Shop Pay Installments युनायटेड स्टेट्स अनुपालन आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे
Shop Pay Installments Affirm द्वारे समर्थित आहे. Shop Pay Installments सेवांचा तुमचा ॲक्सेस आणि वापर Affirm च्या धोरणांच्या अधीन आहे. तुमचे मार्केटिंग मटेरिअल आणि अटी विविध नियमांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये राज्य आणि फेडरल कर्ज कायदे, Equal Credit Opportunity Act, Truth in Lending Act (TILA), Controlling the Assault of Non-Solicited Pornography And Marketing (CAN-SPAM) Act आणि फेडरल ट्रेड कमिशन (FTC) चे जाहिरात आणि मार्केटिंग नियम समाविष्ट आहेत, ज्यामध्ये समर्थन मार्गदर्शक तत्त्वे आणि पूर्ण प्रकटीकरण आवश्यकता समाविष्ट आहेत.
जेव्हा तुम्ही Shop Pay Installments चा प्रचार करण्यासाठी मार्केटिंग मटेरिअल तयार करता, तेव्हा तुम्ही मंजूर मेसेजिंग वापरणे आणि या पेजवर वर्णन केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
या पेजवर
वाजवी कर्ज देण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे
वाजवी कर्ज देण्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे Equal Credit Opportunity Act (ECOA) द्वारे नियंत्रित केली जातात. Shop Pay Installments चा प्रचार करण्यासाठी, तुम्हाला हे करणे आवश्यक आहे:
- ॲप्लिकेशन प्रक्रियेत आवश्यकता जोडणे टाळा.
- प्रत्येकाला अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करून सर्व ग्राहकांसाठी Shop Pay Installments उपलब्ध करा.
- व्यापक लोकसंख्याशास्त्राला (डेमोग्राफिकला) टार्गेट करा.
- समान परिस्थितीत असलेल्या व्यक्तींना समान वागणूक द्या.
खालीलपैकी एक किंवा अधिक घटकांवर आधारित विशिष्ट लोकसंख्येला टार्गेट करण्यासाठी तुमचे Shop Pay Installments चे मार्केटिंग मटेरिअल वापरू नका:
- वय (अर्जदाराची करार करण्याची क्षमता असल्यास)
- त्वचेचा रंग
- लिंग
- सार्वजनिक सहाय्य कार्यक्रमावरील उत्पन्नाचे अवलंबित्व
- वैवाहिक स्थिती
- राष्ट्रीय मूळ
- वंश
- धर्म
- लैंगिक प्रवृत्ती
तुमचे Shop Pay Installments चे मार्केटिंग मटेरिअल विशिष्ट गटांना टार्गेट करत असल्यास, तुम्ही सर्व व्यक्तींना Shop Pay Installments वापरण्याची समान संधी देत नाही आहात. तुमचे किती मार्केटिंग मटेरिअल फायनान्सिंगबद्दल आहे यावर अवलंबून, विशिष्ट गटांना टार्गेट करून, तुम्ही वाजवी कर्ज देण्याचे कायदे मोडण्याचा धोका वाढवता. यामुळे खटले किंवा दंड होऊ शकतो.
तुमची उत्पादने विशिष्ट लोकसंख्येला आकर्षक वाटत असली तरी, तुमच्या मार्केटिंग मटेरिअलमध्ये फायनान्सिंगविषयी माहिती असल्यास त्याने विस्तृत लोकसंख्येला टार्गेट केले पाहिजे.
फेडरल ट्रेड कमिशनच्या ECOA च्या मूलभूत तरतुदींबद्दल अधिक जाणून घ्या.
अयोग्य, फसव्या किंवा अपमानास्पद कृती किंवा पद्धती (UDAAP)
ग्राहकांची दिशाभूल होण्याचा धोका कमी करण्यासाठी, तुमचे मार्केटिंग मटेरिअल:
- चुकीचे सादरीकरण, वगळलेली माहिती किंवा इतर फसव्या दाव्यांचा वापर करणे टाळले पाहिजे
- निकडीची खोटी जाणीव निर्माण करणे टाळले पाहिजे
- प्रामाणिक असले पाहिजे
- स्पष्ट आणि समजायला सोपे असले पाहिजे
- यामध्ये सर्व संबंधित माहितीचा समावेश असला पाहिजे
- उत्पादनाबद्दलच्या तथ्यांसह दाव्यांना समर्थन दिले पाहिजे
जर तुम्ही रिस्क-फ्री चाचणी किंवा मनी-बॅक गॅरंटी यासारखे प्रमोशन किंवा रिबेट ऑफर करत असाल, तर तुम्ही नेहमी त्या प्रमोशनची पूर्तता केली पाहिजे.
तुम्ही कोणत्याही विनामूल्य चाचण्यांची जाहिरात करत असल्यास, जमा होऊ शकणाऱ्या कोणत्याही व्याजासह चाचणी खरोखरच विनामूल्य असल्याची तुम्ही नेहमी खात्री केली पाहिजे.
