तुमच्या Shopify स्टोअरमध्ये SEO साठी कीवर्ड जोडणे
कीवर्ड हे असे शब्द किंवा वाक्ये आहेत जे लोक सर्च इंजिनमध्ये टाकतात (ज्यांना शोध क्वेरीज असेही म्हणतात). उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती blue shoes in Canada शोधू शकते. या शोधामध्ये blue shoes आणि Canada या दोन्ही कीवर्ड्सचा समावेश आहे असे मानले जाऊ शकते. तुमचे स्टोअर सर्च निकालांमध्ये वरच्या बाजूला दाखवण्यासाठी, तुम्हाला तुमचे ग्राहक तुमची उत्पादने शोधण्यासाठी वापरू शकतील असे कीवर्ड निर्धारित करणे आणि तुमच्या सामग्रीमध्ये त्या कीवर्ड्सचा समावेश करणे आवश्यक आहे.
कीवर्ड कल्पनांवर संशोधन करण्यासाठी आणि एका कीवर्डला दरमहा किती शोध मिळतात हे समजून घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन टूल्सचा वापर करू शकता. तुमची उत्पादने आणि व्यवसायासाठी विशिष्ट असलेल्या तसेच वारंवार शोधल्या जाणार्या कीवर्डला प्राधान्य द्या. हे लक्षात ठेवा की तुमच्या कीवर्ड्सला जितके अधिक ट्रॅफिक मिळेल, तितकी शोधांमध्ये तुमच्या स्टोअरला जास्त स्पर्धा असेल, त्यामुळे तुमचे स्टोअर सर्च निकालांमध्ये वरच्या बाजूस दाखवले जाणार नाही.
तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) सुधारण्यासाठी तुम्ही कीवर्ड जोडू शकता अशी चार मुख्य ठिकाणे आहेत:
- पेजची शीर्षके
- मेटा डिस्क्रिप्शन
- ALT टॅग
- पेजवरील बॉडीमधील सामग्री
या पेजवर
- पेजची शीर्षके आणि मेटा डिस्क्रिप्शन समजून घेणे
- तुमच्या पेजेस आणि स्टोअरमध्ये शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शन जोडणे
- तुमच्या पेजचे शीर्षक टॅग सुधारण्यासाठी टिप्स
- इमेज ऑल्ट मजकूर सेट करा
- पेजच्या H1 हेडरमध्ये कीवर्ड जोडा
- पेजच्या सामग्रीमध्ये कीवर्ड वापरणे
- सामान्य प्रश्न
- सर्च इंजिन लिस्टिंगमधील समस्यांचे ट्रबलशूटिंग
पेजची शीर्षके आणि मेटा डिस्क्रिप्शन समजून घेणे
शीर्षक टॅग आणि मेटा डिस्क्रिप्शन हे SEO च्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी दोन आहेत. ते सर्च इंजिन निकालांमध्ये दाखवले जातात आणि तुमच्या उत्पादनांशी संबंधित गोष्टी शोधणाऱ्या लोकांना माहिती प्रदान करतात. एक चांगले शीर्षक आणि वर्णन ग्राहकांना तुमच्या स्टोअरला भेट देण्यासाठी सर्च निकालांमधील लिंकवर क्लिक करण्यास प्रोत्साहित करते.
पेजचे शीर्षक
शीर्षक टॅग हे सर्वात मौल्यवान फील्डपैकी एक आहे जे सर्च निकालांमध्ये पेजची कामगिरी सुधारण्यासाठी तुम्ही संपादित करू शकता. शीर्षक हे सर्च इंजिन निकालांमध्ये क्लिक करण्यायोग्य लिंक म्हणून दाखवले जाते, त्यामुळे संभाव्य ग्राहकांना शीर्षक आकर्षक वाटणे आवश्यक आहे.
तुम्ही SEO साठी शीर्षक टॅग खालील प्रकारे ऑप्टिमाइझ करू शकता:
- एक युनिक, वर्णनात्मक शीर्षक वापरा.
