खाते सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धती
स्वतःचे धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी, तुमच्या खात्यांसाठी युनिक पासवर्ड जनरेट करण्याविषयी, तसेच धोक्यात आलेले खाते सुरक्षित कसे करावे आणि ब्लॉक केलेले क्रेडेंशियल्स कसे रीसेट करावे याविषयी जाणून घ्या.
या पेजवर
- पासवर्ड व्हॉल्टसह युनिक पासवर्ड जनरेट करा
- तुमचे लॉग इन क्रेडेंशियल्स कधीही शेअर करू नका
- हल्ल्याच्या सामान्य पद्धती कशा ओळखायच्या ते जाणून घ्या
- टू-स्टेप प्रमाणीकरण अॅक्टिव्हेट करा
- पासकी वापरा
- तुमचे रिकव्हरी कोड डाउनलोड करा आणि ते सुरक्षित ठिकाणी स्टोअर करा
- धोक्यात आलेले खाते सुरक्षित करा
- तुमचे ईमेल खाते आणि उपकरणे सुरक्षित करा
- ब्लॉक केलेले क्रेडेंशियल्स रीसेट करा
- संशयास्पद लॉग इन अॅक्टिव्हिटी
- निष्क्रिय खात्यामध्ये लॉग इन करा
- अनोळखी उपकरण लॉग इन
पासवर्ड व्हॉल्टसह युनिक पासवर्ड जनरेट करा
बरेच लोक एकापेक्षा जास्त खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात. अनेकदा ते तोच युझरनेम किंवा ईमेल ॲड्रेससह जोडतात. युनिक पासवर्ड्सशिवाय, युझरनेम/पासवर्डची जोडी उघडकीस आल्यास, हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ती क्रेडेंशियल्स वापरणाऱ्या अन्य खात्याचा अॅक्सेस मिळू शकतो.
तुमचे पासवर्ड जनरेट आणि व्यवस्थापित करण्यासाठी पासवर्ड व्हॉल्ट सॉफ्टवेअर वापरणे हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही पासवर्ड व्हॉल्ट वापरता, तेव्हा तुम्हाला केवळ व्हॉल्टची मास्टर की लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते आणि तुमचे अन्य पासवर्ड स्वयंचलितरित्या तयार केलेले अक्षरे, संख्या आणि चिन्हे यांचे मिश्रण असू शकतात.
तुमचे लॉग इन क्रेडेंशियल्स कधीही शेअर करू नका
तुमचे लॉग इन क्रेडेंशियल्स, म्हणजेच तुमचे युझरनेम आणि पासवर्ड, ही डिजिटल विश्वातील तुमची ओळख आहे आणि ती खाजगी आणि गोपनीय ठेवली पाहिजे. ही माहिती शेअर केल्याने तुमच्या खात्याची सुरक्षितता कमी होते. तुमचे लॉग इन क्रेडेंशियल्स सहकारी, कुटुंबातील सदस्य किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यासह कोणासोबतही शेअर करू नका.
कर्मचाऱ्यांना तुमच्या खात्याचा अॅक्सेस देण्याऐवजी, तुमच्या स्टोअरमध्ये कर्मचारी जोडा. कर्मचारी त्यांचे स्वतःचे युनिक क्रेडेंशियल्स तयार करू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यांमध्ये लॉग इन करू शकतात.
Shopify सपोर्ट तुम्हाला तुमचा Shopify पासवर्ड मागत नाही.
हल्ल्याच्या सामान्य पद्धती कशा ओळखायच्या ते जाणून घ्या
फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग कसे ओळखावे आणि तुमचे खाते किंवा ओळख धोक्यात आल्यास तुम्ही कोणती पावले उचलावीत याविषयी जाणून घ्या.
टू-स्टेप प्रमाणीकरण अॅक्टिव्हेट करा
तुमच्या Shopify खात्यासाठी टू-स्टेप प्रमाणीकरण सक्रिय करा जेणेकरून तुमचा पासवर्ड मिळवलेल्या कोणाकडूनही नुकसान होण्याची शक्यता कमी होईल. तुमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यांसाठी देखील टू-स्टेप प्रमाणीकरण सेट केले पाहिजे.
