उत्पादनाची स्थिती आणि उपलब्धता

उत्पादनाची स्थिती हे निर्धारित करते की उत्पादन विक्रीसाठी तयार आहे की नाही आणि त्याची उपलब्धता विक्री चॅनेल्स आणि मार्केट्स निर्धारित करते जिथे ग्राहक ते खरेदी करू शकतात. तुम्ही तुमच्या Shopify अ‍ॅडमिनच्या उत्पादने सेक्शनमधील उत्पादन तपशील पेजवरून किंवा Shopify अ‍ॅपमध्ये दोन्ही बदलू शकता.

जेव्हा उत्पादनाची स्थिती सक्रिय किंवा अनलिस्ट केलेले असते आणि ते त्या विक्री चॅनेलवर प्रकाशित केलेले असते, तेव्हाच ग्राहक विक्री चॅनेलवर उत्पादन खरेदी करू शकतात.

नवीन उत्पादने डीफॉल्टनुसार सक्रिय म्हणून सेट केली जातात. तुम्ही एखाद्या विद्यमान उत्पादनाची डुप्लिकेट प्रत बनवून किंवा अनआर्काइव्ह करून तयार केलेली उत्पादने डीफॉल्टनुसार मसुदा म्हणून सेट केली जातात.

उत्पादन स्थिती

तुम्ही उत्पादनासाठी खालील स्थिती सेट करू शकता:

तुम्ही सेट करू शकत असलेल्या उत्पादनांच्या स्थिती आणि ग्राहक उत्पादन खरेदी करू शकतात की नाही याविषयी प्रत्येक स्थितीचा अर्थ
स्थितीवर्णन
सक्रियउत्पादनाचा तपशील पूर्ण आहे आणि उत्पादन विक्रीसाठी तयार आहे.
मसुदाउत्पादनाची विक्री करण्यापूर्वी उत्पादनाचा तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे.
संग्रहितउत्पादनाचा तपशील पूर्ण आहे, परंतु उत्पादन यापुढे विक्रीसाठी उपलब्ध नाही. तुम्ही जेव्हा एखादे उत्पादन संग्रहित करता, तेव्हा ते तुमच्या स्टोअरफ्रंटवरून आणि तुमच्या Shopify ॲडमिनमधील मुख्य उत्पादन सूचीवरून लपवले जाते.
अनलिस्ट केलेलेउत्पादनाचा तपशील पूर्ण आहे आणि उत्पादनाची विक्री केली जाऊ शकते, परंतु ग्राहकांना ते उत्पादन शोधता येत नाही. अनलिस्ट केलेल्या उत्पादनांविषयी अधिक जाणून घ्या.

एखादे उत्पादन कायमचे हटवल्याशिवाय त्याची विक्री थांबवण्यासाठी, तुम्ही ते उत्पादन संग्रहित करू शकता. उत्पादनाला संग्रहित केल्याने ते समाविष्ट असलेल्या कोणत्याही संग्रहातून हटवले जात नाही. संग्रहित केलेली उत्पादने संग्रहांमध्ये राहतात आणि ती तुमच्या Shopify ॲडमिनमधील संग्रह आयटम्स विभागात सूचीबद्ध केली जातात, परंतु संग्रहित उत्पादने तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरून लपवली गेल्यामुळे ग्राहकांना ती पाहता येत नाहीत. संग्रहित उत्पादनांना संग्रहाबाहेर ठेवण्यासाठी अटीचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.

अनलिस्ट केलेली उत्पादन स्थिती

एका अनलिस्ट केलेल्या उत्पादनाचे तुमच्या स्टोअरफ्रंटवर एक पेज असते, परंतु केवळ उत्पादनाच्या थेट URL ने त्यामध्ये प्रवेश करता येतो. तुम्ही खालील संभाव्य परिस्थितींमध्ये उत्पादन अनलिस्ट केलेले म्हणून सेट करू शकता:

  • तुमच्याकडे वॉरंटी अ‍ॅड-ऑन किंवा केवळ बंडलचा भाग म्हणून विकले जाणारे उत्पादन असल्यास, तुम्हाला ते तुमच्या स्टोअरफ्रंटवर किंवा सर्च इंजिन परिणामांमध्ये प्रदर्शित करायचे नसेल. तुम्ही वॉरंटी किंवा बंडल उत्पादन अनलिस्ट केलेले म्हणून सेट करू शकता, परंतु ते खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहते आणि मुख्य उत्पादनासह ऑर्डरमध्ये जोडले जाऊ शकते.
  • तुम्ही ठरावीक उत्पादनांचा ॲक्सेस प्रतिबंधित करू शकता, जसे की विशिष्ट ग्राहकांना अर्ली अ‍ॅक्सेस देण्यासाठी त्यांच्यासोबत उत्पादनाची थेट URL शेअर करणे.

