Shopify Messaging सह मार्केटिंग ईमेल्स लिहिण्यासाठी सर्वोत्तम पद्धती

प्रभावी मार्केटिंग ईमेल्स लिहिण्यामध्ये आकर्षक सामग्री तयार करणे समाविष्ट असते, जे तुमच्या सबस्क्रायबर्सना गुंतवून ठेवते आणि त्यांना तुमच्या स्टोअरला भेट देण्यास प्रवृत्त करते. आकर्षक विषय ओळी (सब्जेक्ट लाइन्स) आणि वैयक्तिकृत ईमेल कॉपी तयार करण्यापासून ते योग्य कॉन्ट्रास्ट आणि ब्रँडिंगसह अ‍ॅक्सेसिबल ईमेल्स डिझाइन करण्यापर्यंत, तुम्ही तुमची सामग्री ज्या पद्धतीने लिहिता आणि सादर करता त्याचा परिणाम ग्राहक तुमचे ईमेल्स उघडतात, वाचतात आणि त्यावर कृती करतात की नाही यावर होतो.

या पेजवर Shopify Messaging मार्केटिंग ईमेल्स लिहिण्याच्या सर्वोत्तम पद्धती दिल्या आहेत, ज्यामध्ये कोणती सामग्री समाविष्ट करावी, तुमचा ब्रँड प्रतिबिंबित करणारे ईमेल्स कसे डिझाइन करावे आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी आणि कायदेशीर आवश्यकतांचा समावेश आहे.

ईमेल मार्केटिंग मोहिमेच्या सामग्रीसाठी सर्वोत्तम पद्धती

तुमच्या ईमेल मोहिमांमध्ये काय समाविष्ट करायचे याविषयीच्या खालील टिप्स पहा:

  • तुमच्या ब्रँडशी जुळणारे ईमेल्स पाठवा. उदाहरणार्थ, नवीन उत्पादने किंवा सेलविषयीच्या घोषणा. जर तुम्हाला काय पाठवायचे याची खात्री नसेल, तर तुम्ही सबस्क्राईब केलेले ईमेल्स तपासा, त्यातील कोणती गोष्ट उठून दिसते याची नोंद घ्या आणि तुमच्या स्टोअरशी जुळणारे पर्याय निवडा. अधिक कल्पनांसाठी, Shopify ब्लॉगच्या ईमेल मार्केटिंग विभागाचा संदर्भ घ्या.
  • जर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्सना यापूर्वी ईमेल मोहीम पाठवली नसेल, तर तुमची ओळख करून देण्यासाठी आणि तुमच्या ग्राहकांशी नातेसंबंध जोडण्यास सुरुवात करण्यासाठी एक स्वागत ईमेल तयार करा. तुमच्या स्वागत ईमेलमध्ये, तुम्ही कोण आहात हे ग्राहकांना सांगू शकता, तुमच्या स्टोअरची जाहिरात करू शकता, ग्राहकांना तुमचा ब्रँड का आवडतो याची आठवण करून देण्यासाठी तुमचे सर्वात लोकप्रिय उत्पादन प्रदर्शित करू शकता किंवा त्यांना काहीतरी नवीन शोधण्यात मदत करू शकता. फक्त नवीन सबस्क्रायबर्सना ईमेल करण्यासाठी तुम्ही ग्राहक पेजवर एक युनिक सबस्क्रायबर ग्राहक विभागदेखील तयार करू शकता.
  • तुमच्या ईमेल मोहिमेचा उद्देश सबस्क्रायबर्सना तुमच्या स्टोअरला भेट देण्यास प्रवृत्त करणे हा आहे. कमीत कमी एक लिंक समाविष्ट करा ज्यावर क्लिक करून सबस्क्रायबर्स तुमच्या स्टोअरवर जाऊ शकतील.
  • तुमच्या स्टोअरच्या सोशल मीडिया साइट्सच्या लिंक्स समाविष्ट करा. यामुळे ग्राहकांना ईमेलव्यतिरिक्त तुमच्या ब्रँडच्या संपर्कात कुठे राहता येईल हे जाणून घेण्यास मदत होते.