- प्रत्येक पेजसाठी तुमचे सर्वात महत्त्वाचे टार्गेट कीवर्ड शीर्षकाच्या सुरुवातीला समाविष्ट करा.
- 60 किंवा त्याहून कमी अक्षरांचे शीर्षक टाका. बहुतांश सर्च इंजिन मोठी शीर्षके लहान करतात.
- तुमचा शीर्षक टॅग समजायला सोपा असल्याची खात्री करा.
मेटा डिस्क्रिप्शन
मेटा डिस्क्रिप्शन हा एक लहान मजकूर असतो जो सर्च इंजिन निकालांमध्ये शीर्षक टॅगच्या नंतर दिसतो. Shopify मध्ये वेबपेज, उत्पादन पेज, कलेक्शन पेज आणि ब्लॉग पोस्टसाठी मेटा डिस्क्रिप्शन सेट केले जाऊ शकते. प्रत्येक पेजसाठी एक युनिक मेटा डिस्क्रिप्शन असल्याची आणि त्यात सोपी, थेट भाषा वापरली असल्याची खात्री करा. एक चांगले वर्णन अधिक लोकांना तुमच्या स्टोअरच्या लिंकवर क्लिक करण्यास प्रोत्साहित करते.
तुमच्या पेजेस आणि स्टोअरमध्ये शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शन जोडणे
तुम्ही तुमच्या पेजेस आणि तुमच्या स्टोअरच्या होमपेजसाठी शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शन जोडू शकता. पेजचे शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शनसाठी खालील अक्षर मर्यादा आहेत:
- पेजचे शीर्षक: तुम्ही शीर्षकामध्ये 70 पर्यंत अक्षरे टाकू शकता. सर्च इंजिन निकालांमध्ये शीर्षके लहान होणे टाळण्यासाठी, तुमचे शीर्षक 60 अक्षरांपर्यंत ठेवण्याचा विचार करा. पेजच्या शीर्षकांविषयी अधिक जाणून घ्या.
- मेटा डिस्क्रिप्शन: वर्णनामध्ये 160 अक्षरे वापरण्याची शिफारस केली जाते. नवीन ग्राहकांना तुमचे पेज शोधण्यात मदत करण्यासाठी संबंधित कीवर्डचा समावेश असल्याची खात्री करा. कीवर्डच्या यादीऐवजी, नैसर्गिक आणि वाचनीय वाक्ये वापरा. मेटा डिस्क्रिप्शनविषयी अधिक जाणून घ्या.
तुम्ही अक्षर मर्यादेपलीकडे अधिक मजकूर टाकल्यास, सर्च इंजिन निकालांमध्ये तुमच्या पेजचे शीर्षक आणि वर्णन लहान केले जाते.
पेजचे शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शन संपादित करा
- तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑनलाइन स्टोअर > पृष्ठे वर जा.
- तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या पेजवर क्लिक करा.
- सर्च इंजिन लिस्टिंग प्रिव्ह्यू विभागात, वेबसाइट SEO संपादित करा वर क्लिक करा.
- पेजचे शीर्षक या फील्डमध्ये वर्णनात्मक शीर्षक टाका. हे शीर्षक सर्च इंजिन निकालांमध्ये लिंक म्हणून दाखवले जाते.
- वर्णन या फील्डमध्ये, सर्च इंजिन लिस्टिंगसाठी वर्णन टाका.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या होमपेजसाठी शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शन जोडा
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑनलाइन स्टोअर > प्राधान्ये वर जा.
सोशल शेअरिंग इमेज आणि SEO विभागात, SEO च्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करून तुमच्या स्टोअरसाठी शीर्षक आणि मेटा डिस्क्रिप्शन टाका.
सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमच्या पेजचे शीर्षक टॅग सुधारण्यासाठी टिप्स
तुमचे SEO ट्रॅफिक वाढवण्यासाठी आणि सर्च निकालांमध्ये तुमच्या स्टोअरची दृश्यमानता वाढवण्यासाठी, तुम्ही तुमचे पेज शीर्षक टॅग सुधारू शकता. तुम्ही तुमचे पेज शीर्षक टॅग कसे सुधारू शकता यावरील टिप्सबद्दल जाणून घेण्यासाठी खालील तक्त्याचे पुनरावलोकन करा:
| टीप | वर्णन |
|---|---|
| प्राथमिक कीवर्ड टार्गेट करा | तुमचे सर्वात महत्त्वाचे टार्गेट कीवर्ड समाविष्ट असलेल्या युनिक, वर्णनात्मक शीर्षक टॅगवर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, Star Wars थीम असलेल्या शर्टसाठी फक्त Star Wars वापरण्याऐवजी Star Wars बटन डाउन शर्ट्स वापरा. |
| दुय्यम कीवर्ड जोडा | दुय्यम कीवर्ड समाविष्ट करून तुमचे शीर्षक टॅग सुधारा. प्रभावी कीवर्डच्या इनसाइटसाठी Google Search Console किंवा कीवर्डच्या सूचनांसाठी Google Keyword Planner यांसारख्या टूल्सचा वापर करा. उदाहरणार्थ, मॉड्युलर सोफे, मॉड्युलर काउचेस आणि सेक्शनल काउचेस यांना देखील टार्गेट करण्यासाठी सेक्शनल सोफे चा विस्तार करून ते मॉड्युलर सेक्शनल सोफे आणि काउचेस असे करा. |
| विशेष उत्पादन वैशिष्ट्ये हायलाइट करा | उठून दिसण्यासाठी उत्पादनाच्या युनिक वैशिष्ट्यांवर भर द्या. उदाहरणार्थ, क्रुएल्टी-फ्री बॉडी बटर उत्पादनासाठी, फक्त बॉडी बटर ऐवजी बॉडी बटर - नॅचरल आणि क्रुएल्टी फ्री वापरा. |
| ग्राहकांसाठीच्या आकर्षक फायद्यांचा उल्लेख करा | पारदर्शकता राखण्यासाठी कोणत्याही संबंधित मर्यादा जोडून विशेष फायदे स्पष्टपणे हायलाइट करा. उदाहरणार्थ, क्लिक्स आकर्षित करण्यासाठी पुरुषांच्या डेनिम जीन्स मध्ये बदल करून ते पुरुषांच्या डेनिम जीन्स - $60USD+ च्या US ऑर्डर्सवर मोफत शिपिंग असे करा. |
अधिक जाणून घेण्यासाठी, प्रभावी शीर्षक टॅग लिहिण्यावरील आमच्या लेखाचे पुनरावलोकन करा.
इमेज ऑल्ट मजकूर सेट करा
सर्च इंजिन तुमच्या सामग्रीमधील मजकूर वाचू शकत असले तरी ते इमेज वाचू शकत नाहीत. सर्च इंजिनला तुमची सामग्री शोधण्यात मदत करण्यासाठी तुम्ही वर्णनात्मक पर्यायी (ऑल्ट) मजकूर वापरू शकता. ऑल्ट मजकूर हे दृष्टिदोष असलेल्या लोकांसाठी एक महत्त्वाचे ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्य देखील आहे.
तुम्ही ऑल्ट मजकूर लिहीत असताना, इमेज जिथे दाखवली आहे त्या पेजवरील कीवर्ड वापरा. इमेजविषयी इतरांनी काय विचार करावा असे तुम्हाला वाटते यापेक्षा, इमेजमध्ये काय दाखवले जात आहे त्याचे स्पष्ट वर्णन करणारी वाचनीय वाक्ये वापरा.
तुम्ही उत्पादन प्रतिमा, कलेक्शनची वैशिष्ट्यीकृत इमेज किंवा ब्लॉग पोस्टच्या वैशिष्ट्यीकृत इमेजसाठी ऑल्ट मजकूर सेट करू शकता. इतर दोन्हींच्या तुलनेत उत्पादन प्रतिमेसाठी ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या इमेजसह असलेल्या उत्पादनावर क्लिक करा.
