गिफ्ट कार्ड पेजेस आणि सूचना सानुकूलित करणे
डिजिटल गिफ्ट कार्ड्स आणि गिफ्ट कार्ड उत्पादने ईमेल सूचनांमध्ये आणि तुमच्या स्टोअरफ्रंटवर प्रदर्शित केली जातात. तुमच्या ब्रँडशी जुळण्यासाठी तुमचे गिफ्ट कार्ड पेज आणि गिफ्ट कार्ड उत्पादन पेजेस अॅडजस्ट करण्यासाठी आणि कस्टम मेसेज, कस्टम गिफ्ट कार्ड इमेज किंवा गिफ्ट कार्ड प्राप्तकर्त्यासारखी अतिरिक्त माहिती समाविष्ट करण्यासाठी तुम्ही तुमची थीम सानुकूलित करू शकता.
जर तुम्ही Shopify POS वापरून प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स विकत असाल, तर तुम्ही सपोर्टेड देशांमधील Shopify Hardware Store मधून सानुकूलित केलेली प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स ऑर्डर करू शकता.
डिजिटल गिफ्ट कार्ड्स तुमच्या स्टोअरफ्रंट थीमवर खालील क्षेत्रांमध्ये प्रदर्शित केली जातात:
- तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर गिफ्ट कार्ड उत्पादने सूचीबद्ध केली आहेत आणि तुमच्या थीमचे उत्पादन पेज वापरतात
- गिफ्ट कार्ड पेज, ज्यामध्ये तयार केलेल्या गिफ्ट कार्डचे तपशील असतात, हे तुमच्या थीममधील पेज टेम्पलेट असते
या पेजवर
गिफ्ट कार्ड्स सानुकूलित करण्यासाठी विचार करण्यायोग्य गोष्टी
तुम्ही तुमची गिफ्ट कार्ड्स सानुकूलित करण्यापूर्वी, खालील विचार करण्यायोग्य गोष्टींचे पुनरावलोकन करा:
- गिफ्ट कार्ड पेज आणि गिफ्ट कार्ड उत्पादन पेजेसवर समाविष्ट असलेली स्टाईल आणि माहिती बदलण्यासाठी तुम्ही तुमची थीम सानुकूलित करू शकता. तुमच्या थीमची रचना आणि उपलब्ध कस्टमायझेशन तुम्ही वापरत असलेल्या थीमवर अवलंबून असते. तुमच्या थीमच्या सेटिंग्जविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या थीमचे दस्तऐवजीकरण तपासा किंवा तुमच्या थीम डेव्हलपर्सशी संपर्क साधा.
- तुम्ही तुमच्या Shopify अॅडमिनच्या सूचना सेटिंग्ज मधून तुमची गिफ्ट कार्ड ईमेल सूचना सानुकूलित करू शकता. तुमच्या सूचना तयार करणार्या फाईल्समध्ये HTML, CSS आणि Liquid ही Shopify ची टेम्पलेटिंग भाषा असते. सूचना टेम्पलेट्स संपादित करण्यासाठी, तुम्हाला HTML, CSS आणि Liquid ची माहिती असणे आवश्यक आहे.
- गिफ्ट कार्ड लागू करा सारखे चेकआउट शब्द हे चेकआउटची सामग्री आहे, ती गिफ्ट कार्ड उत्पादन किंवा गिफ्ट कार्ड पेजचा भाग नाही. तुम्ही कस्टम कोडशिवाय तुमच्या चेकआउट भाषा सेटिंग्ज मधून चेकआउट शब्दांमध्ये संपादन करू शकता.
- 16 अक्षरी गिफ्ट कार्ड रिडम्प्शन कोड्स रँडमाइज केलेले असतात आणि ते सानुकूलित केले जाऊ शकत नाहीत.
गिफ्ट कार्ड उत्पादन सानुकूलित करणे
तुम्ही तुमच्या Shopify अॅडमिनच्या उत्पादने पेजवरून उत्पादन तपशील किंवा व्हेरिएंट तपशील संपादित करून गिफ्ट कार्ड उत्पादनाचे तपशील सानुकूलित करू शकता.
गिफ्ट कार्ड उत्पादनासाठीचे उत्पादन लिस्टिंग पेज हे तुमच्या थीमच्या उत्पादन पेज टेम्पलेटचा एक भाग आहे. गिफ्ट कार्ड उत्पादनासाठी उत्पादन पेज अॅडजस्ट करण्यासाठी, तुम्ही तुमच्या थीमचे उत्पादन पेज सानुकूलित करू शकता.
गिफ्ट कार्ड पेज सानुकूलित करणे
जेव्हा तुम्ही एखादे गिफ्ट कार्ड तयार करता, किंवा एखादा ग्राहक गिफ्ट कार्ड उत्पादनाची ऑर्डर देतो, तेव्हा त्या गिफ्ट कार्डचे तपशील गिफ्ट कार्ड पेजवर समाविष्ट केले जातात, जसे की गिफ्ट कार्डचे मूल्य किंवा शिल्लक आणि रिडम्प्शन कोड.
