Collabs मध्ये क्रिएटर्स व्यवस्थापित करणे

तुम्ही कनेक्ट असलेल्या Collabs क्रिएटर्सना प्रोग्राममध्ये जोडून आणि त्यांनी तुमच्यासाठी जनरेट केलेले कन्व्हर्जन्स आणि विक्रीचा ट्रॅक ठेवून त्यांना व्यवस्थापित करू शकता.

तुम्ही तुमचे क्रिएटर्स आणि प्रोग्राम्स पुढील प्रकारे व्यवस्थापित करू शकता:

नवीन क्रिएटर्सना ईमेलद्वारे आमंत्रित करणे

तुम्हाला तुमच्या Collabs कम्युनिटीमध्ये ज्या क्रिएटर्सना सामील करून घ्यायचे आहे, त्यांना तुम्ही थेट आमंत्रणे पाठवू शकता. Collabs ॲपवरून थेट आमंत्रणे पाठवल्याने तुम्ही कम्युनिटीमध्ये सामील होण्याच्या ॲप्लिकेशन प्रक्रियेला वगळून, तुमच्या विश्वासातील क्रिएटर्सना झटपट ऑनबोर्ड करू शकता. क्रिएटर्सना आमंत्रणे पाठवण्यासाठी, तुमच्या Collabs ॲपच्या Recruiting विभागामध्ये जा आणि त्यानंतर Invite by email वर क्लिक करा. Recruiting creators बद्दल अधिक जाणून घ्या.

Collabs क्रिएटर प्रोफाईलचे प्रकार

तुम्ही तुमच्या Collabs ॲपमधील क्रिएटरच्या प्रोफाईलवरून त्यांच्याबद्दल अधिक तपशील पाहू शकता. त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध असलेली माहिती खालील घटकांनुसार बदलू शकते.

Collabs क्रिएटर प्रोफाईल प्रकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा.

Collabs क्रिएटर प्रोफाईलचे प्रकार
श्रेणीवर्णन
क्रिएटरकडे Collabs खाते आहे, पण त्यांना ओपन ॲक्सेस प्रोग्रामसाठी मंजुरी मिळालेली नाहीया क्रिएटर्सना प्लॅटफॉर्मची माहिती आहे, पण त्यांना ओपन ॲक्सेस प्रोग्रामसाठी मंजुरी मिळालेली नाही. त्यांचा संपर्क ईमेल, वय, लिंग, ठिकाण आणि पसंतीच्या श्रेणी यांसारखी माहिती त्यांनीच भरलेली असते.
क्रिएटरकडे Collabs खाते आहे आणि ते ओपन ॲक्सेस प्रोग्रामचा भाग आहेतया क्रिएटर्सना Collabs आणि ओपन ॲक्सेस प्रोग्रामची माहिती आहे. त्यांचा संपर्क ईमेल, वय, लिंग, ठिकाण आणि पसंतीच्या श्रेणी यांसारखी माहिती त्यांनीच भरलेली असते.
क्रिएटरकडे Collabs खाते नाहीया क्रिएटर्सनी Collabs साठी साइन अप केलेले नाही. त्यांची सोशल मीडिया खाती आणि ईमेल ॲड्रेस यांसारखी मूलभूत माहिती उपलब्ध असू शकते.

क्रिएटरच्या कामगिरीचा ट्रॅक ठेवणे

तुम्ही तुमच्या सर्व Collabs च्या एकूण कामगिरीच्या डेटाचा तसेच वैयक्तिक क्रिएटर्सच्या भेटी, विक्री आणि कन्व्हर्जन दरांसंबंधित ॲनालिटिक्सचा ट्रॅक ठेवू शकता.

एकूण कामगिरी

एकूण कोलॅबोरेशन ॲनालिटिक्स Collabs ॲप होमपेजच्या Performance विभागामध्ये प्रदर्शित होतात आणि त्यामध्ये खालील डेटाचा समावेश असतो:

  • विक्री: अफिलिएट लिंक्स किंवा कोडसह केलेल्या ऑर्डर्सची एकूण विक्री रक्कम.
  • ऑर्डर्स: अफिलिएट लिंक्स किंवा कोडसह केलेल्या ऑर्डर्सची एकूण संख्या.
  • कमिशन: अफिलिएट विक्रीवरील एकूण कमिशन.
  • गिफ्ट केलेले मूल्य: पाठवलेल्या आणि रिडीम केलेल्या गिफ्ट्सचे एकूण मूल्य.

या विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे क्रिएटर्स आणि उत्कृष्ट कामगिरी करणारी उत्पादने यांच्या सूचींचाही समावेश आहे.

डीफॉल्टनुसार, मागील 30 दिवसांचा डेटा प्रदर्शित होतो, पण तुम्ही तारीख निवडकवर क्लिक करून तारीख श्रेणी सेट करू शकता. सुरुवातीच्या आणि शेवटच्या तारखा सेट करा आणि त्यानंतर नवीन तारीख श्रेणीची खात्री करण्यासाठी Apply वर क्लिक करा.

कामगिरीच्या डेटामध्ये Sales आणि Gifts history साठीच्या विस्तारित अहवालांच्या लिंक्सचादेखील समावेश असतो. हे विस्तारित अहवाल पाहण्यासाठी, Sales किंवा Gifted value ॲनालिटिक्सच्या बाजूला असलेल्या View report ॲनालिटिक्स आयकनवर क्लिक करा.

Collabs अहवाल

विक्री आणि गिफ्ट ॲनालिटिक्ससंबंधित अधिक तपशील देण्यासाठी Collabs मध्ये अतिरिक्त विस्तारित अहवालांचा समावेश आहे.

Sales अहवाल तुमच्या क्रिएटर्सच्या वेळेनुसार विक्री आणि कमिशनची मूल्ये प्रदर्शित करतो. यामध्ये तारीख श्रेणीसाठीच्या ऑर्डर्सच्या एकूण संख्येचाही समावेश असतो. हा अहवाल एक्सपोर्ट करण्यासाठी, Export वर क्लिक करा.

तुम्ही Sales अहवालावर खालील फिल्टर्स लागू करू शकता:

  • तारीख श्रेणी
  • प्रोग्रामचे नाव
  • प्रोग्रामचा टियर

Gifts history अहवाल गिफ्ट्सची एकूण संख्या आणि एकूण गिफ्ट मूल्य, तसेच प्रलंबित आणि रिडीम केलेल्या गिफ्ट्सची संख्या प्रदर्शित करतो.

तुम्ही Gifts history अहवालावर खालील फिल्टर्स लागू करू शकता:

  • तारीख श्रेणी
  • क्रिएटरचे नाव
  • गिफ्ट
  • स्थिती, ज्यामध्ये गिफ्ट पाठवले होते, रिडीम केले होते, त्याची पूर्तता केली होती की ते रद्द केले होते याचा समावेश असतो

क्रिएटरनुसार ॲनालिटिक्स पाहणे

तुम्ही एखाद्या क्रिएटरच्या प्रोफाईलवरून वैयक्तिक क्रिएटर्सचे ॲनालिटिक्स पाहू शकता. Collabs ॲपमधून, Connections वर जा आणि त्यानंतर क्रिएटरच्या नावावर क्लिक करा. Collab performance विभागामध्ये खालील ॲनालिटिक्स प्रदर्शित होतात:

  • विक्री: क्रिएटरच्या लिंक्स किंवा कोडसह केलेल्या ऑर्डर्सची एकूण विक्री रक्कम.
  • ऑर्डर्स: क्रिएटरच्या लिंक्स किंवा कोडसह केलेल्या ऑर्डर्सची एकूण संख्या.
  • भेटी: क्रिएटरच्या लिंक्स किंवा कोडवरून दिलेल्या भेटींची एकूण संख्या.
  • कन्व्हर्जन्स: विक्रीसाठी भेटींचा कन्व्हर्जन दर, टक्केवारी म्हणून.

फक्त त्या क्रिएटरचा प्रदर्शित झालेला डेटा असलेला विस्तारित Sales अहवाल पाहण्यासाठी, View report ॲनालिटिक्स आयकनवर क्लिक करा.