फसवणूक रोखणे
तुमचे Shopify स्टोअर तुम्हाला संभाव्य फसवणुकीच्या क्रियांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि त्या टाळण्यासाठी मदत करण्यासाठी माहिती आणि टूल्स प्रदान करते. उदाहरणार्थ, संशयास्पद ऑर्डर ध्वजांकित करण्यासाठी फसवणूक विश्लेषण मशीन लर्निंग वापरते, जे तुम्हाला कोणत्या ऑर्डरची पूर्तता करायची हे ठरवण्यात मदत करते. तुमची फसवणुकीची जोखीम कमी करण्यासाठी आणि ऑर्डर रद्द करून परतावा द्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही Shopify Protect, कार्ड टेस्टिंग प्रोटेक्शन आणि प्रॉक्सी शोध यांसारखी वैशिष्ट्ये देखील वापरू शकता. तुम्ही Shopify Payments वापरत असल्यास, तुम्हाला डायनॅमिक 3D सिक्युअर चेकआउट आणि विवाद व्यवस्थापन यांसारख्या अतिरिक्त फसवणूक प्रतिबंधक वैशिष्ट्यांचा अॅक्सेस मिळतो.
ग्राहकाने अधिकृत न केलेल्या व्यवहाराला फसवणुकीचा व्यवहार म्हटले जाते. फसवणुकीच्या व्यवहारामुळे चार्जबॅक होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे पैशांचे नुकसान होऊ शकते. Shopify चे अंगभूत फसवणूक विश्लेषण तुम्हाला संशयास्पद ऑर्डरच्या बाबतीत सतर्क करण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करते. तुम्ही संशयास्पद ऑर्डरची अनेक मार्गांनी चौकशी करू शकता.
तुमच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी फसवणुकीचे व्यवहार कसे ओळखावे आणि त्यांना कसा प्रतिसाद द्यावा हे समजून घेणे आवश्यक आहे. एखादी ऑर्डर कायदेशीर आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही IP अॅड्रेस, ईमेल अॅड्रेस आणि बिलिंग माहिती यांसारख्या ग्राहक माहितीचे पुनरावलोकन करू शकता. पेमेंटवर प्रक्रिया करण्यापूर्वी उच्च-जोखमीच्या ऑर्डर्सचे व्यक्तिचलितरीत्या पुनरावलोकन करण्यासाठी तुम्ही तुमच्या पेमेंट कॅप्चर सेटिंग्ज देखील अॅडजस्ट करू शकता, ज्यामुळे तुम्ही कोणते व्यवहार स्वीकारता यावर तुम्हाला अधिक नियंत्रण मिळते.
तुम्ही उच्च-जोखमीची ऑर्डर पूर्ण न करण्याचा पर्याय निवडल्यास, तुम्ही ती ऑर्डर रद्द करू शकता आणि तिचा परतावा देऊ शकता.
या पेजवर
Shopify मधील फसवणूक प्रतिबंधक टूल्स
Shopify मधील विविध फसवणूक प्रतिबंधक वैशिष्ट्ये आणि टूल्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा. फसवणूक आणि तुमच्या स्टोअरवरील तिचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर करू शकता.
