QuickBooks Desktop POS डेटा मायग्रेशनच्या बाबी
तुमचा QuickBooks POS डेटा Shopify वर मायग्रेट करण्यापूर्वी, QuickBooks Desktop Connector अॅप वापरून कोणता डेटा मायग्रेट केला जाऊ शकतो आणि कोणता डेटा तुम्हाला मॅन्युअली मायग्रेट करावा लागेल याचे पुनरावलोकन करण्याचे निश्चित करा. डेटा मॅपिंग अटींच्या पूर्ण सूचीसाठी, QuickBooks POS आणि Shopify POS शब्दकोश आणि डेटा मॅपिंग पहा.
या पेजवर
QuickBooks डेटा मायग्रेशनची व्याप्ती
QuickBooks Desktop Connector अॅप वापरून कोणता QuickBooks Desktop POS डेटा Shopify वर मायग्रेट केला जाऊ शकतो आणि कोणता नाही, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा:
| QuickBooks डेटा प्रकार | Shopify डेटा प्रकार | डेटा मायग्रेट केला जाऊ शकतो |
|---|---|---|
| ग्राहक | ग्राहक | ✔ |
| इन्व्हेंटरी | उत्पादने | ✔ |
| इन्व्हेंटरी स्टाईल ग्रिड | उत्पादन व्हेरिएंट किंवा पर्याय | ✔ |
| उत्पादन प्रतिमा | उत्पादन प्रतिमा | ✘ |
| ट्रान्सफर स्लिप्स | उत्पादन ट्रान्सफर | ✘ |
| विक्रेते | विक्रेता किंवा पुरवठादार | ✔ |
| स्टोअर्स (POS) किंवा क्लासेस (QuickBooks Desktop) | स्थाने | ✔ |
| आयटम नंबर किंवा UPC | बारकोड्स | ✔ |
| ग्राहक नोंद | ग्राहक नोंद | ✔ |
| विक्री पावती | ऑर्डर्स (पैसे दिलेले/पूर्ण केलेले) | ✘ |
| इन्व्हॉइस | ऑर्डर्स (पैसे न दिलेले/पूर्ण केलेले) | ✘ |
| पेमेंटसह इन्व्हॉइस | ऑर्डर्स (अंशतः पैसे दिलेले/पूर्ण केलेले) | ✘ |
| विक्री ऑर्डर | ऑर्डर्स (पैसे न दिलेले/अपूर्ण) | ✘ |
| डिपॉझिटसह विक्री ऑर्डर | ऑर्डर्स (अंशतः पैसे दिलेले/अपूर्ण) | ✘ |
| खरेदी ऑर्डर | खरेदी ऑर्डर्स (आयटम्स न मिळालेले) | ✘ |
| रिसिव्हिंग व्हाउचर (QuickBooks Desktop POS) | खरेदी ऑर्डर्स (आयटम्स मिळालेले) | ✘ |
| बिल किंवा आयटमची पावती (QuickBooks Desktop) | खरेदी ऑर्डर्स (आयटम्स मिळालेले) | ✘ |
| स्वयंचलित सवलती | सवलती | ✘ |
| अल्टरनेटिव्ह लूकअप (ALU) | SKU नंबर | ✘ |
| स्टोअर क्रेडिट्स | गिफ्ट कार्ड्स | ✘ |
| लॉयल्टी | लॉयल्टी | ✘ |
कनेक्टर अॅप वापरून मायग्रेट केला जाऊ शकणारा QuickBooks डेटा
QuickBooks Desktop Connector अॅप वापरून खालील डेटा QuickBooks POS मधून Shopify वर मायग्रेट केला जाऊ शकतो:
- ग्राहक डेटा
- नावे
- ईमेल्स
- फोन नंबर
- विक्रेता डेटा (Stocky अॅपमध्ये पुरवठादार म्हणून मायग्रेट होतो)
- ठिकाण डेटा (कमाल 20 ठिकाणे)
- इन्व्हेंटरी आणि उत्पादन डेटा
- उत्पादन शीर्षक
- बारकोड्स (आयटम नंबर)
- प्रमाण
- ठिकाण
- किंमत
उत्पादने आणि उत्पादन व्हेरिएंट्स
तुम्ही मायग्रेट केल्यानंतर, तुमचे उत्पादन व्हेरिएंट्स Shopify वर स्वतंत्र उत्पादने म्हणून इंपोर्ट केले जातात. मायग्रेशन Shopify मधील कोणत्याही विद्यमान उत्पादनांवर ओव्हरराईट करत नाही. तुमची मायग्रेट केलेली उत्पादने Quickbooks टॅगसह आणि मसुदा स्थितीसह इंपोर्ट केली जातात. तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- Quickbooks टॅग वापरून तुमची इंपोर्ट केलेली उत्पादने फिल्टर आणि सॉर्ट करा.
