जाते, जेथे ते त्यांच्या कार्टमध्ये जाऊ शकतात किंवा गैर-Buy-with-Prime पर्यायासह चेकआउट करण्यासाठी पुढे जाऊ शकतात.
- जर खरेदी उत्पादन पेजवरून सुरू केली असेल, तर ग्राहकाला त्यांचे तपशील तपासण्यासाठी आणि त्यांची खरेदी पूर्ण करण्यासाठी थेट चेकआउटवर नेले जाते.
- जर खरेदी कार्टद्वारे किंवा चेकआउट करताना सुरू केली असेल, तर ग्राहक त्यांच्या गैर-Prime पात्र उत्पादनांसाठी चेकआउट करताना उपलब्ध असलेल्या शिपिंग पर्यायांमधून निवड करू शकतात. त्यानंतर ते त्यांच्या खरेदीचे पुनरावलोकन करू शकतात आणि त्यांचे पेमेंट करू शकतात.
परतावा आणि रिटर्न्स हाताळणे
जेव्हा तुमचे ग्राहक मोफत रिटर्न कालावधीमध्ये रिटर्न सबमिट करतात, तेव्हा Buy with Prime तुमच्या ग्राहकांचा परताव्याचा अनुभव स्वयंचलित करते. Buy with Prime परताव्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
Prime मेंबरशिप प्रॉम्प्ट डिअॅक्टिव्हेट करा
जर तुमच्या ग्राहकाने Buy with Prime वापरून चेकआउट करणे निवडले, पण त्यांच्याकडे अॅक्टिव्ह Amazon Prime मेंबरशिप नसेल, तर डीफॉल्टनुसार चेकआउट करताना Prime मेंबरशिप प्रॉम्प्ट प्रदर्शित होतो. हा प्रॉम्प्ट ग्राहकांना Prime साठी साइन अप करण्याचा किंवा थांबवलेली Prime मेंबरशिप पुन्हा सुरू करण्याचा पर्याय देतो. जर तुम्हाला तो चेकआउटवर प्रदर्शित करायचा नसेल, तर तुम्ही हा प्रॉम्प्ट डिअॅक्टिव्हेट करू शकता.
पायऱ्या:
- तुमच्या Amazon Merchant Console खात्यामध्ये लॉग इन करा आणि त्यानंतर Amazon Services टॅबवर जा.
- Prime मेंबरशिप प्रॉम्प्ट शोधा.
- Actions > Deactivate Prime membership निवडा.