उत्पादन वर्णने आपोआप तयार करणे
स्वयंचलित मजकूर निर्मिती वापरून उत्पादन वर्णने लिहिण्यासाठी तुम्ही Shopify Magic वापरू शकता. तुम्ही प्रदान केलेले तपशील, जसे की उत्पादन शीर्षक आणि कीवर्ड्स, घेण्यासाठी हे वैशिष्ट्य कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरते आणि उत्पादन वर्णनासाठी एक सूचना जनरेट करते.
तुमच्या उत्पादन वर्णनांसाठी स्वयंचलित मजकूर जनरेट करण्यापूर्वी, AI-संचलित टूल्स वापरण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल जाणून घ्या.
या पेजवर
समर्थित भाषा
स्वयंचलित उत्पादन वर्णन निर्मिती Shopify द्वारे समर्थित सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा प्रॉम्प्ट कोणत्याही भाषेत लिहू शकता आणि जनरेट केलेली सामग्री तुमच्या प्रॉम्प्टच्या भाषेशी जुळेल. सर्वोत्तम परिणामांसाठी, तुम्हाला तुमचे उत्पादन वर्णन ज्या भाषेत असावेसे वाटते त्याच भाषेत तुमचा प्रॉम्प्ट लिहा.
पूर्ण उत्पादन वर्णनाचा मसुदा तयार करणे
जेव्हा तुम्हाला नवीन उत्पादन वर्णन लिहिण्याची आवश्यकता असेल, तेव्हा सुरुवात करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही आपोआप जनरेट केलेली वर्णने वापरू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
तुम्हाला ज्या उत्पादनासाठी वर्णनाचा मसुदा तयार करायचा आहे त्यावर क्लिक करा.
उत्पादन वर्णनाच्या मजकूर बॉक्समध्ये, टूलबारमधील मजकूर जनरेट करा आयकनवर क्लिक करा.
तुम्हाला जनरेट करायच्या असलेल्या सामग्रीचे वर्णन करणारा प्रॉम्प्ट प्रविष्ट करा आणि त्यानंतर तो सबमिट करा. जनरेट केलेला मजकूर थेट उत्पादन वर्णनावर लागू केला जातो. तुम्ही जितके अधिक तपशील जोडाल, तितकी सुचवलेली सामग्री अधिक संबंधित असेल. तुम्ही तुमच्या प्रॉम्प्टमध्ये थेट उत्पादनाची वैशिष्ट्ये, कीवर्ड्स, हवा असलेला टोन किंवा इतर कोणत्याही सूचना समाविष्ट करू शकता.
तुमचे उत्पादन आणि ब्रँडशी जुळण्यासाठी उत्पादन वर्णन संपादित व स्वरूपित करा आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा. प्रकाशित केलेली उत्पादने लगेच नवीन उत्पादन वर्णन प्रदर्शित करतात.
तुम्हाला मिळणाऱ्या सामग्री सूचनांमध्ये सुधारणा करणे
तुम्ही जेव्हा तुमच्या उत्पादन वर्णनांसाठी जनरेट केलेल्या सूचनांचे मूल्यमापन करता, तेव्हा उत्पादनाचे चांगले वर्णन कशामुळे बनते याचा विचार करा. उत्पादन वर्णनांनी तुमच्या उत्पादनाचे फायदे अशा अनन्य मार्गाने सांगायला हवेत, जे तुमच्या स्टोअरचा ब्रँड प्रतिबिंबित करतात. जेव्हा तुम्ही आपोआप वर्णन सामग्री जनरेट करत असता, तेव्हा तुमच्या प्रॉम्प्टमध्ये अधिक तपशील समाविष्ट केल्यावर तुम्हाला अधिक चांगले निकाल मिळतील.
जनरेट केलेल्या सूचना सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या प्रॉम्प्टमध्ये तुमच्या उत्पादनाबद्दल अधिक तपशील प्रदान करणे होय. वर्णन जनरेट करण्यापूर्वी, किमान एक उत्पादन शीर्षक आणि किमान 2 उत्पादन वैशिष्ट्ये किंवा कीवर्ड द्या. जर तुम्ही अधिक कीवर्ड किंवा वाक्ये जोडली, तर तुम्हाला अधिक अचूक आणि युनिक जनरेट केलेली सामग्री मिळेल. तुम्ही थेट तुमच्या प्रॉम्प्टमध्ये अपेक्षित टोन किंवा लेखन शैलीदेखील नमूद करू शकता.
निकाल सुधारण्यासाठी, तुमच्या उत्पादन वर्णनांमध्ये खालील प्रकारची माहिती जोडण्याचा विचार करा:
- उत्पादन प्रकार कीवर्ड: जर तुमच्या उत्पादनाचे शीर्षक उत्पादनाच्या प्रकाराचे स्पष्टपणे वर्णन करत नसेल, उदाहरणार्थ, Washington सारख्या उत्पादनाच्या नावात eyeglasses समाविष्ट नसेल, तर तुम्हाला कमी दर्जाचे निकाल मिळू शकतात. उत्पादन प्रकार किंवा श्रेणी दर्शवणारे कीवर्ड द्या, जसे की hot sauce किंवा bar soap.
- ग्राहकाविषयी माहिती: सर्वोत्तम उत्पादन वर्णने तुमच्या टार्गेट ग्राहकांच्या गरजा आणि आवडी प्रतिबिंबित करतात. उत्पादन कोणासाठी उत्तम असेल याबद्दल काही कीवर्ड समाविष्ट करा, जसे की त्यांचे लोकसांख्यिकीय तपशील (तरुण पालक) किंवा त्यांची मूल्ये (पर्यावरणाविषयी जागरूक, घराबाहेर राहायला आवडणारे). ही माहिती उत्पादनाचे फायदे जनरेट करण्यासाठी आणि तुमच्या निकालांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दसंग्रहाचा प्रकार ठरवण्यासाठी उपयुक्त आहे.
- मटेरिअल, उत्पादन पद्धत, फिट आणि अपेक्षित उपयोग याबद्दलचे विशिष्ट तपशील: तुम्ही प्रदान करत असलेली कोणतीही उत्पादन वैशिष्ट्ये तुमच्या जनरेट केलेल्या वर्णनांमधील परिच्छेदांमध्ये रूपांतरित केली जाऊ शकतात.
- महत्त्वाचे ब्रँड कीवर्ड किंवा संज्ञा: तुम्ही प्रदान करत असलेल्या माहितीसाठी निकालांमध्ये वेगवेगळी शब्दरचना समाविष्ट असेल, तरीही ब्रँडची नावे किंवा युनिक वर्णनात्मक शब्दांसारखे विशेष शब्द किंवा वाक्ये अनेकदा तशीच ठेवली जातात. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मिंट लिप बामचे वर्णन कीवर्डमध्ये mint-astic असे केले, तर जनरेट केलेल्या सूचनांमध्ये अनेकदा त्या संज्ञेचा समावेश असेल.
- इतर उत्पादन तपशील: कोणते कीवर्ड द्यावेत याबद्दल कल्पना मिळवण्यासाठी तुम्ही Shopify मध्ये तुमच्या उत्पादनामध्ये जोडलेले तपशील वापरू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या उत्पादनामध्ये व्हेरिएंट्स असतील, तर तुम्ही आकार आणि रंग यांसारखे व्हेरिएंट पर्याय कीवर्ड म्हणून देऊ शकता. विक्रेता, श्रेणी किंवा संग्रहाची नावे यांसारख्या इतर उत्पादन तपशीलांचादेखील विचार केला जाऊ शकतो.