नफा अहवाल
तुम्ही तुमचे खर्च, मार्जिन आणि नफ्याविषयी माहिती पाहण्यासाठी नफा अहवाल वापरू शकता.
या पेजवर
तुमच्या उत्पादनांमध्ये प्रति आयटम खर्च जोडणे
जेव्हा उत्पादने आणि व्हेरिएंट्सची विक्री केली जाते त्या वेळी ज्यांच्यासाठी खर्चाची नोंद केलेली असते, केवळ त्यांच्यासाठी नफा नोंदवला जातो. तुमच्या नफ्याच्या अहवालांमधून मूल्य मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमची उत्पादने आणि व्हेरिएंट्समध्ये प्रति आयटम खर्च जोडणे आवश्यक आहे. उत्पादनामध्ये प्रति आयटम खर्च कसा जोडायचा हे जाणून घ्या.
नफा अहवाल पाहणे
केवळ नफा मार्जिन अहवाल प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही तुमची अहवाल सूची फिल्टर करू शकता.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अॅनालिटिक्स > अहवाल वर जा.
कॅटेगरी फिल्टरवर क्लिक करा.
अहवालांमध्ये केवळ नफा मार्जिन अहवाल प्रदर्शित करण्यासाठी नफा मार्जिन वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
अॅनालिटिक्स > अहवाल वर टॅप करा.
फिल्टर आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर कॅटेगरी वर टॅप करा.
अहवालांमध्ये केवळ नफा मार्जिन अहवाल प्रदर्शित करण्यासाठी नफा मार्जिन वर टॅप करा.
< यानुसार फिल्टर करा किंवा ← वर टॅप करा आणि त्यानंतर फिल्टर केलेल्या अहवाल सूचीवर परत जाण्यासाठी X वर टॅप करा.
मार्केटनुसार सरासरी नफा मार्जिन
मार्केटनुसार सरासरी नफा मार्जिन अहवाल मार्केटनुसार गटबद्ध केलेले नफा मेट्रिक्स प्रदर्शित करतो. हा अहवाल तुमच्या देशांतर्गत मार्केटमधील ऑर्डर्सच्या नफ्याशी तुलना करता तुमच्या आंतरराष्ट्रीय मार्केट्समधील नफ्यावर होणारा परिणाम हायलाइट करतो. संबंधित मेट्रिक्समध्ये तुमच्या ग्राहकांसाठी उत्पादन शुल्क, शिपिंग शुल्क, शुल्क आणि आयात कर, तसेच तुमच्या स्टोअरने भरलेले उत्पादन खर्च, शिपिंग खर्च, शुल्क आणि आयात कर यांचा समावेश होतो.
तुम्ही एखाद्या विशिष्ट मार्केटमधील ऑर्डर्सनुसार नफा मार्जिनसाठी ड्रिल-डाउन अहवालदेखील पाहू शकता. डेटा टेबलमध्ये, मार्केटवर क्लिक करा आणि त्यानंतर View market report by order वर क्लिक करा. हा अहवाल निवडलेल्या मार्केटसाठी फिल्टर लागू करतो आणि केवळ निवडलेल्या मार्केटमध्ये दिलेल्या ऑर्डर्ससाठी ऑर्डरनुसार मार्जिन माहिती दाखवतो.
उत्पादनानुसार एकूण नफा
उत्पादनानुसार एकूण नफा अहवाल निवडलेल्या तारखेच्या मर्यादेसाठी उत्पादनानुसार तुमचा एकूण नफा दाखवतो. हा अहवाल फक्त अशा व्हेरिएंट्सचा विचार करतो ज्यांची विक्रीच्या वेळी उत्पादन खर्चाची माहिती उपलब्ध असते. या अहवालात ऑर्डर्स दिसत नसल्यास, या व्हेरिएंट्सच्या खर्चाची माहिती उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.
