Socket Mobile 2D स्कॅनरचे ट्रबलशूटिंग

Socket Mobile 2D स्कॅनरमधील सामान्य समस्यांचे ट्रबलशूटिंग करण्यासाठी तुम्ही हे मार्गदर्शक वापरू शकता. स्कॅनर समस्यांचे त्वरीत निराकरण केल्याने तुमची चेकआउट प्रक्रिया सुरळीत चालू शकते आणि ग्राहकांना होणारा विलंब टळू शकतो. विशिष्ट समस्या निवडण्यापूर्वी पायरी 1: Socket Mobile 2D स्कॅनरसाठी सामान्य ट्रबलशूटिंग पूर्ण करा.

पायरी 1: Socket Mobile 2D स्कॅनरसाठी सामान्य ट्रबलशूटिंग

सर्व Socket Mobile 2D स्कॅनर समस्यांसाठी खालील सामान्य ट्रबलशूटिंग पूर्ण करा:

  • Shopify POS अपडेट असल्याची खात्री करा. 8.16 किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे.
  • तुमचे उपकरण अपडेट असल्याची खात्री करा:
    • तुमचे iOS उपकरण अपडेट करण्यासाठी, तुमच्या उपकरणाच्या सेटिंग्जमध्ये जा आणि त्यानंतर General > Software Update वर टॅप करा. जर अपडेट उपलब्ध असेल, तर तुम्ही Update now वर टॅप करू शकता.
    • तुमचे Android उपकरण अपडेट करण्यासाठी, तुमच्या उपकरणाच्या सेटिंग्जमध्ये जा आणि त्यानंतर Software update वर टॅप करा. जर अपडेट उपलब्ध असेल, तर ते इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  • Bluetooth बंद करा आणि त्यानंतर पुन्हा चालू करा.
  • तुमचे उपकरण रीस्टार्ट करा.
  • (iOS उपकरणांसाठी) तुमच्या सेटिंग्जमध्ये, Shopify POS तुमच्या इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅप्सच्या सूचीमध्ये शोधा आणि खालील सेटिंग्ज अ‍ॅक्टिव्ह असल्याची खात्री करा:
  • तुमचा स्कॅनर तो कनेक्ट केलेल्या उपकरणापासून 33 फूट किंवा त्याहून कमी अंतरावर असल्याची खात्री करा.
  • कोणत्या स्कॅनर लाइट्स कोणत्या बॅटरी क्षमतेशी संबंधित आहेत याचे वर्णन करणाऱ्या खालील टेबलचा वापर करून तुमचा स्कॅनर चार्ज झाल्याची पडताळणी करा:
स्कॅनर चार्जिंग लाईटबॅटरीची क्षमता
स्थिर हिरवा100%-26%
स्थिर पिवळा25%-10%
स्थिर लाल10% पेक्षा कमी
लुकलुकणारा लालअत्यंत कमी
लुकलुकणारा पिवळाबॅटरी चार्ज होत आहे

पायरी 2: Socket Mobile 2D स्कॅनर समस्या निवडा

जर सामान्य ट्रबलशूटिंग पायऱ्यांनी तुमची समस्या सुटत नसेल, तर Socket Mobile 2D स्कॅनरची समस्या निवडा आणि सर्व ट्रबलशूटिंग पायऱ्यांचे अनुसरण करा.

पेअरिंग समस्यांसाठी ट्रबलशूटिंग करा

जर Shopify POS ला तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर आढळला, पण स्कॅनर कनेक्ट होत नसेल, तर खालील पायऱ्यांसह ट्रबलशूटिंग करा:

  • Bluetooth बंद करा आणि त्यानंतर पुन्हा चालू करा.
  • तुमचे उपकरण रिबूट करा.
  • तुम्ही स्कॅनर सेट करण्यासाठी योग्य बारकोड स्कॅन केल्याची खात्री करा. 1D बारकोड तुमच्या iPad सोबत काम करण्यासाठी स्कॅनरला iOS मोडवर सेट करतो. तुम्ही बारकोड स्कॅन केल्यावर तुम्हाला तीन बीप्स ऐकू आले नाहीत किंवा तुम्ही चुकून 2D बारकोड स्कॅन केला असेल, तर स्कॅनर iOS मोडमध्ये नाही. स्कॅनर अनपेअर करा, आणि त्यानंतर ते पुन्हा पेअर करा.

