POS Go सेट करणे

POS Go हे एक ऑल-इन-वन मोबाइल पॉइंट ऑफ सेल (POS) उपकरण आहे, जे तुम्हाला अतिरिक्त हार्डवेअरची आवश्यकता न घेता प्रत्यक्ष विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात, तुमच्या स्टोअरचे कामकाज व्यवस्थापित करण्यात आणि पेमेंट्स स्वीकारण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे पेज तुम्हाला POS Go चा वापर कसा सुरू करायचा, तुमचे उपकरण चार्ज करणे आणि सुरू करण्यापासून ते Wi-Fi शी कनेक्ट करणे, लॉग इन करणे आणि सेटिंग्ज ॲडजस्ट करण्यापर्यंतची माहिती देते.

POS Go चार्ज करा

समाविष्ट केलेल्या USB-C केबलचा वापर करून तुम्ही POS Go चार्ज करू शकता. रीडर चार्ज करण्यासाठी, USB कनेक्टरचे लहान टोक POS Go मध्ये प्लग करा आणि त्यानंतर मोठे टोक फोनच्या चार्जरला किंवा काँप्युटरला प्लग करा.

वॉल ॲडॉप्टर वापरून POS Go पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतात. POS Go पूर्णपणे चार्ज झाल्यावर, त्याची बॅटरी दिवसभराच्या विक्रीसाठी टिकेल.

POS Go च्या LED पॉवर इंडिकेटर लाइटचे खालील स्टेटस असतात:

POS Go वरील बॅटरी लेव्हल स्टेटस लाइट्स
LED हिरवापूर्ण चार्ज
LED निळा (पल्सिंग)चार्जिंग सुरू आहे
LED बंद21% - 99% चार्ज केलेले
LED पिवळा10% - 20% चार्ज केलेले
LED लाल1% - 9% चार्ज केलेले

POS Go चालू आणि बंद करा

POS Go चालू करण्यासाठी, पॉवर बटण दाबा आणि सोडा. स्टेटस लाइट चालू होतो.

POS Go बंद करण्यासाठी, पॉवर बटण दाबा आणि धरून ठेवा. प्रॉम्प्ट केल्यावर, पॉवर ऑफ वर टॅप करा.

POS Go सेट अप करा

  1. POS Go चार्ज करा आणि त्यानंतर ते चालू करा.
  2. तुम्ही POS Go वापरत असलेला देश निवडा.
  3. Wi-Fi नेटवर्क निवडा. पासवर्ड भरा, जॉईन करा वर टॅप करा आणि त्यानंतर कनेक्ट करा वर टॅप करा. POS Go स्वयंचलितपणे अपडेट्स तपासते आणि त्यांना लागू करते.
  4. Shopify POS मध्ये लॉग इन करा.

उपकरणाचे नाव शोधा

तुम्ही अधिक > सेटिंग्ज > उपकरण सेटिंग्ज > उपकरणाचे नाव वर जाऊन उपकरणाचे नाव बदलू शकता.

POS Go त्याच्या डॉकमध्ये वापरत असताना, पेअरिंग प्रक्रियेदरम्यान आणि कनेक्टिव्हिटी स्टेटस स्क्रीन्सवर उपकरणाचे नाव प्रदर्शित केले जाते. उपकरणाचे नाव बदलण्याचा मोबाइल विक्रीवर कोणताही परिणाम होत नाही.

Wi-Fi सेटिंग्ज

तुम्ही अधिक > सेटिंग्ज > नेटवर्क आणि इंटरनेट वर जाऊन Wi-Fi सेटिंग्ज बदलू शकता.

ज्या नेटवर्कला POS Go कनेक्ट केलेले असते, ते एका हिरव्या चेकमार्कसह प्रदर्शित होते. रेंजमध्ये असलेली नेटवर्क्सदेखील प्रदर्शित होतात. अनलिस्ट केलेल्या नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी, इतर... वर टॅप करा. POS Go ला नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी WPA2 सुरक्षितता आवश्यक असते.

