3D मॉडेल्स तयार करण्यासाठी Shopify पार्टनर नियुक्त करणे

Shopify पार्टनर्स हे अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल्स आहेत ज्यांना Shopify स्टोअर्स तयार करण्याबद्दल आणि अपडेट करण्याबद्दल सविस्तर ज्ञान आहे. तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी 3D मॉडेल्स तयार करण्यात मदत मिळवण्यासाठी Shopify पार्टनर्स नियुक्त करू शकता. Shopify पार्टनर नियुक्त करण्याविषयी अधिक जाणून घ्या.

3D मॉडेल्स तयार करण्यासाठी Shopify पार्टनर नियुक्त करा

तुम्ही तुमच्या उत्पादनांचे 3D मॉडेल्स बनवण्यात मदत मिळवण्यासाठी Shopify पार्टनर नियुक्त करू शकता. Shopify Partner Directory मध्ये, 3D मॉडेल तयार करण्याच्या सेवा ऑफर करणारे पार्टनर्स ब्राउझ करा, पार्टनर निवडा आणि त्यांच्याशी संपर्क साधा.

पार्टनर संपर्क फॉर्म वापरून, तुमच्या प्रोजेक्टबद्दल तपशील द्या. तुम्हाला आत्ताच उत्पादन फोटो आणि उत्पादन डायमेंशन्स द्यायचे असल्यास, तुम्ही लिंक केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याची खात्री करा.

तुम्ही एखाद्या पार्टनरशी संपर्क साधता तेव्हा तुम्ही Shopify पार्टनरला नियुक्त करण्याची हमी देत नसता. या पायरीमुळे फक्त पार्टनरला एक विनंती सबमिट केली जाते जे नंतर तुमच्या विनंतीचे पुनरावलोकन करतात. जर एखाद्या पार्टनरने तुमच्यासोबत काम करण्याचे ठरवले, तर ते तुम्हाला त्यांच्या फीबद्दल आणि तुम्ही एकत्र काम कसे सुरू करू शकता याबद्दल अधिक माहितीसह संपर्क करतील.

तुम्ही तुमच्या जॉब विनंतीचा भाग म्हणून आधीच उत्पादनाचे फोटो आणि उत्पादनाचे डायमेंशन्स पुरवले नसल्यास, पार्टनर तुम्हाला त्यांची विनंती करतात. फोटो काढताना आणि मोजमाप घेताना खालील स्पेसिफिकेशन्सचे पालन करा.

उत्पादनाचे फोटो

3D मॉडेल्स फोटोंचा वापर करून तयार केली जातात. 3D मॉडेल तयार करण्यासाठी, Shopify पार्टनरला तुमच्या उत्पादनांचे अनेक अँगलने काढलेले फोटो लागतात:

उत्पादनाच्या फोटोचे अँगल्स

तुमच्या उत्पादनाचे फोटो काढताना, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा:

  • तुमचे उत्पादन चांगल्या प्रकाशात आहे याची खात्री करा.
  • तुमचे संपूर्ण उत्पादन फोकसमध्ये आहे याची खात्री करा.
  • शक्य असल्यास, मोबाईल कॅमेरा वापरू नका. फर्निचरसारख्या मोठ्या उत्पादनांसाठी, 50 mm लेन्स असलेला कॅमेरा वापरा. छोट्या ते मध्यम आकाराच्या उत्पादनांसाठी, 70 mm किंवा 100 mm लेन्स वापरा.
  • कोणत्याही युनिक तपशीलांचे किंवा टेक्सचर्सचे अतिरिक्त फोटो काढा.
  • फोटो फाईल्सना स्पष्ट शीर्षके द्या जसे की blue vase - top किंवा blue vase - left आणि त्यांना स्पष्टपणे लेबल केलेल्या फोल्डरमध्ये स्टोअर करा.

उत्पादनाचे डायमेंशन्स

अचूक 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी, Shopify पार्टनरला तुमच्या उत्पादनाचे तपशीलवार मोजमाप आवश्यक आहे. मोजमाप देताना, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा:

  • तुमच्या उत्पादनाच्या प्रत्येक डायमेंशनचे स्पष्ट, सोप्या शब्दांत वर्णन करा.
  • mm मध्ये मोजमाप द्या.
  • मोजमाप कोणत्या डायमेंशन्सशी संबंधित आहे हे दाखवण्यासाठी डायग्राम समाविष्ट करा.
  • तुमच्या उत्पादनाशी संबंधित टेक्निकल ड्रॉइंग्ज किंवा CAD फाईल्स असल्यास, त्यादेखील समाविष्ट करा.

