Shopify POS हार्डवेअरसह सुरुवात करणे
तुम्ही Shopify POS वापरत असल्यास, रोख रक्कम, कार्ड किंवा दोन्ही वापरून पेमेंट स्वीकारण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले हार्डवेअर निवडून सुरुवात करा. त्यानंतर, तुमच्या व्यवसायाच्या गरजांनुसार विशेष रिटेल हार्डवेअर निवडा, जसे की बारकोड स्कॅनर, पावती प्रिंटर आणि कॅश रजिस्टर.
तुमची पूर्तता प्रक्रिया जलद करण्यासाठी तुम्ही लेबल प्रिंटर आणि स्केल यांसारखे शिपिंग हार्डवेअर देखील वापरू शकता.
या पेजवर
Shopify POS हार्डवेअरसाठी उपकरणाच्या आवश्यकता
Shopify POS iOS आणि Android उपकरण सुसंगतता आवश्यकता
Shopify POS फक्त iOS आणि Android उपकरणांसाठी उपलब्ध आहे. ते लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणक किंवा Amazon Fire टॅबलेटसाठी उपलब्ध नाही.
खालील आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उपकरणांसह Shopify POS काम करते:
| उपकरण | वर्णन |
|---|---|
| iPad | iPadOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारे जनरेशन 5 किंवा त्यावरील उपकरण |
| iPad Air | iPadOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारे जनरेशन 2 किंवा त्यावरील उपकरण |
| iPad mini | iPadOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारे जनरेशन 4 किंवा त्यावरील उपकरण |
| iPad Pro | iPadOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारे सर्व iPad Pro मॉडेल्स |
| iPhone | iOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारा iPhone 7 किंवा त्यापुढील फोन |
| POS Go | Shopify ने प्रदान केलेले नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट्स चालवणारे POS Go |
| Android | सक्रिय केलेल्या Google Play Services आणि Google Mobile Services सह अधिकृत Android आवृत्ती 10.0 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणारा फोन किंवा टॅबलेट |
Shopify POS आता iOS 14 किंवा त्याखालील आवृत्त्यांना सपोर्ट करत नाही. iOS च्या जुन्या आवृत्त्यांसह, तुम्ही अॅप वापरणे सुरू ठेवू शकता परंतु ते यापुढे अपडेट करू शकत नाही. बग फिक्स आणि नवीन वैशिष्ट्यांचा फायदा घेण्यासाठी, तुम्हाला तुमचे उपकरण iOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे. ते शक्य नसल्यास, iOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणाऱ्या दुसऱ्या उपकरणावर Shopify POS वापरण्यास सुरुवात करा.
iOS परवानगीच्या आवश्यकता
तुम्ही तुमचे उपकरण iOS 15.1 किंवा त्यावरील आवृत्तीवर अपडेट केल्यास आणि तृतीय-पक्ष Shopify अॅप्स वापरत असल्यास, तुम्हाला तुमच्या iOS सेटिंग्जमध्ये Cross-Website tracking अॅक्टिव्हेट करावे लागू शकते. Cross-Website tracking मुळे तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये इंस्टॉल केलेली तृतीय-पक्ष Shopify अॅप्स Shopify Inbox, Shopify Point of Sale आणि Shopify अॅपमध्ये कनेक्टेड राहू शकतात.
Cross-Website tracking अॅक्टिव्हेट करण्यासाठी, खालील पायऱ्या पूर्ण करा:
- तुमच्या iOS उपकरणावर, Settings अॅप उघडा.
- Shopify, Shopify POS किंवा Shopify Inbox वर टॅप करा.
- Allow Cross-Website Tracking अॅक्टिव्हेट करा.
तुमचे Shopify POS हार्डवेअर निवडा
तुमच्या व्यवसायानुसार, तुम्हाला आवश्यक असलेल्या रिटेल हार्डवेअरचा प्रकार थोडा वेगळा असू शकतो:
| तुमचा खालील व्यवसाय असल्यास... | तर तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता असू शकते... |
|---|---|
| पॉप-अप शॉप, इव्हेंट्स, प्रासंगिक अर्धवेळ विक्री | एक सपोर्टेड उपकरण + कार्ड रीडर |
| कायमस्वरूपी रिटेल ठिकाण | एक सपोर्टेड उपकरण + कार्ड रीडर + पावती प्रिंटर |
| अनेक स्टोअर्स किंवा एक वेअरहाऊस | एक सपोर्टेड उपकरण + कार्ड रीडर + पावती प्रिंटर + बारकोड स्कॅनर + कॅश ड्रॉवर |
तुम्ही स्वीकारत असलेल्या पेमेंट पद्धती आणि तुमच्या व्यवसायाच्या गरजांवर आधारित, तुम्ही तुमच्या Shopify POS सिस्टीमसाठी विविध घटक निवडू शकता.
