CSV फाईलसह उत्पादने इंपोर्ट करणे

जेव्हा तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवरून Shopify वर स्विच करता किंवा जेव्हा तुम्हाला तुमची उत्पादने किंवा इन्व्हेंटरीमध्ये अनेक बदल करायचे असतात, तेव्हा कॉमा-सेपरेटेड व्हॅल्यूज (CSV) फाईलचा वापर करून तुमच्या Shopify स्टोअरमध्ये उत्पादने इंपोर्ट करणे उपयुक्त ठरते.

जेव्हा तुम्ही उत्पादने इंपोर्ट करता, तेव्हा डेटा CSV फाईल मधून उत्पादनांमध्ये रूपांतरित केला जातो आणि तुम्हाला तुमची नवीन उत्पादने सर्व विक्री चॅनेल्सवर प्रकाशित करायची आहेत की केवळ तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर, हे तुम्ही निवडू शकता.

सुरू करण्यापूर्वी

CSV फाईल वापरून उत्पादने इंपोर्ट करण्यापूर्वी, तुम्ही खालील विषय वाचल्याची खात्री करा:

CSV फाईलसह सुरू केलेले उत्पादन इंपोर्ट्स एकदा सुरू झाल्यानंतर रद्द केले जाऊ शकत नाहीत आणि तुम्ही मागील इंपोर्ट्सचा इतिहास पाहू शकत नाही. इंपोर्टद्वारे केलेल्या अलीकडील बदलांचे पुनरावलोकन करण्यासाठी, तुमच्या स्टोअरचा अ‍ॅक्टिव्हिटी लॉग तपासा.

डेव्ह स्टोअर वापरून इम्पोर्टची चाचणी करणे

तुम्ही Shopify पार्टनर असल्यास आणि मर्चंटसाठी मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट करत असल्यास, प्रत्यक्ष इम्पोर्ट जॉब करण्यापूर्वी तुम्ही प्रथम डेव्ह स्टोअर वापरून बदलांच्या एका लहान उपसंचाची चाचणी घेत असल्याची खात्री करा.

इम्पोर्ट CSV फाईल वापरून तुमचे उत्पादन तपशील ओव्हरराईट करण्यासाठी विचारात घेण्याच्या बाबी

तुम्ही CSV फाईल इम्पोर्ट करता, तेव्हा तुम्ही जुळणाऱ्या हँडल्ससह उत्पादने ओव्हरराईट करा हा पर्याय निवडू शकता. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, इम्पोर्ट CSV फाईलमधील हँडल तुमच्या उत्पादने सूचीमधील विद्यमान हँडलशी जुळेल तेव्हा, CSV फाईलमधील मूल्ये विद्यमान उत्पादन सूचीमधील जुळणाऱ्या कॉलन्समधील मूल्यांना ओव्हरराईट करतील. ओव्हरराईटचा पर्याय न निवडल्यास, विद्यमान हँडलशी जुळणाऱ्या उत्पादनांकडे CSV इम्पोर्टदरम्यान दुर्लक्ष केले जाते.