ऑनलाइन सुरक्षेसाठी टू-स्टेप प्रमाणीकरण (2SA) महत्त्वाचे आहे कारण ते तुमच्या खात्यामध्ये सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर जोडते. जर तुमचा पासवर्ड शेअर केला गेला असेल, त्याचा अंदाज लावला असेल, लीक झाला असेल किंवा तो फिशिंगद्वारे मिळवला असेल, तर हल्लेखोराला तुमच्या खात्यात अॅक्सेस करण्यापासून रोखण्यासाठी केवळ पासवर्ड पुरेसा नाही. जेव्हा तुम्ही टू-स्टेप प्रमाणीकरण सक्रिय करता, तेव्हा वापरकर्त्याला तुमचा पासवर्ड माहिती असणे आणि तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये लॉग इन करण्यासाठी वापरत असलेल्या मोबाइल उपकरण किंवा सुरक्षा की सारख्या प्रत्यक्ष उपकरणाचा अॅक्सेस असणे आवश्यक आहे.
जेव्हा तुम्ही Shopify Payments सारखा पेमेंट गेटवे सक्रिय करता, तेव्हा त्या पेमेंट गेटवेचा वापर करण्यासाठी तुम्ही टू-स्टेप प्रमाणीकरण सेट करणे Shopify ला आवश्यक असते. जर तुम्ही भविष्यात टू-स्टेप प्रमाणीकरण निष्क्रिय करण्याचे ठरवले, तर तुम्ही तुमच्या खात्याला आणि आर्थिक माहितीला संभाव्य गुन्हेगारी हल्ल्यांसाठी असुरक्षित करता.
शक्य असेल तेव्हा तुमच्या इतर खात्यांवर टू-स्टेप प्रमाणीकरण वापरा. टू-स्टेप प्रमाणीकरणाला सपोर्ट करणार्या प्रमुख सेवांमध्ये या सेवांचा समावेश आहे:
पासकी वापरा
पासवर्डसाठी पासकी हा एक अधिक सुरक्षित पर्याय आहे. त्या तुम्हाला पासवर्ड एंटर न करता खात्यामध्ये साइन इन करू देतात, पण त्या पासवर्डपेक्षा जास्त सुरक्षित आणि प्रभावी आहेत. पासकी वापरल्याने पासवर्ड विसरणे आणि रीसेट करण्याची आवश्यकता असणे, किंवा चुकीचा पासवर्ड टाकणे आणि तुमच्या खात्यातून लॉक आउट होण्याची शक्यता दूर होते.
पासकी वापरल्याने तुम्हाला फिशिंग घोटाळ्यांपासून वाचण्यास, तसेच तुमचा पासवर्ड चोरीला जाण्यापासून टाळण्यास मदत होऊ शकते.
फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन, किंवा उपकरण पिन यांसारख्या तुमचे उपकरण अनलॉक करण्यासाठी वापरत असलेल्या कोणत्याही प्रमाणीकरण पद्धतीचा वापर करून तुम्ही पासकी जोडू शकता.
तुमच्या Shopify स्टोअरवर पासकी कशा सेट करायच्या याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुमचे रिकव्हरी कोड डाउनलोड करा आणि ते सुरक्षित जागी साठवा
टू-स्टेप प्रमाणीकरण सेट करण्यातील शेवटची पायरी म्हणजे तुमचे रिकव्हरी कोड डाउनलोड करणे आणि सेव्ह करणे. जर तुम्ही तुमच्या उपकरणाचा अॅक्सेस गमावला किंवा तुम्ही सक्रिय केलेल्या टू-स्टेप प्रमाणीकरण पद्धतीचा वापर करून लॉग इन करू शकत नसाल, तर त्याऐवजी लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचे रिकव्हरी कोड वापरू शकता. तुमचे रिकव्हरी कोड अशा एका सुरक्षित आणि गोपनीय ठिकाणी साठवा जिथे तुम्हाला कुठूनही सहजपणे अॅक्सेस करता येईल.
रिकव्हरी कोड्सबद्दल अधिक जाणून घ्या.
धोक्यात आलेले खाते सुरक्षित करा
तुमचे खाते धोक्यात आले असल्यास, तुमचा डेटा आणि तुमचे आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी लगेच कारवाई करा.
