तुमच्या उत्पादनांसाठी बारकोड वापरणे
बारकोड ही स्कॅन करण्यायोग्य चिन्हे असतात जी रेषा, जागा, अक्षरे आणि अंकांनी बनलेली असतात. पुरवठा साखळीच्या विविध टप्प्यांवर उत्पादने ओळखण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी बारकोडचा वापर केला जातो, जसे की इन्व्हेंटरी ट्रॅक करण्यासाठी फुलफिलमेंट केंद्रांमध्ये, अकाउंटिंगमध्ये मदत करण्यासाठी इन्व्हॉइसवर, किंवा रिटेल स्टोअरमधील खरेदी प्रक्रियेचा भाग म्हणून.
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमची उत्पादने आणि व्हेरिएंट्ससाठी बारकोड जोडू शकता. बारकोड स्कॅन केला जातो तेव्हा, जसे की रिटेल स्टोअरमध्ये चेकआउट करताना किंवा इन्व्हेंटरी मोजणीदरम्यान, तो उत्पादन किंवा व्हेरिएंट ओळखतो. ऑनलाइन बाजारपेठांमध्ये उत्पादनाची ओळख पटवण्यासाठीदेखील बारकोडचा वापर केला जाऊ शकतो. काही विक्री चॅनेल वापरून उत्पादन प्रकाशित करण्यापूर्वी, त्यांना ग्लोबल ट्रेड आयटम नंबर (GTIN) ची आवश्यकता असू शकते.
या पृष्ठावर
बारकोड वापरण्यासाठी विचारात घ्यायच्या गोष्टी
तुमच्या उत्पादनांना बारकोड जोडण्यासाठी खालील विचारात घ्यायच्या गोष्टींचे पुनरावलोकन करा:
- तुम्ही एखाद्या उत्पादनात किंवा व्हेरिएंटमध्ये 20 पर्यंत बारकोड जोडू शकता, जेणेकरून वेगवेगळ्या पुरवठादारांचे, प्रदेशांचे किंवा बाजारपेठांचे कोड एकाच आयटमसाठी वापरले जाऊ शकतील.
- एकाच उत्पादनावर किंवा व्हेरिएंटवर तीच बारकोड व्हॅल्यू दोनदा वापरली जाऊ शकत नाही.
- जर तुमच्याकडे उत्पादनासाठी GTIN नसेल, तर तुम्ही उत्पादकाकडे त्याची विनंती करू शकता. तुम्ही उत्पादित करत असलेल्या उत्पादनासाठी GTIN कसे मिळवायचे ते GS1 स्टँडर्ड्स वेबसाइटवर जाणून घ्या.
- Shopify POS मध्ये, तुम्ही उत्पादनाचा कोणताही बारकोड किंवा त्याचा SKU स्कॅन करून किंवा शोधून उत्पादन शोधू शकता. Shopify POS मध्ये उत्पादने शोधण्याविषयी अधिक जाणून घ्या.
- Shopify POS ने स्कॅन केलेले बारकोड Google & YouTube चॅनेलवर उत्पादने प्रकाशित करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
बारकोड कधी वापरावेत
जेव्हा तृतीय-पक्ष सेवा तुमची उत्पादने व्यवस्थापित करण्यात मदत करतात किंवा तुमच्याकडे विस्तृत फुलफिलमेंट किंवा इन्व्हेंटरी ट्रॅकिंग प्रक्रिया असते, तेव्हा बारकोड उपयुक्त ठरतात. खालील परिस्थितींमध्ये तुमच्या उत्पादनांसाठी बारकोडची आवश्यकता असू शकते:
- तुम्ही ऑनलाइन बाजारपेठांमध्ये उत्पादने विकता.
- तुम्ही रिटेल स्टोअरना उत्पादने घाऊक विकता.
- तुमची उत्पादने वेअरहाऊस, वितरण केंद्र किंवा फुलफिलमेंट सेवेमधून जातात.