UDAAP बद्दल अधिक जाणून घ्या.
Truth in Lending Act (TILA)
ट्रुथ इन लेंडिंग अॅक्ट (TILA) नुसार, ग्राहकांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यापूर्वी महत्त्वाच्या क्रेडिटच्या अटींबद्दल माहिती मिळणे आवश्यक आहे. क्रेडिटच्या अटींची जाहिरात करताना, जाहिरातींमध्ये केवळ उपलब्ध असलेल्या अटीच सांगता येतात.
जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटिंग सामग्रीमध्ये क्रेडिटच्या विशिष्ट अटींचा उल्लेख करता, ज्यांना "ट्रिगर अटी" म्हणून ओळखले जाते, तेव्हा तुम्हाला तुमच्या ग्राहकांना परतफेडीच्या संपूर्ण अटी स्पष्ट करणे आवश्यक असते. तुम्ही ट्रिगर अटींवर स्पष्टता देण्यासाठी प्रातिनिधिक उदाहरणे वापरू शकता आणि प्रत्यक्ष कर्ज कसे असू शकते हे तुमच्या ग्राहकांना दाखवू शकता.
प्रातिनिधिक उदाहरणामध्ये खालील माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे:
- खरेदीची किंमत (कर्जाची रक्कम)
- मासिक पेमेंट रक्कम
- कर्जाच्या मुदतीचा कालावधी
- वार्षिक टक्केवारी दर (APR)
प्रातिनिधिक उदाहरण कसे वापरावे यासाठी खालील उदाहरणाचा विचार करा:
- $800 ची खरेदी 15% APR दराने $72.21 च्या 12 मासिक पेमेंटमध्ये किंवा दर 2 आठवड्यांनी $200 च्या 4 व्याज-मुक्त पेमेंटमध्ये विभागली जाऊ शकते.
प्रातिनिधिक उदाहरण आवश्यक असणारे मेसेजेस
या मेसेजेसमध्ये ट्रिगर अटी समाविष्ट आहेत, ज्यांसाठी प्रातिनिधिक उदाहरण आवश्यक आहे:
- पेमेंटची संख्या, जर 4 पेक्षा जास्त पेमेंट असतील. उदाहरणार्थ, 6 पेमेंट.
- परतफेडीचा कालावधी. उदाहरणार्थ, 6 महिने किंवा 12 महिने.
- मासिक पेमेंटची रक्कम. उदाहरणार्थ, किमान $60/महिना
- व्याजाची रक्कम. उदाहरणार्थ, किमान 10% APR.
- कोणत्याही डाउन पेमेंटची रक्कम किंवा टक्केवारी. उदाहरणार्थ, $100 किंवा 25%.
या मेसेजेससाठी प्रातिनिधिक उदाहरणाची आवश्यकता नाही. इतर प्रकटीकरणे अद्याप आवश्यक असू शकतात:
- मासिक पेमेंट
- कालांतराने पे करा
- आता खरेदी करा, नंतर पे करा
- फायनान्सिंग
- किमान 0% APR
- 0% APR किंवा 10-36% APR
- व्याज-मुक्त
- 4 व्याज-मुक्त पेमेंट्स
ट्रुथ इन लेंडिंग अॅक्ट बद्दल अधिक जाणून घ्या.
हेल्थकेअर कंप्लायन्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे
जर तुम्ही हेल्थकेअर उत्पादने किंवा सेवा देत असाल, तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना वैयक्तिकरीत्या, जसे की ट्रीटमेंटच्या ठिकाणी, Shop Pay Installments चे मार्केटिंग करताना अतिरिक्त मार्गदर्शनाचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हाला ज्या अतिरिक्त मार्गदर्शनाचे पालन करणे आवश्यक आहे, त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- ग्राहकांना आवश्यकतेपेक्षा अधिक हेल्थकेअर सेवा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी किंवा विम्याचा गैरवापर होऊ शकेल अशा पद्धतीने Shop Pay Installments चे मार्केटिंग करू नका.
- जेव्हा ग्राहक त्रस्त असतील, भुलीच्या (अॅनेस्थेशिया) प्रभावाखाली असतील, तार्किक विचार करण्यास असमर्थ असतील, किंवा इतर कारणांमुळे माहितीपूर्ण संमती देण्यास सक्षम नसतील, तेव्हा Shop Pay Installments ची ऑफर देऊ नका.
- विमा, फ्लेक्सिबल स्पेंडिंग अकाउंट (FSA) किंवा हेल्थ सेव्हिंग्ज अकाउंट (HSA) चा संदर्भ असलेल्या मार्केटिंग विधानांमध्ये Shop Pay Installments चा समावेश करू नका.