  • इम्पोर्ट CSV फाईलमधील आवश्यक नसलेला कॉलम रिकामा असल्यास, उत्पादन सूचीमधील जुळणारे मूल्य रिकामे म्हणून ओव्हरराईट केले जाते.
    • उदाहरणार्थ, Vendor हे मूल्य तुमच्या विद्यमान उत्पादन सूचीमध्ये John's Apparel आहे, परंतु तुम्ही इम्पोर्ट केलेल्या CSV फाईलमध्ये Vendor कॉलम रिकामा असल्यास, John's Apparel हे रिकामे म्हणून ओव्हरराईट केले जाते.
  • इम्पोर्ट CSV फाईलमध्ये आवश्यक नसलेला कॉलम समाविष्ट केलेला नसेल, परंतु तो विद्यमान उत्पादन सूचीमध्ये समाविष्ट असेल, तर उत्पादन सूचीमधील मूल्य तसेच राहते.
    • उदाहरणार्थ, जर Variant image URL कॉलम विद्यमान उत्पादन सूचीमध्ये समाविष्ट असेल, परंतु तो कॉलम इम्पोर्ट CSV फाईलमध्ये समाविष्ट नसेल, तर उत्पादन सूचीमधील मूल्य तसेच राहते.
  • जर इम्पोर्ट CSV फाईलमध्ये असा एखादा आवश्यक नसलेला कॉलम समाविष्ट केलेला असेल जो फाईलमध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कॉलमच्या डेटावर अवलंबून असेल, तर विद्यमान डेटा हटवला किंवा काढला जातो.
    • उदाहरणार्थ, जर SKU कॉलम इम्पोर्ट CSV फाईलमध्ये समाविष्ट केलेला असेल, पण Option1 value आणि Option1 name कॉलम्स नसतील, तर उत्पादन व्हेरिएंट पर्याय हटवला जातो.
  • उत्पादने बल्कमध्ये हटवण्यासाठी CSV फाईल्स वापरल्या जाऊ शकत नाहीत. तुम्हाला उत्पादने बल्कमध्ये हटवायची असल्यास, तुम्ही तुमच्या अ‍ॅडमिनच्या उत्पादने विभागामध्ये बल्क कृती वापरू शकता.
  • इतर विक्री चॅनेल्सवरील उत्पादन उपलब्धता बल्कमध्ये अपडेट करण्यासाठी CSV फाईल्स वापरल्या जाऊ शकत नाहीत. इतर विक्री चॅनेल्सवर उत्पादन उपलब्धता सेट करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

दुसऱ्या स्टोअरमधून उत्पादने इम्पोर्ट करा

तुमच्याकडे दुसऱ्या स्टोअरमधून एक्सपोर्ट केलेली किंवा अन्य स्रोताकडून आलेली CSV फाईल असल्यास, ती CSV फाईल फॉरमॅट शी जुळत असल्याची पडताळणी करा. जर फॉरमॅट जुळत नसेल किंवा कोणतेही हेडर्स गहाळ असतील, तर इम्पोर्ट अयशस्वी होते.

तुमचे उत्पादन CSV हे 15 MB पेक्षा जास्त असू शकत नाही. नवीन CSV फाईल अपलोड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला एरर आल्यास, किंवा अपलोडला वेळ लागल्यास (टाईम आऊट झाल्यास), CSV फाईल अनेक लहान फाईल्समध्ये विभाजित करा आणि नंतर प्रत्येक फाईल अपलोड करा.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, उत्पादने वर जा.

  2. इम्पोर्ट करा वर क्लिक करा.

  3. फाईल जोडा वर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला इम्पोर्ट करायची असलेली CSV फाईल निवडा.

  4. पर्यायी: तुम्हाला नवीन उत्पादने तुमच्या सर्व विक्री चॅनेल्सवर प्रकाशित करण्याऐवजी फक्त तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर प्रकाशित करायची असल्यास, सर्व विक्री चॅनेल्सवर नवीन उत्पादने प्रकाशित करा ची निवड रद्द करा.

  5. पर्यायी: विद्यमान हँडल्ससाठीची मूल्ये ओव्हरराईट करून URLs बदलण्यासाठी, जुळणाऱ्या हँडल्ससह उत्पादने ओव्हरराईट करा निवडा. CSV मध्ये समाविष्ट केलेल्या सर्व कॉलम्ससाठी विद्यमान मूल्ये बदलली जातील.

  6. अपलोड करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.

  7. इम्पोर्टबद्दलच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि नंतर उत्पादने इम्पोर्ट करा वर क्लिक करा.

तुमची CSV फाईल अपलोड केली जाते, तेव्हा तुम्ही तुमचे Shopify स्टोअर सेट करण्यासाठी वापरलेल्या ईमेल खात्यावर तुम्हाला Shopify कडून पुष्टीकरण ईमेल मिळतो. सामान्य समस्यांवरील काही उपाय वाचा.

CSV फाईल वापरून उत्पादने इम्पोर्ट करा

तुम्हाला CSV फाईल वापरून तुमच्या उत्पादनांमध्ये बदल करायचे असल्यास, तुम्हाला प्रथम तुमची उत्पादने एक्सपोर्ट करणे आवश्यक आहे. तुम्ही Google Sheets सारख्या स्प्रेडशीट प्रोग्राममध्ये तुमच्या CSV फाईलमध्ये बदल करू शकता, त्यानंतर तुमचा अपडेट केलेला CSV Shopify अ‍ॅडमिनमध्ये इम्पोर्ट करू शकता.

