चार्जबॅक किंवा चौकशीची कारणे

चार्जबॅक किंवा चौकशीचे निवारण करण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला कोणत्या प्रकारचा पुरावा पाठवावा, हे ग्राहक चार्जबॅक किंवा चौकशीसाठी देणाऱ्या कारणावर अवलंबून असते. ग्राहक खालीलपैकी एका कारणासाठी शुल्कावर विवाद करू शकतो:

चार्जबॅकचे निवारण करताना अतिरिक्त पुरावा जोडण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

फसवणूक

कार्डधारकाने शुल्कासाठी अधिकृतता दिली नसल्यास चार्जबॅकवर फसवणूक म्हणून खूण केली जाते. हे चार्जबॅकचे सर्वात सामान्य कारण आहे आणि जर कार्ड चोरीला गेले असेल तर असे होऊ शकते.

फसवणुकीच्या शुल्काला हाताळण्यासाठी, तुम्ही ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकता. ग्राहक या खरेदीबद्दल विसरला असू शकतो किंवा त्यांच्या जोडीदाराने, मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने ही खरेदी केलेली असू शकते. जर ग्राहकाने मान्य केले की शुल्क योग्य होते, तर तुम्ही त्यांना त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला आणि चार्जबॅक मागे घ्यायचे आहे असे सांगायला हवे. तरीही, ग्राहकाने शुल्क मागे घेण्यास सहमती दर्शवलेली असल्याच्या स्टेटमेंटसह, तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला पुरावा सबमिट केला पाहिजे.

जर तुम्हाला वाटत असेल की ग्राहक चुकत आहे किंवा सत्य सांगत नाहीये, तर तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला खालील पुरावा सबमिट केला पाहिजे:

  • ऑर्डरची पूर्तता केल्याची तारीख आणि वेळ
  • ग्राहकाने वापरलेली बिलिंग माहिती
  • ऑर्डरसाठी वापरलेला IP अ‍ॅड्रेस आणि देश
  • ऑर्डरसाठीची शिपिंग आणि ट्रॅकिंग माहिती

ऑर्डर्स पूर्ण झाल्यानंतर क्रेडिट कार्ड कंपन्या चोरीला गेलेल्या कार्ड्ससाठी फंड रिव्हर्स करू शकतात. कोणत्याही विवादित शुल्कासाठी पुरावे गोळा करण्यात Shopify तुम्हाला मदत करते. तरीही, फंड रिव्हर्स करण्याचा निर्णय क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून घेतला जातो, Shopify कडून नाही. बँकांकडून होणारे शुल्काचे रिव्हर्सल Shopify कव्हर करत नाही.

अपरिचित

जेव्हा ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर मर्चंटचे नाव किंवा ठिकाण ओळखत नाहीत, तेव्हा चार्जबॅकवर अपरिचित अशी खूण केली जाते.

अपरिचित शुल्काला हाताळण्यासाठी, तुम्ही ग्राहकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीकधी ग्राहक खरेदीबद्दल विसरलेला असू शकतो किंवा त्याच्या जोडीदाराने, मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने ही खरेदी केलेली असू शकते. जर ग्राहकाने मान्य केले की हे शुल्क योग्य होते, तर तुम्ही त्यांना त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला आणि चार्जबॅक मागे घ्यायचे आहे असे सांगायला हवे.

तरीही, ग्राहकाने शुल्क मागे घेण्यास सहमती दर्शवलेली असल्याच्या स्टेटमेंटसह, तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला पुरावा सबमिट केला पाहिजे. तुम्ही खालीलपैकी काही पुरावे समाविष्ट करू शकता:

  • तुम्ही ऑर्डर पूर्ण केल्याची तारीख आणि वेळ
  • ग्राहकाने वापरलेली बिलिंग माहिती
  • ऑर्डरसाठी वापरलेला IP अ‍ॅड्रेस आणि देश
  • ऑर्डरसाठीची शिपिंग आणि ट्रॅकिंग माहिती

डुप्लिकेट

ग्राहकाला असे वाटते की तुम्ही एकाच उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी त्यांच्याकडून दोनदा शुल्क आकारले आहे, तेव्हा चार्जबॅकवर डुप्लिकेट अशी खूण केली जाते.