इमेजवर क्लिक करा आणि नंतर ऑल्ट मजकूर संपादित करा वर क्लिक करा.
इमेजसाठी वर्णनात्मक पर्यायी मजकूर टाका.
ऑल्ट मजकूर सेव्ह करा वर क्लिक करा.
कलेक्शन किंवा ब्लॉग पोस्ट वैशिष्ट्यीकृत इमेजसाठी ऑल्ट मजकूर सेट करण्यासाठी:
- तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या कलेक्शन किंवा ब्लॉग पोस्टच्या नावावर क्लिक करा.
- इमेजच्या खाली, अपडेट वर क्लिक करा आणि नंतर इमेज संपादित करा वर क्लिक करा.
- इमेजसाठी वर्णनात्मक पर्यायी मजकूर टाका.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
पेजच्या H1 हेडरमध्ये कीवर्ड जोडा
H1 हेडर हे पेजच्या वरील बाजूस असलेले मुख्य हेडिंग असते. जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन पेज, कलेक्शन पेज, वेबपेज किंवा ब्लॉग पोस्ट तयार करता, तेव्हा Shopify तुम्ही टाकलेल्या शीर्षकाचा वापर करून पेजसाठी H1 हेडर तयार करते. पेजवरील मजकुराचा सर्वात मोठा आकार अनेकदा H1 हेडर असतो आणि पेजवरील सामग्री कशाबद्दल आहे हे ठरवण्यासाठी सर्च इंजिन त्यांचा वापर करतात. तुम्ही जेव्हा पेजचे शीर्षक टाकता, तेव्हा तुमचे मुख्य कीवर्ड समाविष्ट करा जेणेकरून H1 हेडरमध्ये त्यांचा आपोआप समावेश होईल.
पायऱ्या:
- तुम्हाला संपादित करायचे असलेले उत्पादन, कलेक्शन, वेबपेज किंवा ब्लॉग पोस्ट निवडा.
- शीर्षक या फील्डमध्ये, तुमचे कीवर्ड समाविष्ट असलेले एक वर्णनात्मक शीर्षक टाका.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
पेजच्या सामग्रीमध्ये कीवर्ड वापरणे
जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन किंवा कलेक्शनचे वर्णन, वेबपेज किंवा ब्लॉग पोस्टसाठी सामग्री लिहिता, तेव्हा वाचनीय, युनिक वाक्ये वापरा ज्यामध्ये तुमच्या काही कीवर्डचा समावेश असेल. पेजवर असल्याचा दावा केलेल्या गोष्टी खरोखरच त्या पेजवर आहेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी सर्च इंजिन पेजवरील सामग्रीची त्याच्या हेडरसोबत तुलना करतात. तुम्ही जेव्हा उत्पादनाचे वर्णन लिहिता, तेव्हा उत्पादकाद्वारे तुम्हाला प्रदान केलेला मजकूर थेट कॉपी करणे टाळा कारण ते वर्णन आधीपासूनच इतर वेबसाइट्सद्वारे वापरले गेले असू शकते.
प्रमाणापेक्षा दर्जेदार लेखनावर लक्ष केंद्रित करा, परंतु हे लक्षात ठेवा की सर्च इंजिन तुमचे पेज अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मोठ्या सामग्रीचा वापर करतात. प्रत्येक पेजवर किमान 250 शब्दांचा वर्णनात्मक मजकूर असल्याची आणि माहितीपूर्ण पेजेस व ब्लॉग पोस्टमध्ये किमान 500 शब्द असल्याची खात्री करा.
सामान्य प्रश्न
मी शीर्षक टॅग रिक्त सोडल्यास काय होते?