गिफ्ट कार्ड पेज तुमच्या थीमचा भाग आहे. गिफ्ट कार्ड पेजवर समाविष्ट असलेली स्टाईल आणि माहिती जोडण्यासाठी किंवा अॅडजस्ट करण्यासाठी तुम्ही तुमची थीम सानुकूलित करू शकता.
गिफ्ट कार्डचे मूल्य आणि गिफ्ट कार्ड रिडम्प्शन कोड सानुकूलित केले जाऊ शकत नाही.
गिफ्ट कार्ड सूचना सानुकूलित करणे
जेव्हा तुम्ही गिफ्ट कार्डसह ऑर्डर पूर्ण करता, तेव्हा ग्राहक किंवा गिफ्ट कार्ड प्राप्तकर्त्याला एक सूचना ईमेल मिळतो. तुम्ही तुमच्या Shopify अॅडमिनच्या ग्राहक सूचना पेजवरून तुमच्या स्टोअरचे गिफ्ट कार्ड सूचना टेम्पलेट्स पाहू आणि अपडेट करू शकता.
खालील गिफ्ट कार्ड सूचना उपलब्ध आहेत:
- नवीन गिफ्ट कार्ड: जेव्हा ऑर्डरमधील गिफ्ट कार्ड उत्पादनाची पूर्तता केली जाते, किंवा जेव्हा तुम्ही तयार केलेले गिफ्ट कार्ड पाठवता, तेव्हा ग्राहक किंवा प्राप्तकर्त्याला पाठवले जाते.
- गिफ्ट कार्डची पावती: जेव्हा गिफ्ट कार्डमध्ये प्राप्तकर्ता जोडला जातो, तेव्हा ती खरेदीदाराला पाठवली जाते. यामध्ये गिफ्ट कार्डच्या कॉपीचा समावेश असतो आणि ते कोणाला पाठवले गेले आहे किंवा ते केव्हा पाठवले जाणार आहे याची पुष्टी केली जाते. तुमची थीम गिफ्ट कार्ड प्राप्तकर्त्याच्या फील्डना सपोर्ट करत असेल, तरच खरेदीदार ऑनलाइन स्टोअरवर प्राप्तकर्ता जोडू शकतात.
नोटिफिकेशन टेम्पलेट्स संपादित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
नोटिफिकेशन ईमेल्समधील डीफॉल्ट गिफ्ट कार्ड इमेज बदला
तुमचे ईमेल नोटिफिकेशन टेम्पलेट संपादित करून तुम्ही तुमच्या गिफ्ट कार्ड नोटिफिकेशन्समधील डीफॉल्ट गिफ्ट कार्ड इमेज बदलू शकता. डीफॉल्ट गिफ्ट कार्ड इमेज बदलण्यापूर्वी, तुम्हाला तुमची कस्टम गिफ्ट कार्ड इमेज तुमच्या Shopify ॲडमिनच्या फाईल्स सेक्शनमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
गिफ्ट कार्ड इमेजसाठी शिफारस केलेला आकार 950 px बाय 550 px आहे. तुम्ही 5:3 चा अॅस्पेक्ट रेशो किंवा 450 px बाय 270 px चा किमान आकारदेखील वापरू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > Notifications वर जा.
Customer Notifications वर क्लिक करा.
गिफ्ट कार्ड्स सेक्शनमध्ये, *New gift card किंवा Gift card receipt वर क्लिक करा.
Edit code वर क्लिक करा.
Email body (HTML) क्षेत्रामध्ये, हा कोड ब्लॉक शोधा:
<img src="gift-card/card.jpg" alt="Gift card image" width="240" height="160">.gift-card/card.jpgच्या जागी तुमच्या इमेज फाईलचे नाव टाका. सभोवतालची अवतरण चिन्हे (क्वाेटेशन मार्क्स) ठेवण्याची आणि इमेज फाइल एक्स्टेंशन, उदाहरणार्थ,.pngकिंवा.jpgसमाविष्ट करण्याची खात्री करा.पर्यायी: तुमच्या बदलांचे पूर्वावलोकन करण्यासाठी Preview वर क्लिक करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमच्या थीमवर गिफ्ट कार्डचा प्राप्तकर्ता जोडणे
काही थीम गिफ्ट कार्डवर प्राप्तकर्त्याची माहिती जोडण्याच्या क्षमतेला सपोर्ट करतात. तुमच्या थीमच्या सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमचे थीमचे दस्तऐवजीकरण तपासा किंवा तुमच्या थीमच्या डेव्हलपर्सशी संपर्क साधा.
तुमचा थीम कोड आणि ईमेल नोटिफिकेशन्स सानुकूल करून तुम्ही तुमच्या गिफ्ट कार्ड उत्पादनामध्ये प्राप्तकर्ता फील्ड्सदेखील जोडू शकता.