अनलिस्ट केलेली उत्पादने इंटरनेट सर्च, Shopify Catalog आणि तुमच्या स्टोअरच्या साइटमॅपवरून लपवली जातात. ती Shopify-संचलित कलेक्शन पेजेस, प्रेडिक्टिव्ह सर्च समाविष्ट असलेल्या सर्च परिणामांमध्ये, किंवा तुमच्या स्टोअरफ्रंटमधील उत्पादन शिफारसींमध्ये प्रदर्शित केली जात नाहीत.

जेव्हा तुम्ही एखाद्या उत्पादनाची स्थिती अनलिस्ट केलेले वर सेट करता, तेव्हा पेजवर noindex आणि nofollow मेटा टॅग जोडले जातात आणि तुमच्या स्टोअरच्या XML साइटमॅप फाईलमधून उत्पादन काढले जाते, म्हणजेच सर्च इंजिन क्रॉलर्सना उत्पादन पेज शोधता येत नाही.

उत्पादनाची स्थिती अनलिस्ट केलेले म्हणून सेट करण्यासाठी विचारात घेण्याच्या बाबी

उत्पादनाची स्थिती अनलिस्ट केलेले म्हणून सेट करण्यासाठी खालील बाबींचे पुनरावलोकन करा:

  • तुम्ही जेव्हा एखादे उत्पादन अनलिस्ट केलेले म्हणून सेट करता, तेव्हा उत्पादन पेजची URL तीच राहते.
  • जर एखाद्या बाह्य वेबसाइटची अनलिस्ट केलेल्या उत्पादन पेजच्या URL ला बॅकलिंक असेल, तर बॅकलिंक तरीही उत्पादन पेजवर निर्देशित करते.
  • तुम्ही उत्पादनांना थेट कार्टमध्ये जोडले जाण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी तुमच्या स्टोअरची अनलिस्ट केलेली उत्पादन पेजेस सानुकूलित करत नाही, तोपर्यंत ग्राहक अनलिस्ट केलेल्या उत्पादनांना तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील उत्पादनाच्या थेट URL वरून त्यांच्या कार्टमध्ये जोडू शकतात.
  • तुम्ही पॉइंट ऑफ सेल विक्री चॅनेलवर अनलिस्ट केलेली उत्पादने प्रकाशित करू शकता आणि त्यांची Shopify POS मध्ये विक्री करू शकता.
  • तुम्ही कोणत्याही तृतीय-पक्ष विक्री चॅनेलवर अनलिस्ट केलेली उत्पादने प्रकाशित करू शकत नाही.
  • अनलिस्ट केलेली उत्पादने Digital Products आणि Marketplace Connect ॲप्समध्ये आणि अनलिस्ट केलेल्या उत्पादन स्थितीला सपोर्ट न करणाऱ्या कोणत्याही तृतीय-पक्ष ॲप्समध्ये सक्रिय म्हणून प्रदर्शित केली जातात.
  • तुम्ही जर अनलिस्ट केलेल्या उत्पादन स्थिती कार्यक्षमतेसह इंटिग्रेट केलेले नसलेले एखादे तृतीय-पक्ष सर्च किंवा उत्पादन शिफारसी ॲप वापरत असाल, तर ते ॲप तरीही तुमच्या अनलिस्ट केलेल्या उत्पादनांना त्याच्या सर्च किंवा शिफारसींच्या परिणामांमध्ये प्रदर्शित करू शकते.
  • अनलिस्ट केलेली उत्पादने विक्री चॅनेल्सच्या संदर्भात्मक उत्पादन फीडमध्ये उपलब्ध नाहीत.
  • Shopify ॲडमिनच्या ज्या सर्व भागांमध्ये उत्पादनाची स्थिती दर्शवली जाते, तिथे अनलिस्ट केलेल्या उत्पादनांसाठी अनलिस्ट केलेले हे लेबल प्रदर्शित केले जाते, उदाहरणासाठी उत्पादनांच्या अनुक्रमणिका पेजवर, ड्राफ्ट ऑर्डर्ससाठी उत्पादन निवड संवादामध्ये आणि Translate & Adapt सारख्या ॲप्समधील उत्पादन फिल्टरिंग टूल्समध्ये.