बारकोडचे फायदे
बारकोड वापरण्याच्या खालील फायद्यांचे पुनरावलोकन करा:
| फायदा | वर्णन | कृती |
|---|---|---|
| अचूक इन्व्हेंटरी ट्रॅकिंग | मॅन्युअली टाकलेल्या डेटापेक्षा बारकोड डेटा अधिक विश्वसनीय असतो. बारकोड इन्व्हेंटरी, किंमत निश्चितीची माहिती आणि अगदी एक्सपायरी डेट किंवा वजन यांसारख्या उत्पादनाची माहिती ट्रॅक करू शकतात. | वेअरहाऊस आणि डेटाबेसमध्ये इन्व्हेंटरी ट्रॅक करणे. |
| रिअल-टाइम डेटा | बारकोड उत्पादनाची माहिती जवळपास त्वरित प्रदान करतात. तुम्हाला डेटा टाकण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ घालवावा लागत नाही. | ऑनलाइन बाजारपेठेमध्ये बारकोड वापरून उत्पादन शोधणे. |
| प्रशिक्षणाची कमी आवश्यकता | कर्मचाऱ्यांना बारकोड स्कॅनर वापरण्यासाठी किंवा बारकोड स्कॅन करण्यासाठी विस्तृत प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. | फुलफिलमेंट केंद्रांमध्ये बारकोड स्कॅन करणे. |
| सर्वत्र स्वीकारलेले | बारकोड जगभरातील अनेक उद्योगांमध्ये वापरले जातात आणि स्वीकारले जातात. | विविध व्यवसाय आणि उद्योगांमध्ये बारकोड वापरणे. |
बारकोड संज्ञा
बारकोडच्या सामान्य संज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा:
| संज्ञा | व्याख्या |
|---|---|
| ग्लोबल ट्रेड आयटम नंबर (GTIN) | GTIN हा उत्पादनासाठी एक युनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आयडेंटिफायर आहे. GTIN हा बारकोड चिन्हाखाली छापलेला नंबर असतो. UPCs, EANs आणि ISBNs हे GTIN चे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रकार आहेत. GTIN बद्दल अधिक जाणून घ्या. |
| युरोपियन आर्टिकल नंबर (EAN) | EAN (ज्याला GTIN-13 असेही म्हटले जाते), हा बहुधा उत्तर अमेरिकेबाहेर जागतिक स्तरावर ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी वापरला जाणारा बारकोड प्रकार आहे. |
| युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (UPC) | UPC (ज्याला GTIN-12 असेही म्हटले जाते), हा बहुधा उत्तर अमेरिकेमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी वापरला जाणारा बारकोड प्रकार आहे. |
| इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर (ISBN) | ISBN हा एक अंकीय व्यावसायिक पुस्तक आयडेंटिफायर आहे जो प्रत्येक स्वतंत्र पुस्तक आवृत्ती आणि व्हेरिएशनला दिला जातो. जगात कुठेही पुस्तक युनिक पद्धतीने ओळखण्यासाठी ISBN कोड्स वापरले जातात. |
| GS1 | GS1 ही नफा न कमवणारी, आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी बारकोडसारखी मानके विकसित करते आणि त्यांची देखभाल करते. |
| Shopify द्वारे असाइन केलेला | Shopify Fulfillment Network (SFN) मधील सर्व उत्पादनांना आपोआप दिला जाणारा बारकोड प्रकार. |
| फुलफिलमेंट नेटवर्क स्टॉक कीपिंग युनिट (FNSKU) | Fulfillment by Amazon (FBA) विक्रेत्यांद्वारे वापरला जाणारा एक Amazon-विशिष्ट बारकोड. प्रत्येक FNSKU ची सुरुवात X किंवा B या अक्षराने होते. |
| Amazon Standard Identification Number (ASIN) | Amazon च्या अंतर्गत कॅटलॉग नंबरचा एक प्रकार जो युनिक असतो आणि उत्पादनाशी किंवा उत्पादन व्हेरिएशनशी संबंधित असतो. प्रत्येक ASIN 10 अंकी असतो आणि त्यामध्ये अक्षरे आणि अंक यांचे मिश्रण असते. प्रत्येक ASIN ची सुरुवात X किंवा B या अक्षराने होते. |
बारकोड प्रकार
तुमच्या Shopify ॲडमिनमधील प्रत्येक बारकोडचा एक प्रकार असू शकतो, जो त्याचे मूल्य कोणत्या उद्योग मानकाचे पालन करते हे रेकॉर्ड करतो. तुम्ही एंटर केलेले मूल्य त्या मानकाच्या लांबी मर्यादेशी आणि अनुमत अक्षरांशी जुळले पाहिजे. जर तुमच्याकडे असा बारकोड असेल जो ठरलेल्या मानकाचे पालन करत नसेल, तर बारकोडचा प्रकार कस्टम ठेवा.
