मीडियामध्ये ऑल्ट मजकूर जोडणे
ऑल्ट (पर्यायी) मजकूर मीडिया आयटमचे वर्णन करतो आणि उत्पादन वर्णनाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. जर मीडिया आयटम कोणत्याही कारणास्तव लोड होऊ शकत नसेल, तर त्याऐवजी ऑल्ट मजकूर दर्शविला जातो. दृष्टिहीन असलेल्या ग्राहकाला इमेजचे वर्णन सांगण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे देखील त्याचा वापर केला जातो. ऑल्ट मजकूर समाविष्ट केल्याने तुमच्या वेबसाईटचे SEO बूस्ट होऊ शकते.
तुमचा ऑल्ट मजकूर संक्षिप्त आणि वर्णनात्मक ठेवा. जास्तीत जास्त लांबी 512 कॅरेक्टर्स आहे, परंतु 125 किंवा त्यापेक्षा कमीची शिफारस केली जाते.
तुम्ही CSV फाईलमध्ये ऑल्ट मजकूर अपलोड देखील करू शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिन मधून, उत्पादने वर जा.
तुम्हाला जे उत्पादन संपादित करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.
उत्पादन तपशील पेजवरून, मीडियाचे पूर्वावलोकन करा पेज पाहण्यासाठी उत्पादन मीडिया आयटमवर क्लिक करा.
ऑल्ट मजकूर जोडा वर क्लिक करा.
तुमचा ऑल्ट मजकूर एंटर करा आणि नंतर ऑल्ट मजकूर सेव्ह करा वर क्लिक करा.
प्रिव्ह्यू पेजमधून बाहेर पडण्यासाठी X वर क्लिक करा.
मोबाइल
- Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा .
- उत्पादने स्क्रीनवरून, एखाद्या उत्पादनावर टॅप करा.
- उत्पादन तपशील स्क्रीनवरून, त्याची प्रिव्ह्यू स्क्रीन पाहण्यासाठी एखाद्या उत्पादन मीडिया आयटमवर टॅप करा.
- माहिती वर टॅप करा.
- तुमचा ऑल्ट मजकूर एंटर करा आणि त्यानंतर सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
- सेव्ह करा वर टॅप करा.