यापैकी कोणत्याही पर्यायामुळे एकाच ठिकाणी एकाधिक रजिस्टर्स वापरता येतात आणि प्रति ठिकाण POS स्टेशन्सच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नसते.
हार्डवेअर कुठे खरेदी करावे
Shopify हार्डवेअर स्टोअरमधून सपोर्टेड हार्डवेअरची उपलब्धता देशानुसार बदलते. तुम्ही खालील Shopify हार्डवेअर स्टोअर्समधून हार्डवेअर खरेदी करू शकता:
- ऑस्ट्रेलिया
- बेल्जियम
- कॅनडा (इंग्रजी)
- कॅनडा (फ्रेंच)
- डेन्मार्क
- फिनलंड
- फ्रान्स
- जर्मनी
- आयर्लंड
- इटली
- नेदरलँड
- न्यूझीलंड
- सिंगापूर
- स्पेन
- युनायटेड किंगडम
- युनायटेड स्टेट्स
जर तुम्ही Shopify हार्डवेअर स्टोअर असलेल्या देशात नसाल, तर सपोर्टेड मॉडेल नंबरसाठी सपोर्टेड हार्डवेअर पहा आणि त्यानंतर तुमच्या आवडीच्या व्हेरिफाय केलेल्या तृतीय-पक्ष किरकोळ विक्रेत्याकडून हार्डवेअर खरेदी करा.
Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डरची माहिती
Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डर्सविषयी खालील माहितीचे पुनरावलोकन करा:
- ऑर्डर प्रक्रियेची वेळ
- ऑर्डर्समधील बदल आणि कॅन्सलेशन
- बॅकऑर्डर केलेले आयटम्स
- तुमच्या हार्डवेअर ऑर्डरबद्दल मदत मिळवा
Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डरवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा वेळ
Shopify हार्डवेअर स्टोअरच्या माध्यमातून दिलेल्या सर्व ऑर्डर्ससाठी चेकआउटच्या वेळी दर्शविलेल्या शिपिंग अंदाजाव्यतिरिक्त 1-2 व्यावसायिक दिवसांची पूर्तता प्रक्रिया टाइमलाइन लागू होते. यानुसार तुम्ही तुमच्या हार्डवेअर खरेदीचे नियोजन करत असल्याची खात्री करा.
तुमची Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डर बदलणे किंवा रद्द करणे
तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, ती प्रक्रियेसाठी थेट Shopify हार्डवेअर स्टोअरच्या वेअरहाऊसमध्ये पाठवली जाते, आणि तुम्ही खरेदी केलेले आयटम्स, पेमेंट पद्धत, बिलिंग पत्ता किंवा चेकआउट करताना तुम्ही निवडलेला शिपिंग दर बदलू शकत नाही. खरेदी करण्यापूर्वी तुमच्या ऑर्डरचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
ऑर्डरच्या शिपिंग पत्त्यामध्ये बदलाची विनंती करण्यासाठी किंवा तुमची ऑर्डर रद्द करण्यासाठी, खरेदी केल्याच्या 1 तासाच्या आत Shopify हार्डवेअर स्टोअरवरील ऑर्डर बदल विनंती फॉर्म भरा. तुमची विनंती सबमिट केल्यानंतर, Shopify हार्डवेअर स्टोअरची ऑर्डर व्यवस्थापन टीम पुढील पायऱ्यांसाठी तुम्हाला ईमेलद्वारे संपर्क करेल. ऑर्डर्स बदलल्या जातील किंवा रद्द केल्या जातीलच याची हमी दिली जात नाही.
बॅकऑर्डर केलेले आयटम्स
जर तुम्ही एखादा बॅकऑर्डर केलेला आयटम खरेदी केला, तर तो उपलब्ध झाल्यावर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्वतंत्रपणे पाठवला जातो. बॅकऑर्डर केलेला आयटम शिप झाल्यावर तुम्हाला एक शिपिंग नोटिफिकेशन मिळेल.
तुमच्या Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डरबद्दल मदत मिळवा
हरवलेले हार्डवेअर, भौतिक नुकसान, परतावा अपवाद किंवा कर सूट यांसारख्या तुमच्या Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डरच्या संदर्भात मदतीसाठी, Shopify हार्डवेअर स्टोअर ऑर्डर्स संपर्क फॉर्म वापरा.
Shopify हार्डवेअर स्टोअर परतावा धोरण
Shopify कडून खरेदी केलेले सर्व हार्डवेअर 30-दिवसांच्या परतावा धोरणासह येते. जर तुम्हाला हार्डवेअर Shopify ला रिटर्न करायचे असेल, तर हार्डवेअरच्या वितरणाची तारीख उलटून 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी रिटर्न सबमिट करणे आवश्यक आहे.
