करार CSV इंपोर्ट आणि एक्सपोर्ट करणे

तृतीय-पक्ष सबस्क्रिप्शन ॲपमधून Shopify Subscriptions ॲपमध्ये करार इंपोर्ट करण्यासाठी किंवा Shopify Subscriptions ॲपमधून करार एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही CSV (स्वल्पविरामाने वेगळे केलेले मूल्य) फाईल वापरू शकता.

CSV फाईल्स कशा वापराव्यात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, CSV फाईल उघडणे आणि संपादित करणे पहा.

नमुना CSV फाईल डाउनलोड करा

तुम्ही टेम्पलेट म्हणून वापरण्यासाठी नमुना करार CSV फाईल डाउनलोड करून पाहू शकता.

करार CSV फाईलसाठी विचार करण्यासारख्या गोष्टी

करार इंपोर्ट करण्यासाठी करार CSV फाईल वापरण्यापूर्वी, खालील गोष्टींचे पुनरावलोकन करा.

CSV फाईल फॉरमॅट करणे

तुमची करार CSV फाईल योग्यरित्या इंपोर्ट होण्यासाठी, ती खालील निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा:

  • तुमच्या करार CSV फाईलची पहिली ओळ करार CSV वर्णन टेबल मध्ये नमूद केल्याप्रमाणे कॉलम हेडर्स असणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक कॉलम स्वल्पविरामाने वेगळा केलेला असणे आवश्यक आहे.
  • CSV फाईलचा कमाल आकार 10 MB असू शकतो.

हँडल कॉलम समजून घेणे

प्रत्येक करार स्वतंत्रपणे ओळखण्यासाठी हँडल वापरले जाते. हँडल्सचा वापर खालील प्रकारे डेटा व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो:

  • एकाधिक लाइन आयटम असलेले करार ग्रुप करणे: एकाधिक लाइन आयटम असलेले करार एका सामायिक हँडलने ग्रुप केले जातात.
  • डुप्लिकेट करारांना प्रतिबंध करणे: इंपोर्ट करताना डुप्लिकेट करारांकडे दुर्लक्ष केले जाते. समान हँडल असलेली रो पूर्वी यशस्वीरित्या इंपोर्ट केली असल्यास, ती रो नवीन इंपोर्ट प्रक्रियेत वगळली जाते. ही यंत्रणा डेटाचे डुप्लिकेशन टाळण्यास मदत करते.

एकाधिक लाइन आयटम करार

एकाधिक लाइन आयटमचा समावेश असलेल्या करारांसाठी प्रत्येक लाइन आयटमसाठी वेगळ्या रो ची आवश्यकता असते आणि ते handle कॉलमसोबत ग्रुप केलेले असतात.

उदाहरणार्थ, करारात तीन लाइन आयटम असल्यास, प्रत्येक लाइन आयटम वेगळी रो म्हणून जोडलेला असणे आवश्यक आहे. पहिल्या रो मध्ये कराराची सर्व माहिती असते आणि पुढील दोन रो मध्ये फक्त खालील कॉलम्समधील मूल्ये असतात:

  • handle
  • line_variant_id
  • line_quantity
  • line_current_price
  • पर्यायी: line_selling_plan_id
  • पर्यायी: line_selling_plan_name

handle तीन्ही कॉलम्ससाठी समान असणे आवश्यक आहे. रो दोन आणि तीनमधील इतर सर्व कॉलम्स रिक्त असले पाहिजेत. तुम्ही एकाधिक लाइन आयटम कराराच्या उदाहरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी नमुना CSV टेम्पलेट डाउनलोड करू शकता.

CSV फाईलचे वर्णन

करार CSV मध्ये वापरलेली माहिती खालील कॅटेगरीत येते:

  • कराराचे नाव
  • ग्राहक आणि बिलिंग माहिती
  • डिलिव्हरी पद्धत आणि माहिती
  • सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट केलेले आयटम

योग्यरित्या इंपोर्ट होण्यासाठी सर्व कॉलम्स CSV फाईलमध्ये जोडले गेले पाहिजेत आणि अन्यथा नमूद केल्याखेरीज सर्व फील्ड्स आवश्यक आहेत.

