Shopify Collabs सोबत Flow वापरणे
Shopify Flow हे एक ई-कॉमर्स ऑटोमेशन प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये आणि तुमच्या सर्व अॅप्सवर कार्ये व प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी सक्षम करते. आता तुम्ही तयार Shopify Flow टेम्पलेट्सच्या मदतीने पुनरावृत्ती होणारी Collabs कार्ये स्वयंचलित करू शकता. Shopify Flow बद्दल अधिक जाणून घ्या.
उपलब्ध टेम्पलेट्स
तुम्ही खालील ठिकाणी Collabs साठी Shopify Flow टेम्पलेट्स शोधू शकता:
- Collabs अॅप मध्ये, सेटिंग्ज > इंटिग्रेशन्स टॅबवर जा.
- Flow अॅपमधील वर्कफ्लो अंतर्गत, टेम्पलेट्स ब्राउझ करा निवडा. त्यानंतर, अॅप्स ड्रॉपडाउन मेनूमध्ये, Collabs निवडा.
Collabs अॅपसाठी खालील Shopify Flow टेम्पलेट्स उपलब्ध आहेत:
- अर्जदाराला आपोआप मंजुरी द्या: भक्कम कम्युनिटी, अस्सल आशय आणि सक्रिय प्रेक्षकवर्ग असलेल्या नवीन अर्जदारांना आपोआप मंजुरी देण्यासाठी एक नियम तयार करा. प्रोग्राम्ससाठी अर्जदार नियुक्त करा, भेटवस्तू द्या आणि स्वागत ईमेल पाठवा.
- मंजूर केलेल्या अर्जदारांना Klaviyo मध्ये एक्सपोर्ट करा: नव्याने मंजूर केलेल्या अर्जदारांचे ईमेल आणि नावे Klaviyo मध्ये सिंक करा. यानंतर तुमच्या प्रोग्राममध्ये स्वीकारलेले कोणतेही क्रिएटर्स Klaviyo मधील सूची किंवा सेगमेंटमध्ये आपोआप जोडले जातात. जर तुम्ही यापूर्वी क्रिएटर्सना तुमच्या Collabs ॲफिलिएट प्रोग्राममध्ये स्वीकारले असेल, तर तुम्ही Collabs मधून CSV फाईल एक्सपोर्ट करून आणि ती Klaviyo वर अपलोड करून या क्रिएटर्सना मॅन्युअली Klaviyo मध्ये जोडणे आवश्यक आहे.
- भेटवस्तूचा फॉलो-अप घ्या: जेव्हा क्रिएटर्स भेटवस्तूवर दावा करतात, तेव्हा त्यांना स्वयंचलित ईमेल संदेश पाठवा. जर तुम्हाला Flow द्वारे तयार केलेले कोणतेही ईमेल अधिक वैयक्तिकीकृत करायचे असतील, तर तुम्ही Flow वर्कफ्लोमध्ये ईमेल कॉपी संपादित करू शकता.
- पहिल्या विक्रीबद्दल अभिनंदन: पहिल्या विक्रीचे श्रेय त्यांना मिळाल्यानंतर क्रिएटर्सना स्वयंचलित ईमेल नोटिफिकेशन पाठवा. Flow द्वारे तयार केलेले ईमेल सानुकूलित करण्यासाठी, तुम्ही Flow वर्कफ्लोमध्ये ईमेल कॉपी संपादित करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Collabs साठीच्या Shopify Flow इंटिग्रेशनचा खर्च किती आहे?
Basic, Grow, Advanced किंवा Shopify Plus प्लॅन्सवरील Shopify स्टोअर्ससाठी Flow वापरण्यास मोफत आहे.
मला Collabs साठीच्या Shopify Flow इंटिग्रेशनचा अॅक्सेस कसा मिळेल?
तुम्ही Shopify App Store मधून Shopify Flow इंस्टॉल करू शकता. Basic, Grow, Advanced किंवा Shopify Plus प्लॅन्सवरील Shopify स्टोअर्ससाठी Flow वापरण्यास मोफत आहे.
