Shopify POS उपकरण बदलणे

जेव्हा Shopify POS उपकरण बंद पडते, तेव्हा विक्री सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अतिरिक्त उपकरणावर बदलू शकता किंवा नवीन सेट करू शकता. हार्डवेअर निकामी होण्यासाठी आधीच नियोजन केल्यास, हाताशी सुसज्ज अतिरिक्त उपकरण ठेवल्यास आणि प्रत्येक बदलाची पडताळणी केल्यास डाउनटाइम कमी होऊ शकतो आणि तुम्हाला त्वरीत पुन्हा विक्री सुरू करण्यास मदत मिळू शकते.

उपकरण सेवाबाह्य असताना अतिरिक्त उपकरण कसे तयार करावे, निकामी झालेले उपकरण कसे बदलावे, बदललेल्या उपकरणाची पडताळणी कशी करावी आणि विक्री कशी सुरू ठेवावी याबद्दल या पेजमध्ये माहिती दिलेली आहे.

जर तुमचे POS उपकरण काम करत असेल, परंतु कार्ड रीडर किंवा बारकोड स्कॅनर यांसारखे हार्डवेअर काम करत नसेल, तर POS हार्डवेअर सपोर्टचा संदर्भ घ्या.

अतिरिक्त POS उपकरण तयार करणे

सुसज्ज अतिरिक्त उपकरण म्हणजे एक POS उपकरण जे सेट अप केलेले, साईन इन केलेले आणि दुसरे उपकरण निकामी झाल्यावर बदलण्यासाठी तयार असते. खालील परिस्थितींमध्ये हाताशी अतिरिक्त उपकरण ठेवण्याची शिफारस केली जाते:

  • तुम्ही एकाच ठिकाणी 3 किंवा अधिक POS उपकरणे चालवता.
  • तुम्ही अशा ठिकाणी व्यवसाय करता जिथे जास्त गर्दी असते आणि डाउनटाइमचा परिणार विक्रीवर होतो.
  • तुम्ही एकाधिक ठिकाणे चालवता.
  • तुम्ही पॉप-अप किंवा हंगामी बाजार यांसारखा वेळ-मर्यादित इव्हेंट चालवत आहात.

एकाधिक ठिकाणे असलेल्या मर्चंटसाठी, तुम्ही प्रत्येक प्रदेशासाठी 1 अतिरिक्त उपकरण ठेवू शकता.

अतिरिक्त उपकरण सेट करा

तुमच्या अ‍ॅक्टिव्ह उपकरणांप्रमाणेच अतिरिक्त उपकरण सेट करा, जेणेकरून ते बदलताना पुन्हा कॉन्फिगर करण्याची आवश्यकता भासणार नाही. तुमच्या अ‍ॅक्टिव्ह उपकरणांप्रमाणेच मॉडेल वापरा.

पायऱ्या:

  1. स्टोअर मालक किंवा अ‍ॅडमिन खात्यासह Shopify POS मध्ये साइन इन करा.
  2. योग्य ठिकाण निवडा.
  3. कॅटलॉग उपकरणामध्ये सिंक होण्याची प्रतीक्षा करा.
  4. तुमच्या ॲक्टिव्ह उपकरणांशी जुळण्यासाठी स्मार्ट ग्रिड कॉन्फिगर करा. तपशिलांसाठी, Shopify POS स्मार्ट ग्रिड बदलणे पहा.
  5. तुम्हाला अतिरिक्त उपकरणावर उपलब्ध हवे असलेले कोणतेही हार्डवेअर, जसे की बारकोड स्कॅनर किंवा कार्ड रीडर, पेअर करा.
  6. अतिरिक्त उपकरण सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी ठेवा.

अतिरिक्त उपकरण अद्ययावत ठेवा

अतिरिक्त उपकरण दर 2 आठवड्यांनी सुरू करा आणि ते Wi-Fi शी कनेक्ट करा जेणेकरून ते अलीकडील कॅटलॉगमधील बदल सिंक करू शकेल, Shopify POS अपडेट्स तपासू शकेल आणि उपकरण अजूनही योग्यरित्या साइन इन करत असल्याची खात्री करू शकेल. मॅन्युअली सिंक ट्रिगर करण्यासाठी, Shopify POS उघडा आणि Connectivity Icon > Shopify > Store data > Refresh वर टॅप करा. जे अतिरिक्त उपकरण महिन्यांपासून सिंक केलेले नसते ते तुम्ही डिप्लॉय करता तेव्हा मोठा कॅटलॉग डाउनलोड करते, ज्यामुळे ते सेट करण्यात विलंब होतो.

खराब झालेले POS उपकरण बदलणे

जेव्हा कामकाजाच्या वेळेत एखादे उपकरण खराब होते, तेव्हा रजिस्टरवर ट्रबलशूटिंग करण्याऐवजी अतिरिक्त उपकरणाचा वापर करा. स्टोअर बंद झाल्यानंतर तुम्ही खराब झालेल्या उपकरणाची तपासणी किंवा दुरुस्ती करू शकता.

एखादे उपकरण बदलण्यापूर्वी, ते खराब झालेले उपकरण अद्याप प्रतिसाद देत असल्यास ते सिंक करा जेणेकरून अलीकडील व्यवहार गमावले जाणार नाहीत. Shopify POS उघडा, Connectivity Icon > Shopify > Store data > Refresh वर टॅप करा.

अतिरिक्त उपकरणावर स्विच करा

जर तुमच्याकडे आधीपासून तयार असलेले अतिरिक्त उपकरण उपलब्ध असेल, तर स्विच करणे जलद होते कारण कॅटलॉग आणि सेटिंग्ज आधीपासूनच सेट असतात.

पायऱ्या:

  1. अतिरिक्त उपकरण सुरू करा आणि Shopify POS उघडा.
  2. तुम्हाला तसे करण्यास प्रॉम्ट केल्यास स्टोअर मालक किंवा ॲडमिन खात्यासह साइन इन करा.
  3. योग्य ठिकाण निवडल्याची खात्री करा.
  4. सर्वात अलीकडील कॅटलॉग बदल मिळवण्यासाठी Connectivity Icon > Shopify > Store data > Refresh वर टॅप करा.
  5. तुमचे कार्ड रीडर, पावती प्रिंटर किंवा बारकोड स्कॅनर यासारखे कोणतेही हार्डवेअर कनेक्ट करा.
  6. उपकरण तयार असल्याची खात्री करण्यासाठी चाचणी व्यवहारावर प्रक्रिया करा.

एक नवीन बदली उपकरण सेट करा

जर तुमच्याकडे तयार असलेले अतिरिक्त उपकरण नसेल, तर नवीन उपकरण सेट करण्यासाठी किमान 1 तासाचे नियोजन करा. सेटअप वेळ तुमच्या कॅटलॉगचा आकार, नेटवर्क गती आणि तुम्ही किती हार्डवेअर पेअर करत आहात यावर अवलंबून असतो.

पायऱ्या:

  1. उपकरणाला बॉक्समधून बाहेर काढा आणि Wi-Fi शी कनेक्ट करणे आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणे यासह उपकरण सेटअप विझार्ड पूर्ण करा.
  2. iOS वरील App Store किंवा Android वरील Google Play वरून Shopify POS डाउनलोड करा.
  3. स्टोअर मालक किंवा ॲडमिन खात्यासह Shopify POS मध्ये साइन इन करा, जे नवीन उपकरणावर पहिल्या साइन-इनसाठी आवश्यक आहे.
  4. योग्य ठिकाण निवडा.
  5. कॅटलॉग उपकरणामध्ये सिंक होण्याची प्रतीक्षा करा.
  6. तुमच्या ॲक्टिव्ह उपकरणांशी जुळण्यासाठी, स्मार्ट ग्रिडसह Shopify POS सेटिंग्ज कॉन्फिगर करा.
  7. तुमचे कार्ड रीडर, पावती प्रिंटर किंवा बारकोड स्कॅनर यासारखे कोणतेही हार्डवेअर कनेक्ट करा.
  8. उपकरण तयार असल्याची खात्री करण्यासाठी चाचणी व्यवहारावर प्रक्रिया करा.

जे उपकरण सुरू होत नाही त्याचे ट्रबलशूटिंग करा

जर तुमचे उपकरण पॉवर बटणाला प्रतिसाद देत नसेल, तर फोर्स रिस्टार्ट बऱ्याचदा ते पूर्ववत करते. फोर्स रिस्टार्ट की कॉम्बिनेशन्स उपकरणाच्या मॉडेलनुसार बदलतात. उत्पादकाच्या सूचना पहा:

जर उपकरण थोड्या वेळासाठी बॅटरी आयकन दाखवत असेल, तर बॅटरी संपलेली आहे. उपकरणाला पॉवरशी कनेक्ट करा आणि पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी ते 15 ते 30 मिनिटे चार्ज करा.

बदली उपकरणाची पडताळणी करणे

बदली उपकरण ॲक्टिव्ह वापरात परत आणण्यापूर्वी, खालील गोष्टी बरोबर असल्याची खात्री केल्याने समस्या कमी करण्यात मदत होऊ शकते:

  • कॅटलॉग सिंक केलेला आहे आणि उत्पादने शोधण्यायोग्य आहेत.
  • इन्व्हेंटरीचे प्रमाण तुमच्या Shopify ॲडमिनशी जुळते.
  • तुम्ही स्वीकारलेले सर्व पेमेंट प्रकार योग्यरित्या प्रक्रिया करतात, ज्यामध्ये कोणतेही कार्ड रीडर आणि तुम्ही ते वापरत असल्यास Tap to Pay चा समावेश आहे.
  • पावती प्रिंटिंग काम करते आणि प्रिंट केलेल्या पावत्यांमध्ये स्टोअरचा योग्य तपशील समाविष्ट आहे.
  • स्मार्ट ग्रिड तुमच्या इतर ॲक्टिव्ह उपकरणांशी जुळतो.
  • Shopify POS ची आवृत्ती अद्ययावत आहे. तुम्ही एखादी विशिष्ट आवृत्ती पिन करण्यासाठी MDM वापरत असल्यास, उपकरण अपेक्षित आवृत्तीवर असल्याची खात्री करा.

बदली उपकरण सेवेत आल्यानंतर, खराब झालेले उपकरण हाताळा. जर खराब झालेले उपकरण पूर्ववत करण्यायोग्य असेल, तर तुम्ही त्यावरील डेटा मिटवू शकता आणि नवीन अतिरिक्त उपकरण म्हणून त्याची पुन्हा नोंदणी करू शकता. जर ते पूर्ववत करण्यायोग्य नसेल, तर तुमच्या स्थानिक इलेक्ट्रॉनिक कचरा धोरणानुसार त्याची विल्हेवाट लावा आणि तुमचे मालमत्ता रेकॉर्ड अपडेट करा.

उपकरण बदलत असताना विक्री करणे सुरू ठेवा

जर एखादे उपकरण खराब झाले आणि तुम्ही ताबडतोब अतिरिक्त उपकरणावर स्विच करू शकत नसाल किंवा नवीन सेट करू शकत नसाल, तर तुम्ही खालीलपैकी एका पर्यायाचा वापर करून विक्री करणे सुरू ठेवू शकता:

  • कार्यरत उपकरण शेअर करा: अनेक कर्मचारी एकच Shopify POS उपकरण आळीपाळीने वापरू शकतात. उपकरण शेअर करताना रजिस्टर सत्रांच्या तपशीलांसाठी, Shopify POS मधून रजिस्टर सत्रे व्यवस्थापित करणे पहा.
  • Tap to Pay वापरा: जर तुमच्याकडे सुसंगत iPhone किंवा Android उपकरण असेल, तर तुम्ही कार्ड रीडरशिवाय कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स घेऊ शकता. तपशिलांसाठी, iPhone वरील Tap to Pay सह Shopify POS वापरून पेमेंट्स स्वीकारणे किंवा Android वरील Tap to Pay पहा.
  • रोख रक्कम स्वीकारा: तुम्ही बदली उपकरणाची व्यवस्था करत असताना एका कार्यरत उपकरणावर रोख रकमेचे पेमेंट्स स्वीकारणे सुरू ठेवू शकता.

जर उपकरणाऐवजी Shopify POS मध्ये समस्या असेल, तर Shopify POS अ‍ॅपचे ट्रबलशूटिंग करणे पहा.

तुमचे POS हार्डवेअर ट्रॅक करणे

प्रत्येक POS उपकरणाचे रेकॉर्ड ठेवल्याने एखादे उपकरण खराब झाल्यास वॉरंटी क्लेम आणि ते बदलण्याचे निर्णय अधिक जलद घेता येतात. प्रत्येक उपकरणासाठी खालील माहिती ट्रॅक करा:

  • उपकरणाचा प्रकार आणि मॉडेल.
  • अनुक्रमांक.
  • खरेदीची तारीख.
  • वॉरंटीची समाप्ती तारीख. Shopify हार्डवेअरवरील वॉरंटीच्या कालावधीसाठी, Shopify POS हार्डवेअरसह सुरुवात करणे पहा.
  • उपकरणाला नियुक्त केलेले स्टोअरचे ठिकाण.

जेव्हा तुम्ही अतिरिक्त उपकरण डिप्लॉय करता किंवा खराब झालेले उपकरण काढून टाकता, तेव्हा तुमचे रेकॉर्ड अपडेट करा जेणेकरून मालमत्ता सूची अचूक राहील.