करार CSV फाईलमधील कॉलम्सचे वर्णन.
कॉलमवर्णन
Handleहँडल्स हे प्रत्येक कराराचे युनिक आयडेंटिफायर असतात. उदाहरणार्थ, red-shirt. हँडल्समध्ये अक्षरे आणि संख्यांचा समावेश असू शकतो आणि ते सहसा अक्षरे, संख्या किंवा दोन्हीची एकत्रित स्ट्रिंग असतात. प्रत्येक कराराचे युनिक हँडल असणे आवश्यक आहे.
upcoming_billing_dateकरारासाठीची पुढील बिलिंग तारीख.
वेळ UTC (समन्वित जागतिक वेळ) मध्ये आहे आणि YYYY-MM-DDTHH:MM:SSZ म्हणून फॉरमॅट केलेली असणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, UTC (समन्वित जागतिक वेळ) च्या टाइम झोनमधील 7 सप्टेंबर 2019 रोजीची दुपारी 3:50 ही वेळ 2019-09-07T15:50:00Z म्हणून दर्शवली जाते.
पुढील बिलिंग तारीख मूल्य हे CSV फाईल इंपोर्ट केल्याच्या तारीख आणि वेळेच्या किमान 24 तासांनंतरची तारीख आणि वेळ यावर सेट करणे आवश्यक आहे.
customer_idग्राहक आयडी. हा ID तुमच्या Shopify ॲडमिनमधील विद्यमान ग्राहकाच्या ID शी जुळला पाहिजे आणि तो संख्यांची स्ट्रिंग असावा. उदाहरणार्थ 6320530986896.
currency_codeकराराचा चलन कोड. चलन कोड तुमच्या स्टोअरमध्ये सक्रिय असलेल्या चलनाशी जुळला पाहिजे.
statusकराराची स्थिती. करारांच्या खालीलपैकी एक स्थिती असू शकते:
  • सक्रिय
  • थांबवले
cadence_intervalसबस्क्रिप्शनची डिलिव्हरी वारंवारता. करारासाठी खालीलपैकी एक वारंवारता अंतराल असू शकतो:
  • आठवडा
  • महिना
  • वर्ष
cadence_interval_countएकूण वेळेच्या अंतरामधील सबस्क्रिप्शनची डिलिव्हरी वारंवारता. उदाहरणार्थ, प्रत्येक महिन्यासाठी कॅडेन्स इंटरव्हल संख्या 1 आहे आणि प्रत्येक दोन आठवड्यांसाठी कॅडेन्स इंटरव्हल 2 आहे.
customer_payment_method_idकरारासाठी ग्राहकाने वापरलेल्या पेमेंट पद्धतीचा ID. हा ID एक अद्वितीय अल्फान्युमेरिक कोड असतो. उदाहरणार्थ, 24e8c839c47ef47d30ad28346d130e74.
delivery_priceयोग्य चलन फॉरमॅट मधील डिलिव्हरीची किंमत.
delivery_method_type सबस्क्रिप्शनची डिलिव्हरी पद्धत. डिलिव्हरी पद्धत खालीलपैकी एका प्रकारची असली पाहिजे:
  • शिपिंग
  • स्थानिक वितरण
  • पिकअप
  • काहीही नाही
delivery_address_first_nameडिलिव्हरी पत्त्यावरील प्राप्तकर्त्याचे पहिले नाव. हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_last_nameडिलिव्हरी पत्त्यावरील प्राप्तकर्त्याचे आडनाव.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_address1डिलिव्हरी पत्त्याची पहिली ओळ.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_address2डिलिव्हरी पत्त्याची दुसरी ओळ.
पत्ता दुसऱ्या फील्डमध्ये असल्यास आणि डिलिव्हरी पद्धत शिपिंग किंवा स्थानिक वितरण असल्यासच हे फील्ड आवश्यक असते.
delivery_address_cityडिलिव्हरी पत्त्याचे शहर.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_province_codeडिलिव्हरी पत्त्याचा प्रांत किंवा राज्य ISO कोड.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_country_codeडिलिव्हरी पत्त्याचा देश ISO कोड.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_companyडिलिव्हरी पत्त्यावरील कंपनीचे नाव.
ऑर्डर एखाद्या व्यवसायासाठी असल्यास आणि डिलिव्हरी पद्धत शिपिंग किंवा स्थानिक वितरण असल्यासच हे फील्ड आवश्यक असते.
delivery_address_zipडिलिव्हरी पत्त्याचा पोस्टल कोड.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_address_phoneडिलिव्हरी पत्त्याचा फोन नंबर -- उदाहरणार्थ +1 (613) 555-5555.
हे फील्ड फक्त शिपिंग आणि स्थानिक वितरण पद्धतींसाठी आवश्यक आहे.
delivery_local_delivery_phoneडिलिव्हरी पत्त्याचा फोन नंबर.
स्थानिक वितरण पद्धतीसह असलेल्या सबस्क्रिप्शन्ससाठी हे फील्ड आवश्यक आहे.
delivery_local_delivery_instructionsस्थानिक वितरण सूचना.
जेव्हा स्थानिक वितरण पद्धतीसह असलेल्या सबस्क्रिप्शन्ससाठी सूचना प्रदान केल्या जातात, तेव्हाच हे फील्ड समाविष्ट करणे आवश्यक असते.
delivery_pickup_method_location_idपिकअप पद्धतीसाठीचा ठिकाण ID.
हे फील्ड फक्त स्थानिक पिकअप पद्धतीसह असलेल्या सबस्क्रिप्शन्ससाठी आवश्यक आहे.
line_variant_idसबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक लाइन आयटमचा ID -- उदाहरणार्थ 53154087005812.
सबस्क्रिप्शनमध्ये एकाधिक लाइन आयटम समाविष्ट असल्यास, प्रत्येक लाइन आयटम अद्वितीय व्हेरिएंट ID सह एक नवीन ओळ म्हणून जोडला जाणे आवश्यक आहे.
line_quantityसबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक लाइन आयटमचे प्रमाण.
सबस्क्रिप्शनमध्ये एकाधिक लाइन आयटम समाविष्ट असल्यास, जोडलेले प्रमाण त्या विशिष्ट आयटमसाठी असावे, समाविष्ट केलेल्या सर्व आयटम्सचे एकूण प्रमाण नसावे.
line_current_priceयोग्य चलन फॉरमॅट मधील सबस्क्रिप्शन लाइन आयटमची किंमत.
line_selling_plan_idसबस्क्रिप्शन प्लॅनचा ID -- उदाहरणार्थ 3607724288.
हे फील्ड ऐच्छिक आहे.
line_selling_plan_nameसबस्क्रिप्शन प्लॅनचे नाव.
हे फील्ड ऐच्छिक आहे.

