वैयक्तिक डेटाचे पुढील ट्रान्सफर

तुम्हाला आमच्या सेवा प्रभावीपणे प्रदान करण्यासाठी, तुम्ही ज्या Shopify संस्थेशी करार करता तिला तुम्ही प्रदान केलेला वैयक्तिक डेटा खालील प्राप्तकर्त्यांना ट्रान्सफर केला जातो:

  • काही इतर Shopify संस्था आणि
  • काळजीपूर्वक निवडलेले आणि विश्वासार्ह सबप्रोसेसर

हा विभाग पुढील ट्रान्सफर कसे नियंत्रित केले जातात, याबद्दल माहिती देतो.

युरोपियन आर्थिक क्षेत्र (EEA) आणि युनायटेड किंगडम (UK) कडून वैयक्तिक डेटाचे पुढील ट्रान्सफर

आयरिश-नोंदणीकृत संस्था असलेली Shopify International Limited ही EMEA (युरोप, मिडल इस्ट आणि आफ्रिका) व LATAM (लॅटिन अमेरिका) मधील मर्चंट्ससोबत काम करणारी Shopify ची प्राथमिक कंत्राटी संस्था आहे. International Limited ही जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) च्या उद्देशांसाठी Shopify ची मुख्य आस्थापना म्हणूनही काम करते.

GDPR आणि त्याच्या UK समतुल्य कायद्यानुसार, जेव्हा वैयक्तिक डेटा EEA आणि UK बाहेरील संस्थेसोबत शेअर केला जातो, तेव्हा गंतव्यस्थान असलेल्या देशामध्ये संरक्षणाची पातळी आवश्यकतेनुसार समान असणे अनिवार्य आहे. या कारणासाठी, असे आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर मजबूत कायदेशीर यंत्रणांद्वारे संरक्षित केले जाणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय डेटा ट्रान्सफरसाठी Shopify कशाप्रकारे GDPR च्या आवश्यकतांची पूर्तता करते

ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, जेव्हा Shopify International Limited तिच्या कॅनडामध्ये-नोंदणीकृत असलेल्या मुख्य कंपनी, Shopify Inc. ला वैयक्तिक डेटा ट्रान्सफर करते, तेव्हा Shopify कॅनडासाठी युरोपियन कमिशनच्या पर्याप्तता निर्णयावर अवलंबून असते. पर्याप्तता निर्णयांबद्दल अधिक जाणून घ्या.

याव्यतिरिक्त, खालील गोष्टी नियंत्रित करण्यासाठी युरोपियन कमिशनने मंजूर केलेल्या मानक कराराचे कलम (SCCs) च्या नवीनतम आवृत्तीचा समावेश असलेले सर्वसमावेशक डेटा ट्रान्सफर आणि प्रक्रिया करार (DPAs) देखील Shopify वापरते:

  • Shopify गटामधील कोणतेही ट्रान्सफर आणि
  • आमच्या सबप्रोसेसरसाठी पुढील ट्रान्सफर

वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य ट्रान्सफर परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी आमच्या सबप्रोसेसर कडे योग्य तांत्रिक आणि संस्थात्मक उपाय असल्याची खात्री करण्यासाठी, आम्ही त्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करतो. SCCs बद्दल अधिक जाणून घ्या

EEA आणि UK मधील डेटा संरक्षण प्राधिकरणांद्वारे पर्याप्तता निर्णय आणि SCCs या दोन्ही गोष्टींना कायदेशीररित्या वैध आणि पुरेशी ट्रान्सफर यंत्रणा मानले जाते.

पूरक उपाय म्हणून, Shopify गटातील ट्रान्सफरचे अधिक नियंत्रण करण्यासाठी Shopify ने बंधनकारक कॉर्पोरेट नियमांसाठी अर्जदेखील केला आहे. हा अर्ज GDPR च्या उद्देशांसाठी असलेल्या Shopify च्या मुख्य पर्यवेक्षक प्राधिकरणाकडे, म्हणजेच आयरीश डेटा संरक्षण आयोगाकडे (Irish Data Protection Commission) केला आहे. आमच्या कंपन्यांच्या गटामधील ट्रान्सफर सुरक्षित करण्यासाठी ही एक अतिरिक्त कायदेशीर ट्रान्सफर पद्धत असेल. आम्ही या अर्जाच्या अंतिम टप्प्यात आहोत आणि तो लवकरच मंजूर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