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये कोणते बारकोड प्रकार निवडू शकता याबद्दल जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा:
| बारकोडचा प्रकार | स्वीकारलेली मूल्ये | वापर |
|---|---|---|
| कस्टम | कोणतेही बारकोड मूल्य, जास्तीत जास्त 255 वर्णांच्या लांबीपर्यंत. हा डिफॉल्ट बारकोड प्रकार आहे. | जे बारकोड्स ठरलेल्या मानकाचे पालन करत नाहीत, ज्यात Code 39 आणि Code 128 सारख्या नॉन-GTIN बारकोड्सचा समावेश होतो, जे अक्षरे आणि संख्या एन्कोड करू शकतात. Code 39 मुख्यत्वे वेअरहाऊसिंगमध्ये आणि ऑटोमोटिव्ह व इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या औद्योगिक ॲप्लिकेशन्समध्ये वापरला जातो. Code 128 जगभरातील वेअरहाऊसिंग, पोशाख, फूड प्रोसेसिंग, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे या उद्योगांमध्ये वापरला जातो. |
| GTIN | 8, 12, 13 किंवा 14 अंक. | उत्पादनासाठी एक युनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आयडेंटिफायर. UPCs, EANs आणि ISBNs हे GTIN चे प्रकार आहेत. |
| UPC | 8 किंवा 12 अंक. | बहुधा उत्तर अमेरिकेतील रिटेल उत्पादने. बहुतेक रिटेल उत्पादनांवर UPC-A बारकोड्स वापरले जातात आणि सौंदर्यप्रसाधने व च्युइंगमच्या पॅकसारख्या लहान पॅकेजेस किंवा उत्पादनांवर UPC-E बारकोड्स वापरले जातात. |
| EAN | 8 किंवा 13 अंक. | बहुधा उत्तर अमेरिकेबाहेरील रिटेल उत्पादने. EAN-13 बारकोड्स नियतकालिके, मासिके आणि पुस्तके यांसारख्या उत्पादनांवर वापरले जातात आणि EAN-8 बारकोड्स सौंदर्यप्रसाधने व च्युइंगमच्या पॅकसारख्या लहान पॅकेजेस किंवा उत्पादनांवर वापरले जातात. |
| ISBN | 10 किंवा 13 वर्ण आणि यात X या अक्षराचा समावेश असू शकतो. | जगभरातील प्रत्यक्ष पुस्तके आणि ई-पुस्तके. जानेवारी 2007 पूर्वी वाटप केलेल्या ISBN मध्ये 10 वर्ण आहेत. |
| ASIN | 10 अक्षरे किंवा अंक. | एखादे उत्पादन किंवा उत्पादन व्हेरिएशनसाठी Amazon चा अंतर्गत कॅटलॉग नंबर. |
| NS-PID | कोणतेही मूल्य, जास्तीत जास्त 255 वर्णांच्या लांबीपर्यंत. | एक गैर-प्रमाणित उत्पादक उत्पादन आयडेंटिफायर, जसे की मॉडेल नंबर, पार्ट नंबर किंवा स्टाईल कोड. हा युरोपियन युनियनमधील शिपमेंटसाठी कस्टम डिक्लेरेशनवर वापरला जातो. |
तुम्ही GS1 सोबत नोंदणीकृत असलेला बारकोड एंटर केल्यास, बारकोडचा प्रकार आपोआप GTIN वर सेट केला जातो. जर तुमच्या उत्पादनाचे नाव आणि विक्रेता त्या बारकोडसाठी असलेल्या GS1 लिस्टिंगशी कम्पेअर केले जाऊ शकत असतील आणि ते जुळत नसतील, तर चेतावणी प्रदर्शित केली जाते. तुमच्या उत्पादनाचे तपशील GS1 रजिस्ट्रीशी कम्पेअर करण्यासाठी, चेतावणी आयकनवर क्लिक करा.
