Launchpad इव्हेंटच्या आधी, दरम्यान आणि नंतर केलेले बदल

Launchpad इव्हेंटदरम्यान तुमच्या विक्री चॅनेल्सवर होऊ शकणाऱ्या बदलांबद्दल जाणून घ्या.

इव्हेंटच्या आधी केलेले बदल

तुम्ही इव्हेंटपूर्वी तुमचे ऑनलाइन स्टोअर लॉक करण्याचे निवडल्याशिवाय, इव्हेंट सुरू होण्यापूर्वी तुमच्या स्टोअरमध्ये काहीही बदलत नाही. तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टोअर लॉक केल्यास, सेल सुरू होण्यापूर्वीच्या ठरावीक वेळेसाठी तुमचे स्टोअर तुमच्या ग्राहकांना ॲक्सेस करता येणार नाही. जेव्हा इव्हेंट सुरू होतो, तेव्हा लॉक आपोआप काढले जाते.

जेव्हा इव्हेंट सुरू होतो तेव्हा केलेले बदल

इव्हेंट सुरू झाल्यानंतर, तुम्ही त्याचे तपशील संपादित करू शकत नाही. इव्हेंट सुरू होतो त्या क्षणी तुमच्या स्टोअरच्या अनेक भागांमध्ये बदल करण्यासाठी Launchpad डिझाइन केले गेले आहे, चालू असलेल्या आधारावर नाही. तुमचा इव्हेंट सुरू झाल्यानंतर, तुम्ही केवळ समाप्ती तारीख आणि वेळ बदलू शकता.

जेव्हा तुमचा इव्हेंट सुरू होतो, तेव्हा इव्हेंटच्या कालावधीसाठी खालील वैशिष्ट्ये सुरू (enabled) केली जातात:

  • सर्व सपोर्टेड विक्री चॅनेल्सवर केल्या गेलेल्या नवीन खरेदी ट्रॅक करणे डॅशबोर्ड सुरू करतो. तुमचा इव्हेंट संपेपर्यंत किंवा चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटेपर्यंत आणि इव्हेंट सुरू असेपर्यंत डॅशबोर्ड डेटा रिपोर्ट करणे सुरू ठेवतो. तुमचा इव्हेंट चार आठवड्यांपेक्षा जास्त चालू शकतो, परंतु त्याचा डॅशबोर्ड फक्त पहिल्या चार आठवड्यांसाठी उपलब्ध असतो.

  • तुमच्या इव्हेंटमध्ये नवीन उत्पादने रिलीज करणे समाविष्ट असल्यास, तुमची उत्पादने तुम्ही निवडलेल्या विक्री चॅनेल्सवर प्रकाशित केली जातात. हा पर्याय विक्री चॅनेलवर उत्पादन उपलब्ध करून देतो. Launchpad उत्पादन स्थिती बदलत नाही.

  • तुमच्या इव्हेंटमध्ये निवडक उत्पादनांमध्ये इन्व्हेंटरी जोडणे समाविष्ट असल्यास, त्या उत्पादनांसाठी विद्यमान इन्व्हेंटरी वाढवली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही 150 लाल शूज जोडण्यासाठी इव्हेंट तयार करता. इव्हेंट सुरू होण्यापूर्वी, इन्व्हेंटरीमध्ये 50 लाल शूज असतात. इव्हेंट सुरू झाल्यावर, इन्व्हेंटरी आता 200 शूज इतकी होते.

  • तुमच्या इव्हेंटमध्ये उत्पादने किंवा संग्रहांवर सेल चालवणे समाविष्ट असल्यास, त्या सवलतीच्या किंमती तुमच्या ऑनलाइन स्टोअर आणि इतर विक्री चॅनेल्समध्ये दिसतात. तुमच्या उत्पादनांच्या तुलनात्मक किंमती असल्यास, ही मूल्ये उत्पादनांच्या नियमित, सेलपूर्व किंमतींमध्ये बदलतात.

  • इव्हेंटपूर्वी तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टोअर लॉक करणे निवडले असल्यास, सेल सुरू झाल्यावर लॉक काढले जाते आणि तुमचे स्टोअर तुमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध होते.

  • तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी इव्हेंट-विशिष्ट थीम वापरणे निवडले असल्यास, इव्हेंटच्या कालावधीसाठी ही थीम वापरली जाते.

इव्हेंट संपल्यावर केले जाणारे बदल

इव्हेंट संपल्यावर, खालील बदल केले जातात:

  • डॅशबोर्ड इव्हेंट डेटा ट्रॅक करणे थांबवतो.

  • इव्हेंटद्वारे विक्री चॅनेल्सवर रिलीज केलेली (उपलब्ध केलेली) कोणतीही उत्पादने त्या चॅनेल्सवर प्रकाशित राहतात. उदाहरणार्थ, तुम्ही ऑनलाइन स्टोअरवर शूज प्रकाशित करणारा इव्हेंट तयार केल्यास, हे शूज सेलच्या शेवटी ऑनलाइन स्टोअरमध्ये अजूनही उपलब्ध असतात.

  • सेल संपल्यावर इन्व्हेंटरीची रक्कम ॲडजस्ट केली जात नाही. अधिक माहितीसाठी, इन्व्हेंटरीमधील वाढ स्वयंचलित करा पहा.

  • इव्हेंटसाठी तुमच्या उत्पादनांना किंवा संग्रहांना लागू केलेले कोणतेही सेल किंवा सवलती सर्व विक्री चॅनेल्सवरून नाहीशा होतात. उदाहरणार्थ, तुमच्या इव्हेंटने शूजवर 50% सवलत दिल्यास, सेलच्या शेवटी हे शूज त्यांच्या नियमित किंमतीत ऑफर केले जातात. त्याचप्रमाणे, तुमच्या उत्पादनांच्या तुलनात्मक किंमती असल्यास, ही मूल्ये परत त्यांच्या सेलपूर्व मूल्यांमध्ये बदलली जातात.

  • तुम्ही इव्हेंटसाठी तुमच्या ऑनलाइन स्टोअरची थीम बदलली असल्यास, ही थीम तुम्ही निवडलेल्या इव्हेंटनंतरच्या थीमने बदलली जाते.