लिथुआनियामध्ये Shopify Payments सह पेआउट आणि सेटलमेंटच्या वेळा
लिथुआनियामध्ये Shopify Payments सह, तुम्हाला सर्व सबस्क्रिप्शन प्लॅन्सवर युरो (EUR) मध्ये पेआउट मिळू शकते. तुमचे स्टोअर Advanced प्लॅन किंवा Shopify Plus प्लॅनवर असल्यास, तुम्हाला अनेक चलनांमध्ये पेआउट मिळू शकते. तुमचे ग्राहक त्यांच्या ऑर्डर्ससाठी पेमेंट करण्यासाठी जे चलन वापरतात ते Shopify Payments मधील तुमच्या पेआउटच्या चलनापेक्षा वेगळे असू शकते. विविध चलनांमध्ये विक्री करणे आणि पैसे मिळवण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
या पेजवर
लिथुआनियामध्ये Shopify Payments साठी सेटलमेंटच्या वेळा
ग्राहकाचे पेमेंट मिळवणे आणि तो निधी तुमच्या बँक खात्यात पाठवण्यासाठी उपलब्ध असणे यांमधील कालावधी म्हणजे सेटलमेंटची वेळ. ग्राहकाचे पेमेंट मिळवल्याचा टाइमस्टॅम्प Coordinated Universal Time (UTC) मध्ये रेकॉर्ड केला जातो. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मिळालेली पेमेंट्स एकत्र केली जातात आणि एकच पेआउट म्हणून पाठवली जातात.
लिथुआनियामध्ये, सेटलमेंटची किमान वेळ 3 व्यावसायिक दिवस आहे. जेव्हा तुम्हाला पेआउट मिळण्यास सुरुवात होते, तेव्हा तुमची सेटलमेंटची वेळ जास्त असते, परंतु तुम्ही ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करत राहिल्यावर, तुमची सेटलमेंटची वेळ कमी होऊन ती तुमच्या प्रदेशासाठी असलेल्या सेटलमेंटच्या किमान वेळेइतकी होऊ शकते.
लिथुआनियामध्ये Shopify Payments साठी किमान पेआउट रक्कम €1 EUR आहे. पेआउट या रकमेपेक्षा कमी असल्यास, पेआउट करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध होईपर्यंत ते प्रलंबित स्थितीत राहते.
Shopify Payments द्वारे पैसे मिळवण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
लिथुआनियामध्ये Shopify Payments साठी शुल्क
Shopify Payments चे शुल्क ठिकाणावर आधारित असतात आणि ते बदलू शकतात. शुल्काबद्दल सर्वात अचूक आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी, तुमच्या प्रदेशाच्या किंमत योजनेच्या पेजचा संदर्भ घ्या.
प्लॅन्स आणि किंमत निश्चितीचे पेज फक्त त्या देशासाठी विशिष्ट असलेल्या भाषेत आणि चलनात ॲक्सेस करता येते. तुम्हाला प्लॅन्स आणि किंमत निश्चितीचे पेज भाषांतरित करायचे असल्यास, तुम्ही Google Chrome एक्स्टेंशनसारखे ब्राउझर एक्स्टेंशन वापरू शकता.
तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये पेमेंटचे दर पहा
तुम्ही लिथुआनियामध्ये Shopify Payments सेट केले असल्यास, तुम्ही तुमच्या स्टोअरचे ठिकाण आणि निवडलेल्या प्लॅनला लागू होणाऱ्या विशिष्ट दरांबद्दल आणि शुल्कांबद्दल माहिती ॲक्सेस करू शकता. लागू होणाऱ्या शुल्कांबद्दलच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधून Shopify Payments सेवेच्या अटी ॲक्सेस करू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > पेमेंट्स वर जा.
Shopify Payments विभागामध्ये, व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
वेगवेगळ्या पेमेंट पद्धतींना लागू होणारे दर पहा.
लिथुआनियामध्ये Shopify Payments सह अनेक चलनांमध्ये पेआउट मिळवणे
तुुमचे स्टोअर Advanced प्लॅन किंवा Shopify Plus प्लॅनवर असल्यास, तुम्ही कोणतेही सपोर्टेड पेआउट चलन तुमचे डीफॉल्ट पेआउट चलन म्हणून सेट करू शकता. तुमचे डीफॉल्ट पेआउट चलन लिथुआनियातील तुमचे EUR हे देशांतर्गत चलन असल्यास, तुम्हाला बहु-चलन पेआउट शुल्क लागणार नाही.
तुम्ही पेआउटसाठी अतिरिक्त बँक खाती सेट केल्यास, तुमच्या ठिकाण आणि Shopify प्लॅनवर आधारित बहु-चलन पेआउट शुल्क लागू होते. ज्या चलनामध्ये Shopify Payments पेआउट प्राप्त करण्यासाठी सेट केलेले नाही त्या चलनात दिलेल्या ऑर्डर्सची रक्कम तुमच्या डीफॉल्ट चलनाच्या बँक खात्यात जमा केली जाते. खाते देशांतर्गत नसलेल्या चलनात असल्यास, तुम्हाला चलन विनिमय शुल्क लागते.
तुमचे देशांतर्गत चलन तुमचे डीफॉल्ट पेआउट चलन नसले तरीही, तुमच्या देशांतर्गत प्रदेशातील बँकेला अदा केलेल्या तुमच्या देशांतर्गत चलनातील ऑर्डर्ससाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
तुम्ही देशांतर्गत नसलेले चलन तुमचे डीफॉल्ट चलन म्हणून निवडल्यास, तुम्हाला मिळणाऱ्या कोणत्याही पेआउट्सवर तुमचे ठिकाण आणि Shopify सबस्क्रिप्शन प्लॅननुसार बहु-चलन पेआउट शुल्क आकारले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही लिथुआनियामध्ये Shopify Payments वापरत असल्यास आणि तुमचे डीफॉल्ट चलन म्हणून USD निवडल्यास, तुम्हाला बहु-चलन पेआउट शुल्क आकारले जाते.
