गिफ्ट कार्ड्स रिडीम करणे आणि वापरणे
तुमचा ग्राहक तुमच्या स्टोअरफ्रंटवरून खरेदी करण्यासाठी गिफ्ट कार्ड्सचा वापर करू शकतो. तुमच्याकडे Shopify POS विक्री चॅनेल असल्यास, तुमचा ग्राहक प्रत्यक्षरित्याही गिफ्ट कार्ड्स वापरू शकतो. Shopify POS वर गिफ्ट कार्ड रिडीम करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
या पेजवर
गिफ्ट कार्ड्स रिडीम करण्यासाठी विचारात घेण्यासारख्या बाबी
गिफ्ट कार्ड्स रिडीम करण्यासाठी खालील बाबींचे पुनरावलोकन करा:
- चेकआउटच्या वेळी स्वयंचलित चलन रूपांतरणाद्वारे स्टोअरच्या चलनातील गिफ्ट कार्ड्स कोणत्याही चलनात रिडीम केली जाऊ शकतात. स्थानिक चलनातील गिफ्ट कार्ड्स केवळ तेव्हाच रिडीम केली जाऊ शकतात जेव्हा चेकआउटचे चलन आणि गिफ्ट कार्डचे चलन जुळते, जोपर्यंत क्रॉस-करन्सी रिडेम्पशन सुरू केलेले नसते. गिफ्ट कार्डच्या चलनांविषयी अधिक जाणून घ्या.
- जोपर्यंत गिफ्ट कार्डवर शिल्लक आहे, तोपर्यंत गिफ्ट कार्डवरील शिल्लक एकापेक्षा जास्त ऑर्डरवर खर्च केली जाऊ शकते.
- गिफ्ट कार्डवरील शिल्लक ऑर्डरच्या एकूण मूल्यावर लागू केली जाते, ज्यामध्ये कर आणि शिपिंगचा समावेश असू शकतो.
- गिफ्ट कार्ड्स सवलत कोड्ससोबत वापरली जाऊ शकतात.
- एकाच ऑर्डरवर एकाधिक गिफ्ट कार्ड्स वापरली जाऊ शकतात.
- सबस्क्रिप्शन उत्पादन असलेल्या ऑर्डरवरील पहिल्या पेमेंटसाठी गिफ्ट कार्ड्स लागू केली जाऊ शकतात, परंतु ती आवर्ती सबस्क्रिप्शन पेमेंट्ससाठी वापरली जाऊ शकत नाहीत. भविष्यातील सबस्क्रिप्शन पेमेंट्ससाठी बिल आकारण्यासाठी ग्राहकाने चेकआउटमध्ये पात्र पेमेंट पद्धत जोडणे आवश्यक आहे.
- दुसरे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी गिफ्ट कार्ड वापरले जाऊ शकत नाही.
- जर एखाद्या ग्राहकाला दुसऱ्या कोणासाठी गिफ्ट कार्ड खरेदी करायचे असेल, तर ऑर्डर देताना ग्राहकांना दुसऱ्या प्राप्तकर्त्याला गिफ्ट कार्ड पाठवण्याची अनुमती देण्यासाठी तुम्ही तुमची थीम सानुकूलित करू शकता. तुमच्या गिफ्ट कार्ड उत्पादनामध्ये प्राप्तकर्ता फील्ड्स जोडण्याविषयी अधिक जाणून घ्या.
गिफ्ट कार्ड ऑनलाइन रिडीम करणे
तुमच्या स्टोअरमध्ये खरेदी करताना, तुमचा ग्राहक चेकआउटच्या वेळी योग्य फील्डमध्ये त्याचा युनिक कोड टाकून गिफ्ट कार्डचे मूल्य रिडीम करू शकतो. गिफ्ट कार्ड कोड्स केस सेन्सेटिव्ह नसतात. पेमेंटसाठी गिफ्ट कार्ड जोडण्याचा पर्याय चेकआउटच्या वेळी केवळ तेव्हाच प्रदर्शित होतो जेव्हा तुमच्या Shopify स्टोअरमध्ये सक्रिय गिफ्ट कार्ड्स असतात.
जेव्हा एखादा ग्राहक गिफ्ट कार्ड रिडीम करतो, तेव्हा चेकआउट खालीलपैकी एक पर्याय प्रदर्शित करते:
- जर गिफ्ट कार्डवर उपलब्ध असलेली शिल्लक ऑर्डरच्या एकूण रकमेपेक्षा जास्त किंवा त्याइतकी असेल, तर ग्राहक ऑर्डर पूर्ण करा वर क्लिक करू शकतो.
