Shopify Payments वापरून NFTs विकण्याशी संबंधित धोके आणि आवश्यकता
Shopify Payments द्वारे NFTs ची विक्री करण्यासाठी Shopify कडून पूर्व-मंजुरी आवश्यक आहे.
NFTs हा एक नवीन उत्पादन प्रकार आहे आणि या विक्रीशी जास्त धोका संबंधित आहे. काही धोके हे blockchain तंत्रज्ञानाशी निगडीत आहेत, तर इतर धोके NFTs साठी विशिष्ट आहेत.
उदाहरणार्थ, NFT एखाद्या खरेदीदाराच्या वॉलेटमध्ये हलवल्यानंतर, त्या खरेदीदाराला ते NFT हलवण्याचा किंवा विद्यमान तृतीय-पक्ष बाजारपेठांवर त्या NFT ची पुनर्विक्री करण्याचा अधिकार असतो. याचा अर्थ असा की जर एखादा चार्जबॅक तयार झाला असेल, किंवा NFT खरेदी करण्यासाठी बनावट क्रेडिट कार्डचा वापर केला असेल, तर ग्राहकाकडून NFT परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते.
तोटा कमी करण्यासाठी खरेदीदार पडताळणी प्रक्रिया ही एक महत्त्वाची युक्ती आहे. काही blockchain अॅप पार्टनर्स NFT विक्रीचे धोके कमी करण्यात मदत करू शकतात आणि तुम्ही चार्जबॅक्स रोखण्याविषयीची सामान्य माहितीदेखील पाहावी.
Shopify Payments आवश्यकता
Shopify वर NFTs ची विक्री करण्यासाठी तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर, तुमच्या Shopify स्टोअरवरील NFT ची विक्री पूर्ण करण्यासाठी तुम्ही Shopify Payments वापरून तुमच्या ग्राहकांकडून पेमेंट्स स्वीकारू शकता. एक मंजूर विक्रेता म्हणून, तुम्ही काळजीपूर्वक पुनरावलोकन केले पाहिजे आणि तुमच्या प्रदेशासाठी Shopify Payments सेवेच्या अटींचे पालन करत असल्याची खात्री करावी.
प्रतिबंधित व्यवसाय
तुम्ही जेव्हा Shopify Payments द्वारे NFTs ची विक्री करता, तेव्हा खालील व्यवसायाचे प्रकार आणि पद्धती प्रतिबंधित असतात:
| प्रकार | वर्णन |
|---|---|
| बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन | विकल्या जात असलेल्या NFTs मध्ये मिंट केल्या जाणाऱ्या सामग्रीची किंवा अशा NFTs च्या विक्रीची जाहिरात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची मालकी तुमच्याकडे असणे किंवा सर्व आवश्यक बौद्धिक संपदा हक्क असणे आवश्यक आहे. |
| जुगार | तुम्ही लॉटरी, बिडिंग फी लिलाव, स्पर्धा, स्वीपस्टेक्स, गेम्स ऑफ चान्स किंवा रॅफल्सच्या स्वरूपात NFTs ची विक्री करू शकत नाही. |
| द्वेषपूर्ण सामग्री | Shopify च्या स्वीकार्य वापर धोरणामध्ये वर्णन केल्यानुसार, तुम्ही द्वेषपूर्ण समजली जाणारी कोणतीही सामग्री असलेले NFTs विकू शकत नाही. |
| प्रौढ सामग्री | तुम्ही पॉर्नोग्राफी (अश्लील साहित्य) किंवा इतर अश्लील सामग्री असलेले कोणतेही NFTs विकू शकत नाही, ज्यामध्ये नग्नता किंवा स्पष्ट लैंगिक कृती दर्शवणारे साहित्य, प्रतिमा आणि इतर मीडिया समाविष्ट आहे, परंतु ते यापुरतेच मर्यादित नाही. |
राखीव रक्कम
तुमचे व्यवसाय मॉडेल, NFTs आणि/किंवा मागील प्रक्रियेचा इतिहास जास्त जोखमीचा असल्याचे Shopify ने निर्धारित केल्यास, चार्जबॅक्समुळे होणाऱ्या कोणत्याही संभाव्य नुकसानाची भरपाई करण्यासाठी तुमच्या पेआउट्सचा काही भाग राखून ठेवण्याकरिता Shopify आणि/किंवा आमचे बँकिंग भागीदार राखीव शिल्लक सेट करू शकतात. ही एक निश्चित डॉलरची रक्कम किंवा व्यवहार केलेल्या विक्रीची टक्केवारी असू शकते. तुमच्या खात्यावर कोणतीही राखीव रक्कम सेट केली असल्यास, तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
चार्जबॅक्स
तुमच्या ऑर्डर्सच्या विरोधात येणाऱ्या कोणत्याही चार्जबॅक्स साठी तुम्ही जबाबदार आहात. Shopify ऑर्डर्सच्या मूलभूत माहितीसह स्वयंचलित चार्ज-बॅक प्रतिसाद देत असले, तरी तुम्हाला प्रत्येक चार्ज-बॅक प्रतिसादाच्या समर्थनार्थ अतिरिक्त पुरावे सबमिट करण्यास प्रोत्साहित केले जाते.
चार्जबॅकला विरोध करणे शेवटी अयशस्वी ठरल्यास, तुमच्या खात्यावरील कोणत्याही कपातीसाठी आणि/किंवा चार्जबॅकशी संबंधित शुल्कांसाठी तुम्ही जबाबदार आहात. एकूण उच्च चार्जबॅक दर आणि/किंवा तुमच्या Shopify Payments खात्यावरील कोणतीही थकीत नकारात्मक शिल्लक यामुळे तुमच्या खात्यावर कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये अतिरिक्त राखीव रक्कम किंवा समाप्ती (termination) यांचा समावेश आहे.
समाप्ती
Shopify आणि/किंवा आमच्या बँकिंग भागीदारांना निधी रोखून ठेवण्याचा, पेमेंट्स निलंबित करण्याचा किंवा तुमचे संपूर्ण Shopify Payments खाते कोणत्याही कारणासाठी आणि आमच्या स्वेच्छेने समाप्त करण्याचा अधिकार आहे. समाप्तीच्या सामान्य कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- वाढलेले चार्जबॅक्स, मग ते वाढलेली टक्केवारी, दर आणि/किंवा रकमेमुळे असो.
- वाढलेल्या दुर्लक्षित फसवणुकीच्या ऑर्डर्स.
- तुमच्या स्टोअरमध्ये अशी उत्पादने किंवा सेवा जोडणे ज्या Shopify Payments सेवेच्या अटी, Shopify स्वीकार्य वापर धोरण, किंवा Shopify वरील NFTs चे मान्यताप्राप्त विक्रेता म्हणून तुम्हाला पालन करणे आवश्यक असलेल्या कोणत्याही इतर अटींच्या विरुद्ध आहेत.
तुमचे Shopify Payments खाते समाप्त करण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केले जाईल.