- तुमची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करण्यापूर्वी उत्पादन माहितीचे पुनरावलोकन करा आणि आवश्यक ते बदल करा. तुम्ही वैयक्तिक उत्पादनांसाठी किंवा बल्क एडिटर वापरून बल्कमध्ये उत्पादनाची स्थिती Draft (मसुदा) वरून Active (सक्रिय) मध्ये बदलू शकता.
डेटा मायग्रेशन आयटम मर्यादा
तुम्ही दररोज 50,000 पर्यंत आयटम्स मायग्रेट करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 1,50,000 आयटम्स असल्यास, तुमचा डेटा QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट करण्यासाठी सुमारे तीन दिवस लागतील. ही आयटम मर्यादा उत्पादने, ग्राहक आणि इन्व्हेंटरी यांसारख्या सर्व इंपोर्ट फाईल्सवर लागू होते.
मायग्रेशन पूर्ण होण्यासाठी एक तास ते पाच तास लागू शकतात. मायग्रेशनचा कालावधी तुमच्या QuickBooks POS सेटअप, तुम्ही मायग्रेट करत असलेल्या डेटाचे प्रमाण किंवा तुमच्या ठिकाणांच्या संख्येसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.
आयटम क्रमांक आणि UPCs
QuickBooks एकाच उत्पादनासाठी एकाधिक स्कॅन करण्यायोग्य बारकोड्सला अनुमती देते. Shopify प्रत्येक उत्पादनासाठी किंवा व्हेरिएंटसाठी 20 पर्यंत बारकोड्सला सपोर्ट करते, त्यामुळे तुम्ही हे सर्व क्रमांक जतन करून ठेवू शकता. मायग्रेशन दरम्यान, बारकोड म्हणून कोणता उत्पादन क्रमांक इंपोर्ट करायचा ते तुम्ही निवडू शकता. तुम्हाला आयटम क्रमांक किंवा UPC मधून निवड करणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही दोन्ही निवडू शकत नाही.
मायग्रेशननंतर, तुम्ही उर्वरित क्रमांक बारकोड्स म्हणून तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये किंवा Barcodes उत्पादन CSV फाईल मधील कॉलमच्या मदतीने जोडू शकता. CSV कॉलम हेडर इंग्रजीमध्येच राहणे आवश्यक आहे. उत्पादनांमध्ये बारकोड्स जोडण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
Shopify मध्ये, तुम्ही इन्व्हेंटरी उत्पादनाला SKU क्रमांकदेखील संलग्न करू शकता. Shopify POS मध्ये, बारकोडप्रमाणेच SKU स्कॅन आणि शोधण्यायोग्य असते. मायग्रेशननंतर तुम्ही CSV फाईल वापरून बल्कमध्ये SKUs संपादित करू शकता.
POS मध्ये बारकोड्स आणि SKUs वापरण्याबद्दल जाणून घ्या.
