Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करणे

Apple Pay जलद चेकआउट प्रक्रिया प्रदान करते, ज्यामुळे ग्राहक तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधून जलद आणि सुरक्षितपणे पेमेंट करू शकतात. तुम्ही Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करता, तेव्हा ते तुमच्या Shopify Checkout च्या पेमेंट्स विभागामध्ये पेमेंट पद्धत म्हणून डिस्प्ले होते.

जेव्हा एखादा ग्राहक Apple Pay वापरून त्यांच्या ऑर्डरसाठी पेमेंट करतो, तेव्हा त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती किंवा शिपिंग पत्ता मॅन्युअली टाकण्याची आवश्यकता नसते. ग्राहक Apple Pay बटणावर टॅप किंवा क्लिक करतात, त्यांच्या सुसंगत उपकरणावर त्यांचे फिंगरप्रिंट स्कॅन करतात किंवा Face ID वापरतात आणि त्यानंतर त्यांचे उपकरण पेमेंट प्रदात्याला पेमेंट माहिती पाठवते.

Apple Pay द्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क भरत नाही. तुम्ही तुमच्या पेमेंट प्रदात्याशी संबंधित सामान्य प्रक्रिया शुल्क भरत राहता. जलद चेकआउटबद्दल अधिक जाणून घ्या.

आवश्यकता

तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, तुम्ही खालील आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे:

Apple Pay ला सपोर्ट करणारी उपकरणे

तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर Apple Pay वापरून पेमेंट करण्यासाठी, तुमच्या ग्राहकांनी Apple Pay शी सुसंगत असलेल्या उपकरणांपैकी एकावर Safari वापरणे आवश्यक आहे.

सबस्क्रिप्शन्ससाठी आवश्यकता

तुमच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे सबस्क्रिप्शन उत्पादने खरेदी करताना तुमच्या ग्राहकांना Apple Pay वापरू देण्यासाठी, तुम्ही मानक Apple Pay आवश्यकतांव्यतिरिक्त अतिरिक्त आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • तुम्ही Shopify Payments वापरणे आवश्यक आहे.
  • ग्राहकांनी Mastercard किंवा Visa कार्डद्वारे पेमेंट करणे आवश्यक आहे.

काही सबस्क्रिप्शन अ‍ॅप्स सबस्क्रिप्शन उत्पादनांसाठी Apple Pay सारख्या जलद चेकआउट्सला सपोर्ट करत नाहीत. तुम्ही सबस्क्रिप्शन अ‍ॅप वापरत असल्यास, Apple Pay सोबतच्या सुसंगततेची पुष्टी करण्यासाठी अ‍ॅपच्या दस्तऐवजीकरणाचे पुनरावलोकन करा किंवा ॲप डेव्हलपरशी संपर्क साधा.

तुमच्या स्टोअरचा ॲक्सेस खाजगी मोडवर सेट केलेला असल्यास, तुमचे ग्राहक डिजिटल सबस्क्रिप्शन उत्पादनांसाठी पेमेंट करू शकत नाहीत. तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करा

तुम्ही आवश्यकता पूर्ण केल्यास आणि तुमचा पेमेंट प्रदाता Apple Pay ऑफर करत असल्यास, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > पेमेंट्स वर जा.

  2. तुमच्या क्रेडिट कार्ड पेमेंट प्रदात्याच्या विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. वॉलेट्स विभागामध्ये, Apple Pay निवडा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाइल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, पेमेंट्स वर टॅप करा.

  3. तुमच्या क्रेडिट कार्ड पेमेंट प्रदात्याच्या विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर टॅप करा.

  4. वॉलेट्स विभागामध्ये, Apple Pay निवडा.

  5. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

फ्रान्समध्ये Shopify Payments वापरत असताना Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करा

तुमचा व्यवसाय फ्रान्समध्ये स्थित असल्यास आणि तुम्ही Shopify Payments वापरत असल्यास, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी Apple Pay अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > पेमेंट्स वर जा.

  2. Shopify Payments विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. प्रगत सेटिंग्ज विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  4. वॉलेट्स विभागामध्ये, Apple Pay साठी अ‍ॅक्टिव्हेट करा वर क्लिक करा.

मोबाइल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, पेमेंट्स वर टॅप करा.

