SMS मार्केटिंग मोहिमा पाठवण्यासाठीच्या आवश्यकता आणि मार्गदर्शक तत्त्वे

Shopify Messaging द्वारे SMS मार्केटिंग मोहिमा पाठवण्यापूर्वी, तुमचे स्टोअर खालील आवश्यकता पूर्ण करत असल्याची आणि तुमच्या मेसेजमधील आशय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याची खात्री करा. या आवश्यकतांमुळे तुम्हाला नियमांचे पालन करण्यास मदत होते आणि तुमच्या मोहिमा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री मिळते. या आवश्यकता पूर्ण केल्याने वाहकांसोबतची तुमची प्रतिष्ठादेखील जपली जाते. वाहक मेसेजेस कसे फिल्टर करतात आणि तुमचे मेसेजेस ग्राहकांपर्यंत पोहोचत राहतील हे कसे सुनिश्चित करावे हे जाणून घेण्यासाठी, तुमची SMS वितरणक्षमता वाढवणे आणि राखणे (Building and maintaining your SMS deliverability) याचा संदर्भ घ्या.

SMS मार्केटिंग मोहिमा पाठवण्यासाठीच्या आवश्यकता

Shopify Messaging चा वापर करून SMS मार्केटिंग मोहिमा तयार करण्यासाठी, तुमच्या स्टोअरने खालील आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत:

प्रदेश-विशिष्ट आवश्यकता

काही प्रदेशांमधील ग्राहकांना SMS मार्केटिंग मोहिमा पाठवण्यासाठी अतिरिक्त आवश्यकता आहेत. खालील प्रदेश-विशिष्ट आवश्यकतांचे पुनरावलोकन करा:

SMS मार्केटिंग मोहिमांसाठी समर्थित प्राप्तकर्ता देश

जोपर्यंत तुमचे स्टोअर SMS मार्केटिंग मोहिमा पाठवण्याच्या आवश्यकतांची पूर्तता करत आहे, तोपर्यंत त्याच्या ठिकाणासाठी कोणत्याही विशिष्ट देशाच्या आवश्यकता नाहीत. तरीही, तुम्ही फक्त खालील देशांमधील ग्राहकांनाच SMS मार्केटिंग मेसेज पाठवू शकता:

  • ऑस्ट्रिया (थांबवले आहे)
  • कॅनडा
  • डेन्मार्क
  • फिनलंड
  • इटली
  • लक्झेंबर्ग
  • पोलंड
  • पोर्तुगाल
  • स्पेन (थांबवले आहे)
  • स्वीडन
  • युनायटेड किंगडम (UK)
  • युनायटेड स्टेट्स (US), पोर्तो रिको वगळून

SMS मार्केटिंग मोहिमांसाठी देश सेट करण्याविषयी अधिक जाणून घ्या. तुम्हाला सपोर्ट नसलेल्या देशांमधील ग्राहकांना SMS मार्केटिंग मेसेज पाठवायचे असल्यास, तृतीय-पक्ष ॲप वापरण्याचा विचार करा.

SMS मार्केटिंग मोहिमांसाठीची सामग्री मार्गदर्शक तत्त्वे

SMS मार्केटिंग मेसेजमध्ये खालील प्रकारची सामग्री समाविष्ट करण्यास सक्त मनाई आहे:

  • मद्य: बिअर, वाइन, रम आणि इतर दारू.
  • कर्ज वसुली आणि माफी: क्रेडिट दुरुस्ती प्रोग्राम, तृतीय-पक्ष कर्ज वसुली, कर्ज एकत्रीकरण आणि कर्ज कपात.
  • शस्त्रास्त्रे: स्फोटके, शस्त्रास्त्रांचे सुटे भाग, दारूगोळा, होल्स्टर्स (कवर), टार्गेट्स, हिंसेचे चित्रण करणारी सामग्री आणि टॅक्टिकल चाकूंसारखी हत्यारे.
  • फटाके: सर्व प्रकारचे फटाके आणि संबंधित उत्पादने.
  • फसवणुकीचे मेसेज: प्राप्तकर्त्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केलेली कोणतीही सामग्री.
  • जुगार: कॅसिनो ॲप्स आणि जुगाराच्या वेबसाइट.
  • द्वेषपूर्ण सामग्री: भेदभाव करणारी, शोषक किंवा शिवराळ भाषा, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसेला प्रोत्साहन.
  • उच्च-जोखमीच्या आर्थिक सेवा: क्रिप्टोकरन्सी, देणगी साइट्सच्या लिंक्स, पेडे कर्ज, अल्प-मुदतीची उच्च-व्याजाची कर्जे, विद्यार्थी कर्जे, तृतीय-पक्ष ऑटोमोबाईल किंवा तारण कर्जे आणि कर्ज व पुनर्वित्त पर्यायांबद्दलचा सल्ला किंवा माहिती.
  • बेकायदेशीर पदार्थ: कॅनबिस, कॅनाबिडिओल (CBD), कायदेशीररीत्या ओव्हर-द-काउंटर विकली न जाणारी प्रिस्क्रिप्शन औषधे, सायकोएक्टिव्ह वनस्पती, टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC), तंबाखू, व्हेपिंग आणि संबंधित साधने.
  • घातक सामग्री: मालवेअर, व्हायरस किंवा इतर हानीकारक सॉफ्टवेअर.
  • मल्टी-लेव्हल मार्केटिंग: नेटवर्क मार्केटिंग, पिरॅमिड स्कीम्स, जोखीम गुंतवणूक प्रोग्राम्स, वर्क फ्रॉम होम स्कीम्स, "लवकर श्रीमंत व्हा", "तुमची संपत्ती वाढवा" आणि "आर्थिक स्वातंत्र्य" मिळवण्याच्या ऑफर्स.
  • अश्लील किंवा आक्षेपार्ह सामग्री: लैंगिकदृष्ट्या स्पष्ट, पोर्नोग्राफिक किंवा इतर अनुचित सामग्री.
  • राजकीय सामग्री: राजकीय जाहिराती आणि प्रचार.
  • तृतीय-पक्ष लीड जनरेशन: तृतीय पक्षांसाठी लीड्स जनरेट करण्यासाठी तयार केलेली सामग्री.