नेटवर्क कनेक्शनची चाचणी करण्यासाठी हेल्थ चेक रन करा वर टॅप करा

खालील कामे पूर्ण करण्यासाठी नेटवर्कच्या समोरील i वर टॅप करा:

  • नेटवर्क माहिती ॲक्सेस करणे
  • नेटवर्क फॉरगेट करणे
  • IP अ‍ॅड्रेस, सबनेट मास्क आणि DNS यांसारखे कनेक्शनबाबतचे तपशील संपादित करणे

तुमच्या POS Go चे डिस्प्ले सेटिंग्ज ॲडजस्ट करा

तुम्ही तुमच्या POS Go चा स्क्रीन ब्राइटनेस आणि लॉक सेटिंग्ज सानुकूलित करू शकता तसेच डार्क किंवा लाइट मोड यांपैकी एक निवडू शकता. तुम्ही POS Go च्या कार्यांसाठी आवाजदेखील ॲडजस्ट करू शकता.

Shopify POS मध्ये, होरिझॉन्टल मेनू > सेटिंग्ज वर टॅप करा आणि त्यानंतर खालीलपैकी कोणतेही डिस्प्ले सेटिंग्ज संपादित करा:

  • डार्क/लाइट मोड: तुम्ही तुमच्या POS Go च्या डिस्प्लेसाठी लाइट किंवा डार्क मोड निवडू शकता.
  • स्क्रीन लॉक: न वापरता पडून राहिल्यानंतर POS Go ची स्क्रीन लॉक होण्यासाठी लागणारा वेळ तुम्ही सेट करू शकता.
  • ब्राइटनेस: स्लाइडर डावीकडे किंवा उजवीकडे सरकवून तुम्ही POS Go चा स्क्रीन ब्राइटनेस ॲडजस्ट करू शकता.
  • आवाज: बारकोड्स स्कॅन करणे किंवा टॅप पेमेंट पद्धत वापरणे यांसारख्या सामान्य ऑपरेशन्सदरम्यान POS Go आवाज करते. स्लाइडर डावीकडे किंवा उजवीकडे सरकवून तुम्ही या आवाजांची पातळी (व्हॉल्यूम) ॲडजस्ट करू शकता. आवाज बंद करण्यासाठी, स्लाइडर शून्यावर सेट करा.

आवाज स्क्रीनवर, तुम्ही सायलेंटवर वायब्रेट करा आणि हॅप्टिक फीडबॅक चालू किंवा बंद करण्यासाठी टॉगल करू शकता. टॉगल चालू केल्यावर, सायलेंटवर वायब्रेट करा मुळे उपकरण सायलेंट मोडवर असताना उपकरणाला कंपन करण्यास अनुमती मिळते आणि हॅप्टिक फीडबॅक टॅप, कीबोर्ड आणि इतर कृतींसाठी हॅप्टिक फीडबॅक मिळण्याची खात्री करते.

ॲक्सेसिबिलिटी कार्ये ॲडजस्ट करा

तुमचे कर्मचारी सदस्य आणि ग्राहकांसाठी POS Go वर ॲक्सेसिबिलिटी कार्ये उपलब्ध आहेत.

पायऱ्या:

  1. Shopify POS मध्ये, होरिझॉन्टल मेनू वर टॅप करा.
  2. सेटिंग्ज > उपकरण सेटिंग्ज वर टॅप करा आणि त्यानंतर खालीलपैकी कोणतीही ॲक्सेसिबिलिटी कार्ये चालू करा:
  • स्क्रीन रीडर ॲक्टिव्हेट करण्यासाठी, स्क्रीन रीडर > हेडफोन्स प्लग इन केलेले असताना स्क्रीन रीडर ॲक्टिव्हेट करा वर टॅप करा.
  • स्क्रीन मॅग्निफिकेशन ॲक्टिव्हेट करण्यासाठी, स्क्रीन मॅग्निफिकेशन वर टॅप करा.
  • कलर करेक्शन ॲक्टिव्हेट करण्यासाठी, कलर करेक्शन > रंग इन्व्हर्ट करा, कलर फिल्टर किंवा दोन्ही पर्यायांवर टॅप करा.

स्क्रीन रीडर

स्क्रीन रीडर ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्क्रीन रीडर वर टॅप करा आणि हेडफोन्स प्लग इन केलेले असताना स्क्रीन रीडर ॲक्टिव्हेट करा चालू करा.

तुम्ही टच स्क्रीनवर L जेश्चर करून स्क्रीन रीडर सेटिंग्ज (जसे की आवाज आणि बोलण्याचा वेग) बदलू शकता. तसेच, तुम्ही स्क्रीन प्रायव्हसी ॲक्टिव्हेट करू शकता, ज्यामुळे सामान्य नॅव्हिगेशनला अनुमती देताना स्क्रीनवरील दृश्ये हटवली जातात.

