तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता अपडेट करणे

तुम्हाला अखंड सेवा पुरवण्यासाठी तृतीय-पक्ष प्रदात्यांना Shopify प्लॅटफॉर्मसह इंटिग्रेट करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत अपडेट केली जात आहे. तुम्ही तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता वापरत असल्यास आणि अद्याप अपडेट पूर्ण केले नसल्यास, पुढे जाण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन अपडेट करावे लागेल हे स्पष्ट करणारे नोटिफिकेशन आणि बॅनर तुम्हाला तुमच्या अ‍ॅडमिनमध्ये प्राप्त होईल.

बहुतांश पेमेंट प्रदात्यांकडे नवीन इंटिग्रेशन्स आहेत, जी तुम्ही तुमच्या Shopify खात्याशी सहजपणे कनेक्ट करू शकता. जर तुम्ही अपडेटेड इंटिग्रेशन देत नसलेला पेमेंट प्रदाता वापरत असाल, तर तुम्ही नवीन पेमेंट प्रदाता निवडणे आवश्यक आहे.

तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता अपडेट करताना विचारात घेण्याच्या गोष्टी

तुमचा तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता अपडेट करताना, तुम्ही खालील गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत:

  • तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि टूल्स: जेव्हा तुम्ही तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करता तेव्हा तृतीय-पक्ष अ‍ॅप्स आणि टूल्सवर कमीत कमी परिणाम अपेक्षित असतो. तुम्हाला कोणतीही अपडेट्स किंवा बदल आवश्यक नसल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही तुमची पेमेंट प्रक्रिया व्यवस्थापित करण्यासाठी वापरत असलेल्या कोणत्याही अ‍ॅप्सची किंवा टूल्सची - उदाहरणार्थ, सबस्क्रिप्शन अ‍ॅप्स किंवा एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग (ERP) टूल्स - चाचणी घेण्याची शिफारस केली जाते.
  • सपोर्ट: तुम्हाला येणाऱ्या समस्येवर अवलंबून, सपोर्ट एकतर Shopify किंवा तुमच्या पेमेंट प्रदात्याद्वारे पुरवला जातो:
  • पेमेंट प्रदाता इंस्टॉल करणे, अपग्रेड करणे किंवा निवडणे - तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधू शकता.
  • पेमेंट प्रदात्याचे इंटिग्रेशन आणि वैशिष्ट्यांबद्दलचे प्रश्न - तुम्ही तुमच्या पेमेंट प्रदात्याशी संपर्क साधू शकता.
  • अपडेट करणे: तुम्ही तुमचा पेमेंट प्रदाता ऑफ-पीक वेळेत (गर्दी नसलेल्या वेळेत) आणि पेमेंट प्रदात्याचे अपडेट यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी कर्मचारी उपलब्ध असताना अपडेट करावा. तुमचे चाचणी स्टोअर असल्यास, लाइव्ह स्टोअरवर पेमेंट अ‍ॅप इंस्टॉल करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या चाचणी स्टोअरवर पेमेंट प्रदाता इंटिग्रेशनची चाचणी घेण्याची शिफारस केली जाते.

तृतीय-पक्ष प्रदाता संसाधने

पेमेंट प्रदात्याला तुमचा प्राथमिक गेटवे म्हणून अपडेट करा

​​तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट्स स्वीकारण्यासाठी वापरत असलेल्या तृतीय-पक्ष प्रदात्याकडे नवीन इंटिग्रेशन उपलब्ध असल्यास, तुम्हाला त्यांचे पेमेंट अ‍ॅप इंस्टॉल करून तुमचे पेमेंट खाते तुमच्या Shopify स्टोअरशी पुन्हा कनेक्ट करावे लागेल. तुम्ही प्रक्रिया सुरू करू शकता यासाठी, तुम्हाला तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमध्ये तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करणे आवश्यक असल्याचे नमूद करणारे नोटिफिकेशन आणि बॅनर मिळेल.

स्टेप्स:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधील बॅनर किंवा नोटिफिकेशनमधून, अपडेट करा वर क्लिक करा.
  2. पेमेंट गेटवे पेजवर, इंस्टॉल करा वर क्लिक करा.
  3. पेमेंट गेटवे सेटिंग्ज पेजवर, खाते व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी तुमच्या तृतीय-पक्ष पेमेंट प्रदात्याच्या साइटवरील सूचना फॉलो करा.