तुमचा स्कॅनर अद्यापही कनेक्ट होत नसेल, तर तुमच्या उपकरणावरील Bluetooth सेटिंग्ज रीसेट करा.

तुमची Bluetooth सेटिंग्ज रीसेट करा

व्हिडीओ ट्युटोरिअल पाहून किंवा दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून तुमच्या POS उपकरणाची bluetooth सेटिंग्ज रीसेट करा.

iOS

पायऱ्या:

  1. तुमच्या iOS उपकरणावरून, Settings > Bluetooth वर जा.
  2. तुम्ही ट्रबलशूटिंग करत असलेल्या हार्डवेअरसमोरील ( i ) आयकन वर टॅप करा आणि त्यानंतर Forget This Device वर टॅप करा.
  3. तुमची Bluetooth सेटिंग्ज डीअ‍ॅक्टिव्हेट करा.
  4. iOS उपकरण 2-3 मिनिटांसाठी बंद करा.
  5. तुमचे iOS उपकरण रीस्टार्ट करा आणि त्यानंतर तुमचे हार्डवेअर कनेक्ट करा.
Android
  1. तुमच्या Android उपकरणावरून, Settings > Bluetooth वर जा.
  2. तुम्हाला फॉरगेट करायचे असलेले उपकरण शोधा आणि त्यानंतर त्यापुढील गिअर आयकन वर टॅप करा.
  3. Forget किंवा Unpair वर टॅप करा.
  4. तुमचे Android उपकरण 2-3 मिनिटांसाठी बंद करा आणि त्यानंतर ते पुन्हा चालू करा.
  5. Bluetooth चालू करा आणि त्यानंतर तुमचे हार्डवेअर कनेक्ट करा.
Shopify POS मध्ये पेअरिंगचा प्रयत्न "Connecting scanner" स्क्रीनवर अडकल्यास ट्रबलशूटिंग करा

उपकरणाच्या Bluetooth सेटिंग्जमधील यादीत तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर दिसत असेल, पण Shopify POS “स्कॅनर कनेक्ट करत आहे” या स्क्रीनवरच राहात असेल, तर समस्या सोडवण्यासाठी पुढील पायऱ्या वापरा.

पायऱ्या:

  1. पेअरिंग प्रक्रिया रद्द करा.
  2. तुमच्या उपकरणाच्या Bluetooth सेटिंग्जमध्ये, स्कॅनर काढा.
  3. Bluetooth बंद करा आणि त्यानंतर ते पुन्हा चालू करा.
  4. पुन्हा स्कॅनर पेअर करा.

जर तुम्हाला अद्यापही समस्या येत असतील, तर तुमचा स्कॅनर रीसेट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर पुन्हा पेअर करा.

बारकोड स्कॅनिंग समस्यांसाठी ट्रबलशूटिंग करा

तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर वापरून कार्टमध्ये बारकोड स्कॅन करण्यात समस्या येत असल्यास, खालील पायऱ्यांसह ट्रबलशूटिंग करा:

  • Shopify POS फोर्स क्लोज करा आणि त्यानंतर ते पुन्हा उघडा.

  • तुमच्या उपकरणाच्या सेटिंग्जमध्ये Bluetooth बंद आणि चालू करण्यासाठी टॉगल करा.

  • तुम्ही Shopify POS कार्टमध्ये बारकोड स्कॅन करत असल्याची खात्री करा. तुम्ही सर्च बारवर टॅप केल्यास आणि त्यानंतर स्कॅन केल्यास, Shopify POS उत्पादनासाठी शोध घेते आणि उत्पादन कार्टमध्ये जोडत नाही.

  • तुम्ही समर्थित बारकोड प्रकार स्कॅन केल्याची खात्री करा.

  • तुमच्या स्टोअरच्या उत्पादनांपैकी एक नसलेल्या जवळच्या आयटमचा बारकोड स्कॅन करून, स्कॅनर कोणतेही बारकोड ओळखतो की नाही याची चाचणी करा. तुमचा स्कॅनर योग्यरीत्या पेअर केलेला असल्यास, Shopify POS मध्ये Unrecognized barcode (अनोळखी बारकोड) एरर दिसेल. एरर दिसल्यास, पुढील पायऱ्या सुरू ठेवा. एरर न दिसल्यास, तुमच्या उपकरणामधून स्कॅनर अनपेअर करा, आणि त्यानंतर त्यांना पुन्हा पेअर करा.