विक्री चॅनेल उपलब्धता

उत्पादन तपशील पेजचा प्रकाशन विभाग तुमचे विक्री चॅनेल आणि मार्केट्स सूचीबद्ध करतो. तुम्ही जर Shopify B2B वापरत असाल, तर तुमचे B2B कॅटलॉग देखील तिथे सूचीबद्ध केले जातात. सर्व विक्री चॅनेल आणि मार्केट्स डीफॉल्टनुसार निवडलेली असतात.

तुम्ही तुमच्या सक्रिय विक्री चॅनेलमध्ये उत्पादनाचा समावेश करून त्याची विक्री कुठे करायची ते नियंत्रित करू शकता. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट विक्री चॅनेलमधून एखादे उत्पादन वगळले, तर ते त्या चॅनेलवरून लपवले जाते. जर तुम्ही एखादे उत्पादन Shop चॅनेलमधून वगळले, तर ते तरीही Shop मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकते, परंतु खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर पुनर्निर्देशित केले जाते.

विक्री चॅनेलला उत्पादनाचा कोणता डेटा मिळेल हे निवडण्यासाठी, जसे की एका चॅनेलसाठी वेगळे शीर्षक, विक्री चॅनेलसाठी उत्पादन डेटा सानुकूलित करणे याचा संदर्भ घ्या.

चॅनेल कनेक्शन्स आणि चॅनेल मार्केट्स

तुमची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी काही विक्री चॅनेल एकापेक्षा अधिक प्रदेश किंवा खात्यासह एकाधिक चॅनेल कनेक्शन्स प्रदर्शित करू शकतात.

तुम्ही जर चॅनेल मार्केट्स वापरत असाल, तर उत्पादनाला विक्री चॅनेलमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी, तुम्ही चॅनेल मार्केटला नियुक्त केलेल्या कोणत्याही कॅटलॉगमध्ये उत्पादनाचा समावेश असणे आवश्यक आहे आणि ते विक्री चॅनेलवर प्रकाशित केलेले असणे आवश्यक आहे.

विक्री चॅनेलमधून उत्पादन लपवण्याची कारणे

तुम्ही खालीलपैकी एका कारणासाठी विक्री चॅनेलमधून एखादे उत्पादन लपवू शकता:

  • तुमच्याकडे हंगामी उत्पादने आहेत जी तुम्हाला वर्षाच्या केवळ काही भागासाठी प्रदर्शित करायची आहेत.
  • एखादे उत्पादन स्टॉकमध्ये नाही, परंतु नंतर तुमच्याकडे अधिक स्टॉक उपलब्ध असेल.
  • तुम्हाला एखाद्या उत्पादनाची विक्री करायची नाही, परंतु तुम्ही नंतर पुन्हा त्याची ऑफर देऊ शकता.
  • तुम्हाला केवळ-ऑनलाइन किंवा केवळ-इन-स्टोअर उत्पादनांची ऑफर द्यायची आहे.
  • तुम्हाला विशिष्ट विक्री चॅनेल वापरून उत्पादनाची विक्री करायची नाही.

उत्पादन केवळ त्याच्या थेट URL द्वारे ॲक्सेस करण्यायोग्य ठेवण्यासाठी, परंतु अन्य ठिकाणी लपवून ठेवण्यासाठी, उत्पादनाची स्थिती अनलिस्ट केलेले वर सेट करा.