  3. Shopify Payments विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर टॅप करा.

  4. प्रगत सेटिंग्ज विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर टॅप करा.

  5. वॉलेट्स विभागामध्ये, Apple Pay साठी अ‍ॅक्टिव्हेट करा वर टॅप करा.

ग्राहक अनुभव

जेव्हा एखादा ग्राहक सुसंगत उपकरण वापरून तुमच्या ऑनलाइन स्टोअरला भेट देतो, तेव्हा Apple Pay लोगोसह एक जलद चेकआउट बटण डिस्प्ले होते.

ग्राहक Apple Pay द्वारे खरेदी करण्यासाठी बटणावर टॅप किंवा क्लिक करू शकतात. त्यांनी त्यांच्या Apple Pay वॉलेटमध्ये जोडलेली शिपिंग आणि बिलिंग माहिती, तसेच ऑर्डरचा खर्च, शिपिंग दर आणि कर डिस्प्ले होतात. त्यानंतर ग्राहकाला खरेदीची पडताळणी करावी लागते. ग्राहक कोणत्या प्रकारचे सुसंगत उपकरण वापरत आहे यावर आधारित पडताळणी प्रक्रिया वेगळी असते.

जर तुम्ही तुमच्या चेकआउट सेटिंग्जमध्ये कंपनीचे नाव फील्ड आवश्यक म्हणून सेट केले असेल, तर ज्या ग्राहकांच्या Apple Pay वॉलेटमध्ये कंपनीचे नाव समाविष्ट नाही त्यांना त्यांची ऑर्डर पूर्ण करण्यापूर्वी तुमच्या चेकआउटमध्ये ते भरणे आवश्यक असेल.

जेव्हा Apple Pay ॲक्टिव्ह असते, तेव्हा ते Shopify Checkout च्या पेमेंट्स विभागामध्ये पेमेंट पद्धत म्हणून देखील डिस्प्ले होते.

ट्रबलशूटिंग

तुम्हाला Apple Pay सेटअपमध्ये समस्या येत असल्यास किंवा चेकआउटदरम्यान तुमच्या ग्राहकांना समस्या येत असल्यास, खालील सामान्य समस्या आणि उपायांचे पुनरावलोकन करा.

तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये Apple Pay दिसत नाही

जर तुम्ही Cybersource, Authorize.net किंवा First Data Payeezy वापरत असाल आणि तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये Apple Pay सक्रिय करण्याचा पर्याय नसेल, तर तुम्हाला तुमच्या पेमेंट प्रोसेसरला नेटवर्क टोकनायझेशन चालू करण्यास सांगणे आवश्यक आहे. जर तुम्ही Stripe वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या Stripe डॅशबोर्डवरून Apple Pay च्या विशिष्ट सेवेच्या अटी स्वीकारल्या आहेत याची खात्री करा. जर तुम्हाला तुमचा पेमेंट प्रोसेसर कोण आहे हे माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या बँकेशी किंवा मर्चंट अकाउंट प्रदात्याशी संपर्क साधावा.

चेकआउटवर Apple Pay बटण दिसत नाही

जर तुमच्या चेकआउटमध्ये Apple Pay बटण दिसत नसेल, तर तुम्ही Apple Pay वापरण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण करत आहात याची खात्री करा.

जर तुमचा ग्राहक त्यांच्या ऑर्डरचे पेमेंट करण्यासाठी खरेदी बटण वापरत असेल, तर Apple Pay दिले जात नाही कारण त्याला खरेदी बटण विक्री चॅनेलचा सपोर्ट नाही.

कार्ट ड्रॉवरमध्ये Apple Pay बटण दिसत नाही

जर तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर कार्ट ड्रॉवर किंवा कार्ट पॉप-अप असेल, तर Apple Pay बटण कदाचित दिसणार नाही. तुमच्या कार्ट ड्रॉवरमध्ये बटण दिसेल याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या थीममध्ये Javascript जोडू शकता.

Apple Pay बटण दिसते पण ते प्रतिसाद देत नाही

जर तुम्ही सपोर्ट असलेला Apple लॅपटॉप वापरत असाल, तर तुमच्या उपकरणावरील Apple Pay वॉलेट तपासा आणि तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन उघडी असल्याची खात्री करा. जर तुमचा लॅपटॉप क्लोज-डिस्प्ले (बंद स्क्रीन) मोडमध्ये असेल, तर Apple Pay बटण कदाचित प्रतिसाद देणार नाही.