पायऱ्या:
- तुम्ही Shopify मध्ये लॉग इन करण्यासाठी वापरत असलेल्या ईमेल खात्यात लॉग इन करा आणि पासवर्ड बदला.
- त्याच ईमेल खात्यातील फॉरवर्डिंग सेटिंग्ज आणि फिल्टर किंवा नियम तपासा. यांपैकी तुम्ही सेट न केलेले काही आढळल्यास ते काढून टाका. तुमच्या ईमेल खात्यात प्रवेश मिळवणारे हल्लेखोर सुरक्षा आणि पेआउटच्या सूचनांसारखे Shopify कडून येणारे ईमेल लपवण्यासाठी या सेटिंग्ज, फिल्टर किंवा नियम सेट करू शकतात.
- Shopify मध्ये लॉग इन करा आणि तुमच्या Shopify वापरकर्ता खात्याचा पासवर्ड बदला. तुम्ही लॉग इन करू शकत नसल्यास, तुमचा पासवर्ड रीसेट करा. जर तुम्हाला पासवर्ड रीसेट ईमेल मिळाला नाही, तर Shopify सपोर्टशी संपर्क साधा.
- तुमच्या Shopify वापरकर्ता खात्यातील तुम्हाला ओळखू येत नसलेली प्रत्येक पासकी काढून टाका. पासवर्ड बदलल्याने किंवा रीसेट केल्याने पासकी काढल्या जात नाहीत.
- खालीलपैकी कोणतेही एक करा:
- तुम्ही लॉग इन करता तेव्हा अतिरिक्त सुरक्षेसाठी टू-स्टेप प्रमाणीकरण सक्रिय करा.
- जर टू-स्टेप प्रमाणीकरण आधीपासूनच सक्रिय असेल आणि हल्लेखोर ते मोडण्यात यशस्वी झाला असेल, उदाहरणार्थ, त्यांनी तुमचे उपकरण चोरले असेल, तर तुम्हाला त्या उपकरणासाठी प्रमाणीकरण पद्धत काढून टाकणे आवश्यक आहे आणि त्यानंतर वेगळ्या उपकरणासाठी पुन्हा टू-स्टेप प्रमाणीकरण सेट करणे आवश्यक आहे.
- संशयास्पद लॉग इन अॅक्टिव्हिटीसाठी तुमच्या Shopify वापरकर्ता खात्याचे पुनरावलोकन करा.
- अनधिकृत अॅक्टिव्हिटीसाठी तुमच्या आर्थिक खात्यांचे आणि बँकिंग तपशिलांचे पुनरावलोकन करा. अनधिकृत Shopify Credit व्हर्च्युअल कार्ड चार्जेस हे बहुधा खात्याशी तडजोड झाल्याचे (खाते धोक्यात आल्याचे) लक्षण असते, त्यामुळे सर्व आर्थिक उत्पादनांचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे:
- तुमचे Shopify Balance खाते सुरक्षित करा.
- तुमचे Shopify Credit खाते सुरक्षित करा. तुम्हाला अनधिकृत क्रेडिट कार्ड व्यवहार दिसल्यास, तुमचे कार्ड लॉक करा आणि या शुल्काबाबत त्वरित आक्षेप नोंदवा.
- तुमचे Shopify Capital खाते सुरक्षित करा.
- तुमचे Shopify Payments खाते सुरक्षित करा.
- इतर सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करण्यासाठी खालील सर्वसाधारण खाते सेटिंग्जचे पुनरावलोकन करा:
- तुमच्या कर्मचारी किंवा सहयोगी खात्यांचे आणि त्यांच्या परवानग्यांचे पुनरावलोकन करून त्यांना अपडेट करा जेणेकरून त्यांना फक्त त्यांच्या गरजेच्या भागांमध्ये अॅक्सेस असेल याची खात्री होईल, विशेषतः संवेदनशील परवानग्या असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी.
- कोणत्याही अनोळखी बदलांसाठी तुमच्या स्टोअरच्या अॅक्टिव्हिटी लॉग चे पुनरावलोकन करा.