तुमचा पेमेंट प्रदाता यशस्वीरीत्या अपडेट झाल्यास, तुम्हाला तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करणे आवश्यक असल्याचे नमूद करणारे बॅनर यापुढे तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमध्ये दिसणार नाही. तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही बॅनर तुमच्या Shopify अ‍ॅडमिनवर राहिल्यास, प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली नाही असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्हाला पेमेंट प्रदाता पुन्हा अपडेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

तुमच्या प्राथमिक गेटवेवर Shop Pay पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करा

तुमच्या जुन्या पेमेंट इंटिग्रेशनवर Shop Pay अ‍ॅक्टिव्ह असल्यास, तुम्ही तुमचा पेमेंट गेटवे अपडेट केल्यानंतर तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमध्ये Shop Pay पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे.

स्टेप्स:

  1. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, सेटिंग्ज > पेमेंट्स वर जा.

  2. तुमच्या पेमेंट प्रदाता वर, मॅनेज करा वर क्लिक करा.

  3. Shop Pay सक्रिय करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

PayPal क्रेडिट कार्ड गेटवेज अपडेट करणे

तुम्ही सध्या PayPal Payflow Pro, PayPal Payments Pro (US), PayPal Website Payments Pro (UK), किंवा PayPal Website Payments Pro (CA) यापैकी कोणतेही गेटवेज वापरत असल्यास, तुम्ही नवीन Braintree पेमेंट्स अ‍ॅपवर अपडेट करणे आवश्यक आहे.

PayPal Express Checkout सक्रिय असलेले PayPal क्रेडिट कार्ड गेटवेज अपडेट करणे

जर तुम्ही PayPal Payflow Pro, PayPal Payments Pro (US), PayPal Website Payments Pro (UK), किंवा PayPal Website Payments Pro (CA) गेटवेजमध्ये PayPal Express Checkout सक्रिय केले असेल, तर तुम्ही Braintree पेमेंट्स अ‍ॅपवर अपडेट केल्यानंतर, तुमच्या Shopify ॲडमिनमधील अतिरिक्त पेमेंट पद्धती विभागात PayPal Express Checkout देखील सक्रिय करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी, PayPal सेट करणे पहा.

तुमचा दुय्यम गेटवे म्हणून पेमेंट प्रदाता अपडेट करा

जर तुम्ही सध्या अस्तित्वात असलेल्या लेगसी सबस्क्रिप्शनसाठी दुय्यम पेमेंट गेटवे म्हणून Stripe, Authorize.net, किंवा Braintree वापरत असाल, तर तुम्ही दुय्यम गेटवे म्हणून त्या प्रदात्यांसाठी नवीन पेमेंट्स अ‍ॅपवर अपडेट करणे देखील आवश्यक आहे. तुम्ही प्रक्रिया सुरू करू शकाल यासाठी तुम्हाला तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगणारे नोटिफिकेशन आणि बॅनर तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये प्राप्त होईल.

स्टेप्स:

  1. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, सेटिंग्ज > पेमेंट्स वर जा.

  2. बॅनर किंवा नोटिफिकेशनमधून, अपडेट करा वर क्लिक करा.

  3. पेमेंट गेटवे पेजवर, इन्स्टॉल करा वर क्लिक करा आणि त्यानंतर सक्रिय करा वर क्लिक करा.

  4. इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी तुमच्या तृतीय-पक्ष पेमेंट प्रदात्याच्या साइटवरील सूचना फॉलो करा.

जर तुम्ही तुमचा पेमेंट प्रदाता यशस्वीरीत्या अपडेट केला, तर तुम्हाला तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगणारे बॅनर आता तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये दिसणार नाही. तुमचा पेमेंट प्रदाता अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही जर बॅनर तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये राहिले, तर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली नाही आणि तुम्ही पेमेंट प्रदाता पुन्हा अपडेट करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तृतीय-पक्ष पेमेंट अ‍ॅप वापरताना ऑर्डर्सचा ताळमेळ घाला

तुमच्या तृतीय-पक्ष पेमेंट खात्यावरील ऑर्डर्सचा ताळमेळ घालण्यासाठी, तुम्ही ऑर्डर टाइमलाइन मधील पेमेंट ID वापरू शकता. ऑर्डरचा पेमेंट ID हा एक युनिक आयडेंटिफायर आहे जो तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमधील ऑर्डरला तुमच्या पेमेंट प्रदाता खात्यातील व्यवहाराशी जुळवण्याची अनुमती देतो.