  • कनेक्टिव्हिटी आयकन वर टॅप करून Connectivity मेनूमध्ये स्कॅनर पेअर केलेला म्हणून दिसतो याची खात्री करा. स्कॅनर कनेक्ट केलेला म्हणून दिसत नसल्यास, तुमच्या उपकरणाच्या Bluetooth सेटिंग्जवर जा आणि स्कॅनर विसरा. त्यानंतर तुमच्या उपकरणासोबत स्कॅनर पुन्हा पेअर करा.

  • तुमच्या उपकरणाच्या कॅमेराने बारकोड स्कॅन करा. तुमचे उपकरण बारकोड स्कॅन करत नसल्यास, बारकोड लेबल किंवा बारकोड नंबरमध्ये समस्या असू शकते आणि तुम्ही खालील पायऱ्यांसह ट्रबलशूट करू शकता:

    • तुमच्या Shopify ॲडमिन मध्ये उत्पादनाचे स्टेटस आणि उपलब्धता तपासा. उत्पादनाचे स्टेटस सक्रिय किंवा अनलिस्ट केलेले असणे आणि ते पॉइंट ऑफ सेल विक्री चॅनेलवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. मसुदा किंवा संग्रहित स्टेटस असलेली उत्पादने Shopify POS मध्ये विकता येत नाहीत.
    • बारकोड लेबलवरील नंबर तुमच्या Shopify ॲडमिन मधील उत्पादनाच्या बारकोड नंबरशी जुळतो याची खात्री करा. नंबरच्या सुरुवातीला किंवा शेवटी अतिरिक्त शून्य किंवा विशेष वर्ण असल्यास, ते हटवा आणि पुन्हा प्रयत्न करा.
    • Shopify ॲडमिन उत्पादन पेजवरील बारकोड नंबर SKU फील्डमध्ये नसून बारकोड फील्डमध्ये असल्याची खात्री करा.
बारकोड स्कॅनिंगच्या गतीचे ट्रबलशूट करा

तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर तुम्हाला पाहिजे तितक्या वेगाने स्कॅन करत नसल्यास, खालील पायऱ्यांसह ट्रबलशूट करा:

  • तुमचा स्कॅनर 33 फूट या त्याच्या नियुक्त केलेल्या कक्षेमध्ये असल्याची खात्री करा. स्कॅनर आणि तुमच्या उपकरणादरम्यानच्या अंतरामुळे स्कॅनिंगच्या वेगावर परिणाम होऊ शकतो.
  • तुमचे उपकरण रीस्टार्ट करा.
स्कॅनर आपोआप बारकोड स्कॅन करत नसल्यास ट्रबलशूट करा

तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर आपोआप बारकोड स्कॅन करत नसल्यास, तुमचा स्कॅनर "Auto scan" मोडमध्ये नसेल. तुमचा स्कॅनर "Auto scan" मोडमध्ये कॉन्फिगर करण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.

पायऱ्या:

  1. तुमच्या उपकरणामधून तुमचा स्कॅनर अनपेअर करा.
  2. बारकोड स्कॅनर फॅक्टरी रीसेट करा.
  3. स्कॅनर HID (कीबोर्ड) मोड मध्ये ठेवा.
  4. खालील Auto scan बारकोड स्कॅन करा. यानंतर स्कॅनरचा लाइट सुरू राहतो.
  5. POS ॲपवरून नाही, तर उपकरणाच्या ब्लूटूथ सेटिंग्ज वापरून स्कॅनर पेअर करा.
  6. POS ॲपवर HID मोड ॲक्टिव्हेट करा.

Socket Mobile 2 स्कॅनर ऑटो स्कॅन मोडमध्ये कॉन्फिगर करण्यासाठीचा बारकोड

स्कॅन यशस्वी झाल्यास, स्कॅनर 3 वेळा बीप वाजवतो. स्कॅनर 3 वेळा बीप वाजवत नसल्यास, तुमच्या उपकरणाच्या Bluetooth वरून डिस्कनेक्ट करा आणि "Auto scan" बारकोड पुन्हा स्कॅन करून पाहा.