Collabs साठीचे Shopify Flow इंटिग्रेशन Klaviyo सोबत काम करते का?
होय. तुम्ही Shopify Flow इंस्टॉल केल्यानंतर, सेटिंग्ज > इंटिग्रेशन्स वर जाऊन Collabs मध्ये मंजूर केलेल्या अर्जदारांना Klaviyo मध्ये एक्सपोर्ट करा टेम्पलेट चालू करा.
Collabs x Flow इंटिग्रेशन मला Klaviyo द्वारे क्रिएटर्सना ईमेल करण्यासाठी कशी अनुमती देते?
तुम्ही मंजूर केलेल्या अर्जदारांना Klaviyo मध्ये एक्सपोर्ट करा टेम्पलेट इंस्टॉल केल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये स्वीकारलेल्या सर्व क्रिएटर्सचे ईमेल Klaviyo मधील सूची किंवा सेगमेंटमध्ये आपोआप सिंक केले जातात. हे तुम्हाला Klaviyo मध्ये तुमच्या क्रिएटर्सना त्यांचे स्वतःचे सेगमेंट म्हणून हाताळण्याची अनुमती देते, त्यामुळे तुम्ही त्यांना पूरक स्वागत किट्स आणि मासिक ब्रँड अपडेट्स यांसारख्या विशिष्ट ईमेल मोहिमा पाठवू शकता.
'अर्जदाराला आपोआप मंजुरी द्या' टेम्पलेटमधील अर्जदार मंजुरी ईमेल हा Collabs ॲडमिनकडून पाठवलेल्या ईमेलपेक्षा वेगळा का आहे?
Shopify Collabs च्या अर्जदार टॅबवर क्रिएटरला मंजुरी देताना, Collabs आपोआप क्रिएटरला स्वीकृती ईमेल पाठवते. जर हे कार्य अर्जदाराला आपोआप मंजुरी द्या टेम्पलेट वापरून स्वयंचलित केले असेल, तर Collabs मध्ये साधारणपणे घडणाऱ्या सर्व स्टेप्स Flow मध्ये होणे आवश्यक आहे. ही स्टेप वर्कफ्लोमध्ये समाविष्ट केल्याशिवाय, क्रिएटरला ईमेल मिळणार नाही. ईमेलला Flow मधील एका वेगळ्या क्रियेमध्ये विभक्त केल्याने ते अधिक सामर्थ्यवान बनते, कारण तुम्ही अतिरिक्त अटींवर आधारित भिन्न स्वीकृती ईमेल पाठवू शकता आणि इतर Flow इंटिग्रेशन्स (जसे की OpenAI) वापरू शकता.
जरी स्वीकृती ईमेल्सची कॉपी Collabs ॲडमिनमध्ये किंवा अर्जदाराला आपोआप मंजुरी द्या टेम्पलेटमध्ये तुमच्या ब्रँडद्वारे सानुकूलित केली जाऊ शकते, तरीही अनेक ब्रँड्स त्यांच्या प्रोग्राम्समध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या क्रिएटर पार्टनर्सना अधिक ब्रँड माहिती पाठवण्यास प्राधान्य देतात. तुम्ही प्रथम तुमच्या क्रिएटर्सना टेम्पलेट ईमेलमध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये क्रिएटरला स्वीकारण्याविषयीची प्राथमिक माहिती पाठवू शकता आणि नंतर अधिक माहितीसह फॉलो-अप ईमेल पाठवू शकता.
मी 'भेटवस्तूचा फॉलो-अप घ्या' आणि 'पहिल्या विक्रीबद्दल अभिनंदन' टेम्पलेट्समधील ईमेल माझ्या ब्रँडसाठी अधिक विशिष्ट कसे बनवू शकतो?