जर सेव्ह केलेल्या बारकोडचा प्रकार कस्टम असेल आणि त्याचे मूल्य वैध GTIN असेल, तर त्याचा प्रकार म्हणून GTIN सुचवला जातो. तुम्ही ही सूचना स्वीकारू शकता किंवा डिसमिस करू शकता.
तुम्हाला बारकोड्सबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कॅनडासाठी GS1 बारकोड चार्ट किंवा US साठी GS1 बारकोड चार्ट संदर्भासाठी पाहा.
उत्पादनांमध्ये बारकोड्स जोडा
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये उत्पादनामध्ये किंवा व्हेरिएंटमध्ये बारकोड्स जोडू शकता, किंवा Shopify अॅप मध्ये तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेराने ते स्कॅन करून जोडू शकता. तुम्ही बारकोड जोडता तेव्हा तुम्ही त्याचा बारकोड प्रकार देखील सेट करू शकता.
तुम्ही बल्क एडिटर वापरून किंवा CSV फाईल इम्पोर्ट करून देखील बारकोड्स जोडू शकता. बल्क एडिटरमध्ये तुम्ही बारकोड्स हाताने एंटर करण्याऐवजी बारकोड स्कॅनरने एंटर करू शकता. बल्क एडिटरमध्ये बारकोड्स स्कॅन करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
व्हेरिएंट्स नसलेल्या उत्पादनामध्ये बारकोड्स जोडा
तुम्ही एखादे उत्पादन तयार करता तेव्हा किंवा अस्तित्वात असलेले उत्पादन एडिट करता तेव्हा तुम्ही बारकोड्स जोडू शकता. Shopify अॅप मध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेराने बारकोड स्कॅन करू शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
अस्तित्वात असलेल्या उत्पादनावर क्लिक करा किंवा नवीन उत्पादन तयार करा.
इन्व्हेंटरी विभागात, बारकोड्स फील्डवर क्लिक करा.
बारकोड फील्डमध्ये, बारकोड नंबर एंटर करा.
पर्यायी: ज्याला बारकोड लागू होतो ते उद्योग मानक सेट करण्यासाठी, कस्टम ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला वापरायचा असलेला बारकोड प्रकार निवडा. नोंदणीकृत GTIN बारकोड मूल्ये आपोआप ओळखली जातात आणि तुमच्यासाठी GTIN बारकोड प्रकार निवडला जातो.
पर्यायी: आणखी एक बारकोड जोडण्यासाठी,
बारकोड जोडा वर क्लिक करा आणि नंतर 4 व 5 या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
- Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा .
- सध्याच्या उत्पादनावर टॅप करा किंवा नवीन उत्पादन तयार करा.
- इन्व्हेंटरी विभागामध्ये, संपादित करा वर टॅप करा.
- बारकोड (EAN, GTIN, ISBN, UPC, इ.) वर टॅप करा.
आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेराने बारकोड स्कॅन करा.
- पर्यायी: बारकोड ज्या उद्योग मानकाला लागू होतो ते सेट करण्यासाठी, कस्टम ड्रॉप-डाउन मेनूवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्हाला वापरायचा असलेला बारकोड प्रकार निवडा.
- पर्यायी: आणखी एक बारकोड जोडण्यासाठी,
बारकोड जोडा वर टॅप करा आणि त्यानंतर 5 आणि 6 या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा.
- सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
उत्पादन व्हेरिएंट्समध्ये बारकोड जोडा
जर उत्पादनामध्ये व्हेरिएंट्स असतील, तर तुम्ही प्रत्येक व्हेरिएंटमध्ये बारकोड जोडता. Shopify अॅप मध्ये, तुम्ही तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेराने बारकोड स्कॅन करू शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
तुम्हाला जे उत्पादन संपादित करायचे आहे त्यावर क्लिक करा.
व्हेरिएंट्स विभागामध्ये, तुम्हाला जे व्हेरिएंट्स संपादित करायचे आहेत ते निवडा आणि त्यानंतर
> बारकोड संपादित करा वर क्लिक करा.
बारकोड संपादित करा डायलॉगमधील प्रत्येक व्हेरिएंटसाठी, ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा.
बारकोड फील्डमध्ये, बारकोड नंबर एंटर करा.
पर्यायी: ज्याला बारकोड लागू होतो ते उद्योग मानक सेट करण्यासाठी, कस्टम ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला वापरायचा असलेला बारकोड प्रकार निवडा. नोंदणीकृत GTIN बारकोड मूल्ये आपोआप ओळखली जातात आणि तुमच्यासाठी GTIN बारकोड प्रकार निवडला जातो.
पर्यायी: व्हेरिएंटमध्ये आणखी एक बारकोड जोडण्यासाठी,
बारकोड जोडा वर क्लिक करा आणि त्यानंतर 5 आणि 6 या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा.
पूर्ण झाले वर क्लिक करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
- Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा .
- तुम्हाला जे उत्पादन संपादित करायचे आहे त्यावर टॅप करा.
- व्हेरिएंट्स विभागामध्ये, उत्पादनाच्या व्हेरिएंट्सवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्हाला जे व्हेरिएंट संपादित करायचे आहे त्यावर टॅप करा.
- इन्व्हेंटरी विभागामध्ये, संपादित करा वर टॅप करा.
- बारकोड (EAN, GTIN, ISBN, UPC, इ.) वर टॅप करा.
आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल डिव्हाइसच्या कॅमेराने बारकोड स्कॅन करा.
- पर्यायी: बारकोड ज्या उद्योग मानकाला लागू होतो ते सेट करण्यासाठी, कस्टम ड्रॉप-डाउन मेनूवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्हाला वापरायचा असलेला बारकोड प्रकार निवडा.
- पर्यायी: आणखी एक बारकोड जोडण्यासाठी,
बारकोड जोडा वर टॅप करा आणि त्यानंतर 6 आणि 7 या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा.
- सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
बारकोड प्लेसमेंट आणि छपाईसाठी सर्वोत्तम पद्धती
तुम्ही उत्पादनावर बारकोड कसा छापता आणि ठेवता यावर स्कॅनर्सची तुमचा बारकोड वाचण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.