स्कॅनर बंद होण्याचे किंवा चार्जिंग टिकत नसल्याचे ट्रबलशूट करा

कोणतीही ॲक्टिव्हिटी नसल्यास 2 तासांनंतर Socket Mobile स्कॅनर डीफॉल्टनुसार बंद होतो आणि डिस्कनेक्ट होतो. तुमच्या उपकरणाचे ब्लूटूथ बंद करा, त्यानंतर तुमचा स्कॅनर कॉन्फिगर करण्यासाठी "scanner is always on" बारकोड स्कॅन करा, ज्यामुळे तो आपोआप बंद होणार नाही:

तुमचा स्कॅनर सुरूच राहण्यासाठी कॉन्फिगर करण्याचा बारकोड

बारकोड स्कॅन केल्यानंतर, ब्लूटूथ परत सुरू करा आणि तुमचा स्कॅनर कनेक्ट केलेला म्हणून दिसत असल्याची खात्री करा.

तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर तरीही बंद होत असल्यास, सुरू होत नसल्यास किंवा त्याचे चार्जिंग टिकत नसल्यास, खालील पायऱ्यांसह ट्रबलशूट करा:

  • तुमचा स्कॅनर फॅक्टरी रीसेट करा.
  • तुमच्या बॅटरी रीसेट करा. डेटा रीडरच्या मागील बाजूचे बॅटरीचे कव्हर काढा, बॅटरी बाहेर काढा आणि त्या 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. बॅटरी पुन्हा टाका, बॅटरीचा दरवाजा परत लावा आणि बॅटरी इंडिकेटर लाइट हिरवा होईपर्यंत स्कॅनर चार्ज करा. चार्जिंगसाठी सहा तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो.
  • स्कॅनर योग्य AC पॉवर अडॅप्टरने चार्ज होत असल्याची खात्री करा. कॉम्प्युटरच्या USB पोर्टसारखा अयोग्य स्रोत वापरून स्कॅनर चार्ज केल्यास, त्याला चार्ज होण्यासाठी पुरेसा विद्युत प्रवाह मिळत नाही. त्यामुळे स्कॅनर प्रत्यक्षापेक्षा जास्त चार्ज दाखवून बंद होऊ शकतो.

ट्रबलशूटिंग करूनही समस्या सुटत नसल्यास, तुम्हाला कदाचित बॅटरी बदलाव्या लागतील. स्कॅनरमध्ये आधीपासून इन्स्टॉल केलेल्या दोन AA NiMH रिचार्जेबल बॅटरी समाविष्ट असतात. या बॅटरी दिलेल्या USB पॉवर केबलचा वापर करून किंवा स्कॅनर क्रॅडलद्वारे रिचार्ज होतात. चार्जिंग प्रक्रियेसाठी बॅटरी काढल्या जात नाहीत.

डॉकमुळे स्कॅनर चार्ज न होण्याचे ट्रबलशूट करा

तुमचा चार्जिंग डॉक तुमच्या Socket Mobile स्कॅनरला चार्ज करत नसल्यास, खालील पायऱ्यांसह ट्रबलशूट करा:

  • चार्जिंग केबल सुरक्षितपणे प्लग इन केल्याची खात्री करा:

क्रॅडलच्या तळाशी सुरक्षितपणे जोडलेली चार्जिंग केबल

  • चार्जिंग पिन स्कॅनरच्या चार्जिंग पोर्टमध्ये पूर्णपणे टाकल्या आहेत आणि त्या स्कॅनरच्या चार्जिंग पिनला स्पर्श करत आहेत याची खात्री करा:

पूर्णपणे टाकलेल्या चार्जिंग पिन्ससोबतचा स्कॅनर

  • बॅटरीच्या दरवाजावरील स्क्रू घट्ट लावला आहे आणि बॅटरीचा दरवाजा बंद आहे याची खात्री करा:

Socket Mobile स्कॅनरच्या बॅटरीचा दरवाजा पूर्णपणे बंद आहे

  • चार्जिंग डॉकवर एक हिरवा LED असल्याची खात्री करा. तो नसल्यास, चार्जिंग केबल कदाचित डॉकवरील चार्जिंग पोर्टमध्ये पूर्णपणे टाकलेली नसू शकते.