| वैशिष्ट्य | उपलब्धता | वर्णन |
|---|---|---|
| फसवणूक विश्लेषण | Shopify Payments वापरणारी स्टोअर्स. तृतीय-पक्ष पेमेंट प्रोसेसर वापरणारी आणि Grow, Advanced, किंवा Shopify Plus प्लॅनवर असणारी स्टोअर्स. | प्रमुख इनसाइट्स आणि जोखमीच्या पातळीच्या आधारावर कोणत्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या हे ठरवण्यासाठी फसवणूक विश्लेषणाचा वापर करा. |
| Shopify Protect | Shop Pay वापरणारी US स्टोअर्स. | फसवणुकीच्या आणि अनोळखी चार्जबॅक्सपासून पात्र ऑर्डर्सचे संरक्षण करण्यासाठी Shopify Protect वापरा. |
| Shopify Flow | Basic, Grow, Advanced किंवा Shopify Plus प्लॅनवरील स्टोअर्स. Shopify Fulfillment Network (SFN) वापरणारी स्टोअर्स. | तुमचे स्टोअर कोणत्या ऑर्डर्स स्वीकारते हे नियंत्रित करणारे नियम, अनुमती सूची आणि ब्लॉक सूची तयार करण्यासाठी Shopify Flow च्या वर्कफ्लोचा वापर करा. |
| डायनॅमिक 3DS | Shopify Payments वापरणारी स्टोअर्स. | तुम्ही Shopify Payments वापरत असल्यास आणि तुमचे स्टोअर PSD2 प्रदेशात स्थित असल्यास, तुम्ही आपोआप 3D सिक्युअर (3DS) चेकआउट फ्लो वापरता. कार्ड जारी करणार्या बँकेला आवश्यक असेल तेव्हाच Shopify Payments 3DS चा वापर करते. |
| कार्ड टेस्टिंग प्रोटेक्शन | Shopify Payments वापरणारी स्टोअर्स. | एकात्मिक कार्ड टेस्टिंग प्रोटेक्शन चेकआउटवर क्रेडिट कार्डची फसवणूक टाळण्यास मदत करते. |
| विवाद व्यवस्थापन | Shopify Payments वापरणारी स्टोअर्स | तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी विवाद व्यवस्थापन स्वयंचलित केले जाते. |
| प्रॉक्सी शोध | Shopify Payments वापरणारी स्टोअर्स. | प्रॉक्सी सेवा किंवा IP अॅड्रेस वापरणारे ग्राहक ध्वजांकित केले जातात. |
| ऑथोरायझेशन रेट ऑप्टिमायझेशन | Shopify Plus प्लॅनवर असणारी आणि Shopify Payments वापरणारी स्टोअर्स. | व्यवहारांसाठी ऑथोरायझेशन दर ऑप्टिमाइझ करण्यासाठी Shopify Payments मशीन लर्निंगचा वापर करते, जे स्वीकारलेल्या ऑथोरायझेशन्सची संख्या वाढवण्यास आणि तुमच्या स्टोअरमधील नाकारलेल्या व्यवहारांची संख्या कमी करण्यास मदत करू शकते. व्यवहार सबमिट केल्यावर पेमेंट प्रोसेसर्सना प्रदान केलेल्या माहितीत सुधारणा करून आणि स्मार्ट रिट्राय तसेच रीरूटिंगसह नाकारलेले व्यवहार रिकव्हर करून हे केले जाते. |
| पेमेंट कॅप्चर नियंत्रण | Shopify Payments न वापरणारी स्टोअर्स. | जेव्हा तुमचे स्टोअर उच्च-जोखमीच्या ऑर्डर्ससह सर्व ऑर्डर्ससाठी आपोआप पेमेंट कॅप्चर करते, तेव्हा तुमच्या ऑर्डर्ससाठी संबंधित तृतीय-पक्ष व्यवहार शुल्काबाबत जागरूक राहा. तुम्ही तुमच्या Shopify अॅडमिनच्या पेमेंट पेजवरील पेमेंट कॅप्चर सेटिंग्जसह, तुम्ही कोणत्या ऑर्डर्सकडून पेमेंट स्वीकारता आणि तुम्ही कधी पेमेंट स्वीकारता हे नियंत्रित करू शकता. |
ग्राहक माहितीचे पुनरावलोकन करणे
Shopify चे फसवणूक विश्लेषण तुम्हाला ग्राहकांच्या तपशीलांचे पुनरावलोकन करू देते आणि तुमच्या ऑर्डर्सवरील संभाव्य संशयास्पद माहितीविषयी माहिती प्रदान करते. एखादी ऑर्डर संशयास्पद कधी आहे आणि ती कधी रद्द केली जावी हे ठरवण्यात मदत करण्यासाठी तुम्ही खालील ग्राहक तपशीलांचे पुनरावलोकन करू शकता.
