Shop Pay Installments उत्पादन पेज बॅनर
Shop Pay Installments बॅनर ग्राहकांना हप्त्यांमध्ये पे करण्याच्या त्यांच्या पर्यायांबद्दल माहिती देते आणि उत्पादन पेजमधील तुमच्या उत्पादनाच्या किमतीखाली प्रदर्शित केले जाते. ते प्रदर्शित करत असलेली माहिती उत्पादनाचे मूल्य आणि ग्राहकाच्या पात्रतेवर आधारित बदलते. बॅनरमधील Shop Pay लोगो तुमच्या उत्पादन पेजच्या बॅकग्राउंडशी जुळवून घेतो. फिकट बॅकग्राउंडवर लोगो गडद आणि गडद बॅकग्राउंडवर पांढरा असतो.
उत्पादन पेज बॅनर्स प्रदर्शित करून, तुम्ही ग्राहकांना ते चेकआउटवर पुढे जाण्यापूर्वी त्यांच्या अंदाजित कर्जाच्या रकमेबाबत आगाऊ माहिती प्रदान करता.
जर तुम्ही 31 जानेवारी 2022 नंतर तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर Shopify थीम इंस्टॉल केली असेल, तर उत्पादनाचे बॅनर तुमच्या उत्पादन पेजेसवर आधीच जोडले गेले असू शकते. तुम्ही Shop Pay Installments ॲक्टिव्हेट केल्यानंतर, उत्पादनाच्या किमतीखाली दिसणाऱ्या बॅनरसाठी तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील एक उत्पादन पेज तपासायला हवे.
तुम्हाला Shop अॅपवर तुमच्या ब्रँडच्या उपस्थितीचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी आणि विक्री इनसाइट्ससारख्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये Shop विक्री चॅनेल जोडण्याचा विचार करा. Shop बद्दल अधिक जाणून घ्या.
जर बॅनर आधीच जोडलेले नसेल, तर तुम्हाला उत्पादन पेज बॅनर मॅन्युअली जोडावे लागेल.
या पेजवर
उत्पादन पेज बॅनर मॅन्युअली जोडा
जर तुम्हाला थीम कोड वाचणे आणि संपादित करणे सोयीस्कर वाटत असेल, तर तुम्ही बदल कुठे करायचे ते ओळखू शकता आणि उत्पादन फॉर्म अपडेट करू शकता.
बदल कुठे करायचे ते ओळखा
बॅनरसाठीचा कोड उत्पादन फॉर्मच्या प्रत्येक उदाहरणामध्ये (instance) समाविष्ट करणे आवश्यक आहे, जे {% form 'product', product ... यासारखे दिसेल. तुमच्या थीमनुसार उत्पादन फॉर्म विविध ठिकाणी (locations) आढळू शकतो, तथापि, खालील काही सामान्य ठिकाणे आहेत:
product-form.liquidfeatured-product-form.liquidproduct-template.liquidproduct.liquid
उत्पादन फॉर्म अपडेट करा
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑनलाइन स्टोअर वर जा.
तुम्हाला संपादित करायची असलेली थीम शोधा, ॲक्शन्स मेनू उघडण्यासाठी
वर क्लिक करा आणि नंतर कोड संपादित करा वर क्लिक करा.
संबंधित फाईल उघडा.
{% form 'product', productअसलेली ओळ शोधा.अगदी खाली एक नवीन ओळ तयार करा आणि त्या ओळीवर पुढील गोष्टी पेस्ट करा:
{{ form | payment_terms }}- सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
विक्री चॅनेल विभागामध्ये, ऑनलाइन स्टोअर वर टॅप करा.
सर्व थीम्स व्यवस्थापित करा वर टॅप करा.
तुम्हाला संपादित करायची असलेली थीम शोधा, ॲक्शन्स मेनू उघडण्यासाठी
वर टॅप करा आणि नंतर कोड संपादित करा वर टॅप करा.
संबंधित फाईल उघडा.
{% form 'product', productअसलेली ओळ शोधा.अगदी खाली एक नवीन ओळ तयार करा आणि त्या ओळीवर पुढील गोष्टी पेस्ट करा:
{{ form | payment_terms }}- सेव्ह करा वर टॅप करा.
निकाल काहीसा पुढीलप्रमाणे दिसला पाहिजे:
{% form 'product', product ... %}
{{ form | payment_terms }}
...
{% endform %}