तुमची थीम तुमच्या दुकानाचे नाव आणि त्यानंतर सामग्रीचे शीर्षक वापरते किंवा सामग्रीचे शीर्षक आणि त्यानंतर तुमच्या दुकानाचे नाव वापरते. तुम्हाला हेच वापरायचे असल्यास, शीर्षक टॅग संपादित करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
माझ्या Shopify थीममध्ये शीर्षक टॅग कुठे आहे? मी यासाठी माझी HTML पेजेस थेट संपादित करू शकत नाही का?
शीर्षक टॅग तुमच्या Shopify थीमच्या फक्त एका फाईलमध्ये समाविष्ट केला आहे: theme.liquid. theme.liquid फाईल तुमच्या वेबसाइटच्या प्रत्येक पेजवर वापरली जाते. तुमच्या theme.liquid फाईलमध्ये शीर्षक टॅग आउटपुट करणारा Liquid टॅग {{ page_title }} हा आहे.
तुमची वेबसाइट तुम्ही एक-एक करून संपादित करू शकता अशा स्टॅटिक HTML पेजेसची बनलेली नाही. संबंधित टेम्पलेटद्वारे सामग्री डायनॅमिकपणे आउटपुट केली जाते.
माझ्या कर्मचाऱ्याला माझ्या theme.liquid फाईलऐवजी माझी वेबपेजेस थेट संपादित करायची आहेत. प्रत्येक पेजचे HTML संपादित करण्यासाठी मी माझ्या वेबसाइटचा FTP ॲक्सेस कसा मिळवू?
तुमच्या वेबपेजेसना FTP ॲक्सेस नाही. तुमच्या शीर्षक टॅगचा कोड तुमच्या theme.liquid फाईलमध्ये आहे. हा कोड theme.liquid मधील head एलिमेंटमध्ये आहे. Liquid बद्दल अधिक माहितीसाठी, थीम डिझायनर्ससाठी SEO मार्गदर्शक पहा.
मी माझे शीर्षक टॅग संपादित केले. मी Google ला भेट देतो तेव्हा मला माझे बदल का दिसत नाहीत?
तुमचे बदल सर्च इंजिन परिणामांमध्ये दिसण्यासाठी तुम्हाला काही आठवडे वाट पाहावी लागू शकते. सर्च इंजिनना तुमची सामग्री क्रॉल आणि री-इंडेक्स करण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
सर्च इंजिन लिस्टिंगमधील समस्यांचे ट्रबलशूटिंग
Google अपेक्षेपेक्षा वेगळे पेज शीर्षक किंवा वर्णन दाखवते
Google सारखी सर्च इंजिने, पेजची सामग्री आणि इतर सिग्नल्सच्या आधारे पेज शीर्षके आणि मेटा वर्णने पुन्हा लिहिणे निवडू शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये SEO फील्ड अपडेट केल्यानंतरही, सर्च परिणामांमध्ये दिसणारा मजकूर तुम्ही एंटर केलेल्या मजकुराशी जुळणार नाही.
तुुमचे पेज योग्य मेटाडेटा आउटपुट करत असल्याची खात्री करण्यासाठी, पेज तुमच्या ब्राउझरमध्ये उघडा, राईट-क्लिक करा आणि View Page Source निवडा. सोर्स कोडच्या वरच्या बाजूस <title> टॅग आणि <meta name="description"> टॅग शोधा. हे टॅग तुम्ही Shopify ॲडमिनमध्ये एंटर केलेल्या माहितीशी जुळत असल्यास, तुमचे पेज योग्यरित्या कॉन्फिगर केलेले आहे. सर्च परिणामांमध्ये तुम्हाला दिसणारा कोणताही फरक हा सर्च इंजिनने पर्यायी मजकूर दाखवण्याची निवड केल्यामुळे असतो.
तुम्ही बदल केल्यानंतर Google ला पेज री-क्रॉल करण्यासाठी प्रॉम्प्ट करण्यासाठी, Google Search Console मधील URL Inspection टूल वापरा आणि त्या पेजसाठी इंडेक्सिंगची विनंती करा. Google ला सर्च परिणामांमध्ये तुमची लिस्टिंग री-क्रॉल करण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी काही दिवसांपासून काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.