“Buy with Shop” वापरण्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे
जेव्हा तुम्ही "Buy with Shop" मालमत्ता वापरता, तेव्हा तुम्ही Shop च्या ट्रेडमार्क वापराविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांना सहमती देता आणि हे समजता की या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास तुमच्या परवान्याची समाप्ती होईल आणि तुम्हाला यापुढे "Buy with Shop" मालमत्ता वापरण्याची परवानगी नसेल. तुम्ही "Buy with Shop" चा योग्यरीत्या वापर करण्यासाठी Shopify च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहात याची खात्री करा.
तुम्ही .eps, .jpg, .png आणि .svg चा समावेश असलेल्या zip फाईलच्या रूपात सर्व "Buy with Shop" मालमत्ता डाउनलोड करू शकता. शक्य असेल तेव्हा, "Buy with Shop" बटण पूर्ण रंगीत प्रदर्शित करा.
"Buy with Shop" Installments च्या आर्टवर्कच्या वापराविषयीच्या मार्गदर्शनासाठी, "Buy with Shop" Installments आर्टवर्क वापरणे पहा.
द शॉपिंग बॅग आणि तिरप्या (इटॅलिक) Shopify वर्डमार्कसह, Shopify ब्रँड वापरण्याविषयीच्या मार्गदर्शनासाठी, आमचा ब्रँड वापरणे पहा.
या पेजवर
"Buy with Shop" लॉक-अप
शक्य असेल तेव्हा, "Buy with Shop" लॉक-अप पूर्ण रंगीत प्रदर्शित करा.

मोनोटोन “Buy with Shop” लॉक-अप
फक्त खालील परिस्थितीत मोनोटोन लॉक-अप वापरा:
- जेव्हा तुम्हाला सिंगल कलर प्रिंटिंगची आवश्यकता असेल
- जेव्हा तुम्हाला अचूक रंगाचे सादरीकरण मिळू शकत नाही
- जेव्हा तुम्ही कमी कॉन्ट्रास्ट असलेली बॅकग्राउंड वापरता
- जेव्हा तुम्ही गुंतागुंतीची किंवा पॅटर्न असलेली बॅकग्राउंड वापरता

रिकामी जागा
प्रत्येक कंपोझिशनमध्ये त्याचा दृश्य प्रभाव वाढवण्यासाठी “Buy with Shop” लॉक-अपच्या आजूबाजूला नेहमी 'X' ची रिकामी जागा किंवा पॅडिंग ठेवा.
'X' म्हणजे लॉक-अपची उंची होय.

किमान आकार
“Buy with Shop” लॉक-अपची दृश्य अखंडता राखण्यासाठी, ते 131 x 25 पिक्सेल (px) पेक्षा कमी स्केल करू नका.

सर्वोत्तम पद्धती
जेव्हा तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये “Buy with Shop” ॲसेट्स वापरता, तेव्हा खालील टेबलमधील शिफारशींचा विचार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
“Buy with Shop” वापरताना तुम्ही काय टाळावे याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
![]() फक्त पूर्ण रंग, पूर्णपणे काळा किंवा पूर्णपणे पांढरा हेच बदल स्वीकार्य आहेत. |
![]() |
![]() त्याऐवजी, सर्वात जास्त कॉन्ट्रास्ट प्रदान करण्यासाठी मोनोटोन लॉक-अप वापरा. |
![]() |
![]() |
![]() |
वेब ॲक्सेसिबिलिटीसाठी डिझायनिंग विषयी अधिक जाणून घ्या.
पेमेंट बटणे जोडा
तुम्ही Shop Pay वापरत असल्यास, तुम्ही “Buy with Shop” चेकआउट बटण वापरू शकता.
“Buy with Shop” चेकआउट बटण
“Buy with Shop” चेकआउट बटण हे समर्पित एक्सप्रेस चेकआउट विभागांमध्ये स्थित असते. कार्ट पेजेसवर किंवा चेकआउटवर हे बटण अनेकदा इतर एक्सप्रेस पेमेंट पर्यायांसोबत बंडल केलेले असते.

ट्रेडमार्क वापर मार्गदर्शक तत्त्वे
ही मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करतात की तुम्ही “Buy with Shop” ॲसेट्स कशा वापरल्या पाहिजेत आणि दृश्यात्मकरित्या कशा सादर केल्या पाहिजेत. “Buy with Shop” ॲसेट्सचा वापर करणे हे सूचित करते की तुम्हाला ही मार्गदर्शक तत्त्वे मान्य आहेत आणि तुम्हाला हे समजते की, या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून तुम्ही या ॲसेट्सचा वापर केल्यास तुमचा परवाना आणि/किंवा त्या वापरण्याची परवानगी आपोआप समाप्त होईल.
- जोपर्यंत लेखी स्वरूपात स्पष्टपणे अधिकृत केलेले नसेल, तोपर्यंत तुम्ही या ॲसेट्सचा वापर फक्त या पेजवरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि Shop Pay ॲक्टिव्हेट केलेल्या Shopify मर्चंटच्या स्टोअरचे प्रमोशन करण्याच्या उद्देशानेच करू शकता.
- तुमच्या या ॲसेट्सच्या वापरामुळे Shopify ने तुमची कंपनी किंवा तुमची उत्पादने किंवा सेवा प्रायोजित केल्याबद्दल, त्यांच्याशी संलग्न असल्याबद्दल किंवा समर्थन केल्याबद्दल ग्राहकांची दिशाभूल होता कामा नये.
- “Buy with Shop” लॉक-अप आणि बटणासह या ॲसेट्स Shopify ची अनन्य मालमत्ता आहेत, आणि त्यापैकी कोणत्याही ॲसेटच्या तुमच्या वापरामुळे निर्माण होणारी सर्व सदिच्छा केवळ आमच्या हिताची असेल आणि तुम्ही आमच्या त्या ॲसेट्सवरील मालकीला बाधा आणणारी कोणतीही कृती करणार नाही. वेब पेजवर वापरल्यास या ॲसेट्समध्ये आमच्या होमपेजच्या एम्बेडेड हायपरलिंक्स समाविष्ट असाव्यात: www.shopify.com.
- या ॲसेट्सचा वापर आदराने केला गेला पाहिजे. त्यांचा वापर Shopify, आमची उत्पादने किंवा सेवा यांना हानी पोहोचवणाऱ्या पद्धतीने किंवा आमच्या मते, आमची प्रतिष्ठा किंवा आमच्या ट्रेडमार्कमधील सदिच्छा किंवा आमच्या मालकीच्या इतर कोणत्याही मालमत्तेला कमी लेखणाऱ्या किंवा नुकसान पोहोचवणाऱ्या पद्धतीने केला जाऊ नये. दुसऱ्या शब्दांत, आमच्या ॲसेट्सला कोणत्याही बेकायदेशीर किंवा अवैध क्रियाकलापांशी जोडू नका किंवा फसव्या किंवा हानिकारक पद्धतीने वापरू नका.