- सर्व माहिती योग्य आणि अपेक्षेनुसार असल्याची खात्री करण्यासाठी खालील स्टोअर सेटिंग्जचे पुनरावलोकन करा: सर्वसाधारण सेटिंग्जमधील स्टोअर संपर्क तपशील, चेकआउट, शिपिंग आणि वितरण, डोमेन्स, नोटिफिकेशन्स.
- कोणत्याही अनधिकृत फाइल्स जोडल्या गेल्या नसल्याची खात्री करण्यासाठी आशय > फाइल्स चे पुनरावलोकन करा.
- तुमच्या Shopify ॲडमिनच्या Growth (वाढ) विभागाचे पुनरावलोकन करा आणि सर्व मार्केटिंग मोहिमा अधिकृततेसह तयार केल्या गेल्या आहेत याची खात्री करा. मार्केटिंगबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमच्या Shopify ॲडमिन सेटिंग्जच्या अॅप्स चे पुनरावलोकन करा आणि इन्स्टॉल केलेले अॅप्स अधिकृत आहेत याची पडताळणी करा. सर्व अॅप्स ओळखीचे असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या कस्टम ॲप्स विभागाचे पुनरावलोकन करा. कस्टम ॲप्सबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमच्या सवलती योग्य असल्याची खात्री करण्यासाठी त्यांचे पुनरावलोकन करा.
- ग्राहकासोबत त्यांच्या वैधतेची पडताळणी करण्यासाठी संशयास्पद ऑर्डर्स किंवा ड्राफ्ट ऑर्डर्ससह तुमच्या ऑर्डर्सचे पुनरावलोकन करा आणि चार्जबॅक्स टाळण्यासाठी आवश्यकता असल्यास त्या रद्द करा किंवा रिफंड करा. चार्जबॅक्स आणि चौकशी तसेच फसवणूक प्रतिबंधाबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमची ओळख आणि संवेदनशील माहिती सुरक्षित करण्यासाठी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.
तुमचे ईमेल खाते आणि उपकरणे सुरक्षित करा
धोके कमी करण्यासाठी तुमची सर्व उपकरणे, ब्राउझर आणि अॅप्स अप-टू-डेट असल्याची खात्री करा.
तुमचे ईमेल खाते सुरक्षित असल्याची खात्री करा.
पायऱ्या:
- तुमच्या ईमेल खात्याचा पासवर्ड बदलून एक मजबूत आणि युनिक पासवर्ड ठेवा.
- टू-स्टेप प्रमाणीकरणासारखी तुमच्या ईमेल प्रदात्याद्वारे ऑफर केलेली अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये सक्रिय करा.
- तुमच्या ईमेल फॉरवर्डिंगच्या सेटिंग्ज आणि फिल्टर किंवा नियम तपासा. तुम्ही सेट न केलेला कोणताही फॉरवर्डिंग पत्ता, फिल्टर किंवा नियम काढून टाका. Shopify कडून येणारे ईमेल ट्रॅश किंवा स्पॅम फोल्डरमध्ये हलवणारे फिल्टर किंवा नियमही काढून टाका, जेणेकरून Shopify कडून येणारे ईमेल तुमच्या मुख्य इनबॉक्समध्ये येतील.
- फिल्टरिंगच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी Shopify चे ईमेल्स विश्वसनीय म्हणून मार्क करण्यासाठी सेटिंग्ज अॅडजस्ट करा.
Shopify POS उपकरणांवर लॉग इन करण्यासाठी स्वतंत्र खाती वापरा
वापरकर्त्याने ईमेल आणि पासवर्ड वापरून Shopify POS उपकरणावर लॉग इन केल्यावर, ते उपकरण त्या वापरकर्त्याच्या खात्यातून लॉग इन केलेले राहते. खात्यातील काही बदलांमुळे त्या खात्यातून लॉग इन केलेली सर्व POS उपकरणे एकाच वेळी लॉग आउट होतात. उदाहरणार्थ, खात्याचा पासवर्ड बदलल्यावर किंवा रीसेट केल्यावर, वापरकर्त्याला स्टोअरमधून काढून टाकल्यावर किंवा क्रेडेंशियल्स उघड झाल्यामुळे खाते लॉक झाल्यावर असे होते. कोणीतरी या उपकरणांवर पुन्हा लॉग इन करेपर्यंत त्यांवर विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. 1 POS उपकरणाच्या सेटिंग्जमधून लॉग आउट केल्याने इतर उपकरणे लॉग आउट होत नाहीत.