POS Go ला हेडफोन्स जोडलेले असताना, हे उपकरण हेडफोन्समध्ये स्क्रीनवरील आशय वाचून दाखवते. तसेच, हेडफोन्स जोडलेले असताना, एखाद्या बटणावर एकदा टॅप केल्यास ते बटण हायलाइट होते आणि त्याचे लेबल घोषित केले जाते आणि बटणावर दोनदा टॅप केल्यास ते निवडले जाते.

जेव्हा हेडफोन्स जोडलेले असतात, तेव्हा सर्व युजर्ससाठी स्क्रीन रीडर कार्ये अ‍ॅक्टिव्हेट केली जातील, त्यामुळे त्यांना निवडण्यासाठी तुम्हाला बटणांवर दोनदा टॅप करावे लागेल. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा ग्राहक PIN वापरून चेकआउट करत असतो आणि हेडफोन्स जोडलेले असतात, तेव्हा ग्राहकाला त्यांचा PIN प्रविष्ट करण्यासाठी बटणांवर दोनदा टॅप करावे लागेल आणि विक्रीवर प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला बटणांवर दोनदा टॅप करावे लागेल.

स्क्रीन रीडर फंक्शन्स डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, तुम्ही हेडफोन्स काढू शकता.

स्क्रीन मॅग्निफिकेशन

जेव्हा तुम्ही POS Go साठी स्क्रीन मॅग्निफिकेशन ॲक्टिव्हेट करता, तेव्हा तुम्ही स्क्रीनचे मॅग्निफिकेशन अ‍ॅडजस्ट करण्यासाठी खालील गोष्टी करू शकता:

  • स्क्रीन मोठी करण्यासाठी स्क्रीनवर तीन वेळा टॅप करा आणि त्यानंतर पुन्हा तीन वेळा टॅप केल्यास डिस्प्ले सामान्य दृश्यावर परत येतो
  • स्क्रोल करण्यासाठी दोन बोटांनी ड्रॅग करा
  • मॅग्निफिकेशन अ‍ॅडजस्ट करण्यासाठी दोन बोटांनी पिंच करा

तुम्ही या फंक्शनद्वारे व्हर्च्युअल कीबोर्ड मोठा करू शकत नाही.

कलर करेक्शन

खालीलपैकी एक किंवा दोन्ही पर्याय ॲक्टिव्हेट करून तुम्ही POS Go वर रंग कसे डिस्प्ले होतात ते ॲडजस्ट करू शकता:

  • इनव्हर्ट कलर्स: स्क्रीनला सामान्य डिस्प्लेवरून इनव्हर्ट केलेल्या रंगांसह डिस्प्ले करण्यासाठी हा पर्याय निवडा.
  • कलर फिल्टर: ठरावीक रंग डिस्प्ले होऊ नयेत यासाठी डिस्प्ले अ‍ॅडजस्ट करण्यासाठी हा पर्याय निवडा.

POS Go साठी ऑटोमॅटिक अपडेट्स

PCI आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, POS Go दर 24 तासांनी आपोआप रिबूट होते. सध्या, हे डीफॉल्टनुसार तुमच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 2 वाजता सेट केले आहे.

जेव्हा उपकरण ऑटोमॅटिकली किंवा मॅन्युअली रिबूट होत असेल, तेव्हा त्याने कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट्स तपासण्यापूर्वी तुम्हाला ते अनलॉक करण्यासाठी स्टाफ PIN प्रविष्ट करणे आवश्यक आहे. काही अपडेट्स उपलब्ध असल्यास, उपकरण त्यांना आपोआप डाउनलोड करून इन्स्टॉल करेल. तुमच्याकडे नवीनतम आवृत्ती असल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही सर्व सॉफ्टवेअर अपडेट्स स्वीकारले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही नवीनतम आवृत्तीवर राहाल. काही अपडेट्स अनिवार्य असतात आणि ते पुढे ढकलले जाऊ शकत नाहीत.

जर तुमची बॅटरी खूप कमी असेल किंवा उपकरण तुमच्या वाय-फाय (Wi-Fi) नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकत नसेल, तर POS Go एक चेतावणी देणारी स्क्रीन डिस्प्ले करते. या स्क्रीन्सवरील सूचनांचे अनुसरण करा आणि अपडेट सुरू राहील.

तुम्ही POS Go वर तुमची OS आवृत्ती पडताळू शकता. तुमच्या POS Go वरून, अधिक > सेटिंग्ज > डिव्हाइस सेटिंग्ज > सिस्टम > याबद्दल > OS आवृत्ती वर टॅप करा.