Epson TM-m30III पावती प्रिंटरचे ट्रबलशूटिंग
Epson TM-m30III पावती प्रिंटरच्या सामान्य समस्यांचे ट्रबलशूटिंग करण्यासाठी तुम्ही या मार्गदर्शकाचा वापर करू शकता. प्रिंटरच्या समस्या त्वरीत सोडवल्याने ग्राहकांना त्यांच्या पावत्या मिळण्याची खात्री होऊ शकते आणि तुमची चेकआउट प्रक्रिया सुरळीत चालू राहू शकते. तुम्ही अनुभवत असलेली विशिष्ट समस्या निवडण्यापूर्वी पायरी 1: Epson TM-m30III पावती प्रिंटरसाठी सामान्य ट्रबलशूटिंग पूर्ण केल्याची खात्री करा.
ट्रबलशूटिंगच्या पायऱ्यांनी समस्या सुटत नसल्यास, तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधू शकता.
या पेजवर
पायरी 1: Epson TM-m30III पावती प्रिंटरसाठी सामान्य ट्रबलशूटिंग
Epson TM-m30III पावती प्रिंटरसाठी खालील सामान्य ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या पूर्ण करा:
Shopify POS अपडेट असल्याची खात्री करा.
तुमचे उपकरण अपडेट असल्याची खात्री करा:
- तुमचे iOS उपकरण अपडेट करण्यासाठी, उपकरणाच्या सेटिंग्जवर जा आणि नंतर General > Software Update वर टॅप करा. अपडेट उपलब्ध असल्यास, तुम्ही Update now वर टॅप करू शकता.
- तुमचे Android उपकरण अपडेट करण्यासाठी, उपकरणाच्या सेटिंग्जवर जा आणि नंतर Software update वर टॅप करा. अपडेट उपलब्ध असल्यास, ते इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.
जर तुम्ही iOS उपकरण वापरत असाल, तर उपकरणाच्या सेटिंग्जवर नेव्हिगेट करा आणि त्यानंतर Allow cross website tracking परवानगी चालू असल्याची खात्री करा.
पायरी 2: Epson TM-m30III पावती प्रिंटरची समस्या निवडा
तुमच्या Epson TM-m30III पावती प्रिंटरला येत असलेली समस्या निवडा आणि ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या फॉलो करा.
Shopify POS Hub कनेक्शन समस्यांचे ट्रबलशूटिंग करा
तुमचे POS हार्डवेअर Shopify POS Hub द्वारे कनेक्ट होत नसल्यास, Shopify POS Hub च्या ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या पूर्ण करा.
वाय-फाय पेअर करण्याच्या समस्यांचे ट्रबलशूटिंग करा
जर तुम्ही Android उपकरण वापरत असाल आणि तुमचा Epson TM-m30III प्रिंटर वाय-फायशी कनेक्ट होत नसेल, तर वाय-फाय सेटिंग्ज रीसेट करा:
पायऱ्या:
तुमच्या प्रिंटरच्या वाय-फाय सेटिंग्ज रीसेट करा
- रोल पेपरचे कव्हर उघडा.
- रोल पेपरचा LED फ्लॅश होईपर्यंत पेपर फीड बटण दाबून ठेवा.
- थोडा रोल पेपर बाहेर काढा आणि रोल पेपरचे कव्हर बंद करा. Next Action शीट प्रिंट होईल.
- SimpleAP निवडा.
- फीड बटण थोडक्यात पाच वेळा दाबा आणि नंतर बटण किमान एका सेकंदासाठी दाबून ठेवा. यामुळे SimpleAP मोड सुरू होतो आणि QR कोड प्रिंट होतो.
- तुमच्या उपकरणाद्वारे QR कोड स्कॅन करा.
- तुमच्या उपकरणाची वाय-फाय सेटिंग्ज स्क्रीन उघडा आणि प्रिंटरच्या नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी प्रिंटर निवडा.
WebConfig आपोआप सुरू होईल.
WebConfig आपोआप सुरू न झाल्यास, Troubleshoot WebConfig not starting automatically विभागातील पायऱ्या वापरून ट्रबलशूटिंग सुरू ठेवा.
WebConfig आपोआप सुरू न होण्याच्या समस्येचे ट्रबलशूटिंग करा
- प्रिंट झालेला दुसरा QR कोड स्कॅन करा आणि नंतर Wi-Fi निवडा.
