आयर्लंडमधील Shopify Payments सह पेआउट आणि सेटलमेंटच्या वेळा
आयर्लंडमधील Shopify Payments सह तुम्ही सर्व सबस्क्रिप्शन प्लॅनवर EUR मध्ये पेआउट मिळवू शकता. तुमचे स्टोअर Advanced Shopify प्लॅन किंवा Shopify Plus प्लॅनवर असल्यास, तुम्ही एकापेक्षा जास्त चलनांमध्ये पेआउट मिळवू शकता. तुमचे ग्राहक त्यांच्या ऑर्डर्ससाठी पैसे भरण्यासाठी जे चलन वापरतात, ते तुमच्या Shopify Payments मधील पेआउटच्या चलनापेक्षा वेगळे असू शकते. वेगवेगळ्या चलनांमध्ये विक्री करण्याबद्दल आणि पेमेंट मिळवण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
या मार्गदर्शकामध्ये आयर्लंडमधील Shopify Payments सह पेआउट चलने, सेटलमेंटच्या वेळा, प्रक्रिया शुल्क आणि तुमचा व्यवहार इतिहास कसा पाहावा हे स्पष्ट केले आहे.
या पेजवर
आयर्लंडमधील Shopify Payments साठी शुल्क
Shopify Payments शुल्क ठिकाणावर आधारित असतात आणि ती बदलू शकतात. शुल्कासंबंधी सर्वात अचूक आणि तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी, आयर्लंडच्या प्लॅन आणि किंमत निश्चिती पेजला भेट द्या. या पेजवर तुम्ही निवडलेल्या प्लॅनवर आधारित Shopify Payments शी संबंधित दर आणि शुल्कांचा तपशील दिला जातो.
तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये पेमेंटचे दर पाहा
तुम्ही आधीपासूनच Shopify मर्चंट असल्यास, तुम्ही तुमच्या स्टोअरचे ठिकाण आणि निवडलेल्या प्लॅनसाठी लागू असलेल्या विशिष्ट दर आणि शुल्कांबद्दल माहिती अॅक्सेस करू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > पेमेंट वर जा.
Shopify Payments विभागात, व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
वेगवेगळ्या पेमेंट पद्धतींना लागू होणारे दर पाहा.
आयर्लंडमधील Shopify Payments साठी सेटलमेंटच्या वेळा
सेटलमेंटची वेळ म्हणजे ग्राहकाचे पेमेंट कॅप्चर केले जाण्याची वेळ आणि तो निधी तुमच्या बँक खात्यात पाठवण्यासाठी उपलब्ध होण्याची वेळ यामधील कालावधी होय. ग्राहकाचे पेमेंट कॅप्चर करण्यासाठीचा टाइमस्टॅम्प समन्वित जागतिक वेळ (UTC) मध्ये रेकॉर्ड केला जातो. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कॅप्चर केलेली पेमेंट्स एकत्र केली जातात आणि एकच पेआउट म्हणून पाठवली जातात.
आयर्लंडमध्ये, सेटलमेंटची किमान वेळ 3 व्यावसायिक दिवस आहे. जेव्हा तुम्हाला पेआउट मिळण्यास सुरुवात होते, तेव्हा तुमची सेटलमेंटची वेळ जास्त असते, परंतु तुम्ही वेळेवर ऑर्डर्स पूर्ण करताच, तुमची सेटलमेंटची वेळ कमी होऊन ती तुमच्या प्रदेशासाठी सेटलमेंटच्या किमान वेळेइतकी होऊ शकते.
आयर्लंडमधील Shopify Payments साठी किमान पेआउट रक्कम €1 EUR आहे. एखादे पेआउट या रक्कमेपेक्षा कमी असल्यास, जोपर्यंत पेआउट करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते प्रलंबित स्थितीत राहते.
Shopify Payments द्वारे पेमेंट मिळवण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
आयर्लंडमध्ये Shopify Payments सह एकापेक्षा जास्त चलनांमध्ये पेआउट मिळवणे
तुमचे स्टोअर Advanced प्लॅन किंवा Shopify Plus प्लॅनवर असल्यास, तुम्ही कोणतेही समर्थित पेआउट चलन तुमचे डीफॉल्ट पेआउट चलन म्हणून निवडू शकता. बहु-चलन पेआउट शुल्क आणि चलन विनिमय शुल्कांसाठी पुढील बाबींचे पुनरावलोकन करा:
- तुमचे डीफॉल्ट पेआउट चलन हे तुमचे देशांतर्गत चलन EUR असल्यास, तुम्हाला बहु-चलन पेआउट शुल्क लागणार नाही.
- तुम्ही पेआउटसाठी अतिरिक्त बँक खाती सेट केल्यास, तुमचे ठिकाण आणि Shopify प्लॅनवर आधारित बहु-चलन पेआउट शुल्क लागू केले जाते.
- पेआउट मिळवण्यासाठी तुमच्या Shopify Payments खात्यावर सेट केलेल्या चलनाव्यतिरिक्त इतर चलनामध्ये ऑर्डर्स दिल्यास, त्यांचे पेआउट तुमच्या डीफॉल्ट चलनाच्या बँक खात्यात केले जाते.
- खाते देशांतर्गत चलनामध्ये नसल्यास, तुम्हाला चलन विनिमय शुल्क लागते.