Flow द्वारे तयार केलेले कोणतेही ईमेल सानुकूलित करण्यासाठी, तुम्ही मूळ Follow-up on a gift किंवा Congratulations on first sale टेम्पलेटमधून ईमेल पाठवण्याची अंतिम कृती काढून टाकू शकता आणि त्याऐवजी Klaviyo Create a Campaign कृती वापरू शकता. तुम्हाला जो ईमेल पाठवायचा आहे तो Klaviyo मध्ये तयार केलेला असावा.
क्रिएटरच्या वेलकम ईमेलमध्ये मी काय समाविष्ट करावे?
क्रिएटर्सना तुमची उत्पादने विकणे सोपे करा. तुमच्या वेलकम ईमेलमध्ये पुढील गोष्टींचा समावेश करा:
- संस्थापकाची गोष्ट किंवा तुमच्या उत्पादनाचे पॅकेजिंग यांसारख्या प्रमुख तपशीलांसह तुमच्या ब्रँडची गोष्ट
- तुम्ही काम केलेल्या इतर क्रिएटर्सकडील चांगल्या कामगिरी असलेल्या सामग्रीची उदाहरणे
- तुमच्या उत्पादनांचे सर्वोत्तम फोटो कसे काढावेत यावरील मार्गदर्शक तत्त्वे
- क्रिएटरला मिळणाऱ्या पर्क्सविषयी तपशील
- तुमच्या ॲफिलिएट प्रोग्रामच्या अटी आणि अपेक्षा
- कोणतेही ब्रँड टॅग किंवा हॅशटॅग
क्रिएटर्सना त्यांची पहिली ॲफिलिएट विक्री करण्यात मदत होऊ शकेल अशा इतर कोणत्याही गोष्टीचा समावेश करा.
त्याऐवजी मी Klaviyo वापरून क्रिएटर्सना ब्रँडेड वेलकम ईमेल कसा पाठवू शकेन?
जरी स्वीकृती ईमेल्सची कॉपी Collabs ॲडमिनमध्ये किंवा अर्जदाराला आपोआप मंजुरी द्या टेम्पलेटमध्ये तुमच्या ब्रँडद्वारे सानुकूलित केली जाऊ शकते, तरीही अनेक ब्रँड्स त्यांच्या प्रोग्राम्समध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या क्रिएटर पार्टनर्सना अधिक ब्रँड माहिती पाठवण्यास प्राधान्य देतात. तुम्ही प्रथम तुमच्या क्रिएटर्सना टेम्पलेट ईमेलमध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये क्रिएटरला स्वीकारण्याविषयीची प्राथमिक माहिती पाठवू शकता आणि नंतर अधिक माहितीसह फॉलो-अप ईमेल पाठवू शकता.
Export approved applicants to Klaviyo टेम्पलेट तुम्हाला स्वीकारण्यात आलेल्या क्रिएटरच्या ईमेलची माहिती आपोआप Klaviyo सेगमेंटमध्ये पाठवण्याची अनुमती देते, जेणेकरून तुम्ही Klaviyo द्वारे ईमेल पाठवू शकता. तुम्ही Klaviyo ची Create a Campaign कृतीदेखील वापरू शकता. तुम्हाला जो ईमेल पाठवायचा आहे, तो वर्कफ्लो अॅक्टिव्ह होण्यापूर्वी Klaviyo मध्ये तयार केलेला असावा.
क्रिएटर्सना ईमेल करण्यासाठी मी Flow चा आणखी कोणत्या प्रकारे वापर करू शकतो?
तुमच्या क्रिएटरची संपर्क माहिती Flow द्वारे Klayvio सारख्या संवादाच्या ॲपमध्ये जोडल्यानंतर, तुम्ही कधीही क्रिएटर-विशिष्ट मोहिमा चालवू शकता. पुढील सर्वोत्तम पद्धतींचे पुनरावलोकन करा:
- तुमच्या क्रिएटर्सना तुमचे ग्राहक समजा.
