तुमची उत्पादन श्रेणी तात्पुरती बदलणे

तुमच्या विक्री करण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या परिस्थिती निर्माण होतात, तेव्हा परिस्थितीच्या नवीन गरजा आणि वास्तवानुसार तुमची उत्पादन श्रेणी अनुकूल करण्याचा विचार करा.

नवीन गरजा पूर्ण करा

अनेक लोक त्यांना सवय असलेल्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळ्या परिस्थितीत आहेत आणि नवीन आव्हाने अनुभवत आहेत. तुमची उत्पादने ग्राहकांच्या नवीन गरजांनुसार कशी अनुकूल केली जाऊ शकतात, याचा विचार करा:

  • कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी किंवा मनोरंजन प्रदान करण्यासाठी तुमची कोणतीही उत्पादने अनुकूल केली जाऊ शकतात का?
  • भाडेतत्त्वावरील सुविधेद्वारे किंवा स्वस्त शिपिंग दरांद्वारे, तुमच्या उत्पादनांचा ॲक्सेस स्वस्त केला जाऊ शकतो का?
  • कौटुंबिक ॲक्टिव्हिटींसाठी तुमची उत्पादने अनुकूल केली जाऊ शकतात किंवा मुलांसाठी मनोरंजन प्रदान करू शकतात का?
  • होम ऑफिस तयार करण्यासाठी किंवा घरून काम करणे अधिक आनंददायक बनवण्यासाठी तुमच्या उत्पादनांचा वापर केला जाऊ शकतो का?
  • लोकांमध्ये कनेक्शन निर्माण करण्यासाठी तुमच्या उत्पादनांचा वापर केला जाऊ शकतो का?

नवीन गरज सोडवण्याच्या उद्देशाने एक नवीन उत्पादन श्रेणी तयार करा

ग्राहकांच्या नवीन गरजा सोडवण्याच्या उद्देशाने संपूर्णपणे नवीन उत्पादने तयार करण्याचा विचार करा. तुमच्या व्यवसायासाठी यापैकी कोणतीही उदाहरणे अनुकूल केली जाऊ शकतात का हे तपासण्यासाठी, खालील उदाहरणांचे पुनरावलोकन करा:

  • जर तुमचा कपड्यांचा व्यवसाय असेल, तर तुम्ही घरी राहणाऱ्या लोकांसाठी एक नवीन श्रेणी तयार करू शकता. उदाहरणार्थ, ज्यांना व्हिडिओ मीटिंग्जसाठी प्रोफेशनल दिसायचे आहे परंतु त्यांना आरामदायक कपडे घालायचे आहेत, अशा लोकांसाठी एक नवीन कपड्यांची श्रेणी तयार करा.
  • जर तुमचे गार्डन सेंटर असेल, तर खालीलपैकी कोणत्याही उद्देशाने नवीन उत्पादन श्रेणी तयार करण्याचा विचार करा:
    • मुलांना वाढवण्यासाठी किंवा देखभाल करण्यात मदत करण्यासाठी उत्तम असणारी झाडे
    • होम ऑफिससाठी चांगली असलेली आणि पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल असलेली झाडे
    • घरातील स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी वापरली जाणारी झाडे, जसे की सहजपणे वाढवता येणाऱ्या औषधी वनस्पती किंवा भाज्या
  • जर तुम्ही होम एंटरटेनमेंट उत्पादनाची विक्री करत असाल, तर तुम्ही दोन-साठी-एक (two-for-one) उत्पादनांची श्रेणी देऊ शकता जिथे ग्राहक दुसरे उत्पादन मिळवण्यासाठी एखाद्या मित्राची किंवा कुटुंबातील सदस्याची निवड करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही पझल्स विकत असाल, तर ग्राहकाला स्वतःसाठी एक खरेदी करू द्या आणि एक मित्राला पाठवू द्या जेणेकरून ते दोघेही मैत्रीपूर्ण स्पर्धेसाठी पझल सोडवू शकतील.

