युनायटेड स्टेट्ससाठी PayPal Wallet

PayPal Wallet वापरून तुम्ही Shopify मधील तुमच्या इतर पेमेंट्सच्या सोबत व्यवहार, पेआउट्स आणि विवादांचे व्यवस्थापन करत असताना PayPal पेमेंट्स स्वीकारू शकता, ज्यामुळे तुमचे पेमेंट ऑपरेशन्स सोपे होऊ शकतात. तुम्ही तुमचे Shopify स्टोअर तयार करता आणि युनायटेड स्टेट्ससाठी Shopify Payments सेट करता, तेव्हा तुम्हाला आपोआप एक PayPal Wallet खाते मिळते. PayPal Wallet सोबत, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या Shopify Payments विभागाद्वारे तुमच्या PayPal चे व्यवहार, पेआउट्स आणि विवादांचे व्यवस्थापन करू शकता.

PayPal Wallet वापरण्यासाठी, तुम्ही Shopify Checkout ची सर्वात अपग्रेड केलेली आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.

PayPal Wallet चे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये

PayPal Wallet वापरण्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • तंटे आणि परताव्यांसह सर्व PayPal सेटिंग्ज आणि व्यवहार, Shopify ॲडमिनमध्ये व्यवस्थापित केले जातात.
  • PayPal Wallet चे व्यवहार तुमच्या Shopify Payments च्या व्यवहारांसोबत बंडल केले जातात आणि तुमच्या पसंतीच्या बँक खात्यामध्ये त्यांचे पेआउट दिले जाते.

Shopify Payments सोबत PayPal Wallet वापरताना विचारात घेण्याच्या गोष्टी

तुम्ही Shopify Payments सोबत PayPal Wallet वापरण्यापूर्वी, पुढील गोष्टींचे पुनरावलोकन करा:

  • जर तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये आधारित असाल आणि Shopify Payments वापरत असाल, तर तुमच्या Shopify ॲडमिनच्या अतिरिक्त पेमेंट पद्धती विभागामध्ये PayPal उपलब्ध नसते. PayPal केवळ Shopify Payments Wallet द्वारे इंटिग्रेट केले जाऊ शकते.
  • PayPal Wallet वापरण्यासाठी, तुम्ही Shopify Checkout ची सर्वात नवीन आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.
  • जर एखाद्या PayPal Wallet च्या व्यवहारावर तंटा उघडला असेल, तर तुम्ही केवळ पूर्ण परतावा देऊ शकता. तंटा असलेल्या व्यवहारांवर आंशिक परतावे उपलब्ध नाहीत.
  • जेव्हा तंट्याची चौकशी सुरू होते, तेव्हा तंटा सुटेपर्यंत तंटामधील निधी तुमच्या खात्यात होल्डवर ठेवला जातो.
  • तंट्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयांविरुद्ध अपील करता येत नाही.
  • PayPal Wallet नवीन सबस्क्रिप्शन्सना आणि आवर्ती पेमेंट्सना सपोर्ट करते.
  • जर तुम्ही PayPal Wallet वापरून तुमच्या पेआउट चलनापेक्षा वेगळ्या चलनात पेमेंट्स स्वीकारत असाल, तर 3% चलन रूपांतरण शुल्क लागू केले जाते. चलन रूपांतरण शुल्कांबद्दल अधिक माहितीसाठी शुल्क आणि खर्च याचे पुनरावलोकन करा.

युनायटेड स्टेट्समधील PayPal Wallet

PayPal Wallet हे थेट Shopify Payments शी जोडलेले असते आणि Shopify Payments मध्ये एक पेमेंट पद्धत म्हणून काम करते, ज्यामुळे तुमचे व्यवहार व्यवस्थापित करणे सोपे होते.

जर तुमचा व्यवसाय युनायटेड स्टेट्समध्ये आधारित असेल आणि तुम्ही Shopify Payments वापरत असाल, तर तुम्ही PayPal Wallet इंटिग्रेशनसह PayPal ऑफर करू शकता.

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या पेमेंट्स विभागामध्ये PayPal Wallet व्यवहारांशी संबंधित शुल्कांचे पुनरावलोकन करू शकता.

PayPal बरील अधिक माहितीसाठी, युनायटेड स्टेट्समधील मर्चंट्सना लागू होणाऱ्या PayPal सेवांसाठीच्या कायदेशीर करारांचा संदर्भ घ्या.

तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये PayPal Wallet व्यवहारांचे व्यवस्थापन करणे

Shopify Payments सोबत PayPal Wallet वापरण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही थेट तुमच्या Shopify ॲडमिनमधून अनेक महत्त्वाचे व्यावसायिक टास्क व्यवस्थापित करू शकता:

  • पेआउट्स: PayPal Wallet च्या व्यवहारांसाठीचे पेआउट्स तुमच्या Shopify ॲडमिनच्या पेआउट्स विभागामध्ये प्रदर्शित केले जातात. PayPal Wallet च्या व्यवहारांचे पुनरावलोकन करण्यासाठी तुम्ही पेमेंट पद्धतीनुसार पेआउट्स फिल्टर करू शकता.
  • परतावे: जेव्हा तुमच्या Shopify Payments खात्यामध्ये PayPal Wallet अ‍ॅक्टिव्ह असते, तेव्हा PayPal द्वारे केलेल्या व्यवहारांवरील परतावे, थेट तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये व्यवस्थापित आणि प्रदर्शित केले जातात.
  • तंटे: PayPal Wallet वापरून केलेल्या व्यवहारांवरील तंटे तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये व्यवस्थापित केले जातात.
  • रिपोर्टिंग: तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधून थेट PayPal Wallet च्या व्यवहारांसाठीची विक्री, परतावे आणि तंटे यांवरील रिपोर्ट्स अ‍ॅक्सेस करू शकता. व्यवहारांवरील रिपोर्ट्सचे पुनरावलोकन करण्यासाठी तुम्ही PayPal Business Centre वापरत नाही.

जर तुम्ही यापूर्वी PayPal Express Checkout ऑफर केले असेल, तर PayPal Express Checkout द्वारे पैसे भरलेल्या ऑर्डर्सवरील तंटे PayPal Business Centre मध्ये व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. PayPal Express Checkout वापरून दिलेल्या ऑर्डर्सवरील परतावे किंवा तंटे व्यवस्थापित करण्यासाठी, PayPal Wallet अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर 180 दिवसांपर्यंत तुम्हाला तुमच्या PayPal Express खात्यामध्ये आणि जोडलेल्या बँक खात्यामध्ये शिल्लक राखणे आवश्यक आहे. जर PayPal Express Checkout ने पैसे भरलेल्या ऑर्डरवर तंटा उघडला असेल आणि तुमच्याकडे खर्च भागवण्यासाठी पुरेसा निधी नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये नकारात्मक शिल्लक असते. जर तुमची PayPal खात्याची शिल्लक नकारात्मक असेल, तर तुम्ही खाते टॉप अप करणे आवश्यक आहे. जर नकारात्मक शिल्लक हाताळली गेली नाही, तर रिझोल्युशनची सुविधा देण्यासाठी PayPal खाते मालकाशी संपर्क साधते.

युनायटेड स्टेट्समध्ये PayPal Wallet सोबत Venmo वापरणे

Venmo ही एक ऑनलाइन पैसे-हस्तांतरित करण्याची सेवा आहे, जी युनायटेड स्टेट्समधील ग्राहकांना त्यांच्या मोबाइल उपकरणांवरून Venmo ॲपमधून पेमेंट्स करण्याची अनुमती देते. तुमच्या PayPal Wallet मध्ये Venmo स्वयंचलितपणे एक पेमेंट पद्धत म्हणून उपलब्ध होते.

तुमचे Shopify Payments अ‍ॅक्टिव्ह असताना जर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना Venmo एक पेमेंट पद्धत म्हणून ऑफर करायची नसेल, तर ते डीअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधणे आवश्यक आहे. हा पर्याय केवळ तेव्हाच उपलब्ध असतो, जेव्हा तुम्ही Shopify Payments सोबत PayPal Wallet इंटिग्रेशन वापरत असता.

त्याऐवजी जर तुम्ही तृतीय-पक्ष गेटवे म्हणून PayPal Express Checkout वापरत असाल, तर PayPal चेकआउटच्या अनुभवामध्ये प्रदर्शित होणाऱ्या पेमेंट पर्यायांवर Shopify नियंत्रण ठेवत नाही. PayPal Express Checkout इंटिग्रेशनसाठी Venmo ची उपलब्धता बदलण्यासाठी, थेट PayPal शी संपर्क साधा.

जर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना पेमेंट पद्धत म्हणून Venmo ऑफर करायचे असेल, परंतु तुम्हाला Shopify Payments वापरायचे नसेल, तर तुम्ही तृतीय पक्ष गेटवे म्हणून PayPal Express जोडून Venmo ने पेमेंट करण्याचा पर्याय देऊ शकता. PayPal Express आणि Venmo बद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या चेकआउटमध्ये Venmo वापरून त्यांच्या ऑर्डरसाठी पेमेंट करण्यासाठी, ग्राहकांनी खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • ग्राहक युनायटेड स्टेट्समध्ये असणे आवश्यक आहे.
  • ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल उपकरणावर Venmo ॲपची नवीनतम आवृत्ती इन्स्टॉल केलेली असणे आवश्यक आहे.
  • ग्राहकांनी कुकीज स्वीकारलेल्या स्थितीत, Venmo ॲपमध्ये त्यांचा कनेक्ट केलेला ब्राउझर वापरणे आवश्यक आहे. Venmo खाजगी ब्राउझिंग किंवा इन्कॉग्निटो मोडला सपोर्ट करत नाही.
  • ग्राहकांनी त्यांच्या Venmo ॲपमध्ये ऑनलाइन खरेदीचे सेटिंग ॲक्टिव्हेट केलेले असणे आवश्यक आहे.