इंटरनेट प्रोटोकॉल (IP) अॅड्रेसची पडताळणी करा
ज्या IP अॅड्रेसवरून ऑर्डर दिली होती तो अॅड्रेस संभाव्य फसवणूक दर्शवू शकतो. ग्राहकाच्या IP अॅड्रेसचे पुनरावलोकन करताना खालील बाबींचे पुनरावलोकन करा:
- ग्राहकाने जेथे असल्याचा दावा केला आहे त्यापेक्षा वेगळ्या सामान्य भागात ग्राहकाचा IP अॅड्रेस आहे का?
- तो वेब होस्टिंग कंपनीचा IP अॅड्रेस आहे का?
- IP अॅड्रेस हा प्रॉक्सी सेवा IP अॅड्रेस आहे का?
यापैकी कोणतीही विधाने खरी असल्यास, ऑर्डरच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला ग्राहकाशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे.
भौगोलिक स्थान, इंटरनेट सेवा प्रदाता (ISP) आणि विशिष्ट IP अॅड्रेसबद्दलची इतर माहिती झटपट निर्धारित करण्यासाठी तुम्ही खालील मोफत टूल्स वापरू शकता:
- http://www.whatismyip.com/ip-tools/ip-address-lookup
- http://www.ip2location.com
- http://www.infosniper.net
तुम्ही ऑर्डर तपशील पेजच्या फसवणूक विश्लेषण विभागामध्ये ऑर्डरशी संबंधित असलेला IP अॅड्रेस शोधू शकता.
ऑर्डरवरील फोन नंबरवर कॉल करा
ग्राहकाला कॉल करणे ही नेहमीच एक चांगली कल्पना असते. फोन नंबर बिलिंग पत्त्याप्रमाणेच समान एरिया कोडमध्ये असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही 411.com सारख्या सेवेचा वापर देखील करू शकता. फसवणूक करणारे ग्राहक अनेकदा अवैध फोन नंबर वापरतात. एखाद्याने फोनला उत्तर दिल्यास, त्यांना त्यांच्या ऑर्डरबद्दल काही सोपे प्रश्न विचारा आणि ते कसा प्रतिसाद देतात याचा विचार करा. त्यांना त्यांनी वापरलेले पत्ते, फोन नंबर, ईमेल आणि नाव माहीत आहे का? ते तुम्हाला साधी माहिती देण्यासाठी अडखळत आहेत का?
ईमेल अॅड्रेस शोधा
Google किंवा इतर सर्च इंजिनवर ईमेल अॅड्रेस शोधल्याने, तो ईमेल अॅड्रेस नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नांमध्ये वापरला गेला होता की नाही, हे ठरवण्यात तुम्हाला मदत मिळू शकते. तुम्हाला सोशल मीडियावरील पोस्ट किंवा त्या ग्राहकाला ईमेल अॅड्रेसशी जोडणारी इतर माहितीदेखील मिळू शकते.
शिपिंग तपशीलांचे पुनरावलोकन करणे
Shopify ची फसवणूक विश्लेषण टूल्स संभाव्य फसवणूक असू शकणाऱ्या ऑर्डरच्या शिपिंग तपशीलांमधील कोणत्याही समस्या हायलाइट करतात. एखादी ऑर्डर संशयास्पद कधी आहे आणि ती कधी रद्द केली जावी हे ठरवण्यात मदत करण्यासाठी तुम्ही खालील शिपिंग तपशीलांचे पुनरावलोकन करू शकता.
बिलिंग आणि शिपिंग पत्ते
गैरवर्तन करणारे लोक असा शिपिंग पत्ता देऊ शकतात, जो बिलिंग पत्त्याशी मिळताजुळता नसेल. पत्ते शोधण्यासाठी आणि त्यांच्यामधील अंतर पाहण्यासाठी तुम्ही Google Maps वापरू शकता. जर दोन पत्त्यांमधील अंतर लक्षणीय असेल (उदाहरणार्थ, वेगवेगळे खंड), तर ती ऑर्डर संभाव्य फसवणूक असू शकते. लक्षात ठेवा की एखादी भेटवस्तू पाठवणारे किंवा दुसर्या कोणाच्या तरी वतीने खरेदी करणारे खरे खरेदीदार वेगवेगळे पत्ते देऊ शकतात.