तुमच्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी भाडेतत्त्वावरील सुविधा ऑफर करा

शक्य असल्यास, तुमच्या ग्राहकांना तुमची काही उपकरणे किंवा उत्पादने भाड्याने घेऊ द्या. तुमच्या व्यवसायासाठी यापैकी कोणतीही उदाहरणे अनुकूल केली जाऊ शकतात का हे तपासण्यासाठी, खालील उदाहरणांचे पुनरावलोकन करा:

  • जर तुम्ही एखाद्या लेजर गुड्स दुकानाचे मालक असाल, तर तुम्ही तुमची काही उपकरणे दररोज, साप्ताहिक किंवा मासिक आधारावर भाड्याने देऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही सायकली विकत असाल, तर तुम्ही अशा लोकांना सायकली भाड्याने देऊ शकता ज्यांच्याकडे तात्पुरता लेजर ॲक्टिव्हिटींसाठी जास्त वेळ आहे, परंतु नवीन सायकल खरेदी करण्यासाठी मर्यादित निधी आहे.
  • जर तुमचे फर्निचरचे स्टोअर असेल, तर ग्राहकांना नवीन फर्निचर वापरून पाहण्यासाठी किंवा तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागा तयार करण्यासाठी उत्पादने भाड्याने देण्याचा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही ऑफिसचे फर्निचर विकत असल्यास, जे लोक तात्पुरते घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत त्यांना होम ऑफिस सेट भाड्याने देण्याचा विचार करा.
  • जर तुमचा असा व्यवसाय असेल जो ग्राहकांना एक सेवा म्हणून युनिक उत्पादने अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा देऊन आकर्षित करत असेल, तर तुम्ही ग्राहकांना ती उत्पादने भाड्याने देऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमचे बोर्ड गेम्स कॅफे असेल, तर तुम्ही लोकांना तुमचे बोर्ड गेम्स भाड्याने देऊ शकता आणि बोर्ड गेम पिक अप किंवा वितरित (डिलिव्हरी) करताना पेये (बेव्हरेजेस) किंवा खाद्यपदार्थ देखील देऊ शकता.

तुमची काही उत्पादने तयार करण्यासाठी किंवा पुन्हा तयार करण्यासाठी किट्स ऑफर करा

उत्पादनाचे किट्स आणि ट्युटोरिअल्स ऑफर करा जेणेकरून ग्राहक घरी तुमची काही उत्पादने पुन्हा तयार करू शकतील. तुमच्या व्यवसायासाठी यापैकी कोणतेही अनुकूल केले जाऊ शकते की नाही हे तपासण्यासाठी पुढील उदाहरणांचे पुनरावलोकन करा:

  • जर तुम्ही रेस्टॉरंट किंवा अन्न व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही युनिक पेये, डेझर्ट्स, अ‍ॅपेटायझर्स किंवा मेन कोर्ससाठी मोफत किंवा स्वस्त रेसिपी देऊ शकता ज्या ग्राहकांना तुमच्या ब्रिक-अँड-मोर्टार ठिकाणी भेट देणे शक्य नसेल तेव्हा ते घरी बनवू शकतील. उदाहरणार्थ, जर तुमची एखादी लोकप्रिय पास्ता डिश असेल, तर तुम्ही घरी ती डिश कशी बनवायची याच्या रेसिपीसोबत पास्ता सॉस डिलिव्हर करू शकता, ज्यामध्ये लहान मुले कशी मदत करू शकतील याच्या पर्यायी पायऱ्या देखील असतील.
  • जर तुम्ही एक कलाकार असाल, तर तुम्ही ग्राहकांना स्वतःची कलाकृती बनवण्यासाठी व्हिडिओ किंवा टप्प्याटप्प्याने ट्युटोरिअल्ससोबत किट्स विकू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही पेंटिंग्ज विकत असल्यास, रंगाचे छोटे कंटेनर्स, एक किंवा दोन पेंटब्रश आणि तुमच्या शैलीत चित्र काढण्याबद्दलचे व्हिडिओ ट्युटोरिअल असलेले किट विका.
  • जर तुमचा व्यवसाय एक युनिक अनुभव देत असेल, तर तुम्ही असे किट विकू शकता ज्याद्वारे लोक तो अनुभव घरी पुन्हा तयार करू शकतील. उदाहरणार्थ, तुम्ही मिनिएचर गोल्फचा व्यवसाय चालवत असल्यास, लोक घरी बनवू शकतील असे काही कोर्सेस डिझाइन करा आणि इनडोअर किंवा आउटडोअर खेळण्यासाठी काही मजेशीर अडथळे, स्वस्त गोल्फ बॉल्स आणि स्वस्त गोल्फ क्लब्स असलेले किट विका.