- तुमच्या ब्रँडबद्दल काय चालले आहे हे क्रिएटर्सना माहिती असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही नवीन लॉन्च आणि आगामी सेलसाठी तयार करत असलेल्या मार्केटिंग सामग्रीचा जास्तीत जास्त फायदा घ्या, आणि त्यांना त्याप्रमाणे ईमेल पाठवा. तुम्ही उत्पादन लॉन्च ईमेलमधील ॲसेट पुन्हा वापरू शकता आणि तुम्ही लॉन्च करण्याच्या एक आठवडा आधी काय येत आहे याचे क्रिएटर्सना प्रिव्ह्यू देण्यासाठी तुमच्या मेसेजिंगमध्ये थोडा बदल करू शकता. तुमच्या नवीन उत्पादनासाठी ते आणत असलेल्या प्रत्येक विक्रीवर त्यांना कमिशन मिळते, याची तुम्ही त्यांना आठवणही करून देऊ शकता.
- क्रिएटर-विशिष्ट मोहिमा किंवा मासिक न्यूजलेटर तयार करा.
- नवीन उत्पादन किंवा मोहिमेबद्दल पडद्यामागील सामग्री शेअर करण्यासाठी, इतर क्रिएटर्सकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या काही पोस्ट एकत्र करण्यासाठी किंवा तुमच्या ब्रँडबद्दल सामग्री तयार करण्यात मदत करू शकणार्या आगामी सुट्ट्या शेअर करण्यासाठी क्रिएटर-विशिष्ट मोहिमा तयार केल्याने तुम्ही त्यांच्या नेहमी लक्षात राहाल.
मी Collabs x Flow इंटिग्रेशनचा वापर इतर कोणत्या प्रकारे करू शकेन?
वापरण्यास तयार असलेल्या टेम्पलेट्सव्यतिरिक्त, उपलब्ध ट्रिगर्स आणि कृतींचा वापर करून तुम्ही Collabs वरील ॲक्टिव्हिटी तुमच्या इतर ॲप्सशी जोडण्यासाठी कस्टम वर्कफ्लो सेट करू शकता. काही उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- तुमचा अनबॉक्सिंग अनुभव खास बनवा.
- Collabs शी संबंधित सर्व ऑर्डर्सवर किंवा रिडीम केलेल्या सर्व Collabs भेटवस्तूंवर टॅग जोडण्यासाठी वर्कफ्लो सेट करा, जेणेकरून तुमच्या फुलफिलमेंट केंद्राला त्या ऑर्डर्स काळजीपूर्वक हाताळण्याविषयी सूचित करता येईल. प्राप्तकर्त्याचा अनबॉक्सिंग अनुभव सुधारण्यासाठी, तुम्ही खरेदीसह भेटवस्तू जोडण्यासाठी, गिफ्ट रॅपिंग जोडण्यासाठी किंवा पर्सनलाईझ केलेली नोंद जोडण्यासाठी ऑर्डर अपडेट करण्यासाठी कृती तयार करू शकता. तुम्ही ऑर्डरच्या ॲट्रिब्युट (क्रिएटरने मिळवलेल्या ऑर्डर्ससाठी) किंवा भेटवस्तूचा दावा केलेल्या (क्रिएटरच्या भेटवस्तूसाठी) Collabs-विशिष्ट ट्रिगर्समध्ये update order note ही कृती जोडून असे करू शकता.
- Collabs वर काय चालले आहे याबद्दल तुमच्या टीमला सूचित करा.
- जेव्हाही नवीन क्रिएटर तुमच्या प्रोग्रामसाठी अर्ज करतो किंवा विक्री करतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या टीमला Slack वर पिंग करणारा वर्कफ्लो सेट करा. टीमच्या टास्कबाबत अपडेट राहण्यासाठी, तुमच्या टीमच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरशी Collabs कनेक्ट करून तुम्ही व्यवस्थित संघटितदेखील राहू शकता. कोणत्याही Collabs-विशिष्ट ट्रिगर आणि Connectors in Shopify Flow वापरून तुम्ही हे सेट करू शकता.