इतर सर्व प्रदेशांमधील वैयक्तिक डेटाचे पुढील ट्रान्सफर

EEA आणि UK व्यतिरिक्त इतर अधिकार क्षेत्रांमधील काही गोपनीयता कायद्यांमध्ये वैयक्तिक डेटाचे आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर करण्यासाठी विशिष्ट संरक्षणांचीदेखील आवश्यकता असते. या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, Shopify गटातील ट्रान्सफर नियंत्रित करणारे Shopify चे DPA आणि आमच्या सबप्रोसेसरकडील पुढील ट्रान्सफर नियंत्रित करणाऱ्या त्याच्या DPA मध्ये, लागू असल्याप्रमाणे कॅनडा, युनायटेड स्टेट्स (US) आणि सिंगापूरमधील गोपनीयता कायद्यांचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी योग्य संरक्षणांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार आम्ही हे DPA अपडेट करतो आणि त्यांची देखभालदेखील करतो.

डेटा होस्टिंगची ठिकाणे

आम्ही संपूर्ण मर्चंट डेटाबेसमधील अप्रत्याशित प्रमाण हाताळू शकणाऱ्या विश्वसनीय आणि स्केलेबल पायाभूत सुविधा देऊ शकतो हे सुनिश्चित करण्यासाठी, Shopify अनेक Google Cloud Platform प्रदेशांदरम्यान स्टोरेज डायनॅमिकरीत्या संतुलित करते. आमच्या सेवा चालवण्यासाठी आम्हाला भौगोलिकदृष्ट्या डेटा हलवण्याची आवश्यकता असते आणि असे करण्यासाठी आमच्याकडे GDPR सह लागू असलेले कायदे आणि नियमांनुसार यंत्रणा उपलब्ध आहेत.

Shopify आता खालीलप्रमाणे युरोपमध्ये (म्हणजेच EEA, UK आणि/किंवा स्वित्झर्लंड) विशिष्ट मर्चंट आणि ग्राहकांचा वैयक्तिक डेटा स्टोअर करते:

  • युरोपमधील नवीन मर्चंट्स आपोआप या नवीन पायाभूत सुविधेचा लाभ घेतात आणि आता त्यांचा स्टोअरचा डेटा, ऑर्डर डेटा आणि ग्राहकांचा वैयक्तिक डेटा युरोपमध्ये डीफॉल्टनुसार स्टोअर केलेला असतो.
  • सध्याची सर्व Shopify वैशिष्ट्ये काम करणे सुरू ठेवतील.
  • मर्चंट ग्राहकाचा वैयक्तिक डेटा युरोपमध्ये स्टोअर केलेला असला, तरीदेखील आम्ही त्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आंतरराष्ट्रीय डेटा ट्रान्सफरवर अवलंबून राहू.

Shopify त्याचे सबप्रोसेसर कसे निवडते

GDPR आणि लागू असलेल्या इतर डेटा संरक्षण कायद्यांनुसार, सबप्रोसेसरची नोंदणी करताना Shopify विविध सर्वोत्कृष्ट सराव उपाय अवलंबते:

  • आम्ही ज्या कंपन्यांसोबत काम करतो, त्यांची आम्ही काळजीपूर्वक निवड करतो.
  • आम्ही मर्यादित संख्येतच तृतीय-पक्ष सेवा प्रदाते वापरतो.
  • कॅनडा, US आणि सिंगापूरमधील गोपनीयता कायद्यांचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी योग्य संरक्षणांव्यतिरिक्त SCC समाविष्ट असलेल्या सर्वसमावेशक DPA वर सबप्रोसेसरनी सही करावी, असा आमचा आग्रह असतो.
  • आम्ही आमच्या सबप्रोसेसरचा वापर तांत्रिक सेवांपुरता मर्यादित ठेवतो: क्लाउड होस्टिंग, एरर लॉगिंग, लोड बॅलेंसिंग, सामग्रीचे वितरण, मॅपिंग वितरण, डेटा अ‍ॅनालिसिस आणि अंतर्गत लॉगिंग (लॉग फाईल्स).
  • ट्रान्सफर सातत्याने आणि सुरक्षितरीत्या होते.
  • नियंत्रकाने निर्देश दिल्याशिवाय, वैयक्तिक डेटाच्या कोणत्याही संवेदनशील किंवा विशेष कॅटेगरीवर जाणीवपूर्वक प्रक्रिया केली जात नाही.
  • आम्ही आमच्या सबप्रोसेसरच्या गोपनीयता आणि सुरक्षा प्रोग्राम्सचे काळजीपूर्वक परीक्षण करतो.

Shopify च्या मुख्य सबप्रोसेसर बद्दल अधिक जाणून घ्या.