एकाच शिपिंग पत्त्यासाठी वेगवेगळे बिलिंग पत्ते वापरणाऱ्या एकाधिक ऑर्डर्स
वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळ्या नावांचे, परंतु एकच शिपिंग गंतव्यस्थान असणारे वेगवेगळे बिलिंग पत्ते वापरून एकाधिक ऑर्डर्स दिल्या असल्यास, हे फसवणुकीच्या ऑर्डर्सचे लक्षण असू शकते. ऑर्डरच्या तपशीलांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा आणि चेकआउटच्या वेळी दिलेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांशी संपर्क साधा.
कार्ड टेस्टिंग आणि पुन्हा होणारी फसवणूक
कार्ड टेस्टिंग, ज्याला कार्डिंग, अकाउंट टेस्टिंग आणि कार्ड एन्युमरेशन असेही म्हटले जाते, हा फसवणुकीच्या अॅक्टिव्हिटीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये चोरीला गेलेल्या कार्डचे तपशील वैध आहेत की नाही, याची चाचणी करण्यासाठी एखादी व्यक्ती ऑटोमेटेड स्क्रिप्ट्सचा वापर करते. कोणती कार्डे सक्रिय आहेत, हे ओळखण्यासाठी धोकेबाज एकाच वेळी अनेक छोटे पेमेंटचे प्रयत्न करतात. पुष्टी झालेली कार्डे नंतर मोठ्या खरेदीसाठी वापरली जातात किंवा पुन्हा विकली जातात.
काही हल्ल्यांमध्ये खरेदी पूर्ण करण्याऐवजी कार्डचे तपशील सेव्ह करण्याच्या प्रयत्नांचा समावेश असतो. हे प्रयत्न कार्डधारकाच्या स्टेटमेंटवर दिसणार नाहीत, त्यामुळे ही अॅक्टिव्हिटी जास्त काळ लक्षात न येता सुरू राहू शकते. या प्रयत्नांमुळे अनेक नाकारलेले व्यवहार होऊ शकतात आणि काहींचे रूपांतर दिलेल्या ऑर्डर्समध्ये होऊ शकते. Shopify ने संशयित कार्ड टेस्टिंग किंवा बॉट अॅक्टिव्हिटी म्हणून ओळखलेले चेकआउटचे प्रयत्न, सोडून दिलेल्या चेकआउट्समध्ये समाविष्ट केले जात नाहीत. ज्या कार्डधारकांचे तपशील त्यांच्या माहितीशिवाय वापरले गेले होते, ते नंतर कोणत्याही अनधिकृत शुल्कासाठी त्यांच्या बँकेकडे चार्जबॅक्स दाखल करू शकतात.
तुम्ही विवाद जिंकलात किंवा हरलात, तरीही प्रत्येक चार्जबॅक तुमच्या चार्जबॅक दरामध्ये मोजला जातो. हल्ला थांबल्यानंतरही, नाकारलेल्या व्यवहारांमधील वाढ तुमच्या खर्या ग्राहकांसाठी तुमचा नकार दर वाढवू शकते. चार्जबॅक्स कसे काम करतात याबद्दल अधिक जाणून घ्या.
कार्ड टेस्टिंगचा धोका आणि त्यानंतर येणाऱ्या चार्जबॅक्सचे प्रमाण कमी करण्यासाठी, खालील पायऱ्या उचला:
- पूर्ततेपूर्वी उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स रद्द करा: संशयास्पद ऑर्डर्स ओळखण्यासाठी फसवणूक विश्लेषण वापरा. एखादी ऑर्डर रद्द केल्याने किंवा रद्दबातल केल्याने चार्जबॅकचा धोका कमी करण्यात मदत मिळू शकते, परंतु ते कार्डधारकाच्या बँकेला चार्जबॅक दाखल करण्यापासून रोखत नाही. कोणतेही पेमेंट कॅप्चर केले नसतानाही ऑथरायझेशन होल्ड्स खऱ्या कार्डधारकाच्या स्टेटमेंटवर दिसू शकतात. कार्डधारकाने त्यांच्या बँकेला तो होल्ड अनधिकृत असल्याचे कळवल्यास, त्यांची बँक तुमच्या स्टोअरविरुद्ध चार्जबॅक दाखल करू शकते.