CSV फाईल वापरून करार इंपोर्ट करा

तुम्ही Shopify App Store मधील पात्र तृतीय-पक्ष सबस्क्रिप्शन अ‍ॅपमधून किंवा दुसऱ्या स्टोअरवरील Shopify Subscriptions अ‍ॅपमधून विद्यमान करार इंपोर्ट करण्यासाठी CSV फाईल वापरू शकता.

विद्यमान करार संपादित करण्यासाठी किंवा ओव्हरराइट करण्यासाठी CSV फाईल वापरता येत नाही. इंपोर्ट करताना विद्यमान करारांच्या डुप्लिकेट्सकडे दुर्लक्ष केले जाते.

तृतीय-पक्ष सबस्क्रिप्शन अ‍ॅपवरून करार इंपोर्ट करणे

तुम्ही एखाद्या तृतीय-पक्ष सबस्क्रिप्शन अ‍ॅप मधून करार इंपोर्ट करू शकता. तृतीय-पक्ष अ‍ॅपवरून इंपोर्ट करताना खालील बाबी विचारात घ्या:

  • तुमचे तृतीय-पक्ष सबस्क्रिप्शन अ‍ॅप Shopify Checkout सह इंटिग्रेट केलेले नसल्यास, तुम्ही तुमचे करार इंपोर्ट करू शकत नाही.
  • तुम्ही तुमच्या तृतीय-पक्ष अ‍ॅपवरून थेट डेटा इंपोर्ट करू शकत नाही. इंपोर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तृतीय-पक्ष अ‍ॅपमधील कराराचा डेटा योग्य फॉरमॅटमध्ये Shopify Subscriptions अ‍ॅपशी सुसंगत CSV मध्ये जोडणे आवश्यक आहे.
  • तुमच्या तृतीय-पक्ष सबस्क्रिप्शन अ‍ॅपमध्ये एक्सपोर्ट फीचर नसल्यास किंवा एक्सपोर्ट केलेल्या डेटामध्ये सर्व आवश्यक डेटा समाविष्ट नसल्यास, सपोर्टसाठी अ‍ॅपच्या डेव्हलपरशी संपर्क साधा.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Subscriptions वर जा.

  2. करार वर क्लिक करा.

  3. इंपोर्ट करा वर क्लिक करा.

  4. फाईल जोडा वर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला इंपोर्ट करायची असलेली CSV फाईल निवडा.

  5. फाईल अपलोड करा वर क्लिक करा.

तुमची CSV फाईल अपलोड झाल्यानंतर, तुमचे Shopify स्टोअर सेट करण्यासाठी वापरलेल्या ईमेल खात्यावर तुम्हाला Shopify कडून एक पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल. कोणत्याही इंपोर्ट समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी सामान्य इंपोर्ट त्रुटींवरील उपाय वाचा.

CSV फाईल वापरून करार एक्सपोर्ट करा

तुम्ही तुमच्या रेकॉर्डसाठी किंवा तुम्ही Shopify Subscriptions अ‍ॅप इन्स्टॉल केलेल्या दुसऱ्या Shopify स्टोअरमध्ये इंपोर्ट करण्यासाठी तुमचे करार एक्सपोर्ट करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Subscriptions वर जा.

  2. करार वर क्लिक करा.

  3. एक्सपोर्ट करा वर क्लिक करा.