प्रभावी ईमेल सामग्री लिहिण्यासाठीच्या टिप्स

तुमची ईमेल सामग्री लिहिताना खालील टिप्स लक्षात घ्या:

  • तुमच्या अपेक्षित प्रेक्षकांना जाणून घ्या आणि त्यानुसार तुमच्या भाषेमध्ये बदल करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तरुण प्रेक्षकांसाठी लिहित असाल, तर त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी तुमच्या टोनमध्ये बदल करा.
  • अधिक प्रतिबद्धता आकर्षित करण्यासाठी आणि कन्व्हर्जन दर सुधारण्यासाठी तुमच्या ईमेलच्या मुख्य भागामध्ये (बॉडीमध्ये) वैयक्तिकृत मजकूर समाविष्ट करा. वैयक्तिकीकरणामुळे तुमचे ईमेल्स ग्राहकाला अधिक त्यांच्यासाठीच तयार केलेले वाटतात.
  • जाहिरातीची किंवा महत्त्वाची माहिती तुमच्या ईमेलच्या वरच्या भागात ठेवा. मोबाइलवर, ती पहिल्या दोन स्क्रोलच्या आत ठेवा जेणेकरून वाचकांना ती पटकन पाहता येईल.
  • ईमेल्स 200 शब्दांच्या किंवा सुमारे 20 ओळींच्या आत ठेवा. लांब ईमेल्स प्रदात्यांद्वारे कापले (कट केले) जाऊ शकतात. उदाहरणार्थ, Gmail 102 KB च्या पलीकडची सामग्री लपवते, त्यामुळे तुमचा मेसेज खूप लांब असल्यास त्याचा केवळ काही भागच दिसू शकतो.
  • केवळ कॅपिटल अक्षरे किंवा अत्याधिक उद्गारवाचक चिन्हे वापरणे टाळा आणि तुमचे ईमेल्स मोठ्या प्रेक्षकांसाठी अ‍ॅक्सेसिबल राहण्यास मदत करण्यासाठी 8वीच्या वाचन पातळीवर लिहा.

तुमच्या सबस्क्रायबर्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी विषय ओळीचा (सब्जेक्ट लाइनचा) वापर करणे

सबस्क्रायबर्स सर्वात आधी तुमची विषय ओळ (सब्जेक्ट लाइन) आणि प्रिव्ह्यू टेक्स्ट वाचतात, जे बऱ्याचदा तुमचा ईमेल उघडायचा की हटवायचा हे ठरवतात. सब्जेक्ट लाइन्स आणि प्रिव्ह्यू टेक्स्टसाठी खालील सर्वोत्तम पद्धतींचा विचार करा:

  • प्रथम तुमचा ईमेल तयार करा आणि नंतर शेवटची पायरी म्हणून सब्जेक्ट लाइन आणि प्रिव्ह्यू टेक्स्ट जोडा जेणेकरून ते ईमेल सामग्रीशी जुळतील.
  • तुमची सब्जेक्ट लाइन सामग्रीशी सुसंगत आणि वाचकांना तुमचा ईमेल उघडण्याची इच्छा होईल इतकी आकर्षक बनवा.
  • प्रिव्ह्यू टेक्स्ट समाविष्ट केल्याची खात्री करा. प्रिव्ह्यू टेक्स्ट सर्वात प्रभावी तेव्हाच असते जेव्हा ते वाचकांना कृती करण्यास प्रोत्साहित करते.
  • तुमच्या विषय ओळीपेक्षा वेगळा, पण त्याला पूरक असलेला प्रिव्ह्यू मजकूर वापरा. ईमेल कशाबद्दल आहे हे वाचकांना या दोन्हीमधून समजले पाहिजे. उदाहरणासाठी, Check out our new spring gear ही विषय ओळ वापरा आणि त्यासोबत Don't miss out on 10% off shorts, tanks, and more for the warm weather ahead. असा प्रिव्ह्यू मजकूर वापरा.
  • तुमची विषय ओळ 3 ते 6 शब्दांच्या दरम्यान किंवा 50 वर्णांपेक्षा कमी ठेवा. यामुळे वाचक मोबाइल उपकरणावर ईमेल तपासत असतानाही विषय ओळ वाचू शकतात.

ईमेल मार्केटिंग मोहिमेची वेळ आणि वारंवारता

  • सबस्क्रायबर्सना गुंतवून ठेवण्यासाठी महिन्याला किमान एक वेळा ईमेल करा. वाचकांना नियमितपणे नवीन सामग्री मिळावी आणि त्यांना तुमच्या स्टोअरला भेट देण्याची आठवण राहावी, यासाठी पाठवल्या जाणार्‍या ईमेल किंवा अपडेट्सचे नियोजन करण्यासाठी कॅलेंडर वापरा. खूप जास्त वेळा ईमेल केल्याने सबस्क्रायबर्सचा रस कमी होऊ शकतो.
  • तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्सना ईमेल संदेश पाठवण्यापूर्वी, लिंकची गंतव्यस्थाने आणि सवलतीचे तपशील योग्य आहेत याची पडताळणी करण्यासाठी स्वतःला एक चाचणी ईमेल पाठवा.

