वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सुरळीत इन्व्हेंटरी व्यवस्थापन अनुभवाची खात्री करण्यासाठी Shopify सोबत Stocky वापरण्याबाबत वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांच्या या उत्तरांचे पुनरावलोकन करा.
या पेजवर
मी Shopify आणि Stocky मधील खर्चाच्या किमती सिंक करू शकतो का?
होय, Shopify आणि Stocky मध्ये खर्चाच्या किमती सिंक होतात. खर्चाच्या किमती अपडेट करण्यासाठी, Stocky मध्ये, खाते आयकनवर क्लिक करा आणि नंतर प्राधान्ये > COGS वर क्लिक करा. Stocky वरून Shopify वर किमती अपडेट करण्यासाठी, Shopify वर सरासरी खर्च सिंक करा वर क्लिक करा. Shopify वरून Stocky वर किमती अपडेट करण्यासाठी, Stocky मध्ये खर्चाच्या किमती सिंक करा वर क्लिक करा.
मी Stocky मध्ये तयार केलेले कस्टम फील्ड्स माझ्या Shopify ॲडमिनमध्ये वापरू शकतो का?
नाही. Stocky चे कस्टम फील्ड्स फक्त Stocky मध्येच वापरले जाऊ शकतात.
मी Stocky सोबत बारकोड स्कॅनर वापरू शकतो का?
होय. खरेदी ऑर्डर्स प्राप्त करणे, स्टॉक ट्रान्सफर प्राप्त करणे आणि साठा मोजणी करणे यासह Stocky ची अनेक कार्ये बारकोड स्कॅनरच्या मदतीने केली जाऊ शकतात.
तुम्ही Stocky शी सुसंगत असा कोणताही USB कीबोर्ड बारकोड स्कॅनर वापरू शकता. तुम्ही Stocky सोबत बारकोड स्कॅनर वापरणे सुरू करण्यापूर्वी, स्कॅनर “कीबोर्ड मोड” किंवा HID मोड वापरण्यासाठी सेट केलेला असल्याची खात्री करा. हा मोड बारकोड स्कॅनरला ऑनलाइन स्टोअरशी संवाद साधण्याची अनुमती देतो, याउलट Shopify POS सारख्या अॅपला IOS मोड (कधीकधी SPP किंवा ॲप्लिकेशन मोड म्हटले जाते) आवश्यक असतो.
सॉकेट मोबाईल 1D बारकोड स्कॅनरचा मोड बदलण्यासाठी, स्कॅनरचा फॅक्टरी रीसेट करा.
Stocky नंबर्स राऊंड ऑफ कसे करते?
Stocky सर्व नंबर्सना दोन दशांश स्थानांपर्यंत राऊंड ऑफ करते आणि नंतर एकूण बेरीज प्रदान करण्यासाठी प्रत्येक लाइन आयटम जोडते. बाह्य अकाउंटिंग सॉफ्टवेअरशी जुळण्यासाठी तुम्हाला इन्व्हॉइसची एकूण बेरीज बदलण्याची आवश्यकता असल्यास, तुम्ही कोणत्याही इन्व्हॉइसमध्ये समायोजने फील्ड वापरू शकता.
Stocky हे Shopify सह सिंक का होत नाहीये?
दोन सामान्य परिस्थिती आहेत ज्या Stocky ला Shopify शी सिंक होण्यापासून थांबवतात:
- Shopify API सह कनेक्ट करण्यात अक्षम
- तुमच्या व्हेरिएंट ID मधील बदल
Shopify API सह कनेक्ट करण्यात अक्षम
Stocky तुमची स्टॉक पातळी अपडेट करण्याचा प्रयत्न करत असताना Shopify API अनुपलब्ध असल्यास किंवा एरर परत करत असल्यास, पाच मिनिटे प्रतीक्षा करा आणि पुन्हा सिंक करण्याचा प्रयत्न करा.
सिंक करण्याची समस्या सुटली नाही, तर ती तुमच्या उत्पादनाच्या व्हेरिएंट ID मधील बदलामुळे असू शकते. एररचे निराकरण करण्यासाठी पुढील विभागातील मार्गदर्शकाचे अनुसरण करा.
तुमच्या व्हेरिएंट ID मधील बदल
Shopify मधील प्रत्येक उत्पादन आणि व्हेरिएंटचा स्वतःचा एक युनिक ID असतो, ज्याला व्हेरिएंट ID म्हटले जाते. या युनिक ID चा वापर करून Stocky हे Shopify शी संवाद साधते. तुम्ही एखादे उत्पादन हटवले, तरीही Stocky त्याच व्हेरिएंट ID शी संलग्न राहते. उदाहरणार्थ, काही अॅप्स किंवा उत्पादने मोठ्या प्रमाणात इंपोर्ट केल्याने तेच उत्पादन हटवले जाऊन पुन्हा तयार केले जाऊ शकते, ज्यामुळे व्हेरिएंट ID बदलतो. जेव्हा असे घडते, तेव्हा Stocky ला हटवलेल्या उत्पादनाचा व्हेरिएंट ID शोधता येत नाही आणि त्या उत्पादनाच्या माहितीसोबत सिंक करण्यात अयशस्वी ठरते.
तुमच्या Stocky मधील खरेदी ऑर्डर (PO) मध्ये एखादे हटवलेले उत्पादन असल्यास, हटवलेले उत्पादन काढून टाकण्यासाठी आणि नवीन व्हेरिएंट ID सह नवीन उत्पादन जोडण्यासाठी तुम्हाला PO संपादित करणे आवश्यक आहे. तुम्ही PO संपादित केल्यानंतर, Stocky पुन्हा सिंक करू शकते.
तुमच्या व्हेरिएंट IDs मध्ये बदल करणे टाळण्यासाठी, या सर्वोत्तम पद्धती फॉलो करा:
- जेव्हा तुम्ही Shopify मध्ये उत्पादने अपडेट करता, तेव्हा उत्पादन हटवू नका आणि तत्सम उत्पादन तयार करू नका. व्हेरिएंट ID तोच राहील याची खात्री करण्यासाठी नेहमी मूळ उत्पादन संपादित करा.
- जेव्हा तुम्ही Shopify मध्ये उत्पादने मोठ्या प्रमाणात इंपोर्ट करता, तेव्हा तुमच्या उत्पादनांसाठी तेच व्हेरिएंट IDs कायम ठेवण्यासाठी नेहमी समान हँडल असलेली कोणतीही वर्तमान उत्पादने बदला वर क्लिक केल्याची खात्री करा.
तुमच्या व्हेरिएंट ID वर परिणाम करू शकणारी कोणतीही कृती तुम्ही करत नसल्यास, तुमच्या इतर अॅप्सपैकी एखाद्या अॅपमुळे सिंकची समस्या उद्भवत असू शकते.