पायऱ्या

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, उत्पादने वर जा.

  2. इम्पोर्ट करा वर क्लिक करा.

  3. फाईल जोडा वर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला इम्पोर्ट करायची असलेली CSV फाईल निवडा.

  4. पर्यायी: तुम्हाला नवीन उत्पादने तुमच्या सर्व विक्री चॅनेल्सवर प्रकाशित करण्याऐवजी फक्त तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर प्रकाशित करायची असल्यास, सर्व विक्री चॅनेल्सवर नवीन उत्पादने प्रकाशित करा ची निवड रद्द करा.

  5. पर्यायी: विद्यमान हँडल्ससाठीची मूल्ये ओव्हरराईट करून URLs बदलण्यासाठी, जुळणाऱ्या हँडल्ससह उत्पादने ओव्हरराईट करा निवडा. CSV मध्ये समाविष्ट केलेल्या सर्व कॉलम्ससाठी विद्यमान मूल्ये बदलली जातील.

  6. अपलोड करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.

  7. इम्पोर्टबद्दलच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि नंतर उत्पादने इम्पोर्ट करा वर क्लिक करा.

तुमची CSV फाईल अपलोड केल्यानंतर, तुमचे Shopify स्टोअर सेट करण्यासाठी वापरलेल्या ईमेल खात्यावर तुम्हाला Shopify कडून पुष्टीकरण ईमेल मिळतो. सामान्य समस्यांवरील काही उपाय वाचा.

CSV इम्पोर्ट्स ट्रबलशूट करणे

CSV फाईल इम्पोर्ट करताना तुम्हाला समस्या येत असल्यास, खालील ट्रबलशूटिंग माहितीचे पुनरावलोकन करा.

इम्पोर्ट केलेल्या सामग्रीमध्ये अनपेक्षित अक्षरे किंवा चिन्हे दिसतात

CSV फाईल इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या उत्पादन वर्णनांमध्ये, शीर्षकांमध्ये किंवा इतर सामग्रीमध्ये तुम्हाला अनपेक्षित अक्षरे किंवा चिन्हे आढळल्यास, फाईल UTF-8 (Unicode Transformation Format - 8-bit) एन्कोडिंगसह सेव्ह केली गेली नसावी.

तुमच्या सामग्रीमध्ये अनपेक्षित अक्षरे दिसण्यापासून रोखण्यासाठी UTF-8 एन्कोडिंग आवश्यक आहे. बाय डीफॉल्ट, Google Sheets फाईल्स आपोआप UTF-8 एन्कोडिंगसह सेव्ह करते. इतर स्प्रेडशीट सॉफ्टवेअरला UTF-8 एन्कोडिंगसह सेव्ह करण्यासाठी अतिरिक्त पायरीची आवश्यकता असू शकते.

प्रभावित आयटम्स मॅन्युअली दुरुस्त करा

प्रत्येक प्रभावित उत्पादनावर जा आणि मॅन्युअली अक्षरे बदला किंवा हटवा. जर केवळ काही आयटम्स प्रभावित झाले असतील तर हे सर्वोत्तम काम करते.

जुनी आवृत्ती इम्पोर्ट करा

तुमच्याकडे योग्य एन्कोडिंगसह सेव्ह केलेल्या CSV फाईलची मागील आवृत्ती असल्यास, त्याऐवजी ती आवृत्ती इम्पोर्ट करा.

योग्य एन्कोडिंगसह पुन्हा सेव्ह करा

अयोग्यरीत्या एन्कोड केलेली CSV फाईल उघडा आणि ती पुन्हा UTF-8 एन्कोडिंगसह सेव्ह करा. प्रक्रिया तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि स्प्रेडशीट प्रोग्रामवर अवलंबून बदलते. सूचनांसाठी, CSV फाईल्स चा संदर्भ घ्या.

नेटवर्क एरर: JSON मध्ये 0 स्थानावर अनपेक्षित टोकन

जर तुम्हाला Network error: Unexpected token < in JSON at position 0 हा त्रुटी मेसेज मिळाला, तर CSV कॉलम शीर्षके आवश्यक CSV टेम्पलेट हेडर्सशी तंतोतंत जुळत नाहीत. कॉलम हेडरची नावे केस-संवेदनशील (case-sensitive) असतात.