- जर Shop Pay Installments चे मार्केटिंग विमा, फ्लेक्सिबल स्पेंडिंग अकाउंट (FSA) किंवा हेल्थ सेव्हिंग्ज अकाउंट (HSA) चा संदर्भ असलेल्या मार्केटिंग विधानांपासून वेगळे आणि त्यांच्या जवळ छापलेले नसेल, तर ते तुमच्या मार्केटिंग सामग्रीमध्ये दिसू शकते.
Affirm च्या हेल्थकेअर सेवा अटी आणि तरतुदींच्या संपूर्ण सूचीसाठी, Affirm च्या युनायटेड स्टेट्स मर्चंट हेल्थकेअर सर्व्हिस टर्म्स आणि हेल्थकेअर अँड इलेक्टिव्ह मेडिकल मार्केटिंग कंप्लायन्स सप्लिमेंट पहा.
मद्य उत्पादनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
जर तुम्ही मद्याची उत्पादने ऑफर करत असाल, तर तुम्हाला Shop Pay Installments चे मार्केटिंग करताना मद्य विक्रीसाठी लागू असणार्या कायदे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. युनायटेड स्टेट्स (US) मध्ये मद्य विक्रीच्या कायदे आणि नियमांबद्दल अधिक जाणून घ्या.
Shop Pay Installments मार्केटिंग कंप्लायन्स
तुमचे ऑनलाइन स्टोअर, ईमेल्स आणि सोशल मीडिया खात्यांवर Shop Pay Installments द्वारे Affirm च्या पेमेंट पर्यायांचे प्रमोशन करणाऱ्या मार्केटिंग सामग्रीने Shop Pay Installments मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
जर तुमचे स्टोअर Shop Pay Installments च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसेल, तर Shopify आणि Affirm तुमचे Shop Pay Installments खाते होल्डवर ठेवण्यासह विशिष्ट कारवाई करू शकतात. Shop Pay Installments खाते होल्डवर असल्यामुळे, जोपर्यंत नियम न पाळल्याची समस्या सुटत नाही, तोपर्यंत तुम्हाला नवीन ऑर्डर्सवर पेमेंट पद्धत म्हणून Shop Pay Installments ऑफर करण्यापासून प्रतिबंधित केले जाते.
मार्केटिंग कंप्लायन्सची समस्या सोडवणे
Shop Pay Installments कंप्लायन्स आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे किंवा मंजूर केलेल्या मेसेजिंग चे पालन न केल्यामुळे तुमच्या खात्यावर कारवाईची आवश्यकता असल्यास, तुमच्या Shopify ॲडमिनमधील Shop Pay Installments सेटिंग्ज पेज वर एक बॅनर दिसेल आणि तुम्हाला Affirm कडून एक ईमेल मिळेल.
मार्केटिंग कंप्लायन्सची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली पावले तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये मिळालेल्या मेसेजवर अवलंबून असतात. तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये दिसू शकणारे खालील मेसेजेस तपासा आणि त्यानंतर आवश्यक कारवाई करा:
- तुमच्या Shop Pay Installments वर कारवाई आवश्यक आहे: Shop Pay Installments च्या विक्रीत अडथळे येऊ नयेत म्हणून, तुम्हाला Affirm कडून मिळालेल्या ईमेलचे पुनरावलोकन करा आणि त्यानंतर निर्दिष्ट केलेल्या तारखेपूर्वी आवश्यक त्या सुधारणा करा.
- तुमचे Shop Pay Installments होल्डवर आहे: तुम्हाला Affirm कडून मिळालेल्या ईमेलचे पुनरावलोकन करा. तुमच्या Shop Pay Installments च्या मार्केटिंग मालमत्तांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करा आणि त्यानंतर Affirm कडून मिळालेल्या ईमेलला रिप्लाय करा. तुम्ही आवश्यक त्या सुधारणा केल्यानंतर तुमचे Shop Pay Installments खाते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी 30 दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. तुमचे खाते पूर्ववत झाल्यानंतर, तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये Shop Pay Installments पुन्हा उपलब्ध असा अॅलर्ट दिसेल.
तुम्हाला मिळालेल्या मार्केटिंग कंप्लायन्स नोटिफिकेशनबाबतच्या विशिष्ट प्रश्नांसाठी, Affirm ला affirmcompliancemonitoring@affirm.com वर संपर्क साधा. Affirm केवळ Shop Pay Installments मार्केटिंग कंप्लायन्सच्या समस्यांमध्ये मदत करू शकते आणि इतर Shop Pay Installments च्या प्रश्नांसाठी सपोर्ट देऊ शकत नाही.
तुमच्या Shop Pay Installments खात्याविषयी इतर कोणत्याही सपोर्ट प्रश्नांसाठी, जसे की पात्रतेचे प्रश्न, Shop Pay Installments ऑर्डर्ससाठी पैसे मिळवणे किंवा Shopify Payments खात्यावरील होल्ड्स, Shopify सपोर्टशी संपर्क साधा.