Socket Mobile चार्जिंग डॉकवरून हिरवा LED लागतो

चार्जिंग डॉकवर हिरवा लाइट नसल्यास, डॉकवरून केबल काढा आणि ती थेट स्कॅनरच्या बाजूला असलेल्या चार्जिंग पोर्टमध्ये टाका.

बाण Socket Mobile स्कॅनरच्या बाजूला असलेल्या चार्जिंग पोर्टकडे निर्देशित करतो

स्कॅनर चार्ज होण्यास सुरुवात झाल्यास, चार्जिंग डॉक बहुधा खराब झालेला असतो. स्कॅनर चार्ज होण्यास सुरुवात न झाल्यास, चार्जिंग केबल बहुधा खराब झालेली असते.

स्कॅनर तरीही चार्ज होत नसल्यास, पॉवर ॲडॉप्टर वेगळ्या पॉवर आउटलेटला प्लग करा. नवीन आउटलेटला प्लग केल्यानंतर स्कॅनर चार्ज होत असल्यास, पहिल्या पॉवर आउटलेटमधून कदाचित पॉवर येत नसेल.

चार्जिंग करताना स्कॅनर गरम होण्याचे ट्रबलशूट करा

चार्जिंग करताना तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर जास्त गरम होत असल्यास, स्कॅनर अनप्लग करा. चार्जिंगमुळे तुमचा स्कॅनर थोडा गरम होऊ शकतो, मात्र स्पर्श केल्यानंतर तो खूप गरम लागत असल्यास, तुम्हाला तो त्याच्या पॉवर स्रोतावरून त्वरित डिस्कनेक्ट करणे आणि त्यानंतर Socket Mobile सपोर्ट टीमशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

स्कॅन बटण दाबल्यावर स्कॅनर बंद होत असल्यास समस्या सोडवा

स्कॅन बटण दाबल्यावर तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर अचानक बंद होत असल्यास, खालील ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या करून पाहा.

पायऱ्या:

  1. स्कॅनरवरून बॅटरीचे दार काढा आणि बॅटरी बाहेर काढा.
  2. बॅटरी स्कॅनरच्या बाहेर 15-20 मिनिटांसाठी राहू द्या.
  3. बॅटरी पुन्हा घाला आणि बॅटरीचा लाईट हिरवा होईपर्यंत स्कॅनर चार्ज करा.
  4. स्कॅनर पूर्णपणे चार्ज करा.

समस्या कायम राहिल्यास, स्कॅनरच्या बॅटरी बदला.

Socket Mobile 2D स्कॅनरच्या बॅटरी बदला

स्कॅनरवर चार्ज टिकत नसल्यास किंवा स्कॅन बटण दाबल्यावर स्कॅनर बंद होत असल्यास तुम्हाला स्कॅनरच्या बॅटरी बदलाव्या लागू शकतात. तुम्ही Socket Mobile कडून नवीन बॅटरीची खरेदी करू शकता.

स्कॅनरच्या बॅटरी बदलण्यासाठी, तुम्हाला खालील आयटम आवश्यक आहेत:

  • Phillips स्क्रू ड्रायव्हर
  • NiMH असलेल्या 2 AA रिचार्जेबल बॅटरी (Socket Mobile S700)
  • NiMH असलेल्या 2 AAA रिचार्जेबल बॅटरी (Socket Mobile 7Ci)

पायऱ्या:

  1. स्क्रू ड्रायव्हरने स्क्रू सैल करा.
  2. बॅटरीचे दार काढा.
  3. बॅटरी काढा आणि बदला.
  4. बॅटरीचे दार जोडा आणि त्यानंतर स्क्रू घट्ट करा.

व्हायब्रेट सेटिंग्ज आणि कामाच्या वातावरणानुसार बॅटरीचे आयुष्य बदलू शकते. दोन वर्षांच्या आत बॅटरी बदलणे ही सर्वोत्तम पद्धत आहे.