कॉलम हेडर्सचे पुनरावलोकन करा आणि दुरुस्त करा

  1. योग्य CSV फॉरमॅटिंगसाठी CSV फॉरमॅट मार्गदर्शकाचे पुनरावलोकन करा.
  2. नमुना फाईलसोबत तुमच्या CSV कॉलम शीर्षकांची तुलना करा.
  3. तुमचे CSV फाईल हेडर्स नमुना फाईलशी तंतोतंत जुळत असल्याची खात्री करा, ज्यामध्ये केस-संवेदनशीलता समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, handle ऐवजी Handle वापरा.
  4. नमुना फाईल हेडर्सशी जुळण्यासाठी तुमचे CSV फाईल हेडर्स दुरुस्त करा. तुम्ही CSV फॉरमॅट मार्गदर्शकावरून नमुना फाईलची एक प्रत डाउनलोड करू शकता.
अवैध कोटिंग त्रुटी

जेव्हा तुमच्या CSV फाईलमध्ये नॉन-UTF-8 एन्कोड केलेले स्वल्पविराम आणि अवतरण चिन्हे असतात, तेव्हा अवैध कोटिंग त्रुटी येते.

उत्पादन CSV योग्यरित्या इंपोर्ट करण्यासाठी, सर्व कोट्स आणि अ‍ॅपॉस्ट्रोफी UTF-8 एन्कोड केलेले आणि योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, नॉन-UTF-8 अवतरण चिन्हे वक्र दिसतात: “ ”, आणि UTF-8 अवतरण चिन्हे सरळ असतात: " ".

तुमची फाईल UTF-8 एन्कोडिंगसह सेव्ह करा

इंपोर्ट करण्यापूर्वी तुमची मूळ फाईल UTF-8 एन्कोडिंगसह सेव्ह करा.

"Line is invalid (No details)" या त्रुटीसह इंपोर्ट अयशस्वी झाले

जर तुम्हाला अतिरिक्त तपशिलांशिवाय विशिष्ट ओळी अवैध असल्याचे दर्शवणारा त्रुटी मेसेज मिळाला, तर ही समस्या विद्यमान उत्पादन व्हेरिएंट पर्यायांशी असलेल्या संघर्षामुळे उद्भवलेली असू शकते. जेव्हा तुम्ही एखादे पर्याय मूल्य एका पर्याय स्थानावरून दुसऱ्या स्थानावर बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा असे घडते.

या समस्येचे कारण काय आहे

जेव्हा एखादी फाईल विद्यमान पर्याय मूल्य नवीन पर्याय स्थानावर नियुक्त करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा CSV इंपोर्ट अयशस्वी होते, ज्यामुळे एक संघर्ष निर्माण होतो कारण व्हेरिएंट पर्याय युनिक असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही Size पर्याय 1 वरून पर्याय 2 वर हलवण्याचा प्रयत्न करत असाल आणि नवीन पर्याय 1 म्हणून Type जोडण्याचा प्रयत्न करत असाल, तर नवीन मूल्ये इंपोर्ट करण्यापूर्वी डेटाबेस डुप्लिकेट नावांची पडताळणी करतो आणि प्रक्रिया अयशस्वी होते.

संघर्ष दूर करा

इंपोर्ट करताना तात्पुरते पर्यायाचे नाव वापरा आणि त्यानंतर ते अपडेट करा:

  1. तुमच्या CSV फाईलमध्ये, संघर्ष निर्माण करणाऱ्या पर्यायासाठी पर्यायी तात्पुरते नाव वापरा. उदाहरणार्थ, Size ऐवजी Size. (पूर्णविरामासह) वापरा.
  2. तात्पुरत्या पर्यायाच्या नावासह CSV फाईल इंपोर्ट करा.
  3. इंपोर्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, तात्पुरते पर्यायाचे नाव तुम्हाला हव्या असलेल्या नावामध्ये बदलणारी एक नवीन CSV फाईल तयार करा.
  4. अंतिम पर्यायाचे नाव लागू करण्यासाठी अपडेट केलेली CSV फाईल इंपोर्ट करा.