ज्या उत्पादनाचा खर्च तो विकला गेला त्या वेळी नोंदवला गेला होता, अशा प्रत्येक उत्पादनासाठी खालील माहिती दाखवली जाते:
| कॉलम | वर्णन |
|---|---|
| निव्वळ प्रमाण | या कालावधीत विकल्या गेलेल्या युनिट्सची एकूण संख्या. |
| निव्वळ विक्री | या कालावधीतील एकूण निव्वळ विक्री. |
| खर्च | या कालावधीत विकल्या गेलेल्या युनिट्सचा एकूण खर्च. |
| एकूण मार्जिन | या कालावधीत या उत्पादनावरील नफा मार्जिन. हे मार्जिन ([निव्वळ विक्री - खर्च] / निव्वळ विक्री) * 100 असे मोजले जाते. उदाहरणार्थ, तुमची निव्वळ विक्री $50 असल्यास आणि खर्च $30 असल्यास, एकूण मार्जिन 40% असेल (जे ([50 - 30] / 50) * 100 असे मोजले जाते). |
| एकूण नफा | या कालावधीत या उत्पादनावर मिळवलेला एकूण नफा. तो निव्वळ विक्रीतून खर्च वजा करून मोजला जातो. |
सवलती आणि परताव्यातून तुमच्या नफा मार्जिनवर परिणाम होतो. तुम्ही या कालावधीत सवलतीतील उत्पादने विकली असल्यास किंवा परतावे दिले असल्यास, अहवालातील एकूण मार्जिन संबंधित उत्पादन तपशील पेजवर दिसणाऱ्या मार्जिनपेक्षा वेगळे असते. सवलती आणि परताव्यातून नफा मार्जिनवर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या.
उत्पादन व्हेरिएंटनुसार एकूण नफा
उत्पादन व्हेरिएंटनुसार एकूण नफा अहवाल व्हेरिएंटनुसार तुमचा एकूण नफा दाखवतो.
ज्या उत्पादन व्हेरिएंटचा खर्च तो विकला गेला त्या वेळी नोंदवला गेला होता, अशा प्रत्येक उत्पादन व्हेरिएंटसाठी खालील माहिती दाखवली जाते:
| कॉलम | वर्णन |
|---|---|
| निव्वळ प्रमाण | या कालावधीत विकल्या गेलेल्या युनिट्सची एकूण संख्या. |
| निव्वळ विक्री | या कालावधीतील एकूण निव्वळ विक्री. |
| खर्च | या कालावधीत विकल्या गेलेल्या युनिट्सचा एकूण खर्च. |
| एकूण मार्जिन | या कालावधीत या उत्पादन व्हेरिएंटवरील नफा मार्जिन. हे मार्जिन ([निव्वळ विक्री - खर्च] / निव्वळ विक्री) * 100 असे मोजले जाते. उदाहरणार्थ, तुमची निव्वळ विक्री $50 असल्यास आणि खर्च $30 असल्यास, एकूण मार्जिन 40% असेल (जे ([50 - 30] / 50) * 100 असे मोजले जाते). |
| एकूण नफा | या कालावधीत या उत्पादन व्हेरिएंटवर मिळवलेला एकूण नफा. तो निव्वळ विक्रीतून खर्च वजा करून मोजला जातो. |
सवलती आणि परताव्यातून तुमच्या नफा मार्जिनवर परिणाम होतो. तुम्ही या कालावधीत सवलतीतील उत्पादने विकली असल्यास किंवा परतावे दिले असल्यास, अहवालातील एकूण मार्जिन संबंधित उत्पादन तपशील पेजवर दिसणाऱ्या मार्जिनपेक्षा वेगळे असते. सवलती आणि परताव्यातून नफा मार्जिनवर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या.
POS ठिकाणानुसार एकूण नफा
POS ठिकाणानुसार एकूण नफा अहवाल तुमच्या पॉइंट ऑफ सेल ठिकाणानुसार एकूण नफा दाखवतो.
प्रत्येक POS ठिकाणासाठी, खालील माहिती दाखवली जाते:
| कॉलम | वर्णन |
|---|---|
| निव्वळ प्रमाण | या कालावधीत विकल्या गेलेल्या युनिट्सची एकूण संख्या. |
| निव्वळ विक्री | या कालावधीतील एकूण निव्वळ विक्री. |
| खर्च | या कालावधीत विकल्या गेलेल्या युनिट्सचा एकूण खर्च. |
| एकूण मार्जिन | या कालावधीत या उत्पादन व्हेरिएंटवरील नफा मार्जिन. हे मार्जिन ([निव्वळ विक्री - खर्च] / निव्वळ विक्री) * 100 असे मोजले जाते. उदाहरणार्थ, तुमची निव्वळ विक्री $50 असल्यास आणि खर्च $30 असल्यास, एकूण मार्जिन 40% असेल (जे ([50 - 30] / 50) * 100 असे मोजले जाते). |
| एकूण नफा | या कालावधीत या उत्पादन व्हेरिएंटवर मिळवलेला एकूण नफा. तो निव्वळ विक्रीतून खर्च वजा करून मोजला जातो. |
ऑर्डरनुसार नफा मार्जिन
ऑर्डरनुसार नफा मार्जिन अहवाल निवडलेल्या कालमर्यादेत सर्व ऑर्डर डेटासाठी नफा मार्जिन दाखवतो. संबंधित मेट्रिक्समध्ये तुमच्या ग्राहकांसाठी असलेले उत्पादन शुल्क, शिपिंग शुल्क, शुल्क आणि आयात कर, तसेच तुमच्या स्टोअरने भरलेला उत्पादन खर्च, शिपिंग खर्च, शुल्क आणि आयात कर यांचा समावेश होतो.
सवलती आणि परतावे
सवलती आणि परताव्यातून तुमच्या निव्वळ विक्रीवर आणि नफा मार्जिनवर परिणाम होतो.
उत्पादन तपशील पेजवर दिसणारे मार्जिन उत्पादनाच्या पूर्ण किमतीवर आधारित असते. तुमच्या नफा अहवालांमधील एकूण मार्जिन उत्पादनाच्या निव्वळ विक्रीवर आधारित असते, ज्यामध्ये अहवाल कालावधीत तुम्ही दिलेल्या कोणत्याही सवलती किंवा परताव्यांचा विचार केलेला असतो.
उदाहरण: नफा अहवालांवर सवलतींचा परिणाम
$20 USD इतकी सामान्य किंमत आणि $10 USD इतका खर्च असलेल्या टी-शर्टचे उत्पादन तपशील पेजवर 50% मार्जिन दाखवले जाते.
जर तुम्ही अहवाल कालावधीत टी-शर्टला 25% सवलत देऊन ते $15 USD ला विकले, तर त्याच टी-शर्टचे उत्पादनानुसार एकूण नफा अहवालात 33% मार्जिन दाखवले जाते.
डायनॅमिक रिपोर्टिंग पर्यायांसाठी विचारात घेण्यासारख्या बाबी
प्रति आयटम खर्च फील्डमध्ये स्टॅटिक डेटा असतो, याचा अर्थ असा की तुमच्या नफा अहवालांमधील डेटा फक्त ठरावीक वेळेसाठी संबंधित असतो. तुम्हाला डायनॅमिक डेटाचा अहवाल हवा असल्यास, तुमच्याकडे खालील पर्याय आहेत:
- एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग (ERP) किंवा अकाउंटिंग सिस्टीमसारख्या इतर व्यवसाय सिस्टीममध्ये तुमचे आर्थिक अहवाल रन करा.
- तुमच्या इन्व्हेंटरीच्या एकूण मूल्याचा अहवाल देण्यासाठी Shopify App Store मधील रिपोर्टिंग अॅप वापरण्याचा विचार करा.
- खर्च, नफा आणि नुकसान मॅन्युअली मोजा.