उत्पादनाची स्थिती बदला

तुम्ही उत्पादन तपशील पेजवरून उत्पादनाची स्थिती सक्रिय, मसुदा किंवा अनलिस्ट केलेले मध्ये बदलू शकता. जर एखादे उत्पादन संग्रहित केलेले असेल, तर तुम्ही त्याची स्थिती बदलण्यापूर्वी तुम्हाला ते अनआर्काइव्ह करावे लागेल. अनआर्काइव्ह केलेली उत्पादने मसुदा वर सेट केली जातात.

एकाच वेळी अनेक उत्पादनांचे स्टेटस बदलण्यासाठी, बल्क स्वरूपात संपादित करण्यासाठी उत्पादने निवडा. बल्क एडिटरमध्ये, स्टेटस पर्यायांमध्ये आर्काइव्ह केलेले समाविष्ट असते.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.

  2. तुम्हाला जे उत्पादन बदलायचे आहे, त्याच्या नावावर क्लिक करा.

  3. स्टेटस विभागामध्ये, ड्रॉप-डाउन मेनूमधून सक्रिय, मसुदा किंवा अनलिस्ट केलेले निवडा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, उत्पादने आयकनवर टॅप करा .
  2. तुम्हाला जे उत्पादन बदलायचे आहे त्याच्या नावावर टॅप करा.
  3. स्टेटस विभागामध्ये, सध्याच्या स्टेटसवर टॅप करा आणि त्यानंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून सक्रिय, मसुदा किंवा अनलिस्ट केलेले वर टॅप करा.
  4. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

तुमच्या विक्री चॅनेलमध्ये उत्पादनाची उपलब्धता सेट करा

तुम्ही उत्पादनाच्या तपशील पेजवरून तुमच्या विक्री चॅनेल्समध्ये एखादे उत्पादन समाविष्ट करू शकता किंवा त्यातून वगळू शकता. एकाच वेळी अनेक उत्पादनांसाठी उत्पादनाची उपलब्धता सेट करण्यासाठी, बल्क कृती वापरा. संपूर्ण उत्पादनाऐवजी वैयक्तिक व्हेरिएंट्ससाठी उपलब्धता नियंत्रित करण्यासाठी, तुमच्या विक्री चॅनेल्स आणि कॅटलॉगसाठी विशिष्ट व्हेरिएंट्स प्रकाशित करा किंवा अप्रकाशित करा.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.

  2. उत्पादनाचे तपशील उघडण्यासाठी त्याच्या नावावर क्लिक करा.

  3. प्रकाशित करणे विभागामध्ये, अ‍ॅडजस्ट करा आयकनवर क्लिक करा.

  4. डायलॉगमध्ये, तुम्हाला ज्यांच्यासाठी प्रकाशन सेटिंग्ज बदलायचे आहेत ते विक्री चॅनेल निवडा किंवा निवड रद्द करा.

  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.

  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, उत्पादने आयकनवर टॅप करा .
  2. उत्पादनाचे तपशील उघडण्यासाठी त्याच्या नावावर टॅप करा. विक्री चॅनेल विभागामध्ये सूचीबद्ध केलेल्या विक्री चॅनेल्समध्ये उत्पादनाचा समावेश केलेला असतो.
  3. संपादित करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला ज्यांच्यासाठी प्रकाशन सेटिंग्ज बदलायचे आहेत ते विक्री चॅनेल निवडा किंवा निवड रद्द करा.
  5. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

Shopify द्वारे व्यवस्थापित केलेली स्टेटस

Shopify च्या सेवेच्या अटी आणि स्वीकार्य वापर धोरण यांवर आधारित, तुमचे स्टोअर एखाद्या बौद्धिक संपदा सूचनेच्या अधीन असल्यास पर्यायी स्टेटस प्रदर्शित केले जाऊ शकते. खालील स्टेटस थेट Shopify द्वारे व्यवस्थापित केली जातात:

  • निलंबित: उत्पादन यापुढे विक्रीसाठी उपलब्ध नाही आणि उत्पादनाचे तपशील सुधारित केले जाऊ शकत नाहीत.
  • निलंबन प्रलंबित: हे स्टेटस काढून टाकल्याशिवाय किंवा निलंबित मध्ये बदलेपर्यंत उत्पादनाचे सध्याचे स्टेटस (सक्रिय, मसुदा किंवा आर्काइव्ह केलेले) राखले जाते.