तुमच्या पेमेंट प्रदाता खात्यामध्ये ऑर्डर्सचा ताळमेळ घालताना लक्षात घ्यायच्या गोष्टी

तुमच्या Shopify ॲडमिनमधील ऑर्डर्सला तुमच्या पेमेंट प्रदाता खात्यातील व्यवहारांसोबत जुळवण्यासाठी ऑर्डर टाइमलाइन वापरताना, पुढील माहितीचा विचार करा:

  • तुमच्या पेमेंट प्रदात्याला फक्त पेमेंट ID पाठवला जातो: तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील ऑर्डर्सना तुमच्या पेमेंट प्रदाता खात्यातील व्यवहारांसोबत जुळवण्यासाठी ऑर्डर क्रमांक किंवा ऑर्डर ID वापरू शकत नाही. तुम्ही फक्त पेमेंट ID वापरून ऑर्डर्सचा ताळमेळ घालू शकता, कारण तुमच्या पेमेंट प्रदात्याकडून तुमच्या Shopify ॲडमिनला पाठवला जाणारा हा एकमेव युनिक आयडेंटिफायर आहे.
  • ऑथोरायझेशन कीज केवळ तुमच्या तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता खात्यामध्ये उपलब्ध आहेत: तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता वापरून व्यवहार पूर्ण केल्यावर ऑथोरायझेशन की तुमच्या Shopify ॲडमिनमधील ऑर्डर टाइमलाइनवर अपडेट होत नाही. ऑर्डरची ऑथोरायझेशन की पुनर्प्राप्त करण्यासाठी, तुम्ही तुमच्या तृतीय-पक्ष पेमेंट प्रदाता खात्याचा संदर्भ घेणे आवश्यक आहे.

प्रलंबित आणि कालबाह्य झालेली पेमेंट स्थिती

तृतीय-पक्ष प्रदात्याद्वारे पेमेंट्सवर प्रक्रिया करताना, तुम्हाला तुमच्या लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या पेमेंट स्थिती येऊ शकतात. पुढील स्थिती समजून घेतल्याने तुम्हाला ऑर्डर्स मॅनेज करण्यात आणि ग्राहकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यात मदत होते:

  • प्रलंबित पेमेंट स्थिती: पेमेंट्सवर प्रक्रिया होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पेमेंट प्रदात्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास, पेमेंट प्रलंबित म्हणून दिसू शकते. जेव्हा पेमेंटची स्थिती पेड मध्ये बदलते, तेव्हा तुम्ही ऑर्डर पूर्ण करू शकता.
  • कालबाह्य झालेली पेमेंट स्थिती: पेमेंटची स्थिती कालबाह्य मध्ये बदलल्यास, तुम्ही तुमच्या ग्राहकाकडून पुन्हा पेमेंटची विनंती करण्यापूर्वी तुमच्या पेमेंट पार्टनर खात्यामध्ये पेमेंट प्राप्त झाले नसल्याची पुष्टी करणे आवश्यक आहे. पेमेंटवर प्रक्रिया करणे शक्य नव्हते हे दर्शवण्यासाठी पेमेंटची स्थिती कालबाह्य मध्ये बदलते.

तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये पेमेंट ID शोधा

तुम्ही ऑर्डर टाइमलाइनमध्ये पेमेंट ID आणि गेटवेकडील माहिती अंतर्गत ऑर्डरचा पेमेंट ID शोधू शकता.

स्टेप्स:

  1. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, ऑर्डर्स वर जा.
  2. ज्या ऑर्डरसाठी तुम्हाला पेमेंट ID शोधायचा आहे त्या ऑर्डरवर क्लिक करा.
  3. ऑर्डर टाइमलाइनमध्ये, पेमेंटवर प्रक्रिया केली गेली विभाग शोधा.
  4. गेटवेकडील माहिती उपविभागात, पेमेंट ID शोधा.