तुमच्या ऑर्डरने 30-दिवसांच्या धोरणाचा कालावधी ओलांडला असल्यास, तरीही तुमचे हार्डवेअर वॉरंटी अंतर्गत कव्हर केलेले असू शकते. तुमचा वॉरंटी क्लेम कोण हाताळते हे शोधण्यासाठी फर्स्ट-पार्टी हार्डवेअर वॉरंटीज आणि तृतीय-पक्ष हार्डवेअर वॉरंटीज तपासा.
तुम्ही Shopify ला हार्डवेअर रिटर्न केल्यानंतर, परताव्यावर प्रक्रिया होण्यासाठी 10 व्यावसायिक दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो.
तुमच्या देशातील परतावा धोरणाचा संदर्भ घ्या, आणि एखादा आयटम रिटर्न करताना तुमच्या देशासाठी योग्य रिटर्न फॉर्म पूर्ण केल्याची खात्री करा:
| देश | परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
|---|---|---|
| ऑस्ट्रेलिया | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| कॅनडा | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| युरोपियन युनियन (EU) | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| आयर्लंड | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| न्यूझीलंड | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| सिंगापूर | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| युनायटेड किंगडम | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
| युनायटेड स्टेट्स | 30-दिवसांचे परतावा धोरण | रिटर्न पोर्टल |
Shopify हार्डवेअर स्टोअर वॉरंटीज
Shopify हार्डवेअर स्टोअरच्या माध्यमातून खरेदी केलेले सर्व हार्डवेअर किमान 1 वर्षाच्या उत्पादकाच्या वॉरंटीसह येते. उत्पादकाने सुचविल्याप्रमाणे उत्पादनाचा वापर करताना आढळलेल्या मॅन्युफॅक्चरिंगमधील त्रुटी या वॉरंटीमध्ये कव्हर केल्या जातात. चुकीचा वापर, गैरवापर, अनधिकृत बदल, अयोग्य साठवणूक, वीज पडणे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचा या वॉरंटीमध्ये समावेश होत नाही.
प्रथम-पक्ष हार्डवेअर वॉरंटीज
प्रथम-पक्ष हार्डवेअर वॉरंटीचे तपशील:
- स्टँडर्ड POS: 1-वर्षाची वॉरंटी
- POS Pro: 2-वर्षाची वॉरंटी
- "System Tampered" कार्ड रीडर्ससाठी अपवाद: जर तुमच्या कार्ड रीडरवर हा मेसेज दिसला, तर मदतीसाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधा.
प्रथम-पक्ष हार्डवेअरमध्ये खालील आयटम्सचा समावेश आहे:
- ॲक्सेसरीज
- POS Terminal Reader आणि डॉक
- टॅप & चिप कार्ड रीडर आणि डॉक
- WisePad 3 कार्ड रीडर
- Verifone Victa Mobile आणि डॉक
- बंद केलेले रीडर्स
Verifone Victa Mobile हे Verifone सोबत भागीदारीत दिले जाते आणि Shopify हार्डवेअर स्टोअरद्वारे विकले जाते. Victa Mobile किंवा त्याच्या डॉकच्या वॉरंटी क्लेम किंवा रिप्लेसमेंटसाठी, Verifone ऐवजी Shopify सपोर्टशी संपर्क साधा.
तृतीय-पक्ष हार्डवेअर वॉरंटीज
मूळ खरेदीच्या तारखेवर आधारित उत्पादकानुसार तृतीय-पक्ष हार्डवेअरचे वॉरंटी कालावधी वेगवेगळे असतात. जर तुम्हाला तुमचे ऑर्डर तपशील शोधण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल, तर Shopify सपोर्टशी संपर्क साधा.
कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समधील मर्चंट्सनी तृतीय-पक्ष हार्डवेअर वॉरंटी क्लेमसाठी थेट उत्पादकाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. हे Verifone Victa Mobile ला लागू होत नाही, जे फर्स्ट-पार्टी हार्डवेअर वॉरंटी च्या अंतर्गत कव्हर केले जाते. कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समधील खालील तृतीय-पक्ष उत्पादक वॉरंटी संसाधने तपासा:
- Bixolon
- Bouncepad
- Brother
- 1 वर्षाची वॉरंटी
- उत्पादकाकडून विस्तारित वॉरंटी उपलब्ध आहे
- DYMO
- Epson
- Socket Mobile
- 1 वर्षाची वॉरंटी
- उत्पादकाकडून विस्तारित वॉरंटी उपलब्ध आहे
- Socket Mobile सपोर्टशी संपर्क साधा
- ट्रेड-इन प्रोग्राम
- Star Micronics
- Zebra
तुमच्या Shopify POS नेटवर्कवरील उपकरणे पाहा
तुम्ही आयकनवर टॅप करून आणि त्यानंतर हार्डवेअर विभागावर जाऊन तुमच्या नेटवर्कशी कनेक्ट केलेल्या हार्डवेअरच्या सूचीमध्ये प्रवेश करू शकता.
कनेक्टिव्हिटी मेनूबद्दल अधिक जाणून घ्या.