Launchpad पर्याय

तुम्ही फक्त शीर्षक, सुरुवातीची तारीख आणि वेळ देऊन इव्हेंट तयार करू शकता. इतर सर्व इव्हेंटचे पर्याय ऐच्छिक आहेत. Launchpad पर्याय समजून घेतल्याने तुम्हाला तुमच्या मोहिमेच्या लक्ष्यांशी जुळण्यासाठी इव्हेंट सानुकूलित करण्यात आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रभाव पाडण्यात मदत होऊ शकते.

तुमची ऑनलाइन स्टोअर थीम सानुकूलित करा

इव्हेंटच्या कालावधीत तुमच्या ऑनलाइन स्टोअरची थीम बदलेल असा इव्हेंट तुम्ही तयार करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला मोहिमेशी संबंधित जाहिराती वापरायच्या असतील, तर त्या तुमच्या इव्हेंटच्या थीममध्ये जोडा. तुम्ही तुमच्या इव्हेंटच्या कालावधीसाठी वेगळी मेनू रचना, होम पेज लेआउट आणि इमेज वापरण्यासाठी तुमची इव्हेंट थीम सानुकूलित करू शकता.

पायऱ्या:

  1. इव्हेंटसाठी तुम्हाला तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये करायच्या असलेल्या सर्व बदलांसह इव्हेंट-विशिष्ट थीम तयार करा. तुम्ही तुमच्या सध्याच्या थीमची डुप्लिकेट बनवू शकता आणि इव्हेंटच्या थीमसाठी आधार म्हणून तिचा वापर करू शकता.
  2. Launchpad मध्ये इव्हेंट तयार करा, थीम बदलणे सुरू करा निवडा आणि त्यानंतर इव्हेंट दरम्यान वापरण्याची थीम व इव्हेंटनंतर वापरण्याची दुसरी थीम निवडा.

शेवटची तारीख नमूद करा

तुम्ही इव्हेंट तयार करता तेव्हा त्याच्या शेवटची तारीख आणि वेळ शेड्यूल करू शकता. तुम्ही शेवटची तारीख न भरल्यास, तुम्हाला डॅशबोर्ड पेजवरून इव्हेंट मॅन्युअली संपवावा लागेल. इव्हेंट कसा संपवायचा हे जाणून घेण्यासाठी, इव्हेंट संपवणे पहा.

इव्हेंटपूर्वी तुमचे ऑनलाइन स्टोअर लॉक करा

इव्हेंट सुरू होण्यापूर्वी तुम्ही काही काळासाठी ग्राहकांना तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधून तात्पुरते लॉक करू शकता. उदाहरणार्थ, उत्सुकता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना इव्हेंटपूर्वी त्यांचे कार्ट भरण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमचे स्टोअर लॉक करू शकता.

पायऱ्या:

  1. तुम्हाला तुमच्या ग्राहकांना कोणते पासवर्ड पेज दाखवायचे आहे ते ठरवा. तुम्ही तुमच्या थीमचे डीफॉल्ट पासवर्ड पेज वापरू शकता किंवा तुमचे पेज सानुकूलित करू शकता.
  2. Launchpad मध्ये इव्हेंट तयार करा आणि पासवर्ड पेज सुरू करा निवडा.

तुमचे ऑनलाइन स्टोअर इव्हेंटपूर्वी तुम्ही निवडलेल्या वेळेसाठी लॉक केले जाईल आणि त्यानंतर इव्हेंट सुरू झाल्यावर आपोआप अनलॉक होईल.