एकाच खात्यामुळे सर्व ठिकाणांवरील विक्री थांबू नये म्हणून POS उपकरणांवर लॉग इन करण्यासाठी या कामासाठीची स्वतंत्र वापरकर्ता खाती वापरा. यांना सेवा खाती असेही म्हणतात. किमान 2 स्वतंत्र खाती तयार करा आणि खालीलप्रमाणे उपकरणे या खात्यांमध्ये विभागा:
- प्रत्येक ठिकाणच्या मुख्य POS उपकरणावर लॉग इन करण्यासाठी पहिले खाते वापरा.
- प्रत्येक ठिकाणच्या इतर POS उपकरणांवर लॉग इन करण्यासाठी दुसरे खाते वापरा.
एक खाते लॉग आउट झाले, तरी 2 किंवा अधिक POS उपकरणे असलेल्या प्रत्येक ठिकाणी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी किमान 1 उपकरण उपलब्ध राहते. फक्त 1 POS उपकरण असलेल्या ठिकाणी, त्या उपकरणावरील खाते लॉग आउट झाल्यावर विक्रीचे व्यवहार थांबतात. फक्त 1 POS उपकरण असलेली अनेक ठिकाणे असल्यास, ती उपकरणे 2 खात्यांमध्ये विभागा. यामुळे एकाच खात्यामुळे ती सर्व उपकरणे लॉग आउट होणार नाहीत.
प्रत्येक स्वतंत्र खात्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे:
- एखाद्या कर्मचाऱ्याशी जोडलेले नसावे: एखाद्या व्यक्तीऐवजी तुमच्या व्यवसायाचे नाव आणि ईमेल पत्ता वापरा. एखादा कर्मचारी व्यवसाय सोडून गेल्यावर तुम्ही त्याला स्टोअरमधून काढून टाकले, तरीही POS उपकरणे लॉग इन केलेली राहतात.
- ईमेलद्वारे संवादासाठी वापरलेले नसावे: फक्त या खात्यासाठी असलेला ईमेल पत्ता वापरा. इतर ईमेल पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तो वापरू नका. यामुळे खात्यावर फिशिंग ईमेल येण्याचा धोका कमी होतो. खाते पडताळण्यासाठी मात्र तुम्हाला या ईमेल पत्त्यावर प्रवेश असणे आवश्यक आहे.
- कर्मचाऱ्यांसोबत शेअर केलेले नसावे: लॉग इन क्रेडेंशियल्स गोपनीय ठेवा. हंगामी किंवा तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनाही ती देऊ नका. उपकरणावर लॉग इन केल्यानंतर, कर्मचारी Shopify POS वापरण्यासाठी स्वतःचा वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN) वापरतात.
प्रत्येक स्वतंत्र खात्याला POS उपकरणांवर लॉग इन करण्यासाठी आवश्यक तेवढ्याच परवानग्या द्या, उदाहरणार्थ POS उपकरण सेटअपसाठीची भूमिका. प्रत्येक स्वतंत्र खात्यासाठी टू-स्टेप प्रमाणीकरण सक्रिय करा आणि त्याची क्रेडेंशियल्स पासवर्ड व्हॉल्टमध्ये साठवा.
ब्लॉक केलेले क्रेडेंशियल्स रीसेट करा
अनेक लोक एकापेक्षा जास्त खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात आणि तो एकाच युझरनेम किंवा ईमेल अॅड्रेससोबत पेअर करतात, त्यामुळे युझरनेम/पासवर्डची जोडी उघडकीस आल्यास, अटॅकर त्याच क्रेडेंशियल्सचा वापर करणाऱ्या इतर खात्यांमध्ये प्रवेश मिळवू शकतो.