जर तुम्ही तुमच्या ग्राहकाकडून दोनदा शुल्क आकारले नसेल, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही त्यांना स्पष्ट करू शकता की दोन शुल्क वेगवेगळ्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी होते. जर ग्राहकाने मान्य केले की शुल्क योग्य होते, तर तुम्ही त्यांना त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला आणि चार्जबॅक मागे घ्यायचे आहे असे सांगायला हवे.

तुमच्याशी बोलल्यानंतरही जर ग्राहकाने चार्जबॅक किंवा चौकशी मागे घेतली नाही, तर दोन शुल्क वेगळ्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी होते याचा पुरावा तुम्हाला सबमिट करावा लागेल. तुम्ही खालीलपैकी काही पुरावे समाविष्ट करू शकता:

  • दोन शुल्कांच्या कारणाचे स्पष्टीकरण
  • दोन्ही शुल्क वेगवेगळ्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी होते हे सिद्ध करणाऱ्या पावत्या
  • ग्राहकासोबत झालेला कोणताही संवाद ज्यामध्ये तुम्ही त्यांना दोन शुल्कांबद्दल माहिती दिली आहे

जर तुम्ही तुमच्या ग्राहकाकडून एकाच उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी दोनदा शुल्क आकारले असेल, तर तुम्हाला चार्जबॅक स्वीकारावा लागेल.

सबस्क्रिप्शन रद्द केले

सबस्क्रिप्शन रद्द केले जायला हवे होते त्यानंतरही तुम्ही त्यांच्याकडून सबस्क्रिप्शनचे शुल्क आकारले आहे असे ग्राहकाला वाटल्यास चार्जबॅकवर सबस्क्रिप्शन रद्द केले अशी खूण केली जाते. याचा अर्थ असाही होऊ शकतो की ग्राहकाने प्रत्येक आवर्ती शुल्कापूर्वी रिमायंडरची अपेक्षा केली होती पण त्यांना तो मिळाला नाही.

चार्जबॅकचे निवारण करण्यासाठी, तुम्ही तुमच्या ग्राहकाशी संपर्क साधला पाहिजे. असाही संभव आहे की तुम्ही हा गैरसमज दूर करू शकाल किंवा ग्राहकासोबत एखाद्या निर्णयावर येऊ शकाल. जर तुम्ही दोघांमध्ये सहमती झाली, तर तुम्ही ग्राहकाला त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला आणि त्यांना चार्जबॅक मागे घ्यायचा आहे असे सांगायला सांगावे. तुम्ही या संवादाचा पुरावा क्रेडिट कार्ड कंपनीला देखील पाठवला पाहिजे. ग्राहकाने रद्द केलेल्या चार्जबॅकचे निवारण करा पहा.

शुल्कापूर्वी ग्राहकाने सबस्क्रिप्शन रद्द केले नाही असे जर तुम्हाला वाटत असेल, तर ग्राहकाने शेवटच्या शुल्कानंतर त्यांचे सबस्क्रिप्शन रद्द केले हे सिद्ध करणारा पुरावा तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला सबमिट करावा. तुम्ही खालीलपैकी काही पुरावे समाविष्ट करू शकता:

  • तुमचे सबस्क्रिप्शन रद्द करण्याचे धोरण
  • ग्राहकाला त्यांच्या रद्दीकरणाबद्दल पाठवलेले कोणतेही ईमेल किंवा नोटिफिकेशन्स
  • ग्राहकाला रद्दीकरणाच्या धोरणाबद्दल कधी आणि कुठे माहिती देण्यात आली याचे स्पष्टीकरण
  • डिजिटल उत्पादन किंवा सेवेसाठी: ॲक्टिव्हिटी लॉग जो सिद्ध करतो की ग्राहकाने सबस्क्रिप्शन रद्द केल्याचे सांगितलेल्या तारखेनंतर त्यांनी उत्पादन किंवा सेवेचा ॲक्सेस मिळवला

ग्राहकाने त्यांचे सबस्क्रिप्शन रद्द केल्यानंतरही तुम्ही त्यांच्याकडून शुल्क आकारले असल्यास, तुम्हाला चार्जबॅक स्वीकारावा लागेल.