तुमचा ग्राहक सवलत कोड टाकू शकत नाही

तुमचे ग्राहक Apple Pay सोबत सवलत कोड तेव्हाच वापरू शकतात जेव्हा ते Apple Pay बटणावर क्लिक करण्यापूर्वी चेकआउट पेजवर सवलत कोड टाकतात. जर तुम्ही कार्ट पेजवर Apple Pay बटण समाविष्ट केले, तर तुमचे ग्राहक सवलत कोड टाकण्यासाठी चेकआउट पेजवर जाऊ शकणार नाहीत. तुमच्या ग्राहकांना Apple Pay सोबत सवलत कोड वापरता येतील याची खात्री करण्यासाठी, तुम्हाला चेकआउट पेजवर Apple Pay बटण दाखवणे आवश्यक आहे.

Mac वर Apple Pay वापरून चेकआउट करताना तुमच्या ग्राहकाला एरर येतो

जर Mac वर Apple Pay वापरून चेकआउट करण्याचा प्रयत्न करताना तुमच्या ग्राहकाला एरर मेसेज येत असेल, तर त्यांच्या फोन आणि कॉम्प्युटरमध्ये कम्युनिकेशनची समस्या असू शकते. कनेक्टिव्हिटीची पडताळणी करण्यासाठी, ग्राहकाने फोन आणि कॉम्प्युटर खालील सेटअप आवश्यकता पूर्ण करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे:

  • फोन आणि कॉम्प्युटर एकमेकांच्या जवळ आहेत
  • Bluetooth चालू आहे
  • फोन आणि कॉम्प्युटर दोन्ही एकाच iCloud अकाउंटमध्ये लॉग इन केलेले आहेत

Apple Pay वापरताना तुम्हाला सोडून दिलेल्या चेकआउट्सवर चलन एरर येतो

जर तुम्हाला सोडून दिलेल्या चेकआउटच्या पेमेंट इव्हेंट्समध्ये “Credit card Apple Pay currency not equal to transaction currency” (क्रेडिट कार्डचे Apple Pay चलन आणि व्यवहाराचे चलन समान नाही) यासारखा एरर मेसेज दिसला, तर खालील पायऱ्या पूर्ण करा:

  1. तुमचे आंतरराष्ट्रीय मार्केट आणि चलने योग्यरीत्या सेट केली असल्याची खात्री करा. स्थानिक चलनांमधील किंमत निश्चिती आणि तुमच्या मल्टिपल चलन सेटअपची चाचणी घेण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
  2. तुमच्या ग्राहकाशी संपर्क साधा आणि त्यांना त्यांच्या Apple Pay अकाउंटविषयी खालील तपशील निश्चित करण्यास सांगा:
    • त्यांच्या Apple Pay अकाउंटला क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी सपोर्ट आहे.
    • त्यांच्या Apple Pay प्रोफाइलवर कोणतीही माहिती (जसे की देशाचा तपशील) गहाळ नाही.
    • त्यांच्या बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्डवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. बँक कार्डवरील व्यवहारांना प्रतिबंधित करत असण्याचीही शक्यता आहे, जे बँक आणि ग्राहकामध्ये सोडवणे आवश्यक आहे.

चेकआउट पूर्ण करण्यासाठी तुमच्या ग्राहकाला दुसरी पेमेंट पद्धत वापरून पाहण्याची किंवा वेगळे कार्ड वापरण्याचीही आवश्यकता असू शकते.

शिपिंगमधील मर्यादा

Apple Pay कडील आंशिक पोस्टल कोडच्या उपलब्धतेमुळे, कॅनडाच्या विशिष्ट दुर्गम भागांमध्ये वाहकाद्वारे कॅल्क्युलेट केलेले शिपिंग दर चुकीचे कॅल्क्युलेट केले जाण्याची शक्यता आहे. या समस्येचा बहुतेक कॅनेडियन पत्त्यांवर परिणाम होत नाही.