तुमच्या बाबतीत याचा धोका कमी करण्यासाठी, आम्ही सार्वजनिक डेटा लीकमधून माहिती मिळवतो आणि तिचे विश्लेषण करतो. तुमचे क्रेडेंशियल्स यांपैकी कोणत्याही लीकमध्ये आढळल्यास, आम्ही तुमचे खाते लॉक करतो. जोपर्यंत तुम्ही तुमचा पासवर्ड तडजोड न झालेल्या पासवर्डवर रीसेट करत नाही, तोपर्यंत तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला एरर मेसेज येतो.
तुमची सर्व खाती शक्य तितकी सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही टू-स्टेप प्रमाणीकरण आणि पासवर्ड व्हॉल्ट सॉफ्टवेअर देखील वापरले पाहिजे.
संशयास्पद लॉगिन अॅक्टिव्हिटी
अटॅकर्सद्वारे केले जाणारे Shopify खाते लॉगिन्स रोखण्यासाठी, असामान्य अॅक्टिव्हिटी आढळल्यावर Shopify च्या सुरक्षा सिस्टीम खाते अॅक्सेस शोधून लॉक करतात. अशा केसेसमध्ये, तुम्हाला लॉगिन प्रक्रियेचा भाग म्हणून तुमची ओळख कन्फर्म करणे आवश्यक आहे.
तुमच्या खात्याच्या ईमेलवर दहा-अंकी कोड पाठवला जातो. तुमची ओळख कन्फर्म करण्यासाठी आणि लॉग इन करण्यासाठी हा कोड एंटर करा.
पायऱ्या:
- तुमची ओळख पडताळा पेजवर, तुमच्या ईमेलवर पाठवलेला कोड एंटर करा आणि लॉगिन वर क्लिक करा.
- तुम्ही तुमची ओळख यशस्वीरीत्या कन्फर्म केल्यानंतर, मागील संशयास्पद लॉगिन माहितीचे पुनरावलोकन करा आणि होय, हा मीच होतो किंवा नाही, हा मी नव्हतो वर क्लिक करून हे लॉगिन तुम्ही केले होते की नाही ते सांगा.
- तुम्ही नाही, हा मी नव्हतो वर क्लिक केल्यास, तुमच्या खात्यात लॉग इन करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा पासवर्ड रीसेट करणे आवश्यक आहे.
निष्क्रिय खात्यात लॉग इन करा
जर तुम्ही तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ तुमच्या खात्यात लॉग इन केले नसेल, तर तुम्हाला लॉगिन प्रक्रियेचा भाग म्हणून तुमची ओळख कन्फर्म करणे आवश्यक आहे.
तुमच्या खात्याच्या ईमेलवर दहा-अंकी कोड पाठवला जातो. तुमची ओळख कन्फर्म करण्यासाठी आणि लॉग इन करण्यासाठी हा कोड एंटर करा.
पायऱ्या:
- लॉगिन पेजवर, तुमच्या ईमेलवर पाठवलेला कोड एंटर करा.
- लॉगिन वर क्लिक करा.
अनोळखी उपकरणामधून केलेले लॉगिन
Shopify ला लॉगिनसाठी वापरलेले उपकरण न ओळखता आल्यास, तुम्हाला Shopify कडून "A new device has logged in to your Shopify account" या विषय ओळीसह (subject line) ईमेल प्राप्त होईल.
तुमचे खाते सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही नवीन उपकरण ओळखता की नाही याची पडताळणी करणे आवश्यक आहे.
तुम्हाला दाखवलेले उपकरण ओळखता आले नाही, तर तुमच्या खात्याशी तडजोड झाली असण्याची शक्यता आहे. तुमचे खाते सुरक्षित करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.
पायऱ्या:
- ईमेल उघडा आणि अॅक्टिव्हिटी तपासा वर क्लिक करा.
- उपकरण आणि लॉग इन तपशीलांचे पुनरावलोकन करा.
- खालीलपैकी एक करा:
- तुम्ही उपकरण ओळखत असल्यास, होय, हा मीच होतो वर क्लिक करा.
- तुम्ही उपकरण ओळखत नसल्यास, नाही, खाते सुरक्षित करा वर क्लिक करा आणि तुमचे खाते सुरक्षित करण्यासाठी सूचना फॉलो करा.
तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलावा लागल्यास, प्रमाणीकरणासाठी एका वेगळ्या ईमेलमध्ये सुरक्षा कोड पाठवला जाईल.