तुमच्या ईमेल मार्केटिंग मोहिमा डिझाइन करणे

सुसंगत डिझाइनमुळे विश्वास वाढतो आणि वाचकांना तुमचा ब्रँड ओळखण्यात मदत होते. समान रंग, फॉन्ट आणि लोगो वापरून तुमचे ईमेल तुमच्या स्टोअरशी जुळवा.

सानुकूल प्रेषक ईमेल अ‍ॅड्रेसमुळे वितरणक्षमता सुधारते आणि ब्रँडची ओळख वाढते. तुमचा प्रेषक ईमेल अ‍ॅड्रेस बदलण्याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही प्रतिमा जोडत असल्यास, त्या तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये जे विकता त्याच्याशी संबंधित असाव्यात. Shopify आपोआप उत्पादन प्रतिमा आणि संग्रह प्रतिमा मिळवते, पण तुमचे स्टोअर कशावर आधारित आहे याची माहिती वाचकांना देणाऱ्या प्रतिमा देखील तुम्ही जोडू शकता. तुमच्या ईमेल किंवा ऑनलाइन स्टोअरसाठी वापरण्यासाठीच्या स्टॉक फोटोग्राफीसाठी, Shopify च्या स्टॉक फोटो लायब्ररीचा संदर्भ घ्या.

तथापि, काही ईमेल क्लायंट त्यांच्या ईमेलमधील प्रतिमा निष्क्रिय करत असल्यामुळे, तुम्ही तुमच्या ईमेलसाठी महत्त्वाचा असलेला मजकूर दाखवण्यासाठी प्रतिमा वापरणे टाळावे. उदाहरणासाठी, केवळ 50% off असा मजकूर असलेल्या प्रतिमेद्वारे सेलची जाहिरात करू नका, कारण ग्राहकाच्या ईमेल क्लायंटद्वारे ती प्रतिमा ब्लॉक केली जाऊ शकते.

तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही प्रतिमांसाठी, ऑल्ट मजकूर समाविष्ट करा जेणेकरून तुमचे ईमेल अ‍ॅक्सेस करण्यायोग्य राहतील. वाचकांना तिथे नेव्हिगेट करता यावे, यासाठी तुमच्या स्टोअरवरील संबंधित सामग्रीला प्रतिमा लिंक करा.

ईमेल ॲक्सेसिबिलिटी आणि कॉन्ट्रास्ट

दृष्टीदोष असलेल्या वाचकांसह सर्व वाचकांना तुमचे ईमेल अ‍ॅक्सेस करता येतील याची खात्री करण्यासाठी, तुम्ही तुमच्या ईमेल डिझाइनमध्ये योग्य रंग कॉन्ट्रास्ट राखला पाहिजे. अनसबस्क्राइब लिंक आणि इतर मजकूर घटकांचे त्यांच्या बॅकग्राउंडच्या रंगाशी किमान 4.5:1 चे कॉन्ट्रास्ट गुणोत्तर असावे. तुम्ही ऑनलाइन कॉन्ट्रास्ट तपासणी टूल्स वापरून कॉन्ट्रास्ट गुणोत्तर तपासू शकता.

जर तुम्हाला ईमेल तयार करताना कॉन्ट्रास्टविषयीची चेतावणी मिळाली (जसे की अनसबस्क्राइब करा लिंकच्या रंगाचा कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट करा), तर तुम्ही तुमच्या टेम्पलेट ब्रँडिंगमध्ये रंग अ‍ॅडजस्ट करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनवरून, अ‍ॅप्स > Messaging वर जा.

  2. टेम्पलेट्स वर क्लिक करा आणि त्यानंतर ब्रँडिंग व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. जोपर्यंत रंग कॉन्ट्रास्टच्या आवश्यकतांची पूर्तता करत नाहीत, तोपर्यंत ते अ‍ॅडजस्ट करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

मजकुराच्या ॲक्सेसिबिलिटीविषयी अधिक जाणून घ्या.