- जर गिफ्ट कार्डवर उपलब्ध असलेली शिल्लक ऑर्डरच्या एकूण रकमेपेक्षा कमी असेल, तर ग्राहकाला ऑर्डर देण्यापूर्वी उर्वरित रकमेसाठी अतिरिक्त पेमेंट पद्धत निवडण्यास सांगितले जाते. यामध्ये दुसरे गिफ्ट कार्ड जोडणे समाविष्ट आहे.
गिफ्ट कार्डवरील शिल्लक कर आणि शिपिंगसह संपूर्ण ऑर्डरच्या एकूण रकमेवर लागू होते. काही प्रकरणांमध्ये, ग्राहकाला अद्याप अतिरिक्त पेमेंट पद्धतीसाठी विचारले जाऊ शकते किंवा गिफ्ट कार्डवर थोडीशी शिल्लक राहू शकते.
उदाहरणार्थ, जर तुमचे चेकआउट तृतीय-पक्ष किंवा अंदाजित-कर सेवा वापरत असेल, तर गिफ्ट कार्डची रक्कम लागू केल्यानंतर अंतिम कर निर्धारित केला जाऊ शकतो. गिफ्ट कार्ड लागू केल्यानंतर ऑर्डरची एकूण रक्कम बदलल्यास, ग्राहकाला दुसर्या पेमेंट पद्धतीचा वापर करून फरकाची रक्कम भरण्यास सांगितले जाते.
गिफ्ट कार्डवरील शिल्लक तपासणे
तुमचा ग्राहक तुमच्या ऑनलाइन स्टोअरफ्रंटच्या गिफ्ट कार्ड पेजवर गिफ्ट कार्डची शिल्लक तपासू शकतो. ग्राहकांना मिळणाऱ्या गिफ्ट कार्ड ईमेलमधील लिंक उघडून ते या पेजवर प्रवेश करू शकतात.
जर एखाद्या ग्राहकाने गिफ्ट कार्ड ऑर्डर केले असेल आणि तुम्ही नवीन ग्राहक खाती वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या अॅडमिनमधील ऑर्डर पेजवरून गिफ्ट कार्ड ईमेल पुन्हा पाठवू शकता. हा पर्याय लेगसी ग्राहक खाती यामध्ये उपलब्ध नाही.
तुम्ही शिल्लक तपासू शकता आणि त्यानंतर ती माहिती तुमच्या ग्राहकाला पाठवू शकता.
Apple Wallet मध्ये गिफ्ट कार्ड जोडणे
तुम्ही तुमच्या गिफ्ट कार्ड सेटिंग्ज मध्ये Apple Wallet पासेस सक्रिय करू शकता. हे सेटिंग तुमच्या ग्राहकांना Apple Wallet मध्ये गिफ्ट कार्ड्स जोडण्याची अनुमती देते.
तुम्ही Apple Wallet पासेस सक्रिय करता, तेव्हा गिफ्ट कार्ड सूचना ईमेलमध्ये खालील अतिरिक्त माहिती समाविष्ट असते:
- iOS उपकरणावर Apple Wallet पासेस डाउनलोड करण्यासाठी एक लिंक
- एक Apple Wallet मध्ये जोडा बटण, ज्याचा वापर करून तुमचा ग्राहक Apple Wallet मध्ये गिफ्ट कार्ड आपोआप उघडू शकतो
गिफ्ट कार्ड पास तुमची स्टोअरची माहिती, गिफ्ट कार्डवरील सक्रिय शिल्लक आणि एक युनिक QR कोड प्रदर्शित करतो.
जेव्हा एखादा ग्राहक Apple Wallet चा वापर करून गिफ्ट कार्ड सादर करतो, तेव्हा तुम्ही 2D स्कॅनरने किंवा Shopify POS ॲप वापरत असताना iPad वरील कॅमेऱ्याने QR कोड स्कॅन करू शकता.
जर ग्राहकाने गिफ्ट कार्ड पासेस डाउनलोड केले असतील आणि ते तुमच्या स्टोअरजवळ असतील, तर ते त्यांच्या iOS उपकरणावर सूचना मिळवू शकतात. तुमचा ग्राहक गिफ्ट कार्ड पासच्या तपशील स्क्रीनवर Apple Wallet मधून या सूचना निष्क्रिय करू शकतो. तपशील स्क्रीन तुमच्या स्टोअरच्या सेवेच्या अटी देखील प्रदर्शित करते.