लिथुआनियामध्ये Shopify Payments सह सपोर्टेड पेआउट चलने
लिथुआनियामध्ये Shopify Payments सह बहु-चलन पेआउट्स वापरताना तुम्हाला खालील चलनांमध्ये पेआउट मिळू शकते:
| पेआउट चलन | बँक खात्याचे ठिकाण | देशांतर्गत चलन | बहु-चलन पेआउट शुल्क |
|---|---|---|---|
| EUR | ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिक्टनस्टाईन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम | होय | नाही |
| AUD, CAD, CHF, CZK, DKK, GBP, HKD, HUF, JPY, NOK, NZD, PLN, RON, SEK, SGD, ZAR | ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिक्टनस्टाईन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम | नाही | होय |
| USD | ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिक्टनस्टाईन, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स | नाही | होय |
तुम्हाला एकापेक्षा जास्त चलनांमध्ये पेआउट मिळवायचे असल्यास, तुम्ही विशिष्ट चलन, Shopify सबस्क्रिप्शन प्लॅन, ठिकाण आणि बँक खाते यांसंबंधित आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे. बहु-चलन पेआउट बद्दल अधिक जाणून घ्या.
तुमचे पेआउट पाहा
तुम्ही Shopify ॲडमिनमध्ये तुमचे पेआउट पाहू शकता आणि प्रलंबित, ट्रान्झिटमध्ये असलेले, पेड किंवा अयशस्वी झालेल्या कोणत्याही पेआउट ट्रान्सफरचे पुनरावलोकन करू शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > पेमेंट्स वर जा.
Shopify Payments विभागामध्ये, पेआउट पाहा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, पेमेंट वर टॅप करा.
Shopify Payments विभागामध्ये, पेआउट पाहा वर टॅप करा.
कर अहवाल
मर्चंट म्हणून, तुम्ही कर अहवालासह लागू होणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुमच्या अधिकारक्षेत्रानुसार, Shopify Payments ला तुमच्या विक्रीची माहिती स्थानिक कर प्राधिकरणांना देणे देखील आवश्यक असू शकते.
आयर्लंडचा अपवाद वगळता, युरोपमधील स्टोअरसाठी Shopify Payments शुल्कामध्ये मूल्यवर्धित कर (व्हॅट) समाविष्ट केलेला नाही. तुम्हाला तुमच्या VAT रिटर्नवर स्थानिक पातळीवर लागू असलेल्या कर दरानुसार व्हॅटचा हिशेब ठेवावा लागेल. ही माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही जनरेट केलेले इन्व्हॉइस डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या व्यवहार माहितीसह एखादी फाईल एक्सपोर्ट करू शकता.
आयर्लंडमधील स्टोअरसाठी, Shopify Payments शुल्काव्यतिरिक्त 23% व्हॅट आकारला जातो.
जनरेट केलेले इन्व्हॉइस डाउनलोड करा
तुम्ही तुमच्या कर दाव्यासह सबमिट करण्यासाठी मासिक इन्व्हॉइस डाउनलोड करू शकता. प्रत्येक इन्व्हॉइसमध्ये त्या महिन्यात तुमच्या स्टोअरमध्ये दिलेल्या सर्व ऑर्डरच्या व्यवहार शुल्कावर भरलेला एकूण व्हॅट समाविष्ट असतो. जनरेट केलेले इन्व्हॉइस UTC वेळ क्षेत्र वापरतात, जे तुमच्या स्टोअरच्या वेळ क्षेत्रापेक्षा वेगळे असू शकते. जर तुम्हाला तुमच्या स्टोअरचे वेळ क्षेत्र वापरणारा अहवाल हवा असेल, तर तुम्ही तुमच्या स्टोअरच्या व्यवहारांची सूची CSV फाईल म्हणून एक्सपोर्ट करू शकता.
प्रत्येक महिन्याचे इन्व्हॉइस पुढील महिन्याच्या 5 तारखेला जनरेट होते. उदाहरणार्थ, जून महिन्याचे इन्व्हॉइस 5 जुलै रोजी जनरेट होते. एखाद्या महिन्यात Shopify Payments सह कोणतेही व्यवहार झाले नसल्यास, त्या महिन्यासाठी कोणतेही इन्व्हॉइस जनरेट केले जात नाही.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > पेआउट वर जा.
दस्तऐवज वर क्लिक करा.
कर दस्तऐवज डायलॉगमध्ये, तुम्हाला जे इन्व्हॉइस डाउनलोड करायचे आहे त्यासाठी PDF डाउनलोड करा वर क्लिक करा.
व्यवहार एक्सपोर्ट करा
तुम्ही तुमच्या स्टोअरच्या व्यवहारांची सूची CSV फाईल म्हणून एक्सपोर्ट करू शकता. CSV फाईलमध्ये युरोपीय मर्चंटसाठी व्हॅटचा कॉलम समाविष्ट आहे.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > पेआउट वर जा.
व्यवहार वर क्लिक करा.
एक्सपोर्ट करा वर क्लिक करा. तुमच्या ब्राउझरमध्ये CSV फाईल डाउनलोड होते.
स्प्रेडशीट एडिटरमध्ये CSV फाईल उघडा. CSV फाईलमधील शेवटचा कॉलम प्रत्येक व्यवहारावर गोळा केलेल्या व्हॅटची रक्कम दाखवतो.
तुम्ही गोळा केलेल्या एकूण व्हॅटची गणना करण्यासाठी SUM टूल वापरा.