तुमच्या ईमेल मार्केटिंग मोहिमांसाठी टेम्पलेट ब्रँडिंग

तुमच्या सर्व Shopify Messaging मोहीम टेम्पलेट्सला सानुकूलित करण्यासाठी आणि त्यांना डीफॉल्ट शैली लागू करण्यासाठी तुम्ही टेम्पलेट ब्रँडिंग वापरू शकता. डीफॉल्टनुसार, टेम्पलेट ब्रँडिंग हे ब्रँड सेटिंग्जशी आणि तुमच्या Shopify ॲडमिनच्या सामान्य सेटिंग्जच्या स्टोअरचे संपर्क तपशील विभागातील तुमच्या स्टोअरच्या नावाशी जुळते.

तुम्ही स्वतंत्र ईमेल टेम्पलेट ब्रँडिंगपेक्षा वेगळे दिसण्यासाठी सानुकूलित करू शकता. उदाहरणासाठी, तुम्हाला एखाद्या अल्प-मुदतीच्या मोहिमेसाठी किंवा सुट्टीच्या-थीमवर आधारित असलेल्या मोहिमेसाठी तुमचे ईमेल ब्रँडिंग वेगळे ठेवायचे असेल.

तुमच्या डीफॉल्ट टेम्पलेट ब्रँडिंगमध्ये बदल करा

जेव्हा तुम्ही तुमच्या स्टोअरचे टेम्पलेट ब्रँडिंग संपादित करता, तेव्हा ते बदल तुम्ही भविष्यात वापरणार असलेल्या सर्व ईमेल टेम्पलेट्सला लागू होतात. तुम्ही रंग, फॉन्ट आणि तुमच्या ईमेल हेडरमधील लोगो किंवा स्टोअरचे नाव सानुकूलित करू शकता. जेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल मोहिमा तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या शैलींपेक्षा वेगळ्या (उदाहरणासाठी, हंगामी मोहिमांसाठी) ठेवायच्या असतील, तेव्हा तुम्ही तुमच्या टेम्पलेट ब्रँडिंगमध्ये बदल करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनवरून, अ‍ॅप्स > Messaging वर जा.

  2. टेम्पलेट्स वर क्लिक करा आणि त्यानंतर ब्रँडिंग व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. टेम्पलेट सानुकूलित करा. रंग आणि फॉन्ट कसे दिसतात हे तपासण्यासाठी पेजवरील टेम्पलेट प्रिव्ह्यूचा वापर करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

तुमच्या मार्केटिंग ईमेलमध्ये टपाल अ‍ॅड्रेस समाविष्ट करणे

तुम्ही कोठे आहात यावर अवलंबून, तुम्हाला तुमच्या जाहिरातविषयक ईमेल्समध्ये प्रत्यक्ष टपाल अ‍ॅड्रेस समाविष्ट करण्याची आवश्यकता असू शकते. युनायटेड स्टेट्समधील CAN-SPAM कायदा आणि कॅनडामधील CASL कायदे/PIPEDA ही या कायद्यांची उदाहरणे आहेत. मोठ्या प्रमाणात पाठवले जाणारे अनपेक्षित ईमेल्ससारख्या ईमेल मार्केटिंग आणि स्पॅमशी संबंधित नियम आणि कायदे तुमच्या ठिकाणानुसार बदलतात. तुम्ही ईमेल मार्केटिंग मोहीम सुरू करण्यापूर्वी तुमच्या प्रदेशातील, राज्यातील आणि देशातील कायद्यांशी परिचित असल्याची खात्री करा.

डीफॉल्टनुसार, तुमच्या स्टोअरचा अ‍ॅड्रेस तुमच्या ईमेलच्या फुटरमध्ये समाविष्ट केलेला असतो. तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये तुमच्या स्टोअरचा अ‍ॅड्रेस शेअर करणे सुरक्षित वाटत नसल्यास, तुम्ही तुमचा टपाल अ‍ॅड्रेस म्हणून वापरण्यासाठी तुमच्या स्थानिक पोस्ट ऑफिस किंवा UPS स्टोअरमधून पीओ बॉक्स भाड्याने घेऊ शकता. तुमच्या ईमेल्समधील टपाल अ‍ॅड्रेस बदलण्यासाठी, तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये सेटिंग्ज > सामान्य वर जा आणि तुमच्या स्टोअरचा अ‍ॅड्रेस म्हणून तुमचा पीओ बॉक्स अ‍ॅड्रेस भरा.