- पासवर्ड म्हणून प्रिंटरचा सिरीयल नंबर टाका. तुम्हाला "SimpleAP Start" शीटवर सिरीयल नंबर मिळेल. जर तुमच्या प्रिंटरवर लॉक चिन्ह आणि QR कोड असलेले लेबल असेल, तर लॉक चिन्ह आणि QR कोडच्या बाजूचे नंबर टाका.
- उपलब्ध SSIDs पाहण्यासाठी Ok वर क्लिक करा.
- तुमच्या हव्या असलेल्या नेटवर्कचा SSID निवडा, त्यानंतर Ok वर क्लिक करा.
- नेटवर्क पासवर्ड टाका, त्यानंतर Ok वर क्लिक करा.
नेटवर्क स्टेटस शीट प्रिंट होते. नेटवर्कचे कनेक्शन यशस्वी झाल्यास, "Check Network Connection" फील्डमध्ये "PASS" प्रिंट होते.
नेटवर्कचे कनेक्शन अयशस्वी झाल्यास, "Check Network Connection" फील्डमध्ये "FAIL" प्रिंट होते. तुम्ही फीड बटण एका सेकंदासाठी दाबून आणि नंतर सोडून कनेक्शन रीस्टार्ट करू शकता. "SimpleAP" मोड सुरू होईल आणि QR कोड प्रिंट होईल. QR कोड स्कॅन करा आणि सेटिंग पुन्हा कॉंफिगर करा.
प्रिंटर अद्याप वाय-फायशी कनेक्ट होण्यात अयशस्वी झाल्यास, तुमचे उपकरण आणि प्रिंटरचे नेटवर्क समान असल्याची आणि नेटवर्क पासवर्ड बरोबर असल्याची खात्री करा. त्यानंतर तुमचा वाय-फाय राऊटर अनप्लग करा आणि पुन्हा प्लग इन करून तो रीसेट करा.
वाय-फायच्या समस्या कायम राहिल्यास, तुमच्या इंटरनेट सेवा प्रदात्याशी संपर्क साधा.
ब्लूटूथ कनेक्शन समस्यांचे ट्रबलशूटिंग करा
जर तुम्ही iOS किंवा Android उपकरण वापरत असाल आणि तुमचा Epson TM-m30III प्रिंटर ब्लूटूथशी कनेक्ट होत नसेल, तर तुमच्या उपकरणावरील ब्लूटूथ रीसेट करा.
iOS
पायऱ्या:
- तुमच्या iOS उपकरणाची सेटिंग्ज उघडा.
- Bluetooth निवडा.
- तुम्ही ज्या हार्डवेअरचे ट्रबलशूटिंग करत आहात, त्याच्या पुढील information (i) आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर Forget This Device निवडा.
- Bluetooth बंद करा.
- तुमचे iOS उपकरण 2-3 मिनिटांसाठी बंद करा.
- तुमचे iOS उपकरण पुन्हा चालू करा, Bluetooth चालू करा आणि त्यानंतर तुमचे हार्डवेअर कनेक्ट करा.
Android
- तुमच्या Android उपकरणाची सेटिंग्ज उघडा, त्यानंतर Bluetooth निवडा.
- तुमचे हार्डवेअर डिस्कनेक्ट करण्यासाठी Bluetooth बंद करा.
- तुमचे Android उपकरण 2-3 मिनिटांसाठी बंद करा, त्यानंतर ते पुन्हा चालू करा.
- Bluetooth चालू करा, त्यानंतर तुमचे हार्डवेअर कनेक्ट करा.
Epson TM-m30III पावती प्रिंटर एका वेळी केवळ एकाच उपकरणाशी कनेक्ट होऊ शकतो. प्रिंटरला नवीन उपकरणाशी पेअर करण्यापूर्वी, तुम्ही ते पहिल्या उपकरणावरून अनपेअर केल्याची खात्री करा.
लाल ब्लिंक होत असलेल्या ERROR इंडिकेटरचे ट्रबलशूटिंग करा
जर ERROR इंडिकेटरचा लाईट लाल ब्लिंक होत असेल, तर प्रिंटरमध्ये पेपर नाहीये. प्रिंटर उघडा, पेपर बदला आणि झाकण बंद करा. ERROR इंडिकेटरचे ब्लिंक होणे थांबले पाहिजे आणि READY इंडिकेटरचा लाईट लागला पाहिजे.
तुम्ही पावतीचा पेपर योग्यरित्या टाकत असल्याची खात्री करा:

फ्लॅश होत असलेल्या LEDs चे ट्रबलशूटिंग करा
LEDs फ्लॅश होत असल्यास, समस्येचे ट्रबलशूटिंग करण्यासाठी Epson च्या तांत्रिक संदर्भ मार्गदर्शकाच्या पान 19 चा संदर्भ घ्या.