उत्पादन मिळाले नाही

ग्राहकाला त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा मिळाल्या नाहीत असे वाटत असल्यास, चार्जबॅक उत्पादन मिळाले नाही म्हणून मार्क केला जातो.

समस्या समजून घेण्यासाठी तुम्ही प्रथम ग्राहकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ग्राहकाची समस्या सोडवू शकलात, तर तुम्ही ग्राहकाला त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला सांगा आणि त्यांना चार्जबॅक मागे घ्यायचा आहे असे सांगायला सांगा. तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला पाठवलेल्या प्रतिसादात ग्राहकाने चार्जबॅक मागे घेण्याचे मान्य केले आहे याचा पुरावा देखील समाविष्ट केला पाहिजे. ग्राहकाने रद्द केलेल्या चार्जबॅकचे निराकरण करा चा संदर्भ घ्या.

जर तुम्ही तुमच्या ग्राहकासोबत समस्येचे निराकरण करू शकत नसाल, तर तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला असा पुरावा सबमिट केला पाहिजे जो हे सिद्ध करेल की चार्जबॅक करण्यापूर्वी ग्राहकाला उत्पादन किंवा सेवा मिळाली होती. तुम्ही खालीलपैकी काही पुराव्यांचा समावेश करू शकता:

  • तुम्ही ऑर्डर पूर्ण केल्याची तारीख आणि वेळ
  • ग्राहकाने वापरलेली बिलिंग माहिती
  • ऑर्डरसाठीची शिपिंग आणि ट्रॅकिंग माहिती
  • डिजिटल उत्पादन किंवा सेवेसाठी: ग्राहकाने उत्पादन किंवा सेवा अ‍ॅक्सेस केल्याचे सिद्ध करणारा अ‍ॅक्टिव्हिटी लॉग

उत्पादन स्वीकारार्ह नाही

ग्राहकाला उत्पादन मिळाले परंतु ते सदोष, खराब झालेले किंवा वर्णनाप्रमाणे नाही असे वाटत असल्यास, चार्जबॅक उत्पादन स्वीकारार्ह नाही म्हणून मार्क केला जातो.

तुमच्या ग्राहकाशी संपर्क साधा. जर तुम्ही ग्राहकाची समस्या सोडवू शकलात, तर तुम्ही ग्राहकाला त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला सांगा आणि त्यांना चार्जबॅक मागे घ्यायचा आहे असे सांगायला सांगा. ग्राहकाने शुल्क मागे घेण्यास सहमती दर्शविल्याचा पुरावा तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला देखील पाठवावा. ग्राहकाने रद्द केलेल्या चार्जबॅकचे निराकरण करा चा संदर्भ घ्या.

चार्जबॅक करण्यापूर्वी ग्राहकाने उत्पादन रिटर्न करण्याचा किंवा सेवा रद्द करण्याचा प्रयत्न न केल्यास, किंवा तुम्ही ग्राहकाला बदली उत्पादन किंवा सेवा पुरवली असल्यास, त्याचाही पुरावा पाठवा.

तुम्ही ग्राहकाची समस्या सोडवा किंवा न सोडवा, तरीही तुम्ही संबंधित पुरावे क्रेडिट कार्ड कंपनीला पाठवावेत. तुम्ही खालीलपैकी काही पुराव्यांचा समावेश करू शकता:

  • तुम्ही ऑर्डर पूर्ण केल्याची तारीख आणि वेळ
  • ग्राहकाने वापरलेली बिलिंग माहिती
  • ऑर्डरसाठीची शिपिंग आणि ट्रॅकिंग माहिती
  • तुमच्या स्टोअरमधील उत्पादनांची वर्णने किंवा चित्रे जी सिद्ध करतात की ती वर्णनाप्रमाणेच होती

क्रेडिटवर प्रक्रिया केली नाही

ग्राहकाने तुम्हाला खरेदी केलेले उत्पादन रिटर्न केले आहे किंवा तुमच्यासोबतचा व्यवहार रद्द केला आहे अशी माहिती दिल्यास, परंतु तुम्ही अद्याप ग्राहकाला परतावा किंवा क्रेडिट दिले नसल्यास, चार्जबॅक क्रेडिटवर प्रक्रिया केली नाही म्हणून मार्क केला जातो.