- ऑर्डर्स तुमच्या देशांतर्गत चलनात असल्यास आणि तुमच्या देशांतर्गत प्रदेशातील बँकेत पेआउट केले असल्यास, तुमचे देशांतर्गत चलन तुमचे डीफॉल्ट पेआउट चलन नसले तरीही तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
तुम्ही देशांतर्गत नसलेले चलन तुमचे डीफॉल्ट चलन म्हणून निवडल्यास - उदाहरणार्थ, आयर्लंडमध्ये Shopify Payments वापरत असताना तुम्ही USD हे तुमचे डीफॉल्ट चलन म्हणून निवडल्यास - तुम्हाला मिळणाऱ्या कोणत्याही पेआउटवर तुमचे ठिकाण आणि Shopify प्लॅननुसार बहु-चलन पेआउट शुल्क आकारले जाते.
आयर्लंडमधील Shopify Payments सह समर्थित पेआउट चलने
आयर्लंडमध्ये Shopify Payments वापरताना तुम्ही ज्या चलनांमध्ये पेआउट स्वीकारू शकता, बँक खाते कुठे असले पाहिजे आणि त्यांच्याकडून बहु-चलन पेआउट शुल्क आकारले जाते की नाही, याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
| पेआउट चलन | बँक खात्याचे ठिकाण | देशांतर्गत चलन | बहु-चलन पेआउट शुल्क |
|---|---|---|---|
| EUR | ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिक्टनस्टाईन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम | होय | नाही |
| AUD, CAD, CHF, CZK, DKK, GBP, HKD, HUF, JPY, NOK, NZD, PLN, RON, SEK, SGD, ZAR | ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिक्टनस्टाईन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम | नाही | होय |
| USD | ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिक्टनस्टाईन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स | नाही | होय |
पेआउट पाहणे
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या वित्त पेजवरून तुमचे पेआउट पाहू शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
- तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > पेआउट वर जा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
वित्त वर टॅप करा.
पेआउट पाहा वर टॅप करा.
कर अहवाल
मर्चंट म्हणून, तुम्हाला कर अहवालासह सर्व लागू नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुमच्या अधिकारक्षेत्रानुसार, Shopify Payments ला तुमच्या विक्रीचा अहवाल स्थानिक कर प्राधिकरणांना देणे आवश्यक असू शकते.
आयर्लंड वगळता युरोपमधील स्टोअर्ससाठी Shopify Payments शुल्कांमध्ये मूल्यवर्धित कर (VAT) समाविष्ट नसतो. तुम्हाला तुमच्या VAT रिटर्नवर स्थानिक लागू कर दरानुसार VAT चा हिशोब ठेवावा लागू शकतो. ही माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही एकतर जनरेट केलेले इन्व्हॉइस डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या व्यवहार माहितीसह एक फाईल एक्सपोर्ट करू शकता.
आयर्लंडमधील स्टोअर्ससाठी, Shopify Payments शुल्कांव्यतिरिक्त 23% VAT आकारला जातो.
जनरेट केलेले इन्व्हॉइस डाउनलोड करा
तुम्ही तुमच्या कर दाव्यासह सबमिट करण्यासाठी मासिक इन्व्हॉिसेस डाउनलोड करू शकता. प्रत्येक इन्व्हॉइसमध्ये त्या महिन्यात तुमच्या स्टोअरमध्ये केलेल्या सर्व ऑर्डर्ससाठी व्यवहार शुल्कांवर भरलेल्या एकूण VAT चा समावेश असतो. जनरेट केलेली इन्व्हॉिसेस UTC टाइम झोन वापरतात, जो तुमच्या स्टोअरच्या टाइम झोनपेक्षा वेगळा असू शकतो. तुम्हाला तुमच्या स्टोअरचा टाइम झोन वापरणारा अहवाल हवा असल्यास, तुम्ही CSV फाईल म्हणून तुमच्या स्टोअरच्या व्यवहारांची सूची एक्सपोर्ट करू शकता.
प्रत्येक महिन्याचे इन्व्हॉइस पुढील महिन्याच्या 5 तारखेला जनरेट होते. उदाहरणार्थ, जून महिन्याचे इन्व्हॉइस 5 जुलै रोजी जनरेट होते. एखाद्या महिन्यात Shopify Payments वरून कोणतेही व्यवहार झाले नसल्यास, त्या महिन्यासाठी कोणतेही इन्व्हॉइस जनरेट होत नाही.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > पेआउट वर जा.
डॉक्युमेंट्स वर क्लिक करा.
कर डॉक्युमेंट्स डायलॉगमध्ये, तुम्हाला जे इन्व्हॉइस डाउनलोड करायचे आहे त्यासाठी, PDF डाउनलोड करा वर क्लिक करा.
व्यवहार एक्सपोर्ट करा
तुम्ही तुमच्या स्टोअरच्या व्यवहारांची सूची CSV फाईल म्हणून एक्सपोर्ट करू शकता. या CSV फाईलमध्ये युरोपियन मर्चंट्ससाठी VAT कॉलमचा समावेश असतो.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > पेआउट वर जा.
व्यवहार वर क्लिक करा.
एक्सपोर्ट करा वर क्लिक करा. तुमच्या ब्राउझरमध्ये एक CSV फाईल डाउनलोड होते.
स्प्रेडशीट एडिटरमध्ये CSV फाईल उघडा. CSV फाईलचा शेवटचा कॉलम प्रत्येक व्यवहारावर गोळा केलेल्या VAT ची रक्कम दाखवतो.
तुम्ही गोळा केलेल्या VAT च्या एकूण रक्कमेची गणना करण्यासाठी SUM टूल वापरा.