पेपर जॅमचे ट्रबलशूटिंग करा
जर तुम्ही पावती प्रिंटरमध्ये कागद तिरपा घातला, तर तो अडकू शकतो. असे झाल्यास, प्रिंटर बंद करा, तो उघडा आणि कागद पुन्हा घाला.
तुम्ही पावतीचा पेपर योग्यरित्या टाकत असल्याची खात्री करा:

जर तुम्ही तुमची पावती निर्दिष्ट केलेल्या 3 इंच रुंदीपेक्षा कमी रुंद करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सोबत दिलेला डिव्हायडर वापरल्याची खात्री करा. प्रिंटरमध्ये कागद घालताना तो दुमडू नका.
प्रिंटिंग समस्यांचे ट्रबलशूटिंग करा
Epson TM-m30III दोन्ही 58mm आणि 80mm पावती कागदाच्या आकाराला सपोर्ट करतो, परंतु Shopify POS केवळ 80mm ला सपोर्ट करतो. प्रिंटरमधून 58mm कागदाचे गार्ड्स काढून टाकून तुम्ही तुमचा प्रिंटर 80mm प्रिंट करण्यासाठी कॉन्फिगर केल्याची खात्री करा.
पायऱ्या:
- प्रिंटर बंद करा.
- रोल पेपरचे कव्हर उघडा.
- त्रिकोणी खुणा एका रेषेत आणून रोल पेपर गाइड्स इंस्टॉल करा.

जर प्रिंटिंगची समस्या सुटली नाही, तर ती सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनची समस्या असू शकते आणि तुम्हाला तुमच्या प्रिंटरचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल. तुमच्या उपकरणावर, Epson Utility ॲपवर जा आणि त्यानंतर Change Printer Settings > Various Settings > Printing Control वर टॅप करा. Paper width - Number of columns विभागामध्ये हे 80mm - 48 कॉलम्सवर सेट केले असल्याची खात्री करा.
RED अॅक्टिव्हेट केलेल्या प्रिंटरचे ट्रबलशूटिंग
RED (रेडिओ इक्विपमेंट डायरेक्टिव्ह) अॅक्टिव्हेट केलेले प्रिंटर सध्या काम करत नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी, तुमच्या उपकरणाचे यशस्वी पेअरिंग आणि कार्यक्षमतेसाठी तुम्हाला Secure Printing बंद करणे आवश्यक आहे.
RED च्या कक्षेत येणाऱ्या सर्व उत्पादनांवर Secure Printing बाय डीफॉल्ट ॲक्टिव्हेट केलेले असते. तुम्ही चालू सेटिंग कन्फर्म करू शकता आणि RED शी सुसंगत असलेल्या खालीलपैकी कोणत्याही मॉडेल युटिलिटीजचा वापर करून Secure Printing सेटिंग बदलू शकता:
- TM (थर्मल मॉनिटर) युटिलिटी
- Web Config
- EpsonNet Config (वेब आवृत्ती)
Epson TM-m30III पावती प्रिंटर फॅक्टरी रीसेट करा
फॅक्टरी रीसेट ब्लूटूथ कनेक्शन समस्या सोडवण्यात मदत करू शकते.
पायऱ्या:
- प्रिंटरच्या वरच्या बाजूला असलेली पॉवर की दाबून प्रिंटर बंद करा.
- इथरनेट प्लगच्या शेजारी प्रिंटरच्या तळाशी असलेले SW रीसेट बटण शोधा.
- SW रीसेट बटण 5 सेकंद दाबून ठेवण्यासाठी बॉल पॉइंट पेन वापरा.
- तुम्ही प्रिंटर परत चालू करता तेव्हा SW रीसेट बटण दाबून ठेवा.
- “Resetting to Factory Default” असे लिहिलेला एक कागद प्रिंट होतो.
- SW रीसेट बटण सोडून द्या. याने फॅक्टरी रीसेट पूर्ण होते.
तुमच्या Epson TM-m30III पावती प्रिंटरबद्दल Shopify सपोर्टशी संपर्क साधा
जर सामान्य ट्रबलशूटिंग आणि विशिष्ट समस्यांचे ट्रबलशूटिंग फॉलो केल्यानंतरही तुमचा पावती प्रिंटर काम करत नसेल, तर तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधू शकता.
Shopify POS मधून, आयकन > सपोर्ट > सपोर्टशी संपर्क साधा वर टॅप करा.