तुमच्या ग्राहकाशी संपर्क साधा. चार्जबॅक झाल्यावर तुम्ही परतावा जारी करू शकत नाही, परंतु तुम्ही परिस्थिती स्पष्ट करू शकता किंवा समस्या सोडवण्यासाठी दुसरा मार्ग शोधू शकता. जर ग्राहकाने चौकशीसाठी विचारले असेल, तर तुम्ही परतावा जारी करू शकता. जर तुम्ही ग्राहकाची समस्या सोडवू शकलात, तर तुम्ही ग्राहकाला त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला सांगा आणि त्यांना चार्जबॅक किंवा चौकशी मागे घ्यायची आहे असे सांगायला सांगा. ग्राहकाने चार्जबॅक मागे घेण्याचे मान्य केल्याचा पुरावा तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला देखील पाठवला पाहिजे. ग्राहकाने रद्द केलेल्या चार्जबॅकचे निराकरण करा चा संदर्भ घ्या.

जर तुम्ही समस्या सोडवू शकत नसाल, आणि तुम्हाला वाटत असेल की चार्जबॅक वैध नाही, तर तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला पुरावा पाठवला पाहिजे की एकतर तुम्ही चार्जबॅक किंवा चौकशी करण्यापूर्वी ग्राहकाला परतावा दिला आहे, किंवा ग्राहक परताव्यासाठी पात्र नव्हता. तुम्ही खालीलपैकी काही पुराव्यांचा समावेश करू शकता:

  • तुमची परतावा आणि रिटर्न धोरणे
  • ग्राहकाला परतावा धोरणाची माहिती कधी आणि कुठे दिली होती याचे स्पष्टीकरण
  • परताव्याबद्दल तुम्ही ग्राहकाला पाठवलेले कोणतेही ईमेल किंवा सूचना
  • ग्राहक परताव्यासाठी पात्र का नव्हता याचे स्पष्टीकरण

सामान्य

चार्जबॅक इतर कोणत्याही श्रेणीत बसत नसल्यास त्याला सामान्य म्हणून मार्क केले जाते.

सामान्य चार्जबॅक सोडवण्यासाठी, तुम्ही समस्येचे कारण समजून घेण्यासाठी प्रथम ग्राहकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही ग्राहकाची समस्या सोडवू शकलात, तर तुम्ही ग्राहकाला त्यांच्या बँकेशी संपर्क साधायला सांगा आणि त्यांना चार्जबॅक रद्द करायचा आहे असे सांगायला सांगा. त्यानंतर त्यांच्या बँकेकडून मिळालेल्या चार्जबॅक मागे घेण्याच्या पत्राची प्रत तुम्हाला देण्याची विनंती तुम्ही करावी. ग्राहकाने चार्जबॅक रद्द करण्याची विनंती केल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, तुम्हाला हे पत्र ऑर्डरवरील चार्ज-बॅक प्रतिसाद फॉर्ममध्ये पुरावा म्हणून सबमिट करणे आवश्यक आहे. ग्राहकाने रद्द केलेल्या चार्जबॅकचे निराकरण करा चा संदर्भ घ्या.

ग्राहकाला चार्जबॅक मागे घ्यायचा नसेल, तर शुल्क वैध असल्याचा पुरावा तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला पाठवावा. तुम्ही खालीलपैकी काही पुराव्यांचा समावेश करू शकता:

  • ऑर्डर केलेल्या उत्पादनांबद्दलचे तपशील
  • ऑर्डरची पूर्तता केल्याची तारीख आणि वेळ
  • ग्राहकाची बिलिंग माहिती
  • ग्राहकाचा IP अ‍ॅड्रेस आणि देश
  • ग्राहकासोबत केलेले ईमेल किंवा इतर संवाद
  • USPS/FedEx/UPS किंवा इतर ऑनलाइन ट्रॅकिंग किंवा शिपिंग कन्फर्मेशन
  • मागील परतावे किंवा बदली शिपमेंटचा पुरावा