- मॅन्युअल पेमेंट कॅप्चर वापरा: निधी गोळा करण्यापूर्वी उच्च-जोखमीच्या ऑर्डर्सचे पुनरावलोकन करण्यासाठी मॅन्युअल पेमेंट कॅप्चर वापरा.
- Shopify Flow सह फसवणूक प्रतिबंध ऑटोमेट करा: प्रत्येक ऑर्डरचे मॅन्युअली पुनरावलोकन न करता, उच्च-जोखमीच्या पॅटर्नशी जुळणाऱ्या ऑर्डर्सना आपोआप फ्लॅग करणारे, होल्डवर ठेवणारे किंवा रद्द करणारे वर्कफ्लोज तयार करण्यासाठी Shopify Flow वापरा.
- तुमच्या Shopify Payments फसवणूक-प्रतिबंध सेटिंग्जचे पुनरावलोकन करा: तुम्ही Shopify Payments वापरत असल्यास, तुमच्या स्टोअरसाठी उपलब्ध असलेल्या फसवणूक प्रतिबंध टूल्सचे पुनरावलोकन करा. विशिष्ट ईमेल अॅड्रेस, IP अॅड्रेस किंवा बिलिंग तपशील ब्लॉक करण्यासाठी तुम्ही AVS आणि CVV फसवणूक फिल्टर्स कॉन्फिगर करू शकता आणि Fraud Control अॅप वापरू शकता.
दाखल केलेल्या कोणत्याही विवादांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी, तुमच्या Shopify ॲडमिनमधील ऑर्डर्स वर जा आणि तुमच्या खुल्या चार्जबॅक्स आणि चौकशीचे पुनरावलोकन करा.
सामान्य चार्जबॅक प्रतिबंध पद्धतींसाठी, चार्जबॅक्स आणि चौकशीला प्रतिबंध करणे पहा.
तुमची पेमेंट कॅप्चर सेटिंग्ज अॅडजस्ट करणे
तृतीय-पक्ष पेमेंट प्रदात्याद्वारे केलेल्या सर्व प्रोसेस केलेल्या पेमेंट्ससाठी व्यवहार शुल्क आकारले जाते आणि तुम्ही परतावा देता तेव्हा ते तुम्हाला परत केले जात नाही. विशिष्ट ऑर्डर्ससाठी ऑटोमॅटिक पेमेंट कॅप्चर रोखण्यासाठी तुम्ही तुमची पेमेंट कॅप्चर सेटिंग्ज बदलू शकता आणि फसवणुकीच्या ऑर्डर्ससाठी आकारल्या जाणाऱ्या व्यवहार शुल्काचा तुमच्या व्यवसायावर होणारा संभाव्य परिणाम कमी करू शकता.
आपोआप पेमेंट कॅप्चर करण्याच्या खालील पर्यायांचे पुनरावलोकन करा:
- पेमेंट्स मॅन्युअली कॅप्चर करण्यासाठी तुमची पेमेंट कॅप्चर सेटिंग्ज अॅडजस्ट करणे.
- बँक डिपॉझिट किंवा कॅश ऑन डिलिव्हरी (COD) यांसारखी मॅन्युअल पेमेंट पद्धत वापरणे.
पेमेंट्स मॅन्युअली कॅप्चर केल्याने तुमच्या ऑर्डर पूर्ततेच्या वर्कफ्लोमध्ये आणखी एक पायरी जोडली जाते, परंतु त्यामुळे तुम्हाला विशिष्ट ऑर्डर्ससाठी पेमेंट कॅप्चर करण्यावर अधिक नियंत्रण मिळते. तुमच्या व्यवसायासाठी काय योग्य आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही व्यवहार शुल्काचा संभाव्य खर्च आणि तुमच्या पूर्तता वर्कफ्लोमध्ये वाढलेल्या वेळेचे मूल्यांकन करू शकता.