PayPal Wallet मधील व्यवहारांचे तंटे व्यवस्थापित करणे

जेव्हा ग्राहक PayPal Resolution Center मध्ये एखाद्या समस्येची तक्रार नोंदवतो, तेव्हा एक चौकशी सुरू केली जाते. PayPal च्या कोणत्याही सहभागाशिवाय ग्राहकासोबत थेट समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे 20 दिवस असतात. जेव्हा चौकशी सुरू होते, तेव्हा तंटा सुटेपर्यंत तंटामधील निधी तुमच्या खात्यात होल्डवर ठेवला जातो.

तंटा व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही अनेक पावले उचलू शकता:

  • ग्राहकांशी सर्व संवाद तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये झाला पाहिजे.
  • जर तुम्हाला ग्राहकाचा दावा वैध वाटला, तर चौकशी बंद करण्यासाठी तुम्ही पूर्ण परतावा देऊ शकता.
  • जर तुम्हाला असे वाटत असेल की, या खरेदीसाठी पुढील कारवाईची आवश्यकता नाही, तर ग्राहकाशी याबाबत चर्चा करा. जर ते सहमत असतील, तर ते चौकशी बंद करू शकतात किंवा तिला 20 दिवसांनंतर कालबाह्य होऊ देऊ शकतात.
  • ग्राहक 20 दिवसांच्या आत कोणत्याही वेळी चौकशीला दाव्यामध्ये एस्केलेट करू शकतात, ज्यामुळे चार्जबॅक्स आणि चौकशांच्या प्रक्रियांप्रमाणे रिझोल्युशनची प्रक्रिया PayPal कडे स्थलांतरित होते.
  • Shopify Payments वर PayPal Wallet वापरून खरेदी केलेल्या ऑर्डर्स PayPal च्या विक्रेता संरक्षणासाठी पात्र आहेत.

चौकशीच्या चॅट फॉर्ममधील त्रुटींचे ट्रबलशूटिंग करणे

ग्राहकासोबतच्या तंट्याच्या चौकशी चॅटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करताना जर तुम्हाला "message failed to be sent" (मेसेज पाठवता आला नाही) अशी त्रुटी आली, तर Shopify सपोर्टशी संपर्क साधा. जेव्हा एखादी चौकशी चार्जबॅकमध्ये एस्केलेट केली जाते, परंतु सिस्टीमने चार्जबॅक फॉर्म प्रदर्शित करण्यासाठी अपडेट केलेले नसते, तेव्हा ही त्रुटी येऊ शकते. Shopify सपोर्ट तुम्हाला तंट्याची वर्तमान स्थिती ओळखण्यात मदत करू शकतो आणि पुढील पायऱ्यांबद्दल मार्गदर्शन प्रदान करू शकतो.

एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग (ERP) इंटिग्रेशन्स

जर तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी एखादे एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग (ERP) टूल किंवा तृतीय पक्ष इंटिग्रेशन वापरत असाल, तर तुमच्या Shopify ॲडमिनमधून व्यवहार, पेआउट आणि तंट्यांची माहिती खेचण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या क्वेरीज बदलणे आवश्यक आहे.

PayPal व्यवहार

तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये, PayPal Wallet चे व्यवहार व्यवहारांच्या पेजवर प्रदर्शित केले जातात. कोणत्याही संबंधित व्यवहारांचे पुनरावलोकन करण्यासाठी तुम्ही पेमेंट पद्धत म्हणून PayPal साठी फिल्टर करू शकता. तुमच्या Shopify ॲडमिनमधून PayPal च्या व्यवहारांची माहिती खेचण्यासाठी तुम्ही तुमच्या ERP टूलमध्ये खालील क्वेरीज वापरू शकता:

  • GraphQL मध्ये, तुम्ही खालील क्वेरी रन करू शकता:
  • orderTransaction जिथे paymentMethodName = PayPal Wallet आणि गेटवे Shopify Payments आहे
  • हे शुल्कासह सर्व PayPal Wallet व्यवहार दाखवते, तसेच व्यवहार अधिकृत, कॅप्चर, यशस्वी किंवा अयशस्वी झाला आहे का तेदेखील दाखवते.

PayPal Wallet पेआउट

तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये, PayPal Wallet व्यवहार हे तुमच्या Shopify Payments पेआउटमध्ये एकत्रित केले जातात. PayPal हे पेमेंट पद्धत म्हणून दाखवले जाते. तुमच्या Shopify ॲडमिनमधून PayPal पेआउटची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या ERP टूलमध्ये खालील क्वेरी वापरू शकता:

  • GraphQL मध्ये, PayPal व्यवहारांचा समावेश असलेले पेआउट मिळवण्यासाठी payouts क्वेरी करा आणि OrderTransaction ला जोडा.

PayPal विवाद

PayPal Wallet विवाद फक्त होम पेजवर आणि तुमच्या ऑर्डर्स पेजवर फिल्टर करून दाखवले जातात. तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये ज्याप्रमाणे Shopify Payments विवादाच्या सूचना दिल्या जातात त्याचप्रमाणे PayPal Wallet विवादाच्या सूचना दिल्या जातात.