3D मॉडेल्स बनवून घेण्याचे उदाहरण

नाओमी ही निळ्या रंगाची फुलदाणी विकत आहे:

खालील मोजमाप दर्शवण्यासाठी डायग्राम ॲनोटेट केली आहे

फुलदाणीचे 3D मॉडेल तयार करण्यासाठी Shopify पार्टनर शोधण्याकरिता ती Shopify Partner Directory चा वापर करते. 70 mm लेन्स असलेल्या कॅमेराने काढलेले सहा उच्च-गुणवत्तेचे फोटो नाओमी पार्टनरला देते:

फोटोमध्ये फुलदाणी समोरून, पाठीमागून, डावीकडून, उजवीकडून, वरून आणि खालून दाखवली आहे

नाओमी पार्टनरला मिलीमीटरमध्ये संबंधित उत्पादनाचे डायमेंशन्स असलेली मोजमापाची डायग्राम देते:

फुलदाणी

  • फुलदाणीची (1) उंची ____mm आहे
  • फुलदाणीच्या वरच्या भागापासून मानेच्या खालच्या भागापर्यंत (2) अंतर ____mm आहे
  • मानेच्या खालच्या भागापासून फुलदाणीच्या खालच्या भागापर्यंत (3) अंतर ____mm आहे
  • फुलदाणीच्या तोंडाचा (4) व्यास ____mm आहे
  • तोंडाच्या कडेची (5) रुंदी ____mm आहे
  • मानेच्या खालच्या भागाचा (6) व्यास ____mm आहे
  • फुलदाणीवर 8 षटकोनी पृष्ठभाग आहेत
  • षटकोनी पृष्ठभागांची (8) उंची ____mm आहे
  • षटकोनी पृष्ठभागांची (9) रुंदी ____mm आहे
  • फुलदाणीच्या सर्वात रुंद भागाचा (10) व्यास ____mm आहे
  • फुलदाणीच्या खालच्या भागाचा (11) व्यास ____mm आहे
  • फोमच्या तळाचा व्यास ____mm आहे

निळ्या फुलदाणीचे 3D मॉडेल तयार करण्यासाठी Shopify पार्टनर या फोटोंचा आणि डायमेंशन्सचा वापर करतात. नाओमीच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये जोडण्यासाठी पार्टनर तिला GLB फाईल पाठवतात.

तुमच्या 3D मॉडेल्सची गुणवत्ता तपासा

जेव्हा Shopify पार्टनर तुम्हाला 3D मॉडेल देतात, तेव्हा तुम्ही त्याच्या गुणवत्तेबाबत समाधानी आहात का हे तपासायला हवे. पार्टनरने तुम्हाला मॉडेलच्या प्रिव्ह्यूसाठी सूचना पुरवल्या पाहिजेत.

सर्व अँगल्सने मॉडेल तपासा. तुमच्या 3D मॉडेल्सचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही glTF Viewer वापरू शकता. तुमच्या मॉडेलचे पुनरावलोकन करताना, खालील प्रश्नांचा विचार करा:

  • तुम्ही पार्टनरला दिलेल्या उत्पादनाच्या संदर्भ फोटोंशी मॉडेलचा आकार मिळताजुळता आहे का?
  • मॉडेलचे सर्व भाग एकमेकांच्या प्रमाणात आहेत का?
  • तुम्ही ऑगमेंटेड रिॲलिटीमध्ये मॉडेलचा प्रिव्ह्यू पाहू शकत असल्यास, उर्वरित सीनच्या तुलनेत मॉडेलचे स्केल योग्यरित्या प्रदर्शित होते का?
  • उत्पादनासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यापासूनच मॉडेल बनवलेले दिसते का?
  • मॉडेलचे साहित्य ताणलेले, अस्पष्ट किंवा विद्रूप दिसते का?
  • मॉडेलचे साहित्य अधिक रिॲलिस्टिक वाटावे यासाठी त्यात घासल्याच्या खुणा किंवा ओरखडे यांसारखे तपशील आहेत का?
  • उत्पादनाचे भाग पारदर्शक, रिफ्लेक्टिव्ह असतील किंवा त्यातून प्रकाश पडत असेल, तर ते योग्यरित्या प्रदर्शित होतात का?
  • कडा रिॲलिस्टिक वाटतात का? त्यापैकी कोणतीही कड खूप धारदार आहे का आणि ती मऊ करण्याची गरज आहे का?
  • लोगो किंवा काही मजकूर यांसारखे कोणतेही सजावटीचे तपशील असल्यास, ते पाहणे सोपे आहे का?
  • जिथे असू नयेत तिथे कोणत्याही गॅप्स किंवा छिद्रे आहेत का?
  • 3D मॉडेल Shopify प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक गरजा पूर्ण करते का?
    • 3D मॉडेल GLB फाईल असणे आवश्यक आहे.
    • GLB फाईल अंदाजे 4 MB असली पाहिजे.
    • GLB फाईल 15 MB पेक्षा जास्त नसावी.

Shopify पार्टनरने विशिष्ट स्टँडर्ड्सनुसार 3D मॉडेल तयार केले पाहिजे. तुम्ही मॉडेलचे चांगल्या प्रकारे पुनरावलोकन करू शकावे यासाठी त्या स्टँडर्ड्सबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता, मर्चंट्ससाठी 3D मॉडेल्स तयार करणे पहा.

जर तुम्हाला मॉडेलची गुणवत्ता पुरेशी चांगली नाही असे वाटत असेल, तर Shopify पार्टनरशी संपर्क साधा आणि त्यात काय चूक आहे ते स्पष्ट करा.