Apple Pay स्वीकारण्याचे इतर मार्ग

तुमच्या ऑनलाइन स्टोअर चेकआउटद्वारे Apple Pay स्वीकारण्याव्यतिरिक्त, तुम्ही प्रत्यक्षपणे आणि मोबाइल ॲप्सद्वारेही Apple Pay पेमेंट्स स्वीकारू शकता.

प्रत्यक्षपणे Apple Pay

जेव्हा तुम्ही Shopify POS आणि WisePad 3 कार्ड रीडर, Tap & Chip रीडर किंवा Chipper 2X BT कार्ड रीडर यांसारखा सपोर्टेड कार्ड रीडर वापरता तेव्हा प्रत्यक्षपणे Apple Pay उपलब्ध असते. हे फीचर Tap to Pay on iPhone सोबतही काम करते. तुमचे ग्राहक कोणत्याही सपोर्टेड कार्ड रीडरवर त्यांचा iPhone किंवा Apple Watch टॅप करून Apple Pay ने पेमेंट करू शकतात. पेमेंटवर लगेच प्रक्रिया केली जाते आणि ग्राहकाला त्यांचे क्रेडिट कार्ड दाखवण्याची किंवा त्यांच्या iOS उपकरणाचा कीबोर्ड वापरून त्यांचा पेमेंट तपशील टाकण्याची आवश्यकता नसते.

Apple Pay Cash

जर तुमचा व्यवसाय युनायटेड स्टेट्समध्ये असेल आणि तुम्ही सपोर्टेड कार्ड रीडरसोबत Shopify POS वापरत असाल तर Apple Pay Cash उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या ग्राहकांना iPhone किंवा Apple Watch वापरून त्यांच्या Apple Pay Cash कार्डने पेमेंट करण्याचा पर्याय देऊ शकता. जर तुम्ही युनायटेड स्टेट्सच्या बाहेर असाल, तर ते Discover ला सपोर्ट करतात का हे तपासण्यासाठी तुमच्या पेमेंट प्रदात्याचा सल्ला घ्या.

मोबाइल ॲप्समध्ये Apple Pay

जर तुमच्या स्टोअरमध्ये iOS Buy SDK वापरणारे iOS ॲप असेल, तर Apple Pay उपलब्ध असते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Apple Pay ची कार्यक्षमता, क्रेडिट कार्ड सुसंगतता आणि ऑर्डर डिस्प्ले याबद्दल खालील वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत.

माझे ग्राहक Apple Pay सोबत कोणती क्रेडिट कार्ड्स वापरू शकतात?

तुम्ही जो क्रेडिट कार्ड पेमेंट प्रदाता वापरता त्यावरून ठरते की तुमचे ग्राहक Apple Pay वापरून तुमची उत्पादने खरेदी करताना कोणती क्रेडिट कार्ड्स वापरू शकतात. Apple Pay वापरण्यासाठी, तुमच्या ग्राहकांना त्यांच्या Apple Pay वॉलेटमध्ये त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती जोडणे आवश्यक आहे. जर तुम्ही वापरत असलेला पेमेंट प्रदाता ग्राहकाने त्यांच्या Apple Pay वॉलेटमध्ये जोडलेला क्रेडिट कार्डचा प्रकार स्वीकारत नसेल, तर त्या ग्राहकाला Apple Pay वापरून तुमची उत्पादने खरेदी करता येणार नाहीत.

Apple Pay ची ऑर्डर कशी दाखवली जाते?

Apple Pay वापरण्यासाठी, तुमच्या पेमेंट प्रोसेसरने नेटवर्क टोकनायझेशनला सपोर्ट करणे आवश्यक आहे. परिणामी, ऑर्डरच्या पेमेंट तपशिलामध्ये ग्राहकाच्या क्रेडिट कार्ड नंबरचे शेवटचे चार अंक दाखवले जात नाहीत. त्याऐवजी ग्राहकाच्या Apple Pay उपकरण अकाउंट नंबरचे शेवटचे चार अंक दाखवले जातात.

मी चेकआउटमध्ये फक्त Apple Pay स्वीकारू शकतो का?

चेकआउटमध्ये Apple Pay ऑफर करण्यासाठी, तुमच्या Shopify Payments अकाउंटवर किमान एक तरी क्रेडिट कार्ड प्रकार सक्रिय असणे आवश्यक आहे.