तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता

Shopify Payments व्यतिरिक्त अन्य प्रदात्याद्वारे क्रेडिट कार्ड स्वीकारण्यासाठी, तुमच्या Shopify स्टोअरसाठी 100 पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड पेमेंट प्रदात्यांमधून निवडा. तुम्ही तुमचा एकमेव क्रेडिट कार्ड पेमेंट प्रदाता म्हणून तृतीय-पक्ष प्रदाता वापरू शकता किंवा Shop Pay आणि स्थानिक पेमेंट पद्धतींसारख्या अतिरिक्त पेमेंट पद्धती अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्ही ते Shopify Payments च्या सोबत वापरू शकता.

Shopify दोन भिन्न प्रकारच्या क्रेडिट कार्ड पेमेंट प्रदात्यांना सपोर्ट करते: थेट प्रदाता आणि बाह्य प्रदाता. जर तुम्ही थेट प्रदाता वापरत असाल, तर तुमच्या ग्राहकांना तृतीय-पक्ष चेकआउटवर पे न करता थेट तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर त्यांची खरेदी पूर्ण करता येते. जर तुम्ही बाह्य प्रदाता वापरत असाल, तर तुमच्या ग्राहकांना त्यांची खरेदी तुमच्या ऑनलाइन स्टोअरबाहेर होस्ट केलेल्या चेकआउट पेजवर पूर्ण करावी लागेल.

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या पेमेंट्स पेजवरून पेमेंट प्रदाता ॲक्टिव्हेट करू किंवा बदलू शकता. तुम्हाला वापरायचा असलेला प्रदाता अपेक्षित ठिकाणी सूचीबद्ध नसल्यास, अनुपलब्ध पेमेंट प्रदात्याच्या ट्रबलशूटिंगचा संदर्भ घ्या.

या विभागात