बारकोड छपाईच्या पद्धती
तुमच्या उत्पादनानुसार, बारकोड वेगवेगळ्या पद्धती वापरून छापले जाऊ शकतात. बारकोड छपाईच्या पद्धतींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील तक्त्याचे पुनरावलोकन करा:
| पद्धत | वर्णन | उदाहरण असलेली उत्पादने |
|---|---|---|
| थेट उत्पादनावर छापलेला बारकोड. | जेव्हा बारकोड उत्पादनापासून वेगळा करता कामा नये, तेव्हा थेट उत्पादनावर बारकोड छापण्यासाठी लेझर प्रिंटर्स वापरणारी एक सामान्य पद्धत. | पुस्तके, धातूचे डबे, प्लास्टिकच्या बाटल्या. |
| उत्पादनाला जोडलेल्या लेबलवर छापलेला बारकोड. | लहान व्यवसायांद्वारे किंवा ज्यांच्याकडे थेट उत्पादनावर बारकोड छापण्यासाठी लेझर प्रिंटर नाही त्यांच्याद्वारे वापरले जाते. | स्टेशनरी, कॉफी, सुटा माल. |
| उत्पादनाला जोडलेल्या हँगटॅगवर छापलेला बारकोड. | ज्या उत्पादनांवर बारकोडसाठी योग्य पृष्ठभाग नसतो आणि ज्या उत्पादनांचे लेबलच्या चिकट पदार्थामुळे नुकसान होऊ शकते अशा उत्पादनांसाठी वापरले जाते. | पोशाख, गिफ्टवेअर, टेबल उत्पादने. |
| उत्पादनाच्या पॅकेजिंगवर छापलेला बारकोड. | बॉक्स किंवा पॅकेजमध्ये येणाऱ्या उत्पादनांसाठी वापरले जाते. | बूट, स्केट्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कोणतीही पॅकेज केलेली उत्पादने. |
बारकोड छपाई मार्गदर्शक तत्त्वे
तुमचे बारकोड योग्य आकाराचे असतील आणि तुम्ही छापलेल्या लेबल्सवर ते कापले जाणार नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने संरेखित होणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी बारकोड योग्यरित्या कसे छापावेत यावरील खालील सामान्य मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करा:
- तुम्ही तुमचे बारकोड छापल्यास, 300 dpi किंवा त्याहून अधिक रिझोल्यूशन वापरा, जेणेकरून बारकोड स्कॅनर्स ते स्कॅन करू शकतील.
- बारकोडची मोठी बॅच छापण्यापूर्वी, एकच चाचणी शीट छापा आणि त्यानंतर बारकोड योग्यरित्या काम करत असल्याची पडताळणी करा.
- बारकोड नंबर चिन्हाच्या खाली छापा, जेणेकरून बारकोड खराब झाल्यास उत्पादनाची नंबरवरून तरीही ओळख पटवता येऊ शकेल.
- बारकोड किमान 1.5 इंच रुंद आणि 1 इंच उंच असल्याची खात्री करा. GS1 मानकांच्या शिफारस केलेल्या आकाराचे पुनरावलोकन करा.
- बारकोड छापताना काळी शाई किंवा दुसरा गडद रंग वापरा. लाल किंवा तपकिरी रंगाची शाई वापरणे टाळा.
- प्रत्येक उत्पादन व्हेरिएंटसाठी अद्वितीय बारकोड छापा, जेणेकरून पुरवठा साखळीमध्ये प्रत्येक व्हेरिएंट ओळखले जाऊ शकेल.
बारकोड प्लेसमेंट मार्गदर्शक तत्त्वे
बारकोड योग्यरित्या कसे ठेवावेत यावरील खालील सामान्य मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करा:
- उत्पादनावर बारकोड सपाट ठेवा आणि त्यांना दुमडू नका.
- बारकोडच्या सभोवताली टेप किंवा श्रिंक रॅप गुंडाळू नका.
- तुमच्या बारकोडच्या अगदी जवळ स्टिकर्स किंवा मजकूर घटक ठेवणे टाळा.
- तुमच्या लेबलसाठी जागा बनवण्यासाठी तुमच्या बारकोडचा वरचा किंवा खालचा भाग कापू नका.
- तुमच्या उत्पादनावर एकाधिक बारकोड लावू नका.
- बारकोडमधून स्टेपल्स टाकू नका.
- अपुऱ्या जागेत उत्पादनावर बारकोड लावू नका.
- उत्पादनाच्या कडांवर बारकोड्स ठेवू नका.
- तुमचे उत्पादन चौरस, आयताकृती, गोलाकार, अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आकाराचे असल्यास, स्पॉट लेबल्स, हँगटॅग्ज किंवा कार्डेड स्लीव्हज वापरण्याचा विचार करा.
जर तुम्हाला बारकोड छपाई आणि लेबल सेटअपसाठी सर्वोत्तम पद्धतींबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर उत्पादनांवर बारकोड ठेवण्यासाठी GS1 मार्गदर्शक तत्त्वे पाहा.