Socket Mobile 2D स्कॅनर फॅक्टरी रीसेट करा

जर ट्रबलशूटिंगच्या पायऱ्यांमुळे तुमच्या Socket Mobile 2D स्कॅनरची समस्या सुटत नसेल, तर तुम्ही फॅक्टरी रीसेट बारकोड स्कॅन करून किंवा स्कॅनर मॅन्युअली रीसेट करून फॅक्टरी रीसेट करू शकता.

पायऱ्या:

बारकोड स्कॅन रीसेट
  1. स्कॅनर किमान 50% पॉवरपर्यंत चार्ज करा.
  2. स्कॅनर आणि तुमचे उपकरण अनपेअर करा.
  3. स्कॅनर पुन्हा चालू करा.
  4. फॅक्टरी रीसेट बारकोड स्कॅन करा. स्कॅनरने बारकोड स्वीकारल्यास, तुम्हाला 5 बीप ऐकू येतील आणि नंतर स्कॅनर बंद होईल.

Socket Mobile स्कॅनर फॅक्टरी रीसेट बारकोड

  1. स्कॅनरला तुमच्या उपकरणाशी पुन्हा पेअर करा.
मॅन्युअल रीसेट

स्कॅनर मॅन्युअली रीसेट करण्यासाठी, व्हिडिओ ट्युटोरिअल किंवा लिखित पायऱ्यांचा संदर्भ घ्या.

  1. स्कॅनर चालू करा.
    Socket Mobile स्कॅनर चालू करण्यासाठी पॉवर बटण दाबा
  2. स्कॅन बटण दाबा आणि धरून ठेवा.
    Socket Mobile स्कॅनरचे स्कॅन बटण धरून ठेवणे सुरू ठेवा आणि पॉवर बटण एकदा दाबा.
  3. स्कॅन बटण धरून ठेवणे सुरू ठेवा आणि पॉवर बटण एकदा दाबा.
  4. तुम्हाला बीप ऐकू येईपर्यंत (सुमारे 15 सेकंद) स्कॅन बटण धरून ठेवणे सुरू ठेवा. जेव्हा तुम्ही स्कॅन बटण सोडता, तेव्हा तुम्हाला पुष्टी देणारे 5 बीप ऐकू येतील आणि त्यानंतर स्कॅनर बंद होईल.

तुम्हाला बीप ऐकू येण्यापूर्वी तुम्ही स्कॅन बटण सोडल्यास, फॅक्टरी रीसेट अयशस्वी होते आणि तुम्हाला मॅन्युअल फॅक्टरी रीसेटच्या पायऱ्या सुरुवातीपासून कराव्या लागतील.

सपोर्टेड बारकोड प्रकार

Socket Mobile S720 2D स्कॅनर 1D आणि 2D बारकोड प्रकारांना सपोर्ट करतो.

सपोर्टेड 1D बारकोड प्रकार:

  • Bookland EAN
  • Chinese 2 of 5
  • Codabar (ISBT 128 bit कॉनकेटेनेशनसह)
  • Code 11, Code 128
  • Code 39
  • Trioptic Code 39
  • Code 39 Full ASCII
  • Code 93
  • Discrete 2 of 5
  • GS1 DataBar (RSS)
  • GS1-128 (UCC-128/EAN-128)
  • ISBN
  • ISBT 128
  • Interleaved 2 of 5 (ITF-14)
  • MSI
  • Standard 2 of 5
  • Telepen
  • UPC/EAN (UPC-A, UPC-E, UPC-E1, EAN-13, EAN-8, UCC/EAN-128)
  • VIN

सपोर्टेड 2D बारकोड प्रकार:

  • Aztec
  • Codablock
  • DataMatrix
  • GS1 Composite (EAN/UCC Composite)
  • GS1 DataBar – Limited
  • GS1 DataBar – Omni-directional
  • Matrix 2 of 5
  • Maxicode
  • QR कोड

तुमच्या Socket Mobile 2D स्कॅनरबद्दल Shopify सपोर्टशी संपर्क साधा

सामान्य ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या आणि विशिष्ट समस्येच्या ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या फॉलो केल्यानंतरही तुमचा Socket Mobile 2D स्कॅनर काम करत नसेल, तर तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधू शकता.

Shopify POS मधून, Horizontal menu आयकन > सपोर्ट > सपोर्टशी संपर्क साधा वर टॅप करा.