Shopify POS साठी देश आणि चलनाचे अनुपालन
जेव्हा तुम्ही Shopify Payments आणि Shopify कार्ड रीडर वापरून प्रत्यक्ष POS व्यवहारावर प्रक्रिया करता, तेव्हा तुम्ही ज्या देशामध्ये व्यवहारावर प्रक्रिया करत आहात, त्या देशाच्या पेमेंट नियमांचे तुम्ही पालन करणे आवश्यक आहे.
अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष POS पेमेंट्स स्वीकारण्यासाठी, तुम्ही प्रत्येक अतिरिक्त देशासाठी स्वतंत्र Shopify स्टोअर आणि Shopify Payments खाते तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही Plus प्लॅनवर असल्यास, तुम्ही मल्टी-एंटिटीज वापरून एकाच स्टोअरसह अनेक देशांमध्ये विक्री करू शकता.
या पेजवर
देशाच्या अनुपालनासाठी आवश्यकता
प्रत्यक्ष विक्री करताना देशाच्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी, तुमच्या व्यवसायाने खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- तुमच्या Shopify स्टोअरचा देश हा तुमच्या सर्व प्रत्यक्ष स्टोअरच्या ठिकाणांच्या देशाशी जुळला पाहिजे.
- तुमचे Shopify स्टोअरचे चलन हे तुमच्या प्रत्यक्ष स्टोअर्सच्या ठिकाणांच्या स्थानिक चलनाशी जुळले पाहिजे.
- तुमच्या स्टोअरचे चलन हे तुमच्या Shopify Payments पेआउट बँक खात्याच्या चलनाशी जुळले पाहिजे.
या आवश्यकता फक्त अशा प्रत्यक्ष ठिकाणांना लागू होतात जेथे तुम्ही Shopify Payments द्वारे पेमेंट्स स्वीकारता.
खालील परिस्थितींमध्ये प्रत्यक्ष देशाच्या आवश्यकता लागू होत नाहीत:
- Shopify Payments व्यतिरिक्त इतर पेमेंट सोल्यूशन वापरून आंतरराष्ट्रीय ठिकाणी केलेली प्रत्यक्ष विक्री.
- पेमेंट्स स्वीकारत नसलेली आंतरराष्ट्रीय ठिकाणे. उदाहरणार्थ, वेअरहाऊसिंग किंवा इन्व्हेंटरी व्यवस्थापनाची ठिकाणे.
उदाहरणे
ड्रू यांचा व्यवसाय वॉशिंग्टनमध्ये आहे आणि ते स्टोअरचे चलन म्हणून USD वापरून ऑनलाइन विक्री करतात. त्यांनी लॉस एंजेलिस आणि न्यू यॉर्क येथे रिटेल ठिकाणे सुरू केल्यास, त्यांच्या स्टोअरचा देश आणि चलन त्या रिटेल ठिकाणांच्या देशाशी आणि चलनाशी जुळतात, कारण ही सर्व ठिकाणे युनायटेड स्टेट्समध्ये आहेत आणि USD वापरतात. मात्र, ड्रू यांनी नंतर युनायटेड किंगडममध्ये रिटेल ठिकाण सुरू केल्यास, त्यांच्या व्यवसायाकडून यापुढे नियमांचे पालन होत नाही. कारण स्टोअरचा देश युनायटेड स्टेट्स हाच राहतो (जो युनायटेड किंगडममधील POS ठिकाणाच्या देशाशी जुळत नाही) आणि त्यांच्या POS वर अजूनही USD मध्ये विक्री होत असते (स्थानिक चलन असलेल्या GBP मध्ये नाही).
| स्टोअरचे ठिकाण | चलन | अनुपालन |
|---|---|---|
| युनायटेड स्टेट्स | USD | होय |
| युनायटेड किंगडम | USD | नाही |
जेनचे रिटेल स्टोअर युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि कॅनडामध्ये तिची इन्व्हेंटरी स्टोअर करण्यासाठी वेअरहाऊस आहे. जेनला कॅनडामधील तिच्या वेअरहाऊससाठी नवीन स्टोअर तयार करण्याची आवश्यकता नाही कारण ती कॅनडामध्ये प्रत्यक्ष पेमेंट्स स्वीकारत नाही. तथापि, जर जेनला कॅनडामध्ये Shopify POS वापरून प्रत्यक्ष विक्री सुरू करायची असेल, तर जेनला कॅनडामध्ये स्थित असलेले एक नवीन Shopify स्टोअर तयार करावे लागेल जे CAD मध्ये विक्री करेल.
| स्टोअरचे ठिकाण | चलन | अनुपालन |
|---|---|---|
| युनायटेड स्टेट्स | USD | होय |
| कॅनडा | USD | नाही |
वेगळ्या देशात POS पेमेंट्स स्वीकारण्यासाठी नवीन Shopify स्टोअर सेट करा
तुम्ही Shopify Payments आणि Shopify कार्ड रीडर वापरून प्रत्येक Shopify स्टोअरसाठी एका देशात प्रत्यक्ष POS पेमेंट्स स्वीकारू शकता.
पायऱ्या:
- तुम्हाला ज्या देशात प्रत्यक्ष POS पेमेंट्स स्वीकारायचे आहेत त्या देशामध्ये योग्य चलनासह नोंदणीकृत असलेले नवीन स्टोअर तयार करा.
- नवीन स्टोअर सेट करा. तुम्ही CSV फाईल्स वापरून तुमच्या मूळ स्टोअरमधून तुमची उत्पादनाची माहिती एक्सपोर्ट करू शकता.
- तुम्हाला ज्या देशात प्रत्यक्ष POS पेमेंट्स स्वीकारायचे आहेत त्या देशामध्ये योग्य चलनासह नोंदणीकृत असलेले नवीन Shopify Payments खाते तयार करा.
- नवीन स्टोअरसाठी Shopify POS सेट करा.