कनेक्टर अॅप वापरून मायग्रेट न करता येणारा QuickBooks डेटा
खालील डेटा QuickBooks Desktop Connector अॅप वापरून QuickBooks POS वरून Shopify मध्ये मायग्रेट केला जाऊ शकत नाही, परंतु तुम्ही तुमचा डेटा इंपोर्ट करण्यासाठी पर्यायी पद्धती शोधू शकता:
उत्पादन प्रतिमा
उत्पादन प्रतिमा QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट केल्या जात नाहीत. तरीही, तुम्ही QuickBooks POS वरून बल्कमध्ये तुमची इन्व्हेंटरी चित्रे मॅन्युअली एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही तुमच्या प्रतिमा एक्सपोर्ट केल्यानंतर, तुम्ही खालीलपैकी एक पद्धत वापरून या प्रतिमा Shopify मध्ये इंपोर्ट करू शकता:
- Dropbox किंवा Google Photos सारख्या टूलचा वापर करून प्रतिमा ऑनलाइन सार्वजनिकरित्या उपलब्ध करा, Shopify वरून तुमची उत्पादन सूची एक्सपोर्ट करा, प्रत्येक आयटमसाठी योग्य प्रतिमा URLs जोडा आणि नंतर CSV फाईल वापरून प्रतिमा पुन्हा अपलोड करा
- तुमच्या प्रतिमा इंपोर्ट करण्यासाठी ifyApps Image Manager सारखे तृतीय-पक्ष अॅप वापरा
- तुमच्यासाठी उत्पादन प्रतिमा एक्सपोर्ट आणि इंपोर्ट करण्यासाठी Shopify पार्टनर नियुक्त करा
अल्टरनेटिव्ह लूकअप (ALUs)
Shopify मध्ये उत्पादन SKU क्रमांक म्हणूनही ओळखले जाणारे, अल्टरनेटिव्ह लूकअप (ALUs) QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट केले जात नाहीत. तुम्ही प्रारंभिक डेटा मायग्रेशन पूर्ण केल्यानंतर, तुम्ही ALUs QuickBooks POS वरून Shopify मधील SKU (स्टॉक कीपिंग युनिट) फील्डमध्ये मॅन्युअली इंपोर्ट करू शकता.
ट्रान्सफर स्लिप्स
ट्रान्सफर स्लिप्स QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट केल्या जात नाहीत. तुम्ही Shopify मध्ये उत्पादन ट्रान्सफर्स म्हणून ट्रान्सफर स्लिप्स मॅन्युअली इंपोर्ट करू शकता.
ऑर्डर्स, खरेदी ऑर्डर्स आणि सवलती
ऑर्डर इतिहास, जसे की ऑर्डर्स, खरेदी ऑर्डर्स, सवलती आणि ग्राहक ऑर्डर इतिहास, QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट केला जात नाही. तुम्ही Shopify वर मायग्रेट केल्यानंतर, तुमच्या नवीन खरेदी ऑर्डर्स Stocky अॅपमध्ये तयार केल्या जातात आणि QuickBooks Desktop अकाउंटिंग सॉफ्टवेअरसोबत सिंक केल्या जातात.
विद्यमान स्टोअर क्रेडिट
स्टोअर क्रेडिट QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट केले जात नाही. तुमचे स्टोअर क्रेडिट गिफ्ट कार्ड्स म्हणून Shopify वर मायग्रेट करण्यासाठी तुम्ही Selling Point सारखी तृतीय-पक्ष अॅप्स वापरू शकता.
तुम्ही Selling Point अॅप वापरणे निवडल्यास, तुम्हाला तुमचा गिफ्ट कार्ड अहवाल एक्सपोर्ट करण्यासाठी सेट अप करणे, तुमचा अहवाल Selling Point अॅपमध्ये इंपोर्ट करणे आणि त्यानंतर ही गिफ्ट कार्ड्स स्टोअरमध्ये वापरण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला पुन्हा जारी करणे आवश्यक आहे.
ग्राहक निष्ठा माहिती
ग्राहक निष्ठा माहिती QuickBooks POS वरून Shopify वर मायग्रेट केली जात नाही. तुमची ग्राहक निष्ठा माहिती Shopify वर मायग्रेट करण्यासाठी तुम्ही Growave, Smile, Yotpo किंवा Loyalty